अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी एक जागरुक मतदार असल्यामूळे मलाही दोन्ही ( चारहि) उमेदवारांचे टॅक्स रिटर्न्स बघण्याची तीव्र इच्छा आहे. कधी पूर्ण होणार देव जाणे बुवा.

म्हणे मुरलेली राजकारणी... >> राज अहो 'जनाची नसेल पण मनाची लाज वाटत असेल तिला' असे समजा. सगळेच काही कोडगे नसतात Wink

न्युमोनिया बद्दल एक रेफ्रेशर वाचून बघितले.
http://www.webmd.com/lung/understanding-pneumonia-basics

हे क्लासच आहेत

This is the first time Republicans have cared about a woman’s health.
— Chase Mitchell (@ChaseMit) September 11, 2016

Cheney’s bad heart, Bush 41 spewed, FDR had polio ... but a lady gets the vapors & it’s a crisis.@HillaryClinton pic.twitter.com/KhV3kbaeZY
— Col. Morris Davis (@ColMorrisDavis) September 12, 201६

Antibiotics can cure pneumonia but they can’t cure misogyny, racism, xenophobia, ignorance or wanting to bang your daughter. #HillarysHealth
— OhNoSheTwitnt (@OhNoSheTwitnt) September 12, 2016

Why didn’t @HillaryClinton tell the press years ago she might get pneumonia?Release the surveillance cameras. #DripDrip #FeedsTheNarrative
— (((Andy Kindler))) (@AndyKindler) September 12, 2016

मात्र एखादी व्यक्ती खरोखर कशी वागली आहे ते न बघता तो असा वागला असेलच असा आततायी निष्कर्ष काढणे हे द्वेषमूलक असू शकते. >> यातही द्वेष नाही. ट्रम्प ने त्याचा पॅटर्न तसा केला आहे. जॉन मॅकेन च्या पकडले जाण्याबद्दल व त्या खान कुटुंबियांबद्दल अगदी इन्सेन्सिटिव्ह कॉमेण्ट्स त्याने मारल्या आहेत. त्या तुलनेत आजारपणाबद्दल त्याने मारली असती तरी आश्चर्य वाटले नसते.

मिसळपाववरही मी शेंडेनक्षत्र असतो. पण क्वचितच. असो.

एक नवी थियरी म्हणजे हिलरीने वेळप्रसंग पडला तर असावी म्हणून एक तोतया हिलरी ठेवलेली आहे! हे म्हणजे फारच झाले.

त्यामुळे घेरी येऊन पडणारी हिलरी आपल्या मुलीच्या घरात गेली की काही क्षणात ठणठणीत होऊन बाहेर येते असे लोक म्हणत आहेत.

http://www.usatoday.com/story/news/nation-now/2016/09/13/internet-thinks...

तिची तथाकथित तोतया जास्त तरुण आणि जास्त शिडशिडीत बांध्याची आहे.

ही निवडणूक म्हणजे एखाद्या रहस्यकथेपेक्षा सुरस आणि खुमासदार होऊ लागली आहे!

>>सगळेच काही कोडगे नसतात<<

असं बोलुन तुम्हि हिलरीला तिच्या निसर्गदत्त देणगी पासुन पारखं करत आहात - असं नाहि तुम्हाला वाटत?.. Happy

डोक्यावर पडल्यामुळे (कंकशन) त्यांना बेनगाझी प्रकरणी केलेल्या विचारपूशीतले काहीही आठवत नाही >> या बद्दल काही पुरावा देता येईल का ?

हा म्हणा ट्रंप ला कोणी फॅक्ट्स विचारत नाही म्हणून आता त्याच्या समर्थकांना तरी फॅक्ट्स विचारायच्या नाहीत का? Proud

राज त्या लिंकमधला हा भाग मजेशीर आहे

A Clinton campaign aide said Clinton only referenced her concussion to explain she was not at work but for a few hours a day at that time, not that she did not remember things from that period.

The concussion was widely reported then, and Republicans have since used it to attack the 68-year-old candidate's health in a way her staff have said is unfounded.

The FBI report, which does not quote Clinton directly, is ambiguous about whether it was her concussion that affected her ability to recall briefings.

The FBI declined to provide further comment on the report.

कमाॅन यार, गिम्मी ए ब्रेक; आर यु गोइंग टु बिलिव हिलरी एड्ज जस्टिफिकेशन आॅर एफ्बिआय रिपोर्ट दॅट क्लियरली सेज -

"However, in December of 2012, Clinton suffered a concussion and then around the New Year had a blood clot," the FBI's summary said. "Based on her doctor's advice, she could only work at State for a few hours a day and could not recall every briefing she received."

इतकं का आश्चर्य वाटतंय हिलरीच्या हेल्थचा इश्यू होतोय त्याचं? रिपना ही निवडणूक जिंकायची आहे, सो ह्यावर जर मतं फिरणार असतील तर लोकं फिरवणारच की.

आश्चर्य नाही रे. फक्त इतकंच वाटतं आहे की आता पर्यंत जी लोकं फक्त कॉन्स्पिरसी थियरी मांडणारे आणि तसेच काही तरी नेहमी लिहिणारे असे लोक. त्यांना मिडीयाने मेन स्ट्रीम केले आहे आणि त्यांच्या कॉन्स्पिरसी उगाळत आहेत. Lol

हिलरीचे ते पडणे आणि सुरक्षा रक्षकांद्वारे उचलबांगडी करुन तिला गाडीत कोंबणे हे जर कुण्या हौशी क्यामेरावाल्याने टिपले नसते तर हिलरीने न्युमोनियाचे स्पष्टीकरण तरी दिले असते का? मला वाटत नाही.

काही गोष्टींमुळे ती हिलरीसारखी दिसणारी बाई हिलरी नसावी असा संशय बळावला (खरे खोटे देवच जाणे!)
१. तिने दोन चार वाक्ये बोलली आणि ती चक्क खोटी नसावीत असा संशय आला.

२. दोन तीन प्रश्न विचारले असता एकाचेही उत्तर "आठवत नाही" असे दिले नाही.

३. एकदोनदा तिने मनमोकळे हास्य केले परंतु आसपासच्या कुठल्याही काचसामानाला तडे गेले नाहीत!

४. बिल क्लिंटन तिच्याशी फारच प्रेमाने वागत होता!

काही गोष्टींमुळे ती हिलरीसारखी दिसणारी बाई हिलरी नसावी असा संशय बळावला (खरे खोटे देवच जाणे!) >> घ्या आता माबो वर पण कॉन्स्पिरसी थियरी वाचतो Lol

आता हा धागाही भोंदू फॉरवर्ड्स बरोबर एकरूप करावा Wink

मला हिलरीचा तो अडखळत गाडित बसतानाचा व्हिडियो पाहून बाई फार आजारी आहेत असे वाटले. असे असताना दोन तासात ही खडखदीत बरी कशी झाली याचे आश्चर्य वाटले व यात काहीतरी सम्शयास्पद आहे असा समज झाला.

हिलरी क्लिंटनच्या क्लिंटन फाऊंडेशनने सौदी अरेबिया, कतार, येमेन असल्या आजही मनाने अश्मयुगात रहाणार्‍या रानटी लोकांकडून कोट्यावधी डॉलर खिशात सारले आहेत. आता हे लोक समलिंगी, नास्तिक, बिगर मुस्लिम, महिला अशा लोकांना कसे बरे वागवतात? किती अतिरेकी संघटनांचे पुरस्कर्ते ह्या देशात रहातात आणि सुखेनैव अतिरेकी संघटना पोसतात?
वहाबी, सलाफी असे अतीजहाल विचार अन्य सौम्य मुस्लिम देशात पसरवून तिथल्या मुस्लिमांची डोकी फिरवतात?

अशाच लोकांमधून आयसिस, अल कायदा, लष्करे तोयबा, जैश ए महंमद, अल शबाब वगैरे थोर थोर संघटना प्रसवल्या नाहीत काय? मग असल्या लोकांकडून पैसे घेणारे देशाचे प्रमुख झाल्यावर काय ह्या अतिरेक्यांवर मुक्तपणे कारवाई करतील?

पण हिलरी पडली पुरोगामी आणि ट्रंप प्रतिगामी. सबब, ट्रंपविरुद्ध साग्रसंगीत गरळ ओका. हिलरीबद्दल मात्र मौन. चालायचेच!

' क्लिंटननी निवडून आलो तर फांडेशनमधून बाहेर पडणार' हे जाहीर केले आहे हा फूटकळ तपशील आहे. ट्रंप ची मिडल ईस्टमधे अजिबात गुंतवणूक नाहि हे ज्ञान मला नव्हते. ट्रंप ने टॅक्स रीटर्न्स जाहिर केले कि कळेलच. कधी होणार बरे ते ? Wink

'क्लिंटनचे ईमेल्स' हा नक्की काय प्रकार आहे नि एकच भाग आहे कि त्यात बरेच पैलू आहेत ह्याबद्दल माहिती असण्याची शक्यता फारच कमी आहे. हे एकदा वाचून घेतले कि नक्की कशाबद्दल कोण का बोंबाबोंब करतोय हे समजायला सोपे जाईल. बोंबाबोंब करणार्‍यांना हे कळले असेल ह्याची शक्यता कमी आहे हा भाग अलहिदा Wink
http://www.vox.com/2016/9/13/12770636/hillary-clinton-email-scandals-exp...

किती भोंगळ लिहाल शेंन?
ज्या देशातून पैसा आला, मनाने अश्मयुगात, अशा ठिकाणहून अतिरेकी, मुक्त कारवाया. टिपिकल कॉन्झरवेटिव्ह फिअर मोन्गरिंग. Happy

ट्रंप हा टाकाऊंचे टोपले अर्थात बास्केट ओफ डिप्लॉरेबल्स असल्याचे प्रमाणपत्र हिलरीनेच दिलेले आहे. त्यामुळे तो वाईट वागला तर आश्चर्य नको. पण समलैंगिकांचे, काळ्यांचे, स्त्रियांचे कैवारी म्हणवणारे क्लिंटन दांपत्य सौदी अरेबियाकडून खोर्‍याने पैसे घेते तेव्हा जनाची वा मनाची लाज का नसते? जिथे गे लोकांना केवळ गे आहे म्हणून ठार मारले जाऊ शकते वा जाहीररित्या चाबकाने फोडले जाते, जिथे बायकांनी गाडी चालवायचा "अतीगंभीर गुन्हा" केला तर त्याला कारावास वा फटके मिळतात, जिथे इस्लामविरुद्ध बोलल्याचा संशयही आला तर जाहीर फटके वा शिरच्छेद केले जातात त्या देशाकडून पैसे का घेतले?
पकडले गेल्यावर फाऊंडेशनमधून बाहेर पडणार वगैरे मखलाशीचा काहीही उपयोग नाही. अब्रू गेली ती गेलीच.

ट्रंपच्या टॅक्स रिटर्नशी ह्याची तुलना होत नाही. राष्ट्रपतीच्या उमेदवाराने मागे भरलेल्या आयकराची माहिती द्यावी असा काहीही कायदा नाही. पूर्वी होत होते म्हणून ते केलेच पाहिजे असे नाही. त्याने तसे केले नाही म्हणून त्याला मत न देण्याचा लोकांना अधिकार आहेच पण माझ्या लेखी काही ते असे अब्रह्मण्यम वगैरे नाही. नसले दाखवायचे तर नको दाखवूस.
==
किती भोंगळ लिहाल शेंन?
ज्या देशातून पैसा आला, मनाने अश्मयुगात, अशा ठिकाणहून अतिरेकी, मुक्त कारवाया. टिपिकल कॉन्झरवेटिव्ह फिअर मोन्गरिंग.
==
गे असणे, धर्माविरुद्ध टीका करणे अशा व्हिक्टिमलेस क्राईम्सकरता भयानक शिक्षा देणारे कायदे बनवणारे देश हे माझ्या लेखी अश्मयुगीन आहेत. ऊर्वरित जग त्याच्या कितीतरी पुढे गेलेले असताना अट्टाहासाने मध्ययुगातले कायदेकानून डोक्यावर बसवायचे ह्याला आपण काय पुरोगामीत्व म्हणणार काय?

सौदी अरेबिया हा दहशतवादाचा, वहाबी पंथाचा, सलाफी लोकांचा जनक आहे हे उघड सत्य आहे.
९/११ घडवून आणणार्यात सर्वाधिक लोक कोण होते? अर्थातच सौदी नागरिक. ह्या वास्तवाला फियर माँगरिंग म्हणायचे असेल तर जरुर म्हणा. पण् त्याने वस्तुस्थिती बदलत नाही.

शेंन - एक करेक्शन. डिप्लोरेबल्स हे ट्रम्प च्या काही ("अर्ध्या") समर्थकांना उद्देशून आहे. स्वतः ट्रम्प ला नव्हे.


"...You know, to just be grossly generalistic, you could put half of Trump's supporters into what I call the basket of deplorables. Right? The racist, sexist, homophobic, xenophobic, Islamaphobic -- you name it."

मी असे गृहित धरतो की ट्रंप हा स्वतःला मत देणार आहे हिलरीला नाही तेव्हा तो ट्रंप समर्थक आहे!
आणि त्यानंतर एक नाणे उडवून तो छापा पडल्यास टोपलीतला व काटा पडताच बाहेरचा असा निर्णय करण्याऐवजी त्याची प्रतिमा मुस्लिमद्वेष्टा, लॅटिनोद्वेष्टा, समलैंगिकद्वेष्टा आहे का असा प्रश्न विचारताच तो टाकाऊ टोपल्याच्या टीममधे सामिल करावा लागला.

अजून एक मोठा फरक. ट्रंप हा कधीही राजकारणी नव्हता. देशाच्या धोरणांचे निर्णय घेण्याचा त्याला कधीच अधिकार नव्हता. त्यामुळे त्याच्या ट्रस्टचे कुठल्या देशांशी संबंध कसे आहेत यावर अमेरिकेचे धोरण ठरत नव्हते.
याउलट हिलरीचे पहा, एका पाजी आय मीन माजी राष्ट्रपतीची बायको, सिनेटर, परराष्ट्रमंत्री. हे सगळे पुरेसे प्रभावी हुद्दे आहेत ज्यावर देशाची धोरणे ठरू शकतात. त्यामुळे तिचे नि:संकोच असल्या दुष्ट राष्ट्रांकडून देणग्या घेणे खटकणारे आहे. आता हात झटकून बरबटलेले हात साफ होणार नाहीत.

जिथे इस्लामविरुद्ध बोलल्याचा संशयही आला तर जाहीर फटके वा शिरच्छेद केले जातात त्या देशाकडून पैसे का घेतले? >>> तुम्ही त्या देशाकडून घेतलेले पेट्रोल का वापरता? Proud

गे असणे, धर्माविरुद्ध टीका करणे अशा व्हिक्टिमलेस क्राईम्सकरता भयानक शिक्षा >> आणि मग तुमच्या नेत्याचे यांना अमेरिकेत येण्याकरता बंदी घाला, हे लोक रेपिस्ट असतात तर भिंत बांधा, तेल चोरा, त्यांच्या मुला - बायकांचा छळ करा वगैरे वक्तव्य तर अगदी २२ च्या शतकातले आहेत ना ?

तोतया हिलरीलाच होऊ देत मग प्रेसिडेन्ट
त्यापेक्षा, मेलानि बरी नाही का?

तोतया हिलरी नि मेलनि यांच्यात beuty pagent करा, नि अर्थात ट्रंप ठरवणार निकाल.

बाकी या निवडणुका याहून काही जास्त बघण्याजोग्या, ऐकण्याजोग्या नाहीत.

Happy

ट्रंप बोलू दे किंवा कुणि हिलिबिली बोलू दे, एकंदरीत बर्‍याच लोकांच्या भावना तशाच झाल्या आहेत हे अजूनहि ट्रंप ला पाठिंबा देणारे लोक आहेत, त्याच्या बोलण्यातून काहीतरी अर्थपूर्ण शोधून काढण्याचा प्रयत्न करणारे, न जमल्यास हिलरीला शिव्या देणारे लोक आहेतच यावरून दिसते.

राजकारण म्हणजे तिसरी चौथीतल्या मुलांची भांडाभांडी झाली आहे - माझ्या नाकाला शेंबूड, तर तुझ्या गालावर काळा डाग असली बोलणी.

बाकी शंभर वर्षांनी या देशाचे पाच खंड पडतील - काही भाग भारतीय, काही चिनी, काही ज्यू, मध्य अमेरिका गोर्‍या लोकांच, दक्षिणेतील देश मेक्सिकोचे, नि काळ्या लोकांच्या वस्त्या अधून मधून.

लिहून ठेवा - नातवंडांना सांगून ठेवा. कुणि Time vault मधे शंभर वर्षांनी उघडण्यासाठी पुरून ठेवणार असतील तर मायबोलीचे नाव लिहून त्यात ठेवा.

Pages