Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !!
बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
'व्यासोच्छिष्ठम जगद् सर्वम्'
'व्यासोच्छिष्ठम जगद् सर्वम्' सारखे ट्रंपसाठी काहितरी लवकरच लिहावे लागणार बहुधा.
https://www.buzzfeed.com/andrewkaczynski/trump-cites-iraq-withdrawal-he-...
These are classic gems
2007 :
“You know how they get out? They get out,” Trump said to CNN’s Wolf Blitzer. “That’s how they get out. Declare victory and leave, because I’ll tell you, this country is just going to get further bogged down. They’re in a civil war over there, Wolf. There’s nothing that we’re going to be able to do with a civil war. They are in a major civil war.”
2008 :
“First, I’d get out of Iraq right now,” Trump said to British GQ in a 2008 interview. “And by the way, I am the greatest hawk who ever lived, a far greater hawk even than Bush. I am the most militant military human being who ever lived. I’d rebuild our military arsenal, and make sure we had the finest weapons in the world. Because countries such as Russia have no respect for us, they laugh at us. Look at what happened in Georgia, a place we were supposed to be protecting.”
ट्रेवर नोआ ने
ट्रेवर नोआ ने म्हंटल्याप्रमाणे ट्रंप हा खरा stand up comedian आहे. पूर्वी डॉन रिकल्स नावाचा एक होता, त्याची ख्याति म्हणजे तो एकजात सगळ्यांची टिंगल करायचा, त्या वेळी लोक सभ्य असत. त्याची भाषाहि ट्रंपपेक्षा एकदम सभ्य होती. तो लोकप्रिय झाला.
आजकाल समाजाला गलिच्छपणा, मूर्खपणा, खोटे बोलणे, शिव्या देणे, जे जे वाईट असेल, तेच आवडते.
तर ट्रंप त्याच्या एक पाऊल पुढे जाऊन "विनोद" करतो नि मिडिया (धन्य ती आजकालची मिडिया!) त्याला प्रमोट करते! नाहीतरी ओबामाची भाषणे नि हिलरीची भाषणे समजतात कुणाला?
हा! ट्रंप्स र्हेटरिक इज नाॅट
हा! ट्रंप्स र्हेटरिक इज नाॅट गोइंग टु स्टाॅप ॲंड सो डज डॅंसिंग अराउंड आॅफ मिडिया, डेम्स ॲंड यु नो हु...
इट्स गान्ना बी फन राइड...
http://youtu.be/S0k1tsUpqi4
http://youtu.be/S0k1tsUpqi4
जेव्हा तथाकथित अनुभवी, धूर्त
जेव्हा तथाकथित अनुभवी, धूर्त राजकारणी हे गोल्डमन सॅक्स वा अन्य धनाढ्य लोकांच्या हातातले बाहुले बनतात, जेव्हा राजकीय स्वार्थाकरता आयसिससारख्या संघटनेला पोसतात, मुस्लिम लांगूलचालनाकरता दूतावासाच्या सुरक्षेत चालढकल करतात, आंधळेपणाने धर्मांध बंडखोरांना साधनसामग्री पुरवतात तेव्हा ट्रंपसारखेच पर्यायी उमेदवार लोक निवडणार.
पॉलिटिकली करेक्टच्या हव्यासापोटी जी बजबजपुरी माजवली गेली आहे तिला कंटाळून लंबक विरुद्ध दिशेला हेलकावण्याची ही प्रक्रिया आहे.
ट्रंपवरून विनोद करणार्यांनी हे कदापि विसरू नये की जॉर्ज डब्ल्यू बुश असाच असंख्य खो खो हसवणार्या चुटक्यांचा आणि विनोदांचे लक्ष होता. पण अशा विनोदांच्या आणि विनोदवीरांच्या नाकावर टिच्चून तो ८ वर्षे राज्य करुन गेलाच.
ट्रंपच्या चुका ह्या एखादा सूक्ष्मदर्शक एखादी पेशी दहा हजार पट मोठी करून दाखवतो तशा माध्यमे त्याचे स्वल्प प्रमादही कित्येक पट मोठे करुन दाखवतात. याउलट हिलरीच्या इमेल्स, हिलरीचा डेमॉक्रॅटिक पक्षातला घरभेदीपणा, तिची अफाट संपत्ती ह्या सगळ्या गोष्टी दाबून टाकताना सरळ दिसत आहेत. अनेक माध्यमांचे उच्चपदस्थ नेते हे क्लिंटन दांपत्याचे मांडलिक आहेत. त्यांना वचकून आहेत त्यामुळे पत्रकारितेत अभिप्रेत असणारे तटस्थपण त्यागून हे लोक हिलरीचीच तळी उचलत आहेत.
३ महिन्यात काय ते कळेलच. अमेरिकेच्या नशिबी हिलरी असेल तर तसेच होईल! अल्लाहचे बंदे खिज्र खान ह्यांनी अल्लाहची मर्जी हिलरीनेच निवडून यावे अशी असल्याचे ठणकावून सांगितल्याचे स्मरत असेलच.
पण हिलरीच्या एवढ्या चुका
पण हिलरीच्या एवढ्या चुका होत्या तर एक जरा सेन्सिबल पर्याय तरी द्यायचा. बाय द वे या बाफवर हिलरीच्या विरोधात एकाच वेळी ती युद्धखोर्/आक्रमक असल्याचा आरोप आहे, तसाच ती लांगूलचालन ई करता पॅसिफिस्ट असण्याचाही
ट्रम्प कॅम्पेन ची प्रवक्ती कत्रिना - तिला आता नक्कीच हरिकेन कत्रिना म्हणतील- गेल्या ४०-५० वर्षातील सर्व गोष्टींचा दोष ओबामावर टाकणे या एकाच कौशल्यावर त्या पदावर असेल.
काही दिवसांपूर्वी त्या कॅ. खान च्या मृत्यूबद्दल ओबामाला दोषी धरले होते. मृत्यू २००४ मधला. ओबामाचा इराक युद्धाशी काही संबंध तेव्हा नव्हता.
काल तिने नवीन एण्ट्री टाकलेली आहे - ओबामा ने अफगाणिस्तानवर हल्ला केला.
त्यावेळेस जो प्रेसिडेण्ट होता त्याचे नाव जॉर्ज डब्ल्यू बुश असे कोणीतरी तिला सांगायला हवे आहे
बिल मार च्या शो मधे सध्या
बिल मार च्या शो मधे सध्या अर्धा अधिक भाग ट्रम्प वर असतो. परवा तो म्हंटला
"... because he is a nominee, he will get intelligence from the military"
यावर हशा पिकल्यावर म्हंटला, "No. I don't mean it THAT way".
मग आणखी बोलताना म्हंटला, की नॉमिनीज ना मिलिटरी जनरल्स नेहमी अशी गोपनीय माहिती देतात, तशी प्रथा आहे. पण ट्रम्प ला तर ऑलरेडी सगळे माहीत आहे त्याच्या म्हणण्यानुसार, म्हणजे सध्या तोच मिलीटरी जनरल्स ना गोपनीय माहिती देत असेल, आंतरराष्ट्रीय राजकारणावर :).
आता हे बिल ला माहीत नसेल. पण या अर्थाने ट्रम्प हा अमेरिकन राजकारणातला रजनीकांत आहे
हिलरी युद्धखोर आणि
हिलरी युद्धखोर आणि मुस्लिमांचे लांगूलचालन करणारी आहे हे दोन्ही विरोधाभासी वाटले तरी ते खरे आहे.
सद्दाम हुसेन, गद्दाफी, होस्नी मुबारक ह्या लोकांचे उच्चाटन करायला जी युद्धखोरी लागली ती तिच्याकडे आहे. सैनिकी वा अन्य बळ वापरून ह्या लोकांना पदच्युत करायला तिचे समर्थन होते. सिरियन युद्धातील यादवीला मदत करण्यात ओबामा व हिलरीचा मोठा वाटा होता. लिबिया, इजिप्त आणि सिरिया ह्या सर्व ठिकाणी हिलरी व तिच्या समविचारी लोकांनी कट्टर इस्लामी लोकांना पाठिंबा आणि पाठबळ देऊन ताकदवान बनवले आणि लोकांच्या असंतोषाच्या मदतीने त्यांनी उठाव केला. गद्दाफी आणि मुबारक दोन्ही क्रूर असले तरी त्यांच्या जागी येणारे लोक त्यांच्याहीपेक्षा वाईट आहेत. हिलरीच्या समविचारी लोकांनी हुकुमशहांऐवजी क्रूर, मूलतत्त्ववादी इस्लामी लोकांना पसंती दिली. अल काईदाचे उदाहरण असताना ते केले गेले.
बेनगाझीवर हल्ला झाल्यावर त्य्याचे खापर एका व्हिडियोवर फोडण्याची अनाठायी घाई. खरे कारण वेगळे असतानाही खोटारडेपणा करण्याचे काय कारण होते? मला वाटते लांगूलचालन हेच ते कारण. आमचीच चूक होती म्हणून आमचा राजदूत मारला गेला अशा प्रकारची सारवासारवी केली गेली. गुप्तहेर खात्याकडे तशी कुठलीही माहिती नव्हती. निव्वळ धूळफेक!
सॅन बर्नार्डिनो, पॅरिस, नीस, ओर्लेंडो, म्युनिक, ब्रुस्रेल्स, अंकारा, इस्तंबूल प्रत्येक ठिकाणी इस्लामी लोकांनी अतिरेक केला तरी अट्टाहासाने इस्लामचा काही संबंध नाही असा जप करणे. ह्या दहशतवादाशी इस्लामचा संबंधच नाही. आयसीस मुस्लिम नाहीच (जसे काही हे मोठे इस्लामचे अभ्यासक आहेत!) अशी जपमाळ जपणे हे सगळे इस्लामी मूलतत्त्ववादाचे लांगूलचालनच आहे.
लांगूलचालन आणि पॅसिफिस्ट ह्या पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. समानार्थी नाहीत. हिलरी पॅसिफिस्ट आहे असे मी स्वप्नातही म्हणणार नाही. बर्नीच्या दबावामुळे नाईलाजाने ती त्या दिशेने किंचित सरकणे शक्य आहे पण ती निव्वळ प्रचारापुरती. पण सत्तेचा लगाम हाती आल्यावर तिची युध्दखोरी उफाळून येणार ह्यात शंकाच नाही. दूरगामी परिणाम विचारात न घेता मध्यपूर्वेत व अन्य देशात उचापती करण्याची अमेरिकेची जुनी खोड आहे. बहुधा शस्त्रास्त्र विकणारा राजकीय दबावगट हे करवून घेत असावा. हिलरी अशा लोकांच्या खिशात असणे अगदी शक्य आहे.
बिल मार हा माझा अत्यंत आवडता
बिल मार हा माझा अत्यंत आवडता होस्ट आहे पण त्याची ट्रंपवरील शेरेबाजी कित्येकदा कंबरेखाली वार प्रकारात मोडते.
ओरँग उटँग हा ट्रंपचा बाप आहे हा त्याचा अत्यंत आवडता विनोद. ट्रंप गोरा (खरे तर शेंदरी!) असल्यामुळे असल्या विनोदावर लोक मनमुराद हसतात. पण कल्पना करा असा विनोद कुणी ओबामावर केला तर काय हलकल्लोळ माजेल? ट्रम्पच्या केसावर, त्वचेच्या रंगावर अमाप विनोद आहेत. ऑरेंज इज न्यू व्हाईट ह्या मालिकेच्या नावाचा उपयोग करुन त्याच्यावर शेरेबाजी केली आहे.
असा विनोद केवळ श्वेतवर्णीयांवरच केला जाऊ शकतो. ओबामासारखा काळा माणूस त्यातून वाचतो. हिलरीच्या शारिरिक व्यंगावर हल्ली कुणी विनोद केल्याचे ऐकिवात नाही. एकंदरीत हा शारिरिक व्यंगावरुन केलेला विनोद हा माझ्या मते अत्यंत खालच्या दर्जाचा असतो. ज्याच्यावर विनोद केला आहे ती व्यक्ती नावडती असेल तर काही काळ आपल्याला तो विनोद सुखावून जातो पण जेव्हा आपल्या आवडीच्या व्यक्तीवर असा विनोद केला जातो तेव्हा त्यातील दुष्टपणा जाणवतो. असो.
बिल मार हा नाईलाजाने हिलरीचा समर्थक बनलेला आहे. हिलरी समर्थक पेक्षा ट्रंपविरोधक म्हणून त्याच्या भावना जास्त तीव्र आहेत. दुर्दैवाने रिपब्लिकनांच्या बाजूला असे विनोदाचे हत्यार नाही.
बिल मारचाच हिलरीवरचा एक विनोद तिला पक्षाचे नामांकन मिळाल्यावर "हिलरीने काचेचे छत (अर्थात ग्लास सिलिंग) भंग केले आहे (टाळ्यांचा कडकडाट). पण ते मुख्यतः तिच्या विकट हास्यामुळेच फुटले असावे!".
ते ऑरेंज वाले खरे आहे. पण ते
ते ऑरेंज वाले खरे आहे. पण ते का रेसिस्ट होत नाही तर ते केवळ रंगावरची कॉमेण्ट आहे. काळ्या लोकांना रंगावरून हिणवण्यात पिढ्यानपिढ्या त्याबरोबर येणारी दुय्यमता त्यात नाही. ओबामावर असा विनोद चालला नसता - पण बिल उगाचच पीसीपणा करत नाही.
बिल खरा बर्नीचा समर्थक. तो दोघांवरही (हिलरी, ट्रम्प) अनेक विनोद करतो. एवढेच काय बर्नीवरही करतो. पण त्याचा हिलरीचा सपोर्ट प्राग्मॅटिक आहे. पूर्वी जेव्हा सुरूवातीला ट्रम्प निदान थोडे सेन्सिबल बोलायचा (ते मेक्सिकन्स, मुस्लिम वगैरे नव्हे - इतर काही बाबतीत), तेव्हा बिल ने त्यालाही सपोर्ट केला होता.
पण त्याची ट्रंपवरील शेरेबाजी कित्येकदा कंबरेखाली वार प्रकारात मोडते. >>> सर्वांवरचीच. त्याच्या जोक्स मधे असे असंख्य विनोद असतात. केवळ ट्रम्प वरच नव्हे. हिलरीच्या सपोर्टर्स मधे ब्लॅक मेन खूप आहेत यावरची त्याची कॉमेण्ट ऐका
मलाही बिल मार आवडतो कारण अनेक लिबरल लोकांमधे बोकाळलेला फाजील पीसीपणा तो दाखवत नाही. आणि दुसरे म्हणजे त्याच्या शो वरचे वाद अतिशय ऐकण्यासारखे असतात. अतिशय स्पष्ट व रोखठोक.
दोनदा आलेली पोस्ट काढत आहे.
दोनदा आलेली पोस्ट काढत आहे.
दुर्दैवाने रिपब्लिकनांच्या
दुर्दैवाने रिपब्लिकनांच्या बाजूला असे विनोदाचे हत्यार नाही.
बरोबर. त्यामुळे, हॅनिटी, रश लिंबॉ वर भागवावे लागते.
दूरगामी परिणाम विचारात न घेता ,,,,,,,,,,,,,,,,,हिलरी अशा लोकांच्या खिशात असणे अगदी शक्य आहे
खरे आहे.
पण सत्तेचा लगाम हाती आल्यावर तिची युध्दखोरी उफाळून येणार ह्यात शंकाच नाही.
फरक एव्हढाच की ट्रंप उघड उघड अण्वस्त्रे वापरण्याच्या गोष्टी करतो, हिलरी तसे म्हणत नाही एव्हढेच.
ट्रंपवरून विनोद करणार्यांनी ................तो ८ वर्षे राज्य करुन गेलाच.
दुसर्या बुशच्या वेळी, भारताचे राष्ट्रपति अबुल कलाम होते, तेंव्हा इथल्या लोकांनी म्हंटले पहा- भारताचा राष्टपति एक जगप्रसिद्ध अणू शास्त्रज्ञ नि आपला हा डुब्या!
आता असे होणार नाही. जसे भारतात सोनिया, लल्लूप्रसाद, रबडी देवी आहेत तसेच इथेहि मेलनि सारखे इंपोर्टेड लोक आहेत.
तसेच ट्रंपचेहि होईल, जर तो मेला तर मेलनि आहेच.
immigration बद्दलचा हा लेख
immigration बद्दलचा हा लेख वाचण्याजोगा आहे
http://www.vox.com/2016/8/16/12491000/trump-extreme-vetting-test-immigrant
ट्रंपने लगेहात मेक्सिकोचं
ट्रंपने लगेहात मेक्सिकोचं निमंत्रण (हिलरीच्या आधी) स्वीकारले आणि आज गेला, ही भारी खेळी आहे. त्याला लूज करण्यासारखं काहीच नाहीये.
बघू काय बोलतोय.
आज इमिग्रेशन पॉलिसी पण डिक्लेअर करणारे ना?
हो अॅरिझोना मध्ये करणार
हो अॅरिझोना मध्ये करणार आहे.
हॅव टु अॅग्री, नवी कँपेन
हॅव टु अॅग्री, नवी कँपेन मॅनेजर आल्यापासून ट्रम्पच्या चाली बरोब्बर पडत आहेत.
हिलरीने मागच्या महिन्यात ट्रम्प विरुद्ध निर्माण झालेल्या वातावरणाचा आणि मिळालेल्या डबल डिजिट लीड्स चा काहीच फायदा घेतला नाही. ती आपली फंड रेझिंग च्या नादात कुठे दिसेनाशीच झाली आहे!! त्यात आता हुमा अबेदीनबद्दल अन तिच्या अरेबिक ओरिजिनबद्दल वाद निघाले आहेत.
आता लोक ट्रम्पचा आधीचा ड्रामा विसरले पण असतील. ट्रम्प इज गेनिंग द ग्राउंड अगेन !
हो. डबल डीजीट वरून ५% बघितलं
हो. डबल डीजीट वरून ५% बघितलं काल.
मी हायलाईट वाचली की आजच्या
मी हायलाईट वाचली की आजच्या मिटींग मध्ये वॉल बद्दल चर्चा झाली पण ती कोणी बांधायची ह्यावर नाही.
सशल . म्हणजे काश्मीर प्रश्नी
सशल :). म्हणजे काश्मीर प्रश्नी दोन्ही पक्षांनी चर्चेने प्रश्न सोडवायचा असे ठरले. नक्की काय करायचे वगैरे ते ठरले नाही. तसला प्रकार.
फा!
फा!
अरे ट्रंपने तेवढे सामंजस्य
ट्रंपला घूमजाव केलं तर व्हाईट नॉट सो एज्युकेटेड व्होट बेस ठोकेल. लॅटीनो जवळ येणं फार फार कठीण आहे. पण याच्या मधले जे आहेत ते कदाचित ट्रंपच्या टेम डाऊन अप्रोचला जवळ करू शकतात. आज संध्याकाळी इमिग्रेशन पॉलिसी मध्ये थोडी हार्ड लाईन घेतली तरी मी चर्चा करायला उत्सुक आहे. हिलरी गेली नाही. मी जाऊन आलो. दोज पीपल आर लव्हली. आय लव्ह देम. आय नो सम इंक्रेडीबल लॅटीनोज. आय एट बरिटो विथ एक्स्ट्र ग्वाकमोली. क्रुकेड हिलरी.....
थोडं फार पी सी पण तरी अद्वातद्वा बोलता येईल.
हिलरी गेली नाही. मी जाऊन आलो.
हिलरी गेली नाही. मी जाऊन आलो. दोज पीपल आर लव्हली. आय लव्ह देम. आय नो सम इंक्रेडीबल लॅटीनोज. आय एट बरिटो विथ एक्स्ट्र ग्वाकमोली. क्रुकेड हिलरी..... >>>
फा, अमितव ,
फा, अमितव ,
अमित अजून कुठे पचकला नाही
अमित
अजून कुठे पचकला नाही हीच प्रगती म्हणायची.
ऑलरेडी मेक्सिकन
ऑलरेडी मेक्सिकन प्रेसिडेन्ट्च्या भेटीवरून सुरु झाली का गंमत ? ट्रम्प म्हणतो भिंतीचा खर्च कुणी करायचा हे डिस्कसच केले नाही. मेक्सिकन प्रेसिडेन्ट ने स्टेटमेन्ट दिलेय की "आम्ही खर्च करणार नाही असे मी ट्रम्प ला सांगितले"
तेथे तिथल्या माजी प्रेसिडेण्ट
तेथे तिथल्या माजी प्रेसिडेण्ट ने आत्ताच्या प्रेसिडेण्टवर ट्रम्पशी बोलल्याबद्दल टीका केली आहे. सगळे साग्रसंगीत चालू आहे. लॅटिनो मायबोली (इक्विव्हॅलण्ट) वर व मेक्सिकन व्हॉट्सॅप ग्रूप्स वर तुंबळ सुरू असेल - देशाची मान खाली घातली/इतके वर्ष तुम्ही काय केले ई.ई.
ट्रंप अमेरिकन प्रेसिडेंट
ट्रंप अमेरिकन प्रेसिडेंट अजुनतरी नाहि, सो बाय गेटिंग ए मिटिंग विथ मेक्सिकन प्रेसिडेंट, ट्रंप हॅज आउटप्लेड हिम. धिस इज प्रेसिडेंशियल!
राहिता राहिला प्रश्न भिंतीच्या खर्चाचा - ट्रंप म्हणतो विषय निघाला नाहि; निएटो म्हणतो मी सांगितलं पैसे देणार नाहि. ट्रंपच्या मते मेक्सिको हॅज टु पे बिल्ड द वाॅल, इट्स नाॅट निगोशिएबल. सो लेट्स सी वाट हॅपन्स व्हेन ट्रंप बिकम्स पोटस...
ट्रंप स्पीच आॅन इमिग्रेशन इन नेक्स्ट १०...
ट्रंपद्वेषाची कावीळ झाली की
ट्रंपद्वेषाची कावीळ झाली की सगळे जग शेंदरी दिसू लागते बहुधा!
मेलानिया ट्रंपची राबडीदेवीशी तुलना हा अत्यंत उफराटा न्याय आहे. करायचीच असली ती हिलरी आणि राबडीदेवीची तुलना जास्त चपखल आहे. लालू गेला राबडी आली, बिल्लू गेला, हिलरी येणार. नवर्याच्या पुण्याईवर आपली पोळी भाजून घेणे हे दोघींनी करुन दाखवले आहे. हिलरीने त्याकरता अनेक अग्निपरीक्षा पार पाडल्या मोनिकासारख्या सवतीही सहन केल्या!
हिलरीची वाचा बंद होण्याचे कारण ज्युलियस असांज ह्या माणसाने धमकी दिली आहे की तो निवडणुकीआधी काहीतरी गुपित फोडणार आहे ज्यामुळे हिलरीची पंचाईत होणार आहे. त्याविषयी खलबते चालू असतील. कदाचित त्याचा काटा काढायला ओबामाला ड्रोन पाठवायला पटवत असेल! इतक्या वाईटसाईट गोष्टी उघडकीस येत आहेत की सप्टेंबर अखेरीस होणार्या चकमकीला तोंड कसे द्यायचे ह्याकरता जोरदार तयारी चालू असेल.
स्त्रीपुरुष समानतेकरता उच्चरवाने घोषणा करणारी हिलरी मागल्या दाराने सौदी अरेबियाकडून खोर्याने पैसे ओढते तेव्हा दुटप्पीपणाची कमाल वाटते!
एकंदरीत आपले मंत्रीपद वापरून लोकांना हवे तसे कायदे बनवायचे आणि त्याच्या बदल्यात क्लिंटन प्रतिष्ठानाचे उखळ पांढरे करणे हा धंदा अनेक वर्षे करुन हिलरीने बक्कळ दौलत कमावली आहे. मुलगी, नातवंडे, पतवंडे कुणाला कसली ददात नसेल. पुन्हा गरीबांचे कैवारी म्हणून मिरवायला बाई मोकळ्या!
पुरोगाम्यांचा दुटप्पीपणा ह्याविषयी अजून एक उदाहरण म्हणजे लुईजियाना राज्यात आलेला भयंकर पूर. मागे इथेच कट्रीना हे वादळ आले त्यावेळेस बुश राज्य करत होता. तेव्हा जणू बुशनेच मिलिटरी अस्त्रे वापरून हे वादळ निर्माण केले अशा प्रकारे माध्यमे त्याच्यावर तुटून पडली. पण यंदाच्या लुईजियानात वादळ होत होते, लोक मरत होते, बुडत होते आणि जहांपनाह ओबामासाहेब मार्थाच्या बागेत गॉल्फ खेळण्यात मग्न होते. ट्रंपच्या दौर्यामुळे जाग आली की काय म्हणून एक तोंडदेखला दौरा राष्ट्रपतीसाहेबांना करणे भाग पडले. मात्र ह्यावेळेस माध्यमांनी ओबामावर कुठलीही टीका केली नाही. उलट बुशवर आगपाखड करणरे ओबामाची आरती ओवाळत होते. हिलरीने ह्या पूरग्रस्त राज्याचा दौरा करण्याची इच्छाही दाखवली नाही. बहुधा काही केले तरी ते राज्य आपल्या खिशातच आहे अशी खात्री असावी.
आता बॉलिवुड कलाकार पण ट्रंप
आता बॉलिवुड कलाकार पण ट्रंप च्या रॅली करता येणार आहेत म्हणे
http://qz.com/771656/a-group-of-hindu-republicans-is-enlisting-bollywood...
एक नवेच त्रांगडे. हिलरीबाईंची
एक नवेच त्रांगडे. हिलरीबाईंची तब्येत काही ठीक दिसत नाही. ९/११ च्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाच्या वेळेस बाई फारच वाईट परिस्थितीत होत्या. चक्कर किंवा आकडी आली असावी. कसेबसे उचलून त्यांना गाडीत कोंबले.
कुणीतरी तो व्हिडियो प्रकाशित केला त्यामुळे नाईलाजाने न्युमोनियाचे स्पष्टीकरण द्यावे लागले.
आता यामुळे सहानुभूतीची मते मिळणार का अस्वास्थ्यामुळे गमावणार?
Pages