निसर्गाच्या गप्पा (भाग २७)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 4 August, 2015 - 05:07

रामराम दोस्तांनो,

वर्षाऋतु चे काहीच दिवस शिल्लक राहिलेत.. पावसाळ्याचे नै बर का !
सुरुवातीला,
" वो है जरा.. खफा खफा.
के नैन यु .. चुराए है.. "
या गाण्यातल्या प्रियकराप्रमाणे
रुसुन बसलेला पाऊस आता लाडात येऊन मनभरुन बरसायला लागलाय .. ऋतुअखेरीस
तो या धरणीच्या हरेक कोपर्‍याला भिजवुन सोडेल अशी आशा करुया .

सरत्या ऋतुबरोबर हे दिवस आपल्यासाठी घेऊन येतात विविध सणवारं . खरतर
सगळीच हिंदु सणवार एकदम खासमखास आहेत; निसर्गाचे आपापल्या परिने धन्यवाद
मानणारी..

सुरुवात होते ती नागपंचमी पासुन. शेतकर्‍यांचा मित्र असणार्‍या या सापाची
आणि त्यांचा राजा म्हणुन दिमाखात मिरवणार्‍या नागाची आपण यात पुजा करतो.
त्यानंतर येणार्‍या नारळीपोर्णिमेला अथांग अश्या समुद्राला नारळ अर्पुण
वरुणदेवाला धन्यवाद देतो. पोळ्याला ज्याच्या मदतीशिवाय जगायचा विचारही
आपण करु शकत नाही अश्या बैलांना गोड घास भरवुन त्याच्या उपकारांची धन्यता
मानतो . पोळ्यानंतर येणारी हरितालिका, ज्यात आपण पुजा करतो पार्वतीची..
साक्षात प्रकृतीची.. निसर्गाची.. आणि शेवटी येतो आपला सर्वांचा लाडका
बाप्पा.. गणराय.

वर्षाऋतु स्वतःबरोबर खुप मोठा आनंदाचा ठेवा घेऊन येतो. येणार्‍या
प्रत्येक थेंबाबरोबर आपणही आपले दु:ख विसरुन निसर्गाच्या घडीघडी बदलत
जाणार्‍या रुपात सणावारांच्या साक्षीने त्याच्या अधिकाधिक जवळ जातो. पण
खर तर त्याच्या जाण्याचा काळ मनाला खुप हुरहुर लावुन जातो. त्याला
निरोपाचे बोल बोलायचे असतात आणि जोडीला रंगीबेरंगी फुलाफळांची बरसात
करणार्‍या शरदाच्या आगमनाची तयारीही करायची असते.

त्या आभाळाचे रंग बदलायला सुरुवात झाली आहे.. दिवस कमी उरलेत दोस्तांनो
Wink .. भिजायचं शिल्लक असेल तर भिजुन घ्या.. हे दिवस परत उगवायला एक अख्ख
वर्ष वाट बघावी लागणारे. या काळात निसर्ग ज्या खुल्या दिलाने
इंद्रधनुष्याचे जे रंग आपल्यावर उधळत आहे त्यात सामावुन जा, त्याच जतन
करा..
कारण आपण या निसर्गाचे खुप देणे लागतो; तो आपले नाही..

वरील प्रस्तावना व फोटो मायबोलीकर टीना यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली.
मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518 (भाग २४) http://www.maayboli.com/node/52059
(भाग २५) http://www.maayboli.com/node/53187 (भाग २६) http://www.maayboli.com/node/54423

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

https://en.wikipedia.org/wiki/Chinese_wax

http://www.britannica.com/science/Chinese-wax

या लिंक्स बघा.. इथे चित्र नाही आहे.

पण हे कळल्यावर मला इथले नि ग कर अशा उद्योगाला लागलेत, अशी स्वप्ने पडायला लागलीत.

हो माधव, हिच ती.

गौरीच्या दिवसात हिची अमाप तोड होते. फळे धरू दिली जात नाहीत. पण अधिक महिना आला तर हिचा बहर आधी येतो आणि फळे तयार होतात व पुढच्या वर्षीची सोय होते.

हो अन्जू.. पण ही फुले अगदी कॉमन आहेत. मुंबईच्या बाहेर पनवेलच्या दिशेने गेल्यावर सहज दिसतात. माझ्या आठवणीत तर बेलापूर स्टेशनच्या बाहेरही वेल होता याचा. गौरीच्या दिवसात डोंबीवलीच्या बाजारात नक्की असतील.

त्या पिवळ्या किड्यावरून आठवले. कृत्रिम रंग भारतात यायच्या आधी, गुलाबी रंगासाठी कोचिनेल नावाचा रंग फार लोकप्रिय होता. तो पण अश्याच एका किड्यापासून मिळवत. हा किडा फड्या निवडुंगावर वाढत असे. पण महाराष्ट्रात फड्या निवडुंगच कमी झाल्याने हा रंगही मिळणे बंद झाले.

या निवडुंगाच्या फळापासूनच डोंगरे बालामृत नावाचे औषध तयार करत असत.. याच कारणासाठी हे औषधही बम्द पडले.

दिनेश दा कीड्यांपासुन मेण.. बापरे. चायनीज लोक काही पण करु शकतात.. (वर्षु दी तु आता भारतात आलीयेस ना! :दिवा:)

common name: Glory Lily, Gloriosa lily, Tiger claw, claw • Hindi: बचनाग bachnag, kadyanag, करी हरी kari hari, languli, उलट चन्दल ulatchandal • Marathi: कळ लावी Kal-lavi, indai, khadyanag, वाघचबका vaghachabaka • Tamil: கலப்பை கிழங்கு Kallappai kilangu • Malayalam: Kithonni, Mendoni • Telugu: అగ్నీసిఖా Agnisikha • Kannada: ಅಗ್ನೀಸಿಖೆ Agnisikhe, karadikanninagadde, siva-raktaballi, siva-saktiballi • Bengali: Bishalanguli, Ulatchandal • Oriya: garbhhoghhatono, meheriaphulo, ognisikha, panjangulia • Urdu: Kanol, Kulhar • Gujarati: દૂધિઓ Dudhio, વછોનાગ Vacchonag • Sanskrit: अग्निमुखी Agnimukhi, अग्निशिखा Agnisikha, ailni, garbhaghatini, Kalikari, Langalika • Nepali: नेपाली केवारा Nepali kewara
Botanical name: Gloriosa superba Family: Liliaceae (Lily family)
Synonyms: Gloriosa rothschildiana, Gloriosa speciosa,
(www.flowersofindia.net)

नमस्कार निगकर्स. हॉडी? सगळे फोटोज पाहिले फ्फ करून.. मस्त आहेत.

आताच मिनी मायदेश ट्रीप झाली. नशीबाने एका माहितगारणीबरोबर एक छोटा ट्रेल केला. पहा बरं ही झाडं आणि माहिती सांगा. मी नंतर देईनच पण आता असंच थोडा टीपी म्हणून.

pev1.jpgpev2.jpg

बापरे.. केव्हढी माहिती मिळाली इथे आजच्या आज.. वॉव..
वाघनखं, मेण.., फुलं... काय काय!!! मस्तं...

हीही... सायली...

वेका... ओह यंदा भेट चुकली परत आपली.. भारतात येण्याच्या वेळा ठरवायला हव्यात आता पासून..

वर्षू तू जगप्रवासीण आहेस. तुला कुठचा वेळ आम्ही कधीही आलो तर? बरं ज्या पावसासाठी तू घाबरून पळालीस तो तर तिथे नव्हताच गडे Wink

तुझ्या युएसट्रिपला जास्त चांगली भेट होऊ शकेल उलट. मायदेशात मोप माणसं घरचीच असतात त्यामुळे काही गॅरेंटी नसते गं. यंदा तर आजारपणातच वेळ गेला. असो. तू मी टाकलेले साधे सोप्पे फोटो पण पहा की Wink

वाघनखीलाच अग्नीशिखा म्हणतात का? वरचा फोटो बघुन विचारते.>>
माझ्याकडे पण आहे अग्नीशिखाचा फोटो. झब्बु देतो थोड्या वेळात. Happy

हे बघा. Agnisheekha.jpg

येस्स्स पेव. यावरून आपल्या मराठीतला "पेव फुटणे" हा वाक्प्रचार आला असावा >>> असे मला पण सांगण्यात आले होते. पण येथील हिरा या आयडीने पेव = जमीनीखालची धान्य साठवायची जागा हा खरा अर्थ असल्याचे सांगितले होते.

हळदीपासून हळकुंडे बनवताना, ती मूळे उकडून जमिनीखाली मोठ्या घड्यात पुरतात. मग काही काळानी ती उघडतात. त्याला पेव असा शब्द आहे.

पेव म्हणजे धान्याची जागा असेल. मग ती फुटतात पण का?

ही फुलं पाऊस झाला की अचानक वारेमाप येतात, त्या अर्थाने पेव फुटणे असू शकेल. अर्थात माझ्याकडे ऐकीव माहिती आहे दोन्हींची. त्या बाईंना धान्याचं पेव देखील कळवते. माय पॉइंन्ट, फुलं पाहायला छान वाटतात. त्या निसर्गसौंदर्याचा आनंद घेणं मला जास्त आवडलं. त्या ट्रीपमध्ये खूप फुलपाखरं देखील दिसली. कधी वेळ मिळाला तर टाकेन फोटोज.

कांपो, जागूब आणि सर्व, मस्त फोटो.

Pages