निसर्गाच्या गप्पा (भाग २५)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 21 March, 2015 - 09:43


(निसर्गाची नैसर्गिक गुढी/तोरणे)

सर्व निसर्गप्रेमींना सप्रेम
नमस्कार,

गोनीदां, डॉ. शरदिनी डहाणूकर, दुर्गाबाई यांजसारखे जे निसर्गप्रेमी आहेत ते सतत आठवणीत असतातच पण त्यांचा विशेष आठव होतो ऋतूबदल होतो तेव्हा - काय सुरेखरित्या या नैसर्गिक गोष्टीला ते शब्दबद्ध करु शकतात !!

गोनीदांनी " माचीवरला बुधा" या कादंबरीत लिहिलेले हे वर्णन का पहाना ...
"फाल्गुन लागला. अन चाफ्याची सगळी पानं गळून पडली. त्यांच्या टोकाला बारीक बारीक कळ्या धुमारल्या. ती टोकं तांबूस चकचकीत दिसू लागली. होता होता कळ्या फुलल्या. सगळं टेमलाईचं पठार चाफ्याच्या वासानं घमघमायला लागलं.उंबराचीही पानावळ पार झडून
गेली होती. पण फाल्गुन लागताच त्या झाडाच्या अंगी चैतन्य रसरसलेलं दिसू लागलं. त्याच्याच अंगी का, सगळ्याच झाडांची तीच गत झाली. रानची सगळीच झाडं नव्हाळली, देखणी दिसायला लागली. त्यांच्या फांद्याच्या हातांना जणू कोवळी तांबूस नखं फुटली. त्या कोवळ्या झळाळीनं सगळं रान श्रीमंत झालं."
(साभार - माचीवरला बुधा - गोनीदा - मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस)

जरी आपण सगळे शहरी असलो तरी आपल्या आसपासच्या झाडापानात जो बदल होत असतो तो पाहून आपण
आंत कुठेतरी सुखावतो, श्रीमंत होत असतो. या निसर्गाची विविध रुपे पहाताना त्यातून जी निर्मळ प्रसन्नता, शांति व सौंदर्य यांची लयलूट केली जाते त्याची साठवण आपल्या मनात कशी करता येईल हे जरुर
पहावे.

सार्‍या झाडांसारखेच या नव्या वर्षाचे आपण उत्फुल्ल मनाने स्वागत करु या, कोवळ्या पालवीसारखी एक सुंदरशी सतेज गुढी आपल्याही मनात उभारुयात - चैतन्यमय होऊया, अमृतमय होऊया
....

असतो ऽमा सद्गमय |
तमसोऽमा ज्योतिर्गमय |
मृत्योर्मा अमृतं गमय |
ॐ शांति: शांति: शांति: ||

सर्वांना नववर्षाच्या
अनेकानेक हार्दिक शुभेच्छा ....

वरील प्रस्तावना मायबोलीकर शशांक पुरंदरे यांच्याकडून.

निसर्गाच्या गप्पा या धाग्याची सुरुवात ५ डिसेंबर २०१० पासून झाली. आज २५ वा धागा गुढी पाढव्याचा मुहुर्त साधून मराठी नविन वर्षाच्या प्रारंभदिनी सुरू करताना आनंद होत आहे.

मागील धागे.

(भाग १) http://www.maayboli.com/node/21676 (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
(भाग ३) http://www.maayboli.com/node/27162 (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
(भाग ५) http://www.maayboli.com/node/30981 (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
(भाग ७) http://www.maayboli.com/node/34014 (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
(भाग९) http://www.maayboli.com/node/35557 (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
(भाग ११) http://www.maayboli.com/node/38565 (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
(भाग १३) http://www.maayboli.com/node/41996 (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
(भाग १५) http://www.maayboli.com/node/43773 (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
(भाग १७) http://www.maayboli.com/node/47785 (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
(भाग १९) http://www.maayboli.com/node/48774 (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280
(भाग २१) http://www.maayboli.com/node/49967 (भाग २२) http://www.maayboli.com/node/50615
(भाग २३) http://www.maayboli.com/node/51518

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फोटो सर्वच मस्त.

मानुषीताई नगरमध्ये तुम्ही दाखवलेल्या जागी जाणे झालंच नाही. तुम्ही दोन तीन छान जागा दाखवल्यात. मागेपण छान फोटो टाकले होतेत.

हेमाताई आख्खा नगर जिल्हाच निवांत असतो Wink , स्वानुभव.

ब्लु मॉर्मोन फुलपाखराला आज महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू म्हणून घोषित करण्यात आले.

(प्रकाशचित्र आंतरजालावरून)

राज्यवृक्षः आंबा
राज्यपुष्पः तामण / जरूळ
राज्यप्राणी: शेकरु
राज्यपक्षी: हरीयल

संगमेश्वरचा परीसर किती शांत आहे! >>>> त्या ठिकाणाचे नाव वढू-तुळापूर आहे. संगमेश्वर कोकणात आहे जिथे संभाजीमहाराजांना पकडण्यात आले आणि वढू-तुळापूरला त्यांना हाल-हाल करुन मारण्यात आले. त्यामुळे मला स्वतःला तरी ते ठिकाण फार उदास वाटते - नको त्या आठवणी असे होते .......

पुरंदरे शशांक ,
तुळापूरलाच संगमेश्वर सुद्धा म्हणतात शशांक.. तिथल्या नद्यांच्या संगमामुळे असणार नक्कीच..
त्यांना मारण्यात आल तिथ हे खरय पण त्यात त्यांची शौर्यगाथापन तर दिसते ना.. मला कधीच तिथं उदासपणा जाणवला नाही.. प्रत्येकाच्या भावना वेगळ्या हे सुद्धा तेवढच खर म्हणा..

माझी ऑफिसमधील जागा अगदी खिडकीजवळची. कायम बंद असलेल्या काचेच्या खिडक्या आणि त्यांना बाहेरून वर-खाली करता येणार्‍या झडपा. खूप जुने ऑफिस असल्यामुळे झडपा कायम एकाच पोझिशनमधे. कबुतरे, कावळे, साळुंक्या यांना याची सवय, त्यामुळे काचे पलिकडे यांचा मुक्त वावर.
कबुतरे मात्र कायम घाण करतात. त्यांची विष्ठा साठून रहाते, सुकते, शेवाळासारखे होते. आता पाउस सुरु आहे. सकाळपासून दोन-तीन कावळे येत आहेत. माझी खिडकीजवळ चाहूल लागली तरी उडून जात नाहीत. कशात मग्न आहेत बरे?
नीट निरखून पाहिले. सुके शेवाळासारखे जे जमा झाले होते ते पावसाच्या पाण्याने ओले झाले. त्यात काही अळ्या झाल्या. व्यवस्थित दिसत होत्या. कावळ्यांची मेजवानी चालू होती. स्वच्छ्तेचे काम बिनबोभाट करत होते. तासाभरात सर्व अळ्या गायब. पोट भरून कावळे पसार.

अरे बापरे कसला भन्नाट नाकतोडा हा. मागे कोणीतरी पानासारखा दिसणारा नाकतोडा टाकलेला इथे . त्याची आठवण झाली.

Pages