अमेरिकेतल्या निवडणुका - २०१६

Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41

अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:

डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !! Happy बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!

एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक नवेच त्रांगडे. हिलरीबाईंची तब्येत काही ठीक दिसत नाही. ९/११ च्या श्रद्धांजलीच्या कार्यक्रमाच्या वेळेस बाई फारच वाईट परिस्थितीत होत्या. चक्कर किंवा आकडी आली असावी. कसेबसे उचलून त्यांना गाडीत कोंबले.
कुणीतरी तो व्हिडियो प्रकाशित केला त्यामुळे नाईलाजाने न्युमोनियाचे स्पष्टीकरण द्यावे लागले.
आता यामुळे सहानुभूतीची मते मिळणार का अस्वास्थ्यामुळे गमावणार?

ट्रम्प साहेब काय म्हणताय्त त्यावर? बघा कशी नाजूक आहे आजारी बिजारी पडते. नाहीतर मी पाहा. I am the fittest guy ever. वगैरे वगैरे :).

ह्म्म तब्येत बिघडणे अन तीही इतकी उचलून नेण्याइतकी - बिग ब्लो असू शकतो हिलरीच्या कँपेन ला. ट्रम्प ला काही म्हणण्याची गरजही नाही.
त्याने काही तारे तोडले नाहीत बहुतेक अजून तरी.

आताच सीआयए च्या डायरेक्टर नी त्याचे विधान खोडून काढले आहे की इंटेलिजन्स ब्रीफींग मध्ये बॉडी लँग्वेज नी काही तरी कळले असेल म्हणून.

ट्रंप मॅट लाऊअर च्या फोरम मध्ये म्हंटला होता की इंटेलिजन्स ब्रीफींग मध्ये बॉडी लँग्वेज नी ती लोकं (ब्रीफिंग देणारे) प्रेसिडेंशियल पॉलिसी बद्दल नाखूश आहेत हे दाखवून दिले.

सीआयए चीफ म्हणाला की असं काहीच पॉलिसी बद्दल सांगत नाहीत आणि इतकी सिनियर लोकं आहेत की त्यांची बॉडी लँग्वेज असं काही सांगेन असं अजिबात वाटत नाही.

हो म्हणजे एकाला अवघड प्रश्न विचारायचे, उत्तरं द्यायला वेळ द्यायचा नाही आणि दुसर्‍याला सोपे प्रश्न विचारून वर खोटी उत्तरं दिलीत तरी ते खोटं आहे हे सांगायचं नाही असा दुटप्पी पणा केला तर असंच होणार ना ! Proud

ट्रंपद्वेष्ट्यांकरता. चक्क हफिंग्टन पोस्टमधे ही बातमी! ट्रंपने हिलरीला लवकर बरी हो अशा शुभेच्छा दिल्यात!
तिच्या आजारीपणाबद्दल मी चुकूनही आनंद व्यक्त करणार नाही. मला वाईट वाटते आणि तिने लवकर बरे व्हावे असे तो म्हणाला.

http://www.huffingtonpost.com/entry/donald-trump-hillary-clinton-pneumon...?

उलटे झाले असते तर बघा कोट्यावधी निरपराध मुस्लिमांचे आणि लक्षावधी मेक्सिकनांचे शाप कसे भोवतायत त्याला वगैरे पुरोगामी शेरेबाजी झाली असती!

हिलरी मुरलेली राजकारणी असली तरी ती कधी कधी Too Clever by half सारखी वागते. शुक्रवारीच न्युमोनिया झाला आहे असे जाहीर केले असते तर इतके रामयण झाले नसते. शिवाय लहान मुलगी पळत जाऊन मिठी मारते तेही स्क्रिप्टेड वाटते.

ट्रंपने हिलरीला लवकर बरी हो अशा शुभेच्छा दिल्यात! >>> धन्यवाद Happy

But you got to admit - त्या खान फॅमिलीबद्दल, जॉन मॅकेन बद्दल वगैरे तो म्हंटला होता त्यावरून काहीतरी अचाट बोलणे अशक्य नव्हते.

बाय द वे मी ट्रम्पद्वेष्टा नाही. पण तो कॅम्पेनचे सुरूवातीचे काही दिवस सोडले तर आवडण्यासारखे काही बोललेला नाही. हिलरीचा ही फॅन नाही. तिचे प्रत्यक्ष भाषण दोन वर्षांपूर्वी पाहिले/ऐकले होते. तोपर्यंत कॅम्पेन सुरू झालेली नसल्यामुळे असेल, पण ती उत्स्फुर्त बोलली होती आणि एकदम प्रेसिडेन्शियल वाटली होती. पण नंतर ट्रम्प आणि सॅण्डर्स च्या ओरिजिनॅलिटी पुढे तोलून मापून वाक्ये बोलणारे सगळेच उमेदवार "फोनी" वाटू लागले.

पण तो कॅम्पेनचे सुरूवातीचे काही दिवस सोडले तर आवडण्यासारखे काही बोललेला नाही. >> +१

ट्रम्पची ओरिजिनॅलिटी ही किती खरीच आहे आणि किती दिखावा आहे असा प्रश्न मला पडलेला आहे. तो बिझनेसमन आहे आणि रियालिटी शो होस्ट आहे त्यामुळे टिव्हीवर काय खपते हे त्याला नक्की माहिती आहे !

चला, आता माबोवरहि ट्रंपद्वेष्टेपणाचं सावट दूर होत आलंय असं बोलुन मी माझे दोन शब्द संपवतो... Wink

ट्रंपने हिलरीला लवकर बरी हो अशा शुभेच्छा दिल्यात! >> खर तर एव्हढ्यावरूनच ट्रंपचीची तब्येत बरी आहे ना असा प्रश्न पडायला हवा होता Lol

मी माझे दोन शब्द संपवतो >> In trump we trust राज Lol

खरा हिलरीभक्त : हिलरी चक्कर येऊन पडली तरी तिची तब्येत ठणठणीत असल्याचा दावा करतो उलट तिच्या तब्येतीविषयी काळजी व्यक्त करणार्‍यांचीच तब्येत ठीक नसल्याचा निष्कर्ष काढतो. धन्य ती हिलरी धन्य तिच्या भक्तांची अलोट भक्ती!

जाता जाता, न्यूमोनिया हा एका दिवसात होणारा आणि बळावणारा विकार नाही. जर कुण्या हौशी कलावंताने हिलरीच्या चक्कर येण्याची क्लिप प्रकाशित केली नसती तर तिला न्युमोनिया झाला आहे असा खुलासा तत्परतेने आला असता का? आजिबात नाही. आत्तापर्यंत तिच्या स्वास्थ्याविषयी कुणी काही बोलले तर त्याच्यावर टीकेचा भडिमार, नोकरीतून अर्धचंद्र असे घडलेले आपण पहातो.
एक मोठी जबाबदारी स्वीकरताना आपल्या आरोग्याबद्दल अशी काही धोक्याची घंटा वाजत असेल तर त्याबद्दल लोकांना वेळेत सांगणे आवश्यक नाही का? परिस्थिती हाताबाहेर गेल्यावर सांगणे प्रामाणिकपणाचे आहे का?

>> न्यूमोनिया हा एका दिवसात होणारा आणि बळावणारा विकार नाही.

हे ट्रम्प लाच सांगा कोणीतरी. हिलरी गेल्या आठवड्यापासून खोकते आहे, "समथिंग (एल्स) इज् गोइंग ऑन" असं म्हणाला ना तो? Happy

पण हिलरीद्वेष्टेपणा तसाच आहे असं दिसतंय >>> Lol

पण भारतातील राजकीय वादांवर एव्हाना एकमेकद्वेष्टेपणा सुरू होतो. त्यामानाने हे ठीक आहे Happy

ट्रंप नक्की काय म्हणाला माहित नाही, पण हिलरीने परत एकदा लपवून ठेवण्याची चूक (उघडकीस आली म्हणून चूक) केली आहे. कधी सांगायचं आणि कधी नाही हे जजमेंट महाकठीण आहेच. पण आता नंतर सांगावे लागल्याने हे नक्की ब्लो अप होईल.

जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या वागणुकीवरून कुणी काही निष्कर्ष काढेल तर तो आंधळा द्वेष म्हणता येत नाही.
मात्र एखादी व्यक्ती खरोखर कशी वागली आहे ते न बघता तो असा वागला असेलच असा आततायी निष्कर्ष काढणे हे द्वेषमूलक असू शकते.
इतकी तोळामासा प्रकृती असताना अट्टाहासाने ती लपवून आपण धट्टीकट्टी असल्याचा बहाणा करणे कितपत ठीक? असे करुन आपण आपल्या पाठिराख्यांची, पक्षाची आणि देशाची दिशाभूल करत आहोत असे वाटत नाही का?

न्युमोनिया असताना आणि डॉक्टरांनी रेस्ट घेण्याचा सल्ला दिलेला असतानाही २ दिवस १६-१६ तासांचे पूर्ण स्केड्युल पाळणे यात कसली आलीये तोळामासा प्रकृती ? बहुतेक आपल्या प्रकृती बद्दलच्या अपेक्षा काहीतरी वेगळ्या असाव्यात. न्युमोनिया असणे जाहीर केले नाही ही चूक आहे पण त्यामुळे लगेच तोळामासा प्रकृती , देशाची दिशाभूल वगैरे आरोप करणे म्हणजे सूतावरून स्वर्ग गाठण्याचेच लक्षण आहे.

>> न्युमोनिया असणे जाहीर केले नाही ही चूक आहे पण त्यामुळे लगेच तोळामासा प्रकृती , देशाची दिशाभूल वगैरे आरोप करणे म्हणजे सूतावरून स्वर्ग गाठण्याचेच लक्षण आहे.

+१

पण एकून मला हे खूप दुर्दैवी वाटतं की ह्या कॅन्डिडेट्स ना सामान्य माणसासारखं आजारी पडण्याचीही मुभा नाही. त्यातून आजारे पडलेच तर त्याने केव्हढा गहजब!

हिलरीने एखाद्या फिजोथेरपिस्ट कडून (फिजोथेरपिस्ट च्या ) वाडवडलार्जित प्रॅक्टिस च्या लेटर हेडवर 'हिलरीची प्रक्रुती ती प्रेसीडँट होण्यासाठी एकदम ठणठणीत आहे' असे सर्टिफिकेट घेतले नि खाली लफ्फेदार सही एली कि झाले, आहे काय नि नाहि काय ! Lol

>>ती प्रेसीडँट होण्यासाठी एकदम ठणठणीत आहे' असे सर्टिफिकेट घेतले नि खाली लफ्फेदार सही एली कि झाले, आहे काय नि नाहि काय<<

नाहि तर काय? एव्हढि साधी गोष्ट तिच्या कॅंपेन टिमच्या डोक्यात आली नाहि; म्हणे मुरलेली राजकारणी...

हिलरीच्या आजाराचे स्पष्टीकरण तितकेसे पटत नाही. न्युमोनिया हा संसर्गजन्य आजार आहे का? माझ्या मते आहे. मग ती लहान मुलांना मिठ्या मारणे वगैरे का करत होती? तिच्या आप्तस्वकीयांचे काय? तिने ह्या सगळ्या लोकांपासून दूर रहायला नको काय?
इतकी ती निष्काळजी आहे का दुसरेच कारण आहे? आणि दुसरे कारण असेल तर ते न सांगता न्युमोनिया का?

मागे बेनगाझीच्या चौकशीच्या वेळेस बाई असे म्हणाल्या की डोक्यावर पडल्यामुळे (कंकशन) त्यांना बेनगाझी प्रकरणी केलेल्या विचारपूशीतले काहीही आठवत नाही. आणि आत्ताचे हे चक्कर येणे हे संशयास्पद आहे. कदाचित ह्या न्यूमोनियापेक्षा गंभीर काहीतरी विकार असावा. डिमेन्शिया वा मेंदूचा तत्सम काही विकार असल्यास त्याने राष्ट्रपती म्हणून करण्याची कामे करण्यात ती कमी पडू शकते.

त्यांची ही लपवाछपवी जास्त संशय निर्माण करत आहे. तिच्या तब्येतीविषयी अनेक किंवदंता प्रचलित आहेतच. त्यामुळे चर्चांना उधाण येणारच.

एका म्हातार्या व्यक्तीला विकार होत आहेत हे ऐकल्यावर सहानुभूती वाटणारच. पण ही व्यक्ती अमेरिकेच्या सर्वोच्च पदावर आरुढ होऊ पहात आहे हे कळल्यावर जागरुक मतदाराला ह्याविषयी जास्त माहिती मिळवायची इच्छा होणे अस्वाभाविक नाही. विशेषतः बाईंची लपवाछपवीची, खोटारडेपणाची पार्श्वभूमी ढळढळीत दिसत असताना आजारपणाविषयी ती हरिश्चंद्रासारखी सत्यवचनी असेल असे का बरे समजायचे? सांगतायत त्यापेक्षा जास्त काहीतरी गडबड आहे असे का नाही वाटणार?

Pages