Submitted by maitreyee on 5 August, 2015 - 11:41
अमेरिकेच्या निवडणुका जवळ आल्यात !! २०१६ च्या रेस मधे रंग भरू लागलेत !! त्यावर चर्चा करायला हा धागा:
डेमोक्रॅटिक पक्षातर्फे मुख्य उमेदवार म्हणजे नारी शक्तीची एकमेव प्रतिनिधी हिलरी !!
बाकी बर्नी सँडर्स आणि सध्याचे व्हाइस प्रेसिडेन्ट जो बायडन (कदाचित) ही चर्चेत असलेली नावं.
रिपब्लिकन्स मधे मात्र डझनावारी उमेदवार बाशिंग बांधून उभे आहेत !! टॉपची चर्चेतील नावं - फ्लोरिडा चे एक्स गवर्नर आणि थोरल्या प्रेसिडेन्ट बुश यांचे धाकटे पुत्र जेब बुश, फ्लोरिडाचेच सिनेटर मार्को रुबिओ ,न्यू जर्सी गवर्नर क्रिस क्रिस्टी, सिनेटर्स रँड पॉल आणि टेड क्रुज, आणि लास्ट बट डेफिनेटली नॉट द लीस्ट - बिलिनेयर बिझ्नेसमन आणि अचाट वक्तव्यांसाठी आणि तेवढ्याच अचाट हेअरस्टाइलसाठी प्रसिद्ध डोनाल्ड ट्रम्प!!
एकूण पुढचे काही महिने मज्जाच मज्जा येणार !! 
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेंडेनक्षत्र, तुम्ही काय
शेंडेनक्षत्र, तुम्ही काय लिहिताय? हे असं ट्रंपच्या रॅलीत कोणी बोलतोय इतकी कुणकुण जरी लागली असती तरी त्या माणसाचे सिक्रेट सर्विसने काय हाल केले असते?
फर्स्ट अमेंडमेंट आणि हेट स्पीच, पोलिटिकल असॅसिनेशनला फूस यातला फरक जाणता का?
हा विनोद नाही, असला तर तो अंगाशी येणार याची त्याला माहिती अर्थात होती. हे तो मुद्दाम चिथवण्यासाठीच बोलला आहे. तो बुली कसा आहे हे आता लिहित नाही. कंटाळा आला.
>>तुम्ही लिहीलेल्या if.. if
>>तुम्ही लिहीलेल्या if.. if Hillary gets to put her judges या अधिकच्या ओळींनी काय बदल झाला त्या वाक्याच्या अर्थात ?<<
ते वाक्य महत्वाचं आहे कारण आधिच्या वाक्यांचा संबंध आहे त्या वाक्याशी..
अरे बाबांनो, त्या कमेंट्सचा संपुर्ण काॅंटेक्स्ट बघा, सोपं करुन सांगु?
१. हिलरी निवडुन आली तर ती स्वत:च्या मर्जीतले स्कोटस जज अपाॅयंट करेल
२. तिच्या मर्जीतले हे जज, गन कंट्रोल च्या बाजुने रुलिंग देतील
३. हे टाळण्याकरता हिलरीला निवडणुकित हरवणं आवश्यक आहे (पोलिटिकल ॲक्शन)
४. आणि ते सेकंड अमेंडमेंड पिपल, गन कंट्रोलच्या विरोधात असणारे लोक, मतपेटिच्या मार्गे करु शकतात...
आता यात वायलंस कुठुन आला?..
वर कोणी म्हणालय तसं तो हे
वर कोणी म्हणालय तसं तो हे त्याला रिपब्लिकन पीपल, वुई अमेरिकन पिपल, सपोर्टरस आणि काहीही संबोधन वापरून म्हणता आलच असतं. तसं न म्हणता यु सेकंड अमेंडमेंट पिपल म्हणालाय तो. का बरं असेल असं?
मतपेटिच्या मार्गे करु शकतात.
मतपेटिच्या मार्गे करु शकतात. >> हे कुठे म्हणाला. सगळीकडे सेकंड अमेंडमेंट म्हणजे गन्स असलेले पिपल असे अध्यारूत आहे
आणि तसं पाहिजे असेल त्याला तर पूर्ण म्हणावं ना ! अशी नरो वा कुंजरो वा कमेंट कशाला द्यावी. मतपेटीचा उल्लेख केला असता पूर्णपणे तर कोणीच गदारोळ घातला नसता.
>>तो इनव्हायटेड वगैरे नव्हता.
>>तो इनव्हायटेड वगैरे नव्हता. सर्वांना खुल्या असलेल्या सभेत तो ही आला होता. इतकेच.<<
तो काल टिवीवर अभिमानाने सांगत होता - आय वाज इन्वायटेड. बरं ठिक आहे, एकवेळ धरुन चालुया नव्हता इन्वायटेड; मग तो हिलरीच्या मागे स्टेजवर कसा पोचला? गेल्या महिन्यात सुटाबुटात मेजर नेटवर्क्सवर मुलाखती देत होता, हिलरी कॅंपेनच्या कोणाच्याच नजरेला पडला नाहि? आणि या सगळ्या प्रकरणात हिलरीबाई मुग गिळुन गप्प. तो दाल में कुछ काला है कि नहि?..
>> हे कुठे म्हणाला<< हे
>> हे कुठे म्हणाला<<
हे एक्स्प्लिसिटली म्हणाला नाहि, पण त्याचा अर्थ हीलरीला ॲसॅसिनेट करण्याची धमकि हा काढणे म्हणजे काय च्या काय...
ॲसॅसिनेट करण्याची धमकि >> असा
ॲसॅसिनेट करण्याची धमकि >> असा काढलेलाच नाहीये. तुमच्या हातात आहे, तुम्ही काहीही करू शकता. इतकी चिथावणी गन ओनर्स करता आहे (त्यात काही माथेफिरूही असू शकतात)
>>वर कोणी म्हणालय तसं तो हे
>>वर कोणी म्हणालय तसं तो हे त्याला रिपब्लिकन पीपल, वुई अमेरिकन पिपल, सपोर्टरस आणि काहीही संबोधन वापरून म्हणता आलच असतं. तसं न म्हणता यु सेकंड अमेंडमेंट पिपल म्हणालाय तो. का बरं असेल असं<<
बिकाॅज दोज पिपल वुड गेट ॲफेक्टेड, सो आॅब्वियस्ली हि ॲड्रेस्ड देम...
>>ॲसॅसिनेट करण्याची धमकि >>
>>ॲसॅसिनेट करण्याची धमकि >> असा काढलेलाच नाहीये.<<
आयला, सगळ्या मिडियात हेच गाणं वाजतंय कालपासुन. त्या वाॅरेन बाई पण हेच म्हणाल्या काल...
बर एक मिनिट मानून चालू हे
बर एक मिनिट मानून चालू हे असंच आहे.
तर हे असं भोंगळ ही व्यक्ती प्रेसिडेंट म्हणून बोलायला लागली तर काय प्रसंग ओढवतील अमेरिकेवर?
प्रचारात कुठल्या टप्प्यात काय
प्रचारात कुठल्या टप्प्यात काय बोलावे आणि अध्यक्ष बनल्यावर काय बोलावे ह्यात नेहमीच फरक असतो.
उदा. प्रायमरीत ख्रिस ख्रिस्ती ट्रंपचा विरोधक होता पण नंतर ते एकत्र आले.
बर्नीचेही तेच.
प्रचारसभेत जे बोलले जाते ते उपस्थितांची मते मिळवण्यासाठी असते. धोरणे, मुत्सद्दीपणा ह्या मुद्द्यांना कमी महत्त्व असते. ह्याचा अर्थ तेच पुढे चालू रहाते असे नाही.
ट्रंप जे बोलला आहे त्यातील विविध छटांपैकी एकाचा अर्थ हिंसेचा आहे. अन्य अर्थ लावता येतात. त्याच्या २ र्या घटनादुरुस्तीच्या समर्थकांना जो अर्थ अभिप्रेत होता त्यांनी तो लावला. आता हा दखलपात्र गुन्हा होऊ शकतो का? मला आजिबात वाटत नाही. निव्वळ विचार मांडण्याने गुन्हा होत नाही. निदान अमेरिकेत तरी.
ट्रंपचे हे विधान त्याच्या बाकी वादग्रस्त विधानांप्रमाणेच कपातले वादळ असणार ह्याची खात्री आहे. त्या निमित्ताने तो प्रसिद्धी झोतात येतो आहे.
दुसरीकडे विकीलिक्स ही हिलरीची वाढती डोकेदुखी बनते आहे. त्यावर उपचार म्हणून ज्युलियस असांजला गोळी खावी लागणार बहुतेक (टायलेनॉल हो!)
http://www.cnn.com/2016/08/10
http://www.cnn.com/2016/08/10/politics/trump-second-amendment/
"A US Secret Service official confirms to CNN that the USSS has spoken to the Trump campaign regarding his Second Amendment comments.
"There has been more than one conversation" on the topic, the official told CNN. But it's unclear at what level in the campaign structure the conversations occurred.
The campaign told the USSS that Donald Trump did not intend to incite violence, according to the official."
"No such meeting or conversation ever happened," Trump tweeted in response to CNN's report.
सिक्रेट सर्विस (हो
सिक्रेट सर्विस (हो अमेरिकेचीच) ट्रंप कॅंम्पशी (हो ज्याबद्दल ट्रंप डिनाय करतोय) एकाहून जास्त वेळा २न्ड अमेंडमेंट वक्तव्यानंतर बोलली.
>>प्रचारसभेत जे बोलले जाते ते उपस्थितांची मते मिळवण्यासाठी असते. धोरणे, मुत्सद्दीपणा ह्या मुद्द्यांना कमी महत्त्व असते. ह्याचा अर्थ तेच पुढे चालू रहाते असे नाही. >>
म्हणजे नंतर तो धोरणी आणि मुत्सद्दी बनणार तर!! पण हे आणि डेंजर की हो.
तो तसा बनला तर मग राजकारणीच झाला की तो. मत देणारे लोक म्हणतील, याच साठी केला होता अट्टाहास!
आणि नाही बनला तर तुम्ही ही कबूल करताय की हे त्याचं बोलणं आततायीपणाचं आहे! असलं बोलणं प्रेसिडेंटला शोभत नाही.
अंजली तुझी पोस्ट आत्ता पाहिली .
"टाका रे बाँब त्या इराण वर"
"टाका रे बाँब त्या इराण वर" किंवा "मला नरेंद्र मोदींनी फोन वर सांगितले की त्यांच्याकडे ८७ अणू बाँब आहेत !"
असले काहीतरी पूर्वी रेगन पण बोलला होता. माईक ऑन आहे हे त्याला माहित नव्हते म्हणून तो जोक करत होता.
बुवा, कसला बोडक्याचा बेनेफिट ऑफ डाऊट ............हा 'मला काय कोण करणार आहे' हा माज आहे.
असेच मला वाटते. त्याचे चमचे नाक दाबून त्याचा डायपर बदलण्याखेरीज काही करू शकत नाहीत.
बाकी जर्सी शोअर, किम कैदाशीण वगैरे बघणारे लोक ट्रंप सारख्यांनाच पाठिंबा देणार. काहीतरी गलिच्छ शिव्या द्यायच्या, खर्याखोट्याची चाड नाही, हाणा मारा याशिवाय दुसरे काहीच त्यांना माहित नाही.
== म्हणजे नंतर तो धोरणी आणि
==
म्हणजे नंतर तो धोरणी आणि मुत्सद्दी बनणार तर!! पण हे आणि डेंजर की हो.
तो तसा बनला तर मग राजकारणीच झाला की तो. मत देणारे लोक म्हणतील, याच साठी केला होता अट्टाहास!
आणि नाही बनला तर तुम्ही ही कबूल करताय की हे त्याचं बोलणं आततायीपणाचं आहे! असलं बोलणं प्रेसिडेंटला शोभत नाही.
==
नेत्याची भाषा ही ज्या प्रकारचे श्रोतेगण असते त्याप्रमाणे बदलते. हा कॉमन सेन्स आहे. एखादा उद्योगपती आपल्या कंपनीशी बोलताना एक आणि बाहेरच्या गिर्हाईकाशी बोलताना दुसरे असे करतोच. त्याकरता मुरलेला राजकारणीच असायची गरज नाही. प्रचारसभेत जी भाषा वापरली जाते ती भाषा राष्ट्रपती बनल्यावर वापरायची गरज नसते. तिथे वेगळी गरज असते आणि ती ट्रंप हिलरीपेक्षा चांगली भागवेल अशी खात्री आहे.
ट्रंपने केलेला हा एक फसलेला विनोद आहे. एवढेच मला वाटते आहे. हिलरीला कुणी तरी ठार करावे असे त्याचे मत असेल असे मला तरी वाटत नाही. ज्यांना त्याच्याबद्दल चीड आहे ते काय वाट्टेल ते त्याच्या माथी मारतीलच. बर्नीच्या नादाने हिलरी थोडी जास्त डावी बनू पहात आहे तिची ती डावी धाव पाहून ट्रंपने ही खेळी खेळलेली आहे. आता हिलरी जर बंदूकवाल्यांच्या बाजूने बोलू लागली तर नाखुशीने, बर्नीच्या म्हणण्याला मान देऊन तिला मत देणारे लोक काय म्हणतील? बघू या.
कितीही भयावह वाटले तरी हे विधान काळाच्या ओघात टिकणार नाही. आठवड्यानंतर लोक विसरून जातील. खात्री ठेवा.
बहुधा हा कमेंट पण साधासुधा
बहुधा हा कमेंट पण साधासुधा विनोदच होता.
https://www.washingtonpost.com/news/morning-mix/wp/2016/07/29/i-wanted-t...
कितीही भयावह वाटले तरी हे विधान काळाच्या ओघात टिकणार नाही. आठवड्यानंतर लोक विसरून जातील. खात्री ठेवा. >> हे मात्र खरंय कारण दोन दिवसांनी महाशय काहितरी अजून भयंकर बरळतीलच. खात्री ठेवा.
==बहुधा हा कमेंट पण साधासुधा
==बहुधा हा कमेंट पण साधासुधा विनोदच होता.
आपण उद्धृत केलेली बातमी वाचलीत तर दस्तुरखुद्द वार्ताहरही बातमी देताना असे म्हटला की "मारणे म्हणजे शारिरिक मार की शाब्दिक मार हे नीट कळू शकले नाही" आता बोला!
ह्यात काही विनोद बिनोद नाही तर संताप आहे. डी एन सी अधिवेशनातील तोडलेले तारे ऐकून माझाही संताप झाला होता. किती तो ढोंगीपणा! किती तो खोटारडेपणा! असो.
दोन दिवसांनी महाशय बरळतील किंवा हिलरीची काही तरी भयानक लीक उघडकीस येऊन लोक त्याची चर्चा करु लागतील. कदाचित सौदी अरेबियाकडून गलेलठ्ठ रकमा हिलरीला निवडणुकीच्या फंडाकरता मिळाल्याची बातमी येईल!
जाता जाता, पाथ टू ९/११ ह्या नावाचा डॉक्यूड्रामा अर्थात नाट्यपूर्णपणे सादर केलेला माहितीपट ए बी सी ह्या वाहिनीने बनवला होता. एक अत्यंत अभ्यासपूर्ण, उत्तम प्रकारे सादर केलेली ही कलाकृती होती. त्याकरता नामवंत कलावंतांना भक्कम पैसे मोजून महत्त्वाच्या भूमिका करायला दिल्या होत्या. परंतु त्यात बिल क्लिंटनच्या निष्क्रियतेबद्दल ताशेरे होते (बिन लादेनला पकडण्याकरता कुठलीही पावले उचलली नाहीत म्हणून). आणि ते ऐकून (फिल्म न बघताच) बिलसाहेब घुश्श्यात आले. हिलरीच्या निवडणुकीत आडकाठी होऊ नये म्हणून त्याने डिस्नी आणि एबीसी वर जोरदार दबाव आणला आणि ह्या डॉ ड्राम्याला गुंडाळून ठेवावे लागले. ह्याची काही दिवसांनी डी व्ही डी बनवायचा बेत होता पण त्यालाही बिलने मोडता घातला. एकदा ह्या फिल्मचे प्रसारण झाले कसे बसे पण त्यानंतर ती जी बासनात गुंडाळून ठेवली गेली ती कायमचीच.
एकंदरीत क्लिंटन दांपत्य अभिव्यक्तीस्वातंत्र्याला किती महत्त्व देते हे ह्या उदाहरणावरून स्पष्ट व्हावे. बिन लादेन वा जवाहिरीपेक्षा क्लिंटनला जास्त राग यावा हे मोठे बोलके आहे.
अरे पण हे तर तिकडे भारतीय
अरे पण हे तर तिकडे भारतीय राजकारणावर वाद चालतात तसे झाले. भाजपने काही केले म्हंटले तर काँग्रेस किती वाईट आहे ती उदाहरणे, आणि काँग्रेसवर टीका केली, तर भाजप. हिलरी व क्लिंटन फॅमिली काड्या करत असतील तर त्याने ट्रम्प कसा जस्टिफाय होतो? तो प्रेसिडेण्ट झाल्यावर सगळे ठीक करेल म्हणणे म्हणजे पूर्वी एखाद्या वाया गेलेल्या पोराचे लग्न झाल्यावर आपोआप सुधारेल म्हणून लग्न लावून देत तशी आशा लावण्यासारखे आहे. तो नंतर काहीतरी भारी करेल अशी कोणतीही शक्यता त्याचे आत्तापर्यंतचे बोलणे ऐकून वाटत नाही.
आणि हे सगळे लिहीणारे हिलरीचे फॅन्स नव्हेत. पण आत्ता हॉट शॉट्स पिक्चर मधे चार्ली शीन ला निवडण्याचे कारण ती सीआयए वाली जे देते, "You are the best of what's left" ते या दोघांमधे ती बरी म्हणण्याचे आहे
गेल्या सहा महिन्यांत ट्रम्प ने असे कधी दाखवून दिलेले आहे की तो एका प्रचंड चेक्स अॅण्ड बॅलन्सेस असलेल्या सिस्टीम मधे राहून, घटनेच्या चौकटीत स्वतः राहून व त्याच घटनेने काँग्रेस, मिलिटरी, न्यायालये ई. ना दिलेले अधिकार मानत, त्यातून निघणार्या राजकीय पेचांमधून मार्ग काहीतरी स्मार्ट बदल करू शकेल? बाहेरचा माणूस एकदम बसवून सगळे प्रॉब्लेम सोडवायला ही काही हुकूमशाही नव्हे. "वॉशिन्ग्टन" च्या सिस्टीम मधून प्रॉब्लेम सोडवायला त्यात अत्यंत मुरलेला, बेरकी राजकारणी लागतो. इतरांना कधी गुंडाळून टाकतील कळणार पण नाही.
Donald Trump Calls Obama
Donald Trump Calls Obama ‘Founder of ISIS’ and Says It Honors Him
http://www.nytimes.com/2016/08/11/us/politics/trump-rally.html
== हिलरी व क्लिंटन फॅमिली
== हिलरी व क्लिंटन फॅमिली काड्या करत असतील तर त्याने ट्रम्प कसा जस्टिफाय होतो?
ट्रंपने केलेला विनोद हा एक फसलेला विनोद आहे हे मी आधीच म्हटले आहे. त्याचे समर्थन कसे केले बरे?
पण ट्रंपच्या बोलण्यातल्या चुका आहेत ज्या पेकॅडिलो म्हणण्याइतक्या क्षुल्लक आहेत. हिलरीचे प्रमाद हे भयानक आहेत. त्यात लोकांचे जीव जातात. लोकांच्या कारकीर्दीची धूळदाण होते. मात्र माध्यमे फक्त ट्रंपवर राळ उडवतात. हिलरीला मात्र मोकळे रान!
===तो प्रेसिडेण्ट झाल्यावर सगळे ठीक करेल म्हणणे म्हणजे पूर्वी एखाद्या वाया गेलेल्या पोराचे लग्न झाल्यावर आपोआप सुधारेल म्हणून लग्न लावून देत तशी आशा लावण्यासारखे आहे
==
हिलरीने वेळोवेळी असे सिद्ध केले आहे की मोठी जबाबदारी दिल्यावर ती तिची वाट लावणारच. मध्यपूर्वेतील अनेक देश तिच्या "अफाट कर्तृत्त्वाला" बळी पडले आहेत. जिची कारकीर्द अशी काळीकुट्ट आहे तिला आणखी मोठी जबाबदारी देणे कितपत योग्य आहे?
==
बाहेरचा माणूस एकदम बसवून सगळे प्रॉब्लेम सोडवायला ही काही हुकूमशाही नव्हे. "वॉशिन्ग्टन" च्या सिस्टीम मधून प्रॉब्लेम सोडवायला त्यात अत्यंत मुरलेला, बेरकी राजकारणी लागतो. इतरांना कधी गुंडाळून टाकतील कळणार पण नाही.
==
काय आहे वॉशिंग्टनची सिस्टम? बड्या आर्थिक कंपन्यांच्या खिशात असणे? का शस्त्रास्त्रांच्या व्यापार्यांच्या खिशात असणे? त्या बाबतीत हिलरी अत्यंत मुरलेली बेरकी वगैरे वगैरे आहे. अशा कंपन्यांकडून कोट्यावधी डॉलर खाऊन त्यांचे प्रमाणपत्र हे राजकारणी लोकांचे कर्तृत्त्व समजत असाल तर त्यात हिलरी निष्णात आहे ह्यात शंकाच नाही. पण अशा नेत्यांनाच तर जनता कंटाळली आहे. ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी छाप ध्येयधोरणे किती वेळ खपवून घ्यायची? बडी धेंडे राजकारण्यांना विकत घेऊन हवे तसे कायदे, हवी तशी धोरणे बनवतात. त्याकरता मुरलेले नव्हे तर सडलेले राजकारणी वापरले जातात.
बर्नी आणि ट्रंप या प्रस्थापितांपेक्षा वेगळे वाटतात आणि म्हणूनच लोकांना भावतात. हिलरीच्या समर्थकांत एक मोठा निरुत्साह असण्याचे कारण हिलरीचे भ्रष्ट असणे. ह्याला मुरब्बीपणाचा गिलावा लावून आतला भ्रष्टाचार फार वेळ झाकला जात नाही.
शेंन - तुम्ही पुन्हा हिलरी
शेंन - तुम्ही पुन्हा हिलरी किती वाईट आहे कडे जात आहात. ती तशीच आहे असे गृहीत धरू. तरीही ट्रम्प जस्टिफाय होत नाही. त्याने तसे काहीही करून दाखवलेले नाही. तो म्हणतो ते त्याला म्हणायचे नसते - हे जास्तीत जास्त चॅरिटेबल समर्थन होईल त्याच्या बोलण्याचे. तुम्ही ट्रम्प च्या बोलण्याचे समर्थन करत आहात असे नाही, पण ट्रम्प वर आरोप केला की हिलरी किती वाईट याने काय सिद्ध होते?
काय आहे वॉशिंग्टनची सिस्टम? बड्या आर्थिक कंपन्यांच्या खिशात असणे? का शस्त्रास्त्रांच्या व्यापार्यांच्या खिशात असणे? >>> "इम्पॅक्ट" साठी चांगले आहे :), पण मी सिस्टीम म्हणतोय ती एखादे बिल पास करून घ्यायला ज्या वेगवेगळ्या सार्वजनिक ते स्वार्थी इंटरेस्ट असलेल्या, स्वतःबद्दल भलताच समज व इगो असलेल्या असंख्य लोकांना आपल्याबरोबर घेउन ते करावे लागते, लोक कोणत्याही नवीन कार्यक्रमात ज्या कायदेशीर काड्या घालतात त्या तिचक्याच तयारीत सोडवाव्या लागतात त्याबद्दल. त्याला हे सगळे नियम, अधिकार, त्यातील खाचाखोचा माहीत असणारी व्यक्ती लागते.
एखाद्या बाहेरच्या माणसाने कसलाही राजकीय अनुभव नसताना मी हे करून दाखवीन म्हणणे ठीक आहे - पण निदान तसा विश्वास बसेल असे काहीतरी त्याच्या वागण्यात, भाषणात दिसायला हवे. ते कोठेच दिसत नाही.
परफेक्ट लिहिलस फा! दोन्ही
परफेक्ट लिहिलस फा! दोन्ही पोस्टींना जोरदार अनुमोदन!!!
हिलरीच्या परराष्ट्र
हिलरीच्या परराष्ट्र धोरणाविषयी वरचं म्हणणं असेल, तर मित्रराष्ट्रांबरोबर केलेले करार न पाळण्याचे, नाटोला कमजोर करण्याचे तसेच न्यूक्लिअर ताकदीचा वापर करू पाहणारे धोरण असे कुठे फार दूरदर्शी वाया चालले आहे?!
>>Donald Trump Calls Obama
>>Donald Trump Calls Obama ‘Founder of ISIS’ and Says It Honors Him<<
नुस्ती लिंक देउ नका हो, तुमचं त्यावर मत काय आहे ते लिहा...
फारएण्ड, दोन पार्टि सिस्टम
फारएण्ड, दोन पार्टि सिस्टम असताना मत एकालाच देता येणार ना? अपक्श उमेदवाराला वोट किंवा नो वोट इन्डायरेक्टली दोघांपैकि एकालाच जाणार ना? मग उघडपणे जस्टिफाय करा अथवा त्यांचे वाभाडे काढा, काय फरक पडतो?
==पण ट्रम्प वर आरोप केला की
==पण ट्रम्प वर आरोप केला की हिलरी किती वाईट याने काय सिद्ध होते?
हे सांगायचा प्रयत्न आहे की हिलरीच्या ज्या कर्तृत्त्वाचे गोडवे गायले जात आहेत ते कर्तृत्त्व प्रत्यक्षात जहरी कडू आहे. त्यामुळे काही पार्श्वभूमी नसणारा आणि अपयशी पार्श्वभूमी असणारी अशी ही तुलना आहे. बोलण्यातील चुकांपेक्षा प्रत्यक्ष वागण्यातील चुकांना मी जास्त महत्त्व देईन.
तुम्ही तहानलेले असाल आणि तुमच्या पुढे एक मचूळ वा कडवट पाण्याचा आणि एक जहाल विषारी पाण्याचा ग्लास ठेवलात तर तुम्ही काय कराल? मचूळ पाणी स्वीकाराल ना? माझ्या लेखी दोन उमेदवारांची तुलना साधारण अशी आहे.
ट्रंपचे अवगुण हवे तेवढे गाता येतील पण दुसरा पर्याय जास्त भयानक आहे आणि माझ्यापुढे दोनच पर्याय आहेत आणि त्यातलाच मला निवडावा लागणार.
हो राज बरोबर आहे. हिलरी ही
हो राज बरोबर आहे. हिलरी ही कन्व्हेन्शनल कॅण्डिडेट आहे. तिचे दोष धरले, तरी पर्याय जास्त वाईट आहे. हे मी म्हणतोय.
तुम्ही तहानलेले असाल आणि
तुम्ही तहानलेले असाल आणि तुमच्या पुढे एक मचूळ वा कडवट पाण्याचा आणि एक जहाल विषारी पाण्याचा ग्लास ठेवलात तर तुम्ही काय कराल? >>>> अहो पण दुसरे पाणी मचूळ, गढूळ आहेच पण ते विषारी नाहीच आहे हे कुठे माहित आहे तुम्हाला?? मग कसं काय ते निवडणार ??
हेच ट्विस्ट करून असेही म्हणता येईल की काही झाले तरी विषच प्यायचेय मग मचूळ, गढूळ आणि घाणेरड्या चवीचे पिण्यापेक्षा स्वच्छ आणि गोड चवीचे तरी पिऊ
>> स्वच्छ आणि गोड चवीचे
>> स्वच्छ आणि गोड चवीचे
शें न उपमा आवडली ! शिवाय ते
शें न उपमा आवडली ! शिवाय ते मचूळ पाणी पंचगव्य असेल तर ऐन श्रावणात पुण्यही लाभेल.
Pages