Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !!
बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
>>बुश ॲडमिनिस्ट्रेशन एक्झिट
>>बुश ॲडमिनिस्ट्रेशन एक्झिट स्ट्रॅटजी डिफाइन करते : जोक ऑफ द इयर !<<
vijaykulkarni, अभ्यास वाढवा...
अरे पण युद्ध अशीच होतात
अरे पण युद्ध अशीच होतात ना?
आता हिरोशिमावर अणुबॉम्ब टाकायचं ठरलं तेव्हा आईनस्टईन पासून (सहभागाची हळहळ व्यक्त करत) किती जणांचा विरोध डावलत, जर्मनीचे हार पत्करल्यानंतर, जपानही जवळजवळ हरल्यात जमा असताना, टेम डाऊन हल्ला शक्य असाताना, अणुबॉम्बची भीती दाखवून इ. इ. काहीही न करता अख्खच्या अख्ख शहर, निरपराध नागरिकांपासून सगळ्याना मारणे. पण याचा अमेरिकेला पुढे चिक्कार फायदा झाला.
भयानक आहे, पण वरचढ ठरायला काय थर गाठला जातो.
असा इराकचाही होऊ शकला असता, पण एक्झिक्युट होताना फासे उलटे पडले.
इराक युद्धाबद्दल हिलरी ही
इराक युद्धाबद्दल हिलरी ही एकमेव जबाबदार आहे असे मी तरी म्हणत नाही. बुश आणि चेनी हे मुख्य जबाबदार आहेतच. पण ना बुश शर्यतीत आहे ना चेनी. इराक युद्धाची समर्थक हिलरी मात्र शर्यतीत आहे. ती तिच्या प्रदीर्घ राजकीय अनुभवाचे गुणगान वरचेवर करत असते. त्या अनुभवात असले सडके नासकेही काही आहे हे पुन्हा पुन्हा सांगणे आवश्यक आहे. बुश आणि चेनीला मुसक्या बांधून आंतरराष्ट्रीय कोर्टात खेचायला माझी हरकत नाही. पण ना हे ओबामाने केले ना हिलरी करेल. ट्रंपही करणार नाहीच. त्यामुळे तो मुद्दा पूर्ण गैरलागू आहे.
बुशने दिशाभूल केली म्हणून बिचारी हिलरी युद्धाला समर्थन देती झाली वगैरे सबबी अत्यंत लंगड्या आहेत. एका मुरब्बी, बेरकी, धूर्त, जाणकार वगैरे विरोधकाने सत्ताधारी बुशच्या ओंजळीने पाणी प्यायचे काय कारण? व्हिएटनामच्या युद्धानंतर तरी राज्यकर्त्यांचे दावे तपासून घ्यावेत इतकी अक्कल अनुभवी राजकारणी जो विरोधी पक्षात आहे त्याला नसावी? असल्या अनुभवाचा काय उपयोग मग? इराकची राजकीय आणि भौगोलिक परिस्थिती, सद्दामची पार्श्वभूमी ह्याचा कसलाही अभ्यास न करता बुशच्या धोरणांना मम म्हणणारा नेता कसला? तो एक मठ्ठ अनुयायी (वा अत्यंत लबाड संधीसाधू) आहे. बिकट परिस्थितीतच व्यक्तीचा स्वभाव कळतो. बर्नीने इराकवरील हल्ल्याला विरोध केला. ओबामानेही केला. हिलरीलाही तसे करता आलेच असते. पण तिने ते केले नाही. रिपब्लिकनपैकी ज्यांनी युद्धाला पाठिंबा दिला ते शर्यतीतून फेकले गेले. मॅकेन, लिण्ड्सी ग्रॅहॅम, जेब बुश, न्यूट सगळे शर्यतीत हरले. तशीच हिलरीही हरायलाच हवी. इतक्या अक्षम्य, गलथानपणाची तिला शिक्षा मिळालीच पाहिजे. २००८ ची शर्यत ती ओबामाशी हरली ती इराकमुळेच. आताही तसेच व्हावे.
ओबामा आणि हिलरी जेव्हा सत्तेवर आले तेव्हा बुशने केलेली इराकची धूळदाण त्यांच्या समोर होती. भूतकाळ आणि वर्तमान बदलता येणार नाही ही जाणीव त्यांना असायला हवी होती. अमेरिकन सैन्य भराभर काढल्याने जी पोकळी होईल ती आयसिससारख्या पिसाटांनी भरली जाईल ह्याची पूर्वकल्पना असायला हवी होती. गुप्तचर खाते, सैन्याचे अधिकारी अन्य व्यवस्था ह्या अमाप पैसे खर्च करुन त्यांच्या दिमतीला असतात. पण त्यांच्या आततायीपणामुळे आयसीस फोफावले आहे.
बुशने सुरवात करुन दिली हे मान्य पण ओबामाने आयसिसला मोकळे रान दिले हेही तितकेच खरे. तो बेसावध राहिला हेही खरे. आणि हिलरी मंत्रीमंडळात होती त्यामुळे तिच्यावरही ह्याची जबाबदारी येतेच.
व्यक्तीशः मी इराकच्या युद्धाच्या बाजूने कधी म्हणजे कधीच नव्हतो. एकंदरीत सद्दामचे व्यक्तीमत्त्व वगैरे पाहून तो एक माजलेला हुकुमशहा आहे. कट्टर वहाबी लोकांना तो कधीही पसंत पडला नसता. त्यामुळे ९/११ च्या हल्ल्यात त्याचा सहभाग असण्याची शक्यता नाही हे आधीच उघड दिसत होते. रिपब्लिकन समर्थकांच्या इराक कसा घातक आहे, त्यामुळे मश्रुम क्लाऊड इन मॅनहटन कसा होऊ शकतो वगैरे वल्गना ह्या पोकळ असल्याचे मला जाणवत होते. त्यामुळे मी या युध्दाचा कायमच विरोधक राहिलो आहे. आणि ज्यांनी ज्यांनी ह्या युद्धाला समर्थन दिले त्यांना जबरदस्त किंमत मोजायला लागलीच पाहिजे असे माझे मत आहे.
आणि ज्यांनी ज्यांनी ह्या
आणि ज्यांनी ज्यांनी ह्या युद्धाला समर्थन दिले त्यांना जबरदस्त किंमत मोजायला लागलीच पाहिजे असे माझे मत आहे. >>
बरोबर, म्हणूनच रिपब्लिकन पक्षाला निवडून देवू नका
<आजिबात कुठेही पुरावा नाही
<आजिबात कुठेही पुरावा नाही त्याच्याकडे ड्ब्लू एम डी असल्याचा ते झुगारून "ही प्लॅण्ड टु किल माय डॅडी" असं म्हणत वड्याचं तेल वांग्यावर काढत युद्धात झोकलं अमेरिकाला. मलातर बॉलिवुडी सिनेमासारख बापाचा राहिलेला बदला हिरोने पुर्ण करण्याइतक शेन्डाबुडुख नसलेले वाटत होत.> यासाठी अगदी अगदी.
माझे एक काका इराकला गेले होते तेंव्हा सद्दामने त्याच्या एक सरकारी मोठ्या हॉटेलाच्या बाहेर बुश चा मोठा फोटो जमिनीवर लावला होता त्यावर पाय देउनच त्या इमारतीत आत जाता येत असे असं सांगितले होते. सद्दाम आणि बुश चे वैर एकदम पर्सनल लेव्हल पर्यंत गेले होते असं वाटले.
आता असं आहे, शेवटी ओबामा ज्या
आता असं आहे, शेवटी ओबामा ज्या प्रॉमिसेज देऊन निवडून आला ते त्याला पुर्ण करणे भाग होते. कँपेन मध्ये आपण काय प्रॉमिस करतो आणि पुढे ते डिलिवर करायला खरच जमणार आहे का हे समजणं फार अवघड आहे. ह्यावेळी सँडर्सबाबत पण साधारण अशीच भिती वाटत होती.
ओबामा जेव्हा ट्रूप्सना लवकर परत आणेन म्हणत होता तेव्हा तो चांगलाच कॉज वाटत होता. बिन कामाच्या युद्धात बळच कित्येक सैनिकांचे जीव गमावले गेले, इराकी सामान्य जनतेबाबतीत तर काही बोलायलाच नको. सैन्याला लवकर परत आणलं तर मग पुढे आयसिस तयार झालं. त्यात ओबामाला किती दोष द्यावा हे समजत नाही.
बुवा, ओबामा जे करून दाखवेन
बुवा, ओबामा जे करून दाखवेन म्हणाला त्यातलं अर्धा टक्का जरी झालं नाही तरी खडे फोडणारी माणसं (म्हणजे थोडक्यात शेंडेनक्षत्र) सोयोस्कररित्या ट्रंप जे अद्वातद्वा बोलतोय ते काही खरच करणार नाहीये. मत मागताना बोलायची भाषा आणि नंतर करायची भाषा वेगळी असते असं म्हणतात. यातच सगळं आलं.
आणि ज्यांनी ज्यांनी ह्या
आणि ज्यांनी ज्यांनी ह्या युद्धाला समर्थन दिले त्यांना जबरदस्त किंमत मोजायला लागलीच पाहिजे असे माझे मत आहे. >>
बरोबर, म्हणूनच रिपब्लिकन पक्षाला निवडून देवू नका >> आमेन, बर झाले शे.न. स्वतःच बोललेत वरचे वाक्य
बुशने सुरवात करुन दिली हे मान्य पण ओबामाने आयसिसला मोकळे रान दिले हेही तितकेच खरे. तो बेसावध राहिला हेही खरे > > म्हणजे तुम्हाला ओबामा ने सिरीयामधे सैन्य उतरवायला हवे होते असे सुचवता आहात हे लक्षात येतेय ना ? तीन-चार पोस्ट पूर्वी हिलरी भयंकर युद्धखोर आहे म्हणून ती सत्तेत येउ नये वगैरे म्हणाला होता.
अमित
अमित
ओबामा-क्लिंटन फेल्ड फाॅरेन
ओबामा-क्लिंटन फेल्ड फाॅरेन पाॅलिसीचं हे अजुन एक उदाहरण. अलेपो, सिरीयातल्या डाॅक्टरांचं ओबामाला भावनीक आवाहन...
ॲज आय टाइप धिस, आॅर व्हेन यु आर रिडिंग इट, चिल्ड्रेन आर डाइंग इन अलेपो ड्यु टु इनॲडिक्वेट/ॲबसेंस आॅफ लाइफ सपोर्टिंग मेडिकल फॅसिलिटिज, वाॅर टाॅर्न सराॅंडिंग्ज. आॅल ॲट्रिब्युटेड टु युएस इनॲक्शन...
काय घंटा फायदा झाला त्या नोबेल पीस प्राईझ दिल्याचा?..
== आणि ज्यांनी ज्यांनी ह्या
==
आणि ज्यांनी ज्यांनी ह्या युद्धाला समर्थन दिले त्यांना जबरदस्त किंमत मोजायला लागलीच पाहिजे असे माझे मत आहे. >>
बरोबर, म्हणूनच रिपब्लिकन पक्षाला निवडून देवू नका >> आमेन, बर झाले शे.न. स्वतःच बोललेत वरचे वाक्य
==
इराक युद्धाचे फलित म्हणूनच रिपब्लिकन पक्ष लागोपाठ दोन वेळा अध्यक्षपद गमावून बसला. २००८ आणि २०१२ आता जर हिलरीलाही तसेच दोनदा अध्यक्षपदापासून वंचित रहायला लागले (२००८ आणि २०१६) तर मग हिशेब व्यवस्थित पूर्ण होईल, कसे?
==
म्हणजे तुम्हाला ओबामा ने सिरीयामधे सैन्य उतरवायला हवे होते असे सुचवता आहात हे लक्षात येतेय ना ?
==
आजिबात नाही. सैन्य उतरवणे हा एकमेव उपाय नाही. गैरसमज नसावा. इराकमधे असलेले सैन्य काढून घेण्यापूर्वी निर्माण होणार्या पोकळीत काय जन्म घेणार आहे ह्याचा अंदाज ओबामाला आला नाही आणि त्यातून आयसिसचे बाळ जन्मले!
एक नेता म्हणून विविध प्रकारे धोरणे राबवता येतात. निव्वळ सैन्य पाठवणे हा एकमेव रामबाण भात्यात नसतो. आर्थिक नाकाबंदी, आयसिसला मदत करणार्या राष्ट्रांवर मोठा दबाव आणणे, अन्य प्रकारे ह्या अतिरेकाची पाळेमुळे खणून काढणे हे व्हायला हवे होते. तसे काही केले नाही. लिबिया व इजिप्तसारख्या देशातून हुकुमशहांना हाकलायला बंडखोरांना मदत करून इराकची पुनरावृत्तीच केली गेली. आणि तिथेही घात केला.
मग हिशेब व्यवस्थित पूर्ण
मग हिशेब व्यवस्थित पूर्ण होईल, कसे? >> असे कसे राव ? युद्धाचे प्रत्यक्ष कर्ते करविते वेगळे आहेत. त्यांना नि त्यांच्या सूरात सूर मिळवणार्यांना एकच न्याय कसा लावता ? 'युद्धच झाले नसते तर बाकीचे रामायण होणारच नाहिये' हा मुद्द्दा अजरामर आहे त्यामूळे फक्त दोनदाच का तर हकनाक मारल्या गेलेल्या प्रत्येक सैनिकाएव्हढे टर्म्स बाहेर राहायला हवे GOP ने असे मी म्हणतो. २०११ पर्यंत इराक मधून सैन्य बाहेर काढायचा प्लॅन बुश अॅडमिनिस्ट्रेशन ने ठरवला होता.
http://mediamatters.org/research/2010/06/27/memo-to-media-bush-set-a-tim...
एक नेता म्हणून विविध प्रकारे धोरणे राबवता येतात. निव्वळ सैन्य पाठवणे हा एकमेव रामबाण भात्यात नसतो. आर्थिक नाकाबंदी, आयसिसला मदत करणार्या राष्ट्रांवर मोठा दबाव आणणे, अन्य प्रकारे ह्या अतिरेकाची पाळेमुळे खणून काढणे हे व्हायला हवे होते. >> असे वर वर ढोबळ मानाने बोलणे सोपे आहे. अमेरिका हे करत नाहिये का ऑलरेडी ? हातावर हात धरून असलेले आहेत का ? passively युद्ध लढताना वेळ लागणार हे साहजिकच नाही का ? इथे जर ट्रंप किंवा चेनी असता तर ground forces घेऊन उतरले असते आत्तापर्यंत हे विसरू नका. जानेवारीमधे पेंटगॉनने दिलेल्या प्लॅन मधे more boots on ground असे स्पष्टपणे मागितले होते (http://www.militarytimes.com/story/military/war-on-is/2016/01/14/pentago...) हे चालले असते का ? 'साप पण मारायचा नि काठि पण तुटता कामा नये' हे कसे होणार ?
असो I think time to move on from this topic.
तो हान्स ब्लि, वेपन्स
तो हान्स ब्लि, वेपन्स इन्स्पेक्टर बोंबलून सांगत होता की आजिबात कुठेही पुरावा नाही त्याच्याकडे ड्ब्लू एम डी असल्याचा ते झुगारून "ही प्लॅण्ड टु किल माय डॅडी" असं म्हणत वड्याचं तेल वांग्यावर काढत युद्धात झोकलं अमेरिकाला.
आजिबात कुठेही पुरावा नाही त्याच्याकडे ड्ब्लू एम डी असल्याचा ते झुगारून "ही प्लॅण्ड टु किल माय डॅडी" असं म्हणत वड्याचं तेल वांग्यावर काढत युद्धात झोकलं अमेरिकाला.>> मलातर बॉलिवुडी सिनेमासारख बापाचा राहिलेला बदला हिरोने पुर्ण करण्याइतक शेन्डाबुडुख नसलेले वाटत होत.
सहमत.
बाकी अफगाणिस्तान मधे मात्र ताबडतोब घुसले होते. नि तिथेच अजून सडताहेत.
तसे सार्या जगाला माहित आहे की सौदी अरेबिया पैसे पुरवते नि पाकीस्तानमधे अमेरिकेने पढवलेले लोक अतिरेकीपणाचे शिक्षण देतात. पण सौदी ने बुशच्या धंद्यात पैसे गुंतवले होते नि रेगनच्या काळी रशियावर हेरगिरी करायला पाकीस्तानशी मैत्री म्हणून मुशर्रफ इज माय बडी!! तसेहि इराणवर नजर ठेवायला इराक ताब्यात घ्यावे असा विचार असावा. पण जमले नाही, कारण अक्कल कमी. Fools rush in where angels fear to trade.
एकटा बुशच किंवा ट्रंप मूर्ख नाही, अनेक दशलक्ष अमेरिकन लोक, डेमोक्रॅट्स काय नि रिपब्लिकन काय, इस्लाम, हिंदू या धर्मातील लोकांबद्दल नि ते जिथे रहातात त्या भागांबद्दल Totally clueless!
डिस्क्लेमरः
मला स्वतःला वैयक्तिकरीत्या यातले काही माहित नाहीये, पण ट्रंप चे बघून, जे काय तोंडाला येईल ते बोलून टाकायचे असे आता मी ठरवले आहे. ट्रंप नाही का म्हणत - मला माहित नाही पण लोक बोलतात, तसे आपण आता काही बाही बोलू.
तेव्हढीच मज्जा! करमणूक.
नाही तरी शेंडेनक्षत्र यांच्यासारखे हिलरी विरोधक नि ट्रंप चे चहाते आहेतच तसाच मीहि फक्त धम्माल येते म्हणून.
परवाच्या विल्मिन्ग्टनच्या
परवाच्या विल्मिन्ग्टनच्या भाषणात ट्रम्प ने एक स्वतःवरच गोल केला आहे. हिलरीसंबंधी बोललेले वाक्य त्यालाच जास्त लागू पडेलः
"It's one thing to make mistakes. It's another to be wacky, and make mistakes"
नन्द्या४३ मतदारांबाबतीत खरय
नन्द्या४३
मतदारांबाबतीत खरय मात्र. शेवटी असं आहे की कोण त्या रेस मध्ये जास्त प्रभावी "वाटतय" ह्यावरुन लोकं मतं देतात. आता नेमका त्यातल्या त्यात बरा कँडिडेट नेमका लेम डक निघाला की दुसरा चंपट असून सुद्धा प्रभावी वाटायला लागतो.
बुशच्या पहिल्या विलेक्शन मध्ये गोअर खरं खुप क्लोज आला होता पण अमेरिकेचं नशीबच खराब! रिवोट मध्ये बुशची सरशी झाली. पुढचं इलेकशन मात्र टोटली मुर्खपणाचा कळस होता! काय तर म्हणे अशा आणीबाणीच्या परिस्थिती मध्ये बुश बेटर लीडर ठरेल म्हणे! व्हॉट??? इथे केरी चांगला कँडिडेट असून सुद्धा त्याचा लेम डक झाला!!
फा
जाउ दे जाउ दे म्हणता हे
जाउ दे जाउ दे म्हणता हे देतोच, असे दिसतेय कि ट्रंप बाबांचे पण आधी वॉर ला हरकत नाही मधून सुरू होत मग मतपरीवर्तन झाले. असो
http://www.huffingtonpost.com/entry/donald-trump-iraq-war_us_57acdbb1e4b...
तर एक न्युज !!
तर एक
न्युज !!
http://www.fox8live.com/story/32743734/in-reversal-trump-says-is-claim-a...
मी खरं तर त्यांच्या आवडत्या ओरिजिनल फॉक्स न्युज वर शोधायचा प्रयत्न करत होतो पण तिथे सापडली नाही ही बातमी
पण खरंच आता मात्र मी
याच स्टेज ला आहे.
धनि, लिंक वर थु फो उत्तर मिळत
धनि, लिंक वर थु फो उत्तर मिळत आहे.
बदलली लिंक !
बदलली लिंक !
धनि तू बावळट आहेस (आय अॅम
धनि तू बावळट आहेस (आय अॅम बिइंग सॅर्कॅस्टिक)
आय अॅम बिइंग सॅर्कॅस्टिक >>
आय अॅम बिइंग सॅर्कॅस्टिक >> चक् विकु, हे दुसर्या दिवशी लिहायचे होते
हे दुसर्या दिवशी लिहायचे
हे दुसर्या दिवशी लिहायचे होते >> सगळीकडे आरडाओरडा, वादविवाद झाले की मग आरामात ट्विट करायचे
ट्रम्पः क्यार्र्रर्र्र,
ट्रम्पः क्यार्र्रर्र्र, क्युर्र्रर्र्र, क्यांर्रर्र, क्वार्र्रर्र, क्यिर्रर्र
ट्रम्पचे अंधसमर्थक*: बघा बघा, कसा 'सत्य वदे वचनाला नाथा' म्हणतोय!
वि.सू.:
१. हा विनोद आहे (किंवा सार्काझम!). तेव्हा ट्रम्पेटिअर्सनी भावना दुखावून घेतल्या किंवा नाही घेतल्या, तरी हरकत नाही
२. (फडकुलीण काकूंची क्षमा मागून)
*सन्मामनीय सदस्यांनी स्वतःला यातून वगळावे. किंवा वगळू नये. कसेही.
ट्र्म्पेटियर्स
ट्र्म्पेटियर्स
ट्रम्पः क्यार्र्रर्र्र,
ट्रम्पः क्यार्र्रर्र्र, क्युर्र्रर्र्र, क्यांर्रर्र, क्वार्र्रर्र, क्यिर्रर्र
ट्रम्पचे अंधसमर्थक*: बघा बघा, कसा 'सत्य वदे वचनाला नाथा' म्हणतोय!
>>> पर्फेक्ट
(No subject)
ट्र्म्पेटियर्स >> परफेक्ट
ट्र्म्पेटियर्स >> परफेक्ट
नंदन
नंदन
(No subject)
'सत्य वदे वचनाला नाथा'
'सत्य वदे वचनाला नाथा'
Pages