Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !!
बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मैत्रेयी नुस्ती लिंक देउ नका
मैत्रेयी
नुस्ती लिंक देउ नका हो, तुमचं त्यावर मत काय आहे ते लिहा... >> अहो दोन दिवस थांबा, त्याला नक्की काय म्हणायचे होते किंवा तो कसा जे सांगायचे तेच बोलला नाही, त्याच्या कँपचे त्या वक्तव्याबद्दलचे 'ट्रंप मिडल ईस्ट मधल्या आयसिस बद्दल बोलत नसून आयडाहो मधल्या एका एका कल्टसंबंधी बोलत होता' वगैरे स्पष्टीकरण वगैरे धुरळा खाली बसू दे आधी. मग आपापली मते मांडू, घाई काय आहे
रेड स्टेट या साईट वरून साभार.
रेड स्टेट या साईट वरून साभार.
A more likely scenario is that ISIS sees President Obama as an apostate, at best, which puts him very much on the outside of their belief system.
Trump, on the other hand, has no clear plan, other than the red meat he routinely tosses out to his glassy-eyed loyalists.
He’d bomb them out of existence, including their families.
He’d use our military as his personal kill force.
And he’d stop all immigration of Muslim immigrants.
Is that broad enough for you?
None of those suggestions are viable and no president has the authority to enact those as policy. That is, however, the rhetoric you get when you nominate a reality TV star who likely failed any American Civics classes he ever took and has no idea about the three separate but equal branches of government, and their purpose.
Great job, America.
ट्रंप हिलरी बद्दल काय बोलला
ट्रंप हिलरी बद्दल काय बोलला किंवा मिडिया ट्रंपबद्दल काय बोलते यापेक्षा यांच्या पॉलिसिज काय आहेत, याचा विचार का करत नाही?
वैयक्तिक रीत्या अत्यंत सोज्वळ, निर्मळ असा माणूस सापडणे कठीणच असते, किंबहुना असला तरी त्याच्यावर चिखल उडवून मग त्याला वाईट ठरवणे हे चालतेच
तेंव्हा व्यक्तीपेक्षा ते कशाबद्दल काय करणार आहेत ते बघावे असे मला वाटते.
कुणि लिहील का, की देशापुढे प्रश्न काय आहेत नि ते कसे सोडवायचे या बद्दल दोघांची मते काय आहेत? .
फारएण्ड, दोन पार्टि सिस्टम
फारएण्ड, दोन पार्टि सिस्टम असताना मत एकालाच देता येणार ना? अपक्श उमेदवाराला वोट किंवा नो वोट इन्डायरेक्टली दोघांपैकि एकालाच जाणार ना? मग उघडपणे जस्टिफाय करा अथवा त्यांचे वाभाडे काढा, काय फरक पडतो?>>>>> मत शेवटी एकालाच जाणार हे बरोबर आहे. समर्थन करताना फक्त ज्या खरच समर्थनीय गोष्टी आहेत त्या नीट मांडून मग समर्थन केलं तर बरं आहे. आता पर्यंत ट्रंपचं समर्थन करताना फक्त "तो म्हणतो म्हणून" ह्या गोष्टीशिवाय कुठलाच ठोस पुरावा नाही की तो खरच काहीतरी इफेक्टिवली करु शकतो. उलट त्याच्या स्वभावामुळे तो कसा कसा अणि कुठे कुठे वाट लावू शकतो हेच अधोरेखित होत आलेलं आहे. नुसतं वक्तव्यच नाही तर त्याचा स्वतःचा बिझनेस मध्ये रेकॉर्ड पण तसाच आहे. ओबामानी आधी लॉयर होणं आणि पबलिक सर्विसचं करियर स्वतः निवडलं पण मला वाटतं त्याच्या नशीबी जर ट्रंप सारखा त्याच्या बापाकडून पैसा आला असता तर त्यानी बिझनेस नीट संभाळला असता असं म्हणायला सुद्धा वाव आहे.
आणि हिलरीचे वाभाडे काढताना सुद्धा जे काही रिझनिंग प्रस्तुत केलं जातं ते बहूतकरुन कॉन्स्पिरसी थियरीज बेस्ड असतं. पुढे अगदी ब्रॉड गोष्टींचं फेल्युअर ज्यात कित्येक जणांचा सहभाग होता ते तिच्या माथी मारलं जातं जे टिपिकल वाभाडे काढायचे म्हणून काढायचे सदराखाली जाऊ शकतं.
बुवा, पहिल्या पॅराशी सहमत.
बुवा, पहिल्या पॅराशी सहमत. हिलरीच्या बाबतीत मात्र तिला मिडीया खूप मोकळी सोडते हे खरे आहे. कालच्या त्या ओरलॅण्डो शूटर च्या वडिलांच्या सहभागाबद्दल न्यू यॉर्क टाइम्स, वॉशिन्ग्टन पोस्ट व नव्यांपैकी हफपोस्ट साईट - तिन्हीवर फ्रण्ट वर फार माहिती नाही.
मला तो बिनडोक पणा वाटला. त्याला "स्पेशली" आमंत्रित केलेला नसणार हे नक्की (डेम्स ने स्थानिक रजिस्टर्ड लोकांना घाउक लेटर्स पाठवली असणार), पण तो स्टेज वर तिच्या मागे कसा काय जाऊ शकला. यात हलगर्जीपणाही दिसतो.
आणि हिलरीचे वाभाडे काढताना
आणि हिलरीचे वाभाडे काढताना सुद्धा जे काही रिझनिंग प्रस्तुत केलं जातं ते बहूतकरुन कॉन्स्पिरसी थियरीज बेस्ड असतं. पुढे अगदी ब्रॉड गोष्टींचं फेल्युअर ज्यात कित्येक जणांचा सहभाग होता ते तिच्या माथी मारलं जातं जे टिपिकल वाभाडे काढायचे म्हणून काढायचे सदराखाली जाऊ शकतं. >> अगदि अगदी, ISIS चा दोष तिच्या माथी मारताना मूळात इराक युद्ध झाले नसते तर ISIS चा उगम होण्याची शक्यता किती होती ह्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते.
हिलरीच्या बाबतीत मात्र तिला मिडीया खूप मोकळी सोडते हे खरे आहे >> फा अगदीच मोकळे सोडते असे नाही. कधी तरी एकदा केनेथ स्टार नि त्यानुषंगाने झालेल्या मिडियाच्या Trial by fire बद्दल माहिती वाचून बघ. कदाचित झक्की किंवा राज लिहू शकतील.
मला सुद्धा मान्य आहे फा की
मला सुद्धा मान्य आहे फा की मिडिया तिला मोकळी सोडते. आधीच्या पानांमध्ये मी त्याबाबतीत लिहिलं सुद्धा आहे. मी ते हार्डकोअर ट्रंप सपोर्टर्स बाबत म्हणत होतो. हिलरीचे किंवा ओबामाचे सुद्धा वाभाडे काढताना जे आर्ग्युमेंट वापरले जातात त्यात काहीच दम नसतो. फक्त एक्स्ट्रिमली ब्रॉड स्ट्रोक्स असतात. जसं की ८ वर्षाची निष्क्रियता, युद्धखोरपणा, बेजबाबदारपणा.
==ISIS चा दोष तिच्या माथी
==ISIS चा दोष तिच्या माथी मारताना मूळात इराक युद्ध झाले नसते तर ISIS चा उगम होण्याची शक्यता किती होती ह्याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते.
==
आणि हिलरीने इराक युद्धाला पूर्ण पाठिंबा दिला होता ह्याकडेही सोयिस्कर काणाडोळा केला जातो त्याचे काय?
सत्तेवर नसताना अशी युद्धखोरी केली आणि सत्ता मिळाल्यावर तर काय विचारायलाच नको!
असामी, बघतो. पण मी आत्ताच्या
असामी, बघतो. पण मी आत्ताच्या कॅम्पेन च्या कव्हरेज संदर्भाने व दोघांच्या "अॅलेज्ड" चुकांच्या कव्हरेज बद्दल बोलतोय. हिलरीच्या इमेल्स, खाजगी सर्वर चा वापर, क्लिंटन फाउण्डेशन ई बद्दल डेम्स सपोर्टर्स चा एक डिसमिसिव्ह अॅप्रोच असतो, लिबरल मीडियाचाही अनेकदा तसाच दिसतो.
बुवा - गॉट इट. आणि सहमत. म्हणे सेकण्ड अमेण्डमेण्ट काढून टाकायला निघाली आहे. ओबामा हा आयसिस चा जनक आहे, ओबामा मुळे त्या खान फॅमिलीतील मुलाला प्राण गमवावे लागले. कायच्या काय.
तो बाप मागे बसला ही चूक होती
तो बाप मागे बसला ही चूक होती असं हिलरीचे सपोर्टर्स टीव्ही वरून सांगत होते. स्वतः हिलरी काही बोलली का माहित नाही (बोलावं आणि निषेध व्यक्त करावा). चुका करणं मला फार चुकीचं वाटत नाही, त्या मान्य न करता साळसूदपणाचा आव सगळ्यात डोक्यात जातो.
कॅसिनो काका पण बोलताना ओघात बरळलो, पण चुक झाली असं बोलले तर स्विंग व्होटर्स येतील तिकडे. पण ते कदापि (आत्ताच्या अनुभवावरून) होणे नाही.
बुवा +१. सेकड अमेंडमेंट जज बदलून काढता येणं शक्य आहे हेच मुळात किती अज्ञानमूलक विधान आहे.
आणि हिलरीने इराक युद्धाला
आणि हिलरीने इराक युद्धाला पूर्ण पाठिंबा दिला होता ह्याकडेही सोयिस्कर काणाडोळा केला जातो त्याचे काय? >> तुम्ही बुवांचे हे वाक्य "पुढे अगदी ब्रॉड गोष्टींचं फेल्युअर ज्यात कित्येक जणांचा सहभाग होता ते तिच्या माथी मारलं जातं जे टिपिकल वाभाडे काढायचे म्हणून काढायचे सदराखाली जाऊ शकतं" किती अचूकपणे प्रूव्ह करताय हे लक्षात येते का ? तुमच्या प्रश्नाचे सविस्तर उत्तर मी मागेच तुम्हाला दिले होते, इथे परत पेस्ट करतो. तुम्हाला संपूर्ण वाचायला वेळ नसणार असे ग्रुहित धरून काही वाक्ये हायलाईट केली आहेत.
"१. तमाम ट्रंपसमर्थक हे पारंपारिक रिपब्लिकन आहेत हे गृहितक चुकीचे आहे. कितीतरी मुरलेले रिपब्लिकन हे ट्रंपच्या विरोधात आहेत. आणि ट्रंपच्या निमित्ताने कितीतरी बिगर रिपब्लिकन लोक ट्रंपकरता रिपब्लिकन बनलेले आहेत. ज्याने ह्या युद्धखोरीत सिंहाचा वाटा उचलला तो बुश ट्रंपचा कडवा विरोधक आहे. तेव्हा इराकच्या युद्धाचा उदोउदो करणारे रिपब्लिकन आणि ट्रंप समर्थक ह्यांच्यात गफलत करू नये. >> माझा काहि गोंधळ होत नसेल तर गिंगरिच पासून प्रिबस पर्यंत सगळे ट्रंपच्या बाजूने किल्ला लढवणारे इराक युद्धाच्या वेळी Dem नव्हते. रबर स्टँप बुश , कर्ता करविता चेनी हे रिपब्लिकन नव्हते ? माझा मुद्दा साधा सरळ आहे. रिपब्लिकन पक्षाच्या core group नी त्या वेळी खोटे ( किंवा अपुरे) पुरावे निर्माण करून सगळ्यांचीच दिशाभूल केली , तेंव्हा त्याचा नि त्यातून निर्माण झालेल्या प्रत्येक complexity चा दोष हिलरीवर कसा ढकलला जातो ? इराक युद्धच झाले नसते तर बेंगाझी होण्याची शक्यता तरी किती होती ? तेंव्हा selective दोषारोप कशाला ? " तेव्हा असा तथाकथित प्रदीर्घ अनुभव असूनही इराक युद्धाला पाठिंबा देणार्या हिलरीची जाण कितपत असेल हे लोकांना ठरवू द्या." हे म्हणताना ती त्यावेळी सत्तेमधे नव्हती हे लक्षात असू दे. समोर आलेल्या पुराव्यावर सगळ्यांनी मत दिलेले आहे. ( तीचे सोडा त्यावेळी आपली स्वतःची भूमिका काय होती ? हा प्रश्न स्वतःला विचारून पाहणे जरुरी आहे) २००१ नंतर ह्या देशात जे वातावरण होते त्या वेळेस असे कोण 'माय का लाल' असणार होते जे समोर आलेल्या सरकारी पुराव्यांना 'नाहि हे खोटे आहेत' असे म्हणून बोंबाबोंब करणार होते ? "
अजून एक ऑब्झर्व केलं का? जसे
अजून एक ऑब्झर्व केलं का? जसे जसे एकेक कँडिडेट कमी होत गेले तसा तसा मला वाटतं हिलरीवरचा फोकस कमी कमी होत गेलाय. ट्रंपचं नाव ह्या करता ह्या पूल मध्ये घेत नाही कारण तो येन्नंकेन्नंप्रकारेन्नं प्रसिद्धी ओढावून घेतोच. पण हिलरीच्या इमेलकांड विषयी जो आधी फोकस होता त्या मानानी आता तो खुपच कमी आहे जेव्हा क्लियरली ती जिंकेल असं दिसू लागलं आहे. खरं तर हे उल्टं हवं. म्हणजे मिडिया जे काही दाखवतं (आयडियली असुमिंग ते सत्य काय आहे दाखवण्याचे समर्थक आहेत) त्या हिशोबानी पासे पलटले पाहिजेत (जर तशी कारणं असतील तर). इथे म्हणजे मिडियाच वाहत्यावार्या प्रमाणे वाहत जात आहे.
असांजचं उदाहरण मला म्हणून वेगळं वाटलं कारण हिलरी जोरात असली तरी त्यानी ती बाजू दाखवायची सोडलेली नाही. तसं करण्यामागे खरच कळवळा आहे सत्य वर आणण्याचा की फक्त स्वतःच रेलेवन्स टिकवून ठेवणे हा उद्देश ते कळायला काही मार्ग नाही पण तरी एक मन म्हणतं की मेनस्ट्रीम मिडियापेक्षा हे असल्या ऑर्गनायझेशन्स जास्त फेअर वाटतात मला.
तसं करण्यामागे खरच कळवळा आहे
तसं करण्यामागे खरच कळवळा आहे सत्य वर आणण्याचा की फक्त स्वतःच रेलेवन्स टिकवून ठेवणे हा उद्देश ते कळायला काही मार्ग नाही >> बुवा new yorker चा मागचा (दोन तीन महिन्यांमधला) issue बघा ज्यावर स्नोडेनचे चित्र होते. तुमचा निष्कर्ष तुम्हीच काढा. (म्हणून इथे अधिक लिहित नाही).
बघतो असामी पण मेनस्ट्रीम
बघतो असामी पण मेनस्ट्रीम मिडिया खरच जसं आहे तसं दाखवते का? ह्याबाबत तुझं काय मत आहे?
असांजचा पर्सनल खुन्नस आहे,
असांजचा पर्सनल खुन्नस आहे, हिलरीवर (विकिलिक्सची हिस्टरी); म्हणुन त्याने प्रतिद्न्या केली आहे कि हिलरीला इंडायट केल्यानंतरच शेंडीला गाठ बांधणार आहे...
सध्या ट्रंपचे चाळे बघता
सध्या ट्रंपचे चाळे बघता मिडीयाने महाभारतातल्या कृष्णाने सांगितल्याप्रमाणे धर्माची बाजू घेतली असेल. सत्य बोलणे, नीती प्रमाणे वागणे म्हणजे धर्म नाही आणि त्याच्या उलट करणे म्हणजे अधर्म नाही! ही अनलॉजी माझी मलाच आवडली आहे.
नाहीतर 'बोस्टन ग्लोब' सारख्या अग्रगण्य पेपरने ट्रंप पश्चात अमेरिका म्हणून संपूर्ण फ्रंट पेज काय काय होऊ शकतं वर दिलं नसतं.
होय असामी. रिपब्लिकन लोकांनी
होय असामी. रिपब्लिकन लोकांनी इराक युद्धाचा दोष हिलरीला देणे एखाद्या कंपनीच्या फसलेल्या अॅक्विझिशनची सगळी जबाबदारी आयटी मधल्या व्हीपीला देण्यासारखे आहे, सगळ्या "सी" लेव्हल्सना मोकळे सोडून
आणि "पूर्ण पाठिंबा" सारखे अतिरंजित आरोपही आहेत. जणू काही सभेत उभी राहून बुशकडे बघून "Let's kick some Iraqi A**" असे ओरडली ती. काँग्रेसने बुशला जा युद्ध कर असे कृष्णासारखे सांगितले नव्हते. त्याच्या हातात युद्धाच्या बाबतीत निर्णय घेण्याचे अधिकार दिले होते. तेव्हा जे १००-२०० लोक चुकले त्यात हिलरीही चुकली. पण बोट तिच्याकडे येण्याआधी बुश, चेनी व इतर अनेक लोक मधे आहेत.
हौ ना. खरं जास्तीत जास्त
हौ ना. खरं जास्तीत जास्त जबाबदारी बुश आणि अन त्या चेनीच्या टाळक्यावर हाणली पाहिजे. तो हान्स ब्लि, वेपन्स इन्स्पेक्टर बोंबलून सांगत होता की आजिबात कुठेही पुरावा नाही त्याच्याकडे ड्ब्लू एम डी असल्याचा ते झुगारून "ही प्लॅण्ड टु किल माय डॅडी" असं म्हणत वड्याचं तेल वांग्यावर काढत युद्धात झोकलं अमेरिकाला.
९/११ झाल्यावर अफघानिस्तान मध्ये कारवाया करायचं सोडून हे इराक मध्ये का म्हून घुसले!
मेनस्ट्रीम मिडिया खरच जसं आहे
मेनस्ट्रीम मिडिया खरच जसं आहे तसं दाखवते का? ह्याबाबत तुझं काय मत आहे? >> बुवा मला असे वाटते कि बर्याच गोष्टींमधे black and white असे नसते, बराचसा ग्रे area असतो. मिडिया त्याच्या कलाप्रमाणे तो ग्रे भाग काळया किंवा पांढर्या बाजूंकडे झुकणासा आहे असे मांडत असते नि वाचणारा त्याच्या prejudice प्रमाणे ते अजून आजू बाजूला सरकवत असतो.
सत्य दाखवणे हा मिडियाचा हेतु नसून त्या मिडीयाला सेलेबल ठेवणे हा आहे हे लक्षात घेतल्यावर ट्रंप वर अधिक फोकस का असेल हे कळणे फारसे कठीण नाही . तो हिलरीपेक्षा अधिक कॅची सेलेबल मटेरियल सतत देतो आहे. एखाद्या पुढे ट्रंपचे खानबद्दलचे वक्तव्य असलेला पेपर नि हिलरीच्या लीक्ड इमेल्स बद्दल व्रुत्त असणारा पेपर ठेवला तर कोणता आधी उचलला जाईल ?
एखाद्या कंपनीच्या फसलेल्या अॅक्विझिशनची सगळी जबाबदारी आयटी मधल्या व्हीपीला देण्यासारखे आहे >> हि उपमा आवडली फा
असामी, अरे तु जो "कल" म्हणत
असामी, अरे तु जो "कल" म्हणत आहेस तोच तर प्रॉब्लेमॅटिक आहे ना? कल असा कुठे नकोच ना?मिडिया इज सपोज्ड टु प्रेझेंट अनबायस्ड फॅक्ट्स. तेच होत नाहीये मेन्स्ट्रिम मिडिया मध्ये. फॉक्सचा रॉजर आईल्स निघाला बाहेर मध्यंतरी तेव्हा त्याच्यावर लेख वाचला मध्यंतरी. खुपच ग्रोस नेग्लिजन्स, इग्नोरन्स आहे रियल फॅक्ट्स बाबत, इतका की बेसिकली खरं चित्र आणि मिडिया पोट्रे करत असलेलं चित्र ह्यात खुप फरक आहे असं दिसून येतं बर्याच वेळा.
>>एखाद्या कंपनीच्या फसलेल्या
>>एखाद्या कंपनीच्या फसलेल्या अॅक्विझिशनची सगळी जबाबदारी आयटी मधल्या व्हीपीला देण्यासारखे आहे <<
आॅफ कोर्स येस. इफ हि कुडंट स्टेप अप द प्लेट, डिडंट अलाइन विथ दि कंपनी विजन ॲंड क्रिएटेड ब्लंडर्स इंटिग्रेटिंग सिस्टम्स. वुड यु प्रमोट हिम विथ बिगर रिस्पाॅंसिबिलीटिज?.. .
Is acquisition all about
Is acquisition all about integrating IT systems ? कुछ भी राज ! इथे फा ने वापरलेला जबाबदारी हा शब्द खापर अशा अर्थाने वाचा.
बेसिकली खरं चित्र आणि मिडिया
बेसिकली खरं चित्र आणि मिडिया पोट्रे करत असलेलं चित्र ह्यात खुप फरक आहे >> बुवा 'खर' चित्र काय आहे हे दाखवणारे कोण आहेत ? ते चित्र ते दाखवणार्यांचा कल दाखवत नाही हे कसे कळणार ?
असामी, आय हॅव सीन एमॅंडए
असामी, आय हॅव सीन एमॅंडए फेलिंग ड्यु टु लॅक आॅफ आय्टि लिडरशीप...
असामी, अरे कित्येक वेळा इवेंट
असामी, अरे कित्येक वेळा इवेंट झाल्या नंतर इतर काही कुकर्मांमुळे पुढे इक्वायरी बसतात आणि मग खरी छानबीन होते. त्यात दिसून येतं की त्यावेळी मिडिया काय सांगत होती आणि खरी परिस्थिती ह्यात पुष्कळ फरक होता. आय कॅन बेट यु हंड्रेड बक्स की २००२-०३ च्या वेळी मिडिया देखिल बुश, चेनी नी केलेले आरोप उचलून धरत होती. They were basically telling people what they wanted to hear.
हे सगळं म्हणून सुद्धा, आय काईंड ऑफ गेट युअर पॉईंट. इम्पारशल मिडिया असं काही असू नाही शकत कारण त्यांनाही तू म्हणालास तसं लोकं विकत घेतील हे खाद्य पुरवावं लागतं. अनफॉर्च्युनेटली लोकं त्यांना जे एकायचं असतं त्याची री ओढणारच खाद्य आवडीनी विकत घेतात.
राज - हिलरीवर युद्धाच्या
राज - हिलरीवर युद्धाच्या बाबतीत काही प्रमुख जबाबदारी होती व त्यात ती फेल गेली असे आर्ग्युमेण्ट तुम्ही करत आहात काय (आणि ती कसली जबाबदारी?) - तसे नसेल तर तुमचे उदाहरण चुकीचे आहे.
असामी म्हणतो नसे मूळ निर्णयाचे खापर हिलरीवर फोडले जात आहे. मधले किमान १० जास्त जबाबदार लोक सोडून.
आय हॅव सीन एमॅंडए फेलिंग ड्यु
आय हॅव सीन एमॅंडए फेलिंग ड्यु टु लॅक आॅफ आय्टि लिडरशीप... >> Isn't that an exception ? c'mon राज.
इम्पारशल मिडिया > बरोबर.
फारएण्ड, नाहि. इराक युद्धात
फारएण्ड, नाहि. इराक युद्धात नाहि पण युद्ध संपल्यावर ती/ओबामा ॲडमिनिस्ट्रेशने घेतलेले निर्णय चुकिचे होते आणि त्याकरता ती जबाबदार आहे. हिलरीवर मुळ हल्ल्याचं खापर फोडलं जात नाहिय तर चुकिच्या पाॅलिसीज राबवुन आयसिसला जन्माला घातल्याचा दोष दिला जातोय...
इराक युद्ध आणि वरचं उदाहरण, या दोन घटनां मधलं साधर्म्य असं दाखवता येइल:
१. इराकवरचा हल्ला = कंपनी अ, कंपनी ब ला ॲक्वायर करायचं ठरवते
२. बुश ॲडमिनिस्ट्रेशन एक्झिट स्ट्रॅटजी डिफाइन करते = सीईओ ॲक्विझिशन स्ट्रॅटजी लेट आउट करतो, लिडरशीप टिम बाइज इन
३. ओबामा ॲडमिनिस्ट्रेशन एक्झिट स्ट्रॅटजी फाट्यावर मारते, ट्रुप्स विड्राॅ करते = सीआयो गोज कोल्ड टर्कि, मेक्स राॅंग डिसीजन्स, डझंट डु प्राॅपर ड्यु डिलिजंस
४. ट्रुप विड्राॅ केल्याने अंदाधुंदि माजते, आयसीसचा जन्म = सीआयोच्या गलथानपणामुळे ॲक्विझिशन फेल होतं, लायाबिलिटी वाढते
मग यात दोष सीआयोचा आहे कि नाहि?...
आजिबात कुठेही पुरावा नाही
आजिबात कुठेही पुरावा नाही त्याच्याकडे ड्ब्लू एम डी असल्याचा ते झुगारून "ही प्लॅण्ड टु किल माय डॅडी" असं म्हणत वड्याचं तेल वांग्यावर काढत युद्धात झोकलं अमेरिकाला.>> मलातर बॉलिवुडी सिनेमासारख बापाचा राहिलेला बदला हिरोने पुर्ण करण्याइतक शेन्डाबुडुख नसलेले वाटत होत.
ते तुद्ध सुरु व्ह्यायचा काही
ते तुद्ध सुरु व्ह्यायचा काही दिवस आधी न्यू यॉर्क मध्ये त्या विरुद्ध प्रचंड मोर्चा निघाला होता. मीही गेलो होतो. पण मिडियाने लोकांचे ब्रेनवॉशिंग इतके केले होते की ९/११ व इराक/सद्दाम चा संबंध नाही असे ओरडावेसे वाटत होते.
इराक युद्धामुळॅ बर्नी ने हिलरीवर टीका करणे एकवेळ समजू शकतो पण रिपब्लिकन पक्षाच्या उमेदवाराने ?
बुश ॲडमिनिस्ट्रेशन एक्झिट स्ट्रॅटजी डिफाइन करते : जोक ऑफ द इयर !
Pages