अरविंद केजरीवाल आणि आम आदमी पार्टी--भाग २

Submitted by मिर्ची on 14 February, 2015 - 06:14

दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्‍या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.

* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.

पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्‍याचं राजकारण
.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जाई,
तुमच्या ह्या पोस्टमधून मुद्दा काय घेऊ? मी अकेभक्त आहे, आप आता कल्ट झालाय वगैरे निष्कर्ष बाजूला ठेवा. मुद्दा सांगा. भमंची पोस्ट सुद्धा तेवढ्यासाठीच पॅराजंप केली.

>>>बा़की या सर्वात ज्या विश्वासाने दिल्लीकरांनी अकेला निवडून दिलेय त्याच मातेर होऊ नये ही सदिच्छा ! <<<

मुद्दलातच मातेरं झालेलं आहे. आज दिल्लीतल्या रँडम पंधराजणांची मते दाखवली. सगळ्यांनी केजरीवालांनी विश्वासघात केला, घोळ घातला, चूक केली असे नोंदवले.

ह्या लोकांच्या मताने काय फरक पडतो, असा मुद्दा येणार असला तर, ह्याच लोकांनी केजरीवालांना मते दिली आहेत. आपण बरेचजण त्या निवडणूकीशी आपला प्रत्यक्ष संबंध नसताना बोलत आहोत.

दिल्लीतील नागरिकांनी आपला मत देऊन चूक केली आहे ह्या माझ्या आवडत्या मतावर, जे मी इतरत्रही नोंदवलेले होए, कोणीतरी साहेबांच्या भाषेत मला विचारले होते की 'ऑन व्हॉट बेसिस यू आर सेयिंग धिस?'! त्याचे मायमराठीत उत्तर आता देऊ शकतो.

कामं राहिली बाजूला आणि अंतर्गत लाथाळ्यांवर अख्खी मिडिया गुजराण करत ठेवली आहे ह्या माणसाने! ह्याला मत देणं म्हणजे चूकच की?

'त्यांनी काम बंद केले का, अपव्यवहार केले का' असे काही प्रश्न वर विचारण्यात आले आहेत. त्याचा प्रतिवादही ह्या एका प्रश्नानेच करता येऊ शकेल.

'कामे सुरू करायला वेळ मिळाला तर बंद केली का विचारता येणार ना? आणि भांडणं मिटली तर अपव्यवहारसुद्धा करता येईल हे आठवणार ना?' Wink

बाकी इथे 'तुम्हीसुद्धा नमोभक्तांप्रमाणेच अकेभक्त होऊ लागला आहात' अशी काही विधाने वाचण्यात येत आहेत. 'सोनियाभक्त, राहुलभक्त' असे कोणी नसतेच अश्या थाटात हे बोलण्यात येत आहे असे वाटते. वरच्या प्रतिसादात म्हंटल्याप्रमाणेच प्रत्येकाच्या मते दुसरा अंधभक्त असतो व आपण सूज्ञ पाठिंबा देणारे असतो. विशेषतः गांधी-नेहरु घराण्याच्या केलेल्या दशकानुदशकांच्या भक्तीमुळे सत्तेत असणार्‍यांचे भरपूर मोठे उदाहरण समोर असताना अलीकडेच सत्तेत आलेल्या नमोंचे भक्त हेच तेवढे नालायक असण्याचे उल्लेख केले जाणे गंमतीशीर आहे.

मुद्दा सांगा. भमंची पोस्ट सुद्धा तेवढ्यासाठीच पॅराजंप केली. >> एवढ्या पोस्टसनंतरही कळला नाही ??? ह्म्म्म

जाऊ दे ! माझा आता ब्रेक !

बेफिकीर, तुमची मत तुमच्यापाशी . आमची मत आमच्यापाशी.

>>>बेफिकीर, तुमची मत तुमच्यापाशी . आमची मत आमच्यापाशी.<<<

ते माझं आणि तुमचं काय, सगळ्यांचंच तसंच असतं. तरीही इथे महिनोनमहिने एकाच विषयावर चर्चा चालतात आणि प्रतिवादही करण्यात येतात. हे वर मला उद्देशून लिहिले आहेत ते धागाकर्त्यांनाही उद्देशून लिहू शकताच की तुम्ही? आणि त्याही तुम्हाला उद्देशून ते लिहू शकतात. तरी चर्चा सुरूच आहे ना? Happy

फोरमवर भरपूर चर्चा केल्यानंतर हळूहळू आपले मतपरिवर्तन झाले व तेच चांगले झाले अश्या अर्थाची एखादी पोस्ट वाचली आहे का कोणी? प्रत्येकजण शेवटपर्यंत आपलेच मत तर ताणून धरत असतो. Happy

निवडून दिलेले लोक कामं करत आहेत की नाही ह्यावर कसलीच टिप्पणी न करता >> कामं करणे म्हणजे नक्की काय करणे? कामं आमदार करत नाहीत. त्यासाठी नोकरशाही आहे. लोकनिर्वाचित प्रतिनिधीनं त्यावर अंकुश ठेवणे आणि देखरेख ठेवणे हे अपेक्षित आहे. हे वैयक्तिक प्रत्येक वॉर्डासाठी किंवा मतदारसंघासाठी. पण प्रत्येक आमदार आणि खासदार यानं इतकंच करणं पुरेसं ठरत नाही. कारण पॉलिसी मेकिंग हा लोकनिर्वाचित प्रतिनिधींचा सर्वात मोठा कामाचा भाग आहे अणि या पॉलिसी मेकिंगसाठी विचारधारा असावी लागते. हा जो काही "कामांचा" मुद्दा धरून लावलेला आहे तो केवळ पॉलिसी इम्प्लीमेण्टेशनचा आहे. त्या इम्प्लीमेंट करून झाल्यावर पुढची धोरणे कशाच्या जोरावर ठरतील?

ज्या वेळी तुम्ही एक "राजकीय पक्ष" म्हणून उभे राहता तेव्हा तुम्हाला एक विशिष्ट राजकीय विचारधारा अभिप्रेत असते. त्या राजकीय विचारधारेमध्ये तावून सुलाखून निघालेले कार्यकर्ते तुमच्य पाठीशी असावे लागतात. (इथं कुठलीही विचारधारा योग्य किंवा अयोग्य हा मुद्दा बाजूला) ते कार्यकर्ते जेव्हा व्यक्तीपेक्षा त्या विचारधारेला जास्त महत्त्व देतात तेव्हा तो पक्ष टिकतो अन्यथा त्या त्या व्यक्तीच्या अंताबरोबर पक्ष संपून जातो. आपमध्ये ही राजकीय विचारधारा आणण्याचं काम योगेंद्र यादव यांनी केलं होतं. केवळ केजरीवाल यांच्या नम्रपणावर आणि इतर आमदारांनी केलेल्या कामांवर हा पक्ष टिकू शकत नाही- हे आपच्या बाहेर असणार्‍या प्रत्येकाला समजतंय (आपमधल्याही काही जणांना समजतंय) दिल्लीमधले आपचे कित्येक कार्यकर्ते मनापासून दुखावलेलेल आहेत.

सध्या ट्विटर, फेसबूक आणि इतर काही सोशल मीडीयावर पाहताना केजरीकल्ट हा प्रकार उदयाला आलेला दिसत आहे. या लोकांच्या मते, (हीच लोकं कालपर्यंत हे आपचे डाय हार्ड सपोर्टर होते. आता लगेच ते केवळ केजरीभक्त झालेले आहेत) केजरीवाल एकटेच चांगले असून इतर सर्वसर्वसर्व जण त्यांच्या वाईटावर टपलेले आहेत. या सर्वजणांमध्ये शाझियापासून दमानियापासून किरणबेदींपासून ते आता यादव-भूषणपर्यंत सर्वचजण आले. आता गंमत अशी होणाराय, की आप फुटत जातोय. लवक्रच या पक्षाचे भविष्य अंधारात जाणार आहे- तसं झालं की हेच ठराविक लोकं "पाहिलंत केजरीवाल चांगलं काम करत होता पण त्याला या सर्वांनी धरून पाडला" अशी रडगाणी गाणार आहेत. (आप फुटल्याचा फायदा कुणाला होइल? कुणालाही नाही!!! पण नुकसन मात्र प्रचंड होणार आहे. भारताला भीजेपी काँग्रेस खेरीज पर्याय नाही असा एक ठळक संदेश आपने जनतेला दिलेला आहे!) केजरीवाल यांचं कधीच काहीच चुकत नाही यावर बरंच चर्वितचर्वण चालू आहेच. केजरीवाल सर्वांना सामावून घेऊन राजकारण करू शकत नाहीत. केजरीवाल इतरांना ड्यु क्रेडीट आणि महत्त्व देऊ इच्छित नाहीत हे केजरीकल्ट कधीच मान्य करणार नाहीत. केजरीवाल व्यतीरीक्त या पक्षामध्ये कुणीच "चांगलं" नसल्याचा निर्वाळा या केजरीकल्टने कधीच दिलेला आहे. यादव यांचं "योगदान" काय असे हास्यास्पद प्रश्न जेव्हा आपसमर्थक विचारू लागतात तेव्हा आप पक्षाचे भवितव्य किती लटकलेले आहे याची सहज कल्पना येऊ शकेल.

यादव यांचं "योगदान" काय असे हास्यास्पद प्रश्न जेव्हा आपसमर्थक विचारू लागतात तेव्हा आप पक्षाचे भवितव्य किती लटकलेले आहे याची सहज कल्पना येऊ शकेल.
------- आप समर्थक आणि केजरीवाल कल्ट हे दोन भिन्न समुह आहेत.

यादव यान्च्या योगदानाबद्दल माझ्या मनात शन्का नव्हतीच, आणि जे काही थोडे सन्शय होते ते अल्पना यान्च्या पोस्टीनन्तर दुर झाले. शेवटी प्रत्यक्षात परिस्थिती जवळुन अनुभवणे, ground reality, काम करणार्यान्शी १-१ सन्वाद आणि माझ्यासारखे १२००० किमी दुरवरुन निव्वळ नेट च्या माध्यमाने मत बनवणे यात मोठे अन्तर आहे.

यादव यान्चे आधिचे कार्य काय आहे ह्या पेक्षाही आप आज जो काही आहे त्यामधे (पक्ष बान्धणे, वाढवणे, फोफावणे) त्यान्चे योगदान अनन्यसाधारण आहे. आज दोन व्यक्ती मधे मतभेद आहेत म्हणुन सत्य नाकारुन चालणार नाही.

अशा योगदान देणार्याला मान्यता, सन्मान दुरच तुम्ही लाथा मारायच्या भाषा करत आहात. मोठा प्रश्न चिन्ह निर्माण करतात.

आप समर्थक आणि केजरीवाल कल्ट हे दोन भिन्न समुह आहेत.<<< तो संंपूर्ण पॅरा वाचा. त्या कंटेक्स्टमध्ये तो शब्द वापरलेला आहे.

वटी प्रत्यक्षात परिस्थिती जवळुन अनुभवणे, ground reality, काम करणार्यान्शी १-१ सन्वाद आणि माझ्यासारखे १२००० किमी दुरवरुन निव्वळ नेट च्या माध्यमाने मत बनवणे यात मोठे अन्तर आहे.>>> एक्झॅक्टली.

नंदिनी,

>> या पॉलिसी मेकिंगसाठी विचारधारा असावी लागते. हा जो काही "कामांचा" मुद्दा धरून लावलेला आहे तो केवळ
>> पॉलिसी इम्प्लीमेण्टेशनचा आहे. त्या इम्प्लीमेंट करून झाल्यावर पुढची धोरणे कशाच्या जोरावर ठरतील?

लाख बोललात पहा! पुढची धोरणे ठरवायची कुवत केजरीवाल यांच्या एकट्याच्यात नाही. त्यासाठी वैचारिक बैठक पक्की करावी लागते. अगदी हेच काम करणारे योया नेमके वेचून बाहेर ढकलले जातात. यावरून केजरीवाल हा बी टीमचा लीडर आहे हे सिद्ध होतं. हा माणूस ए ग्रेडची टीम कधीच संघटित करू शकणार नाही.

आ.न.,
-गा.पै.

मिर्ची +१ अनेक पोष्टसाठी.
अकेंनी घेतलेले निर्णय योग्यच वाटत आहेत. मला वाटते यो या किंवा प्र भू इ. चे आप आधीचे किंवा आप मधील योगदान काय यावरुन चर्चा करुन काही फलित होणार नाही. त्यांनी अके आणी पर्यायाने आपविरोधात बर्‍याच कारवाया केलेल्या आहेत हे आता उघड होत आहे आणि ह्या गोष्टी त्यांचे सगळे गुडविल नष्ट करतात.
यो या पत्रकारांसमोर अगदी विस्तारामध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीत काय झाले याचे (मसाला लावून?) वर्णन करुन सांगत होते आणि वरती 'आप'ला ह्या घटनेचे दोषी ठरवू नका अशी मखलाशी पण करत होते. हे म्हणजे चिखल उडवायचा आणि म्हणायचे कि कपडे घाण होऊन देऊ नका. मला यो या आणि प्र भू यांचे 'मुहमे राम, बगलमे छुरी' असे वर्तन वाटत आहे.

It is sad to lose people with talent but the talent is curse if it is used against the existence of the organization or its leader. With fear of getting exposed in AAP's action-based politics against corruption, there is going to be lot of upset souls and they are going to come attacking with all the resources they have at their disposal. It is going to be test for AK and AAP to stay on course and win these fight.

योया यांच्याबद्दल बर्‍याच जणांना सहाणभुती वाटतेय असे वाटते मग त्यांनी च सांगावे की अके नी त्यांना का काढले असावे? या दोघांना काढुन त्यांनी त्यांचा कुठला स्वार्थ साध्य केला?

@ नंदिनी, 29 march, 2015-22.

ह्या पोस्टला १००% अनुमोदन.

माझ्या आधीच्या पोस्टमधला केजरीवाल भक्त हा शब्द तोवर तरी मिर्ची यांना उद्देशून नव्हता. पण अन्य सो.ने.मिडियामध्ये ज्या प्रकारे प्रतिक्रिया येत आहेत त्या पाहूनच तो शब्द वापरलाय. आणि तो अन्यत्रही वापरला जाऊ लागला आहे.

बाकी इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या काळापासून (१) आम्ही कोणालाही प्रश्न विचारू शकतो पण (२) आम्हाला कोणीही प्रश्न विचारू नयेत (३) विचारल्यास तुम्हाला तसे प्रश्न विचारायचा हक्क नाही कारण तुम्हीच तशा प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही (म्हणजे आम्ही आधी प्रश्न विचारले म्हणून तुमच्यावर राज्य) (४) प्रश्न विचारल्यास प्रतिप्रश्नच विचारले जातील हीच स्ट्रॅटेजी दिसते आहे. वरच्या काही प्रतिसादांतून ती अधोरेखित झाली आहे.

योगेंद्र यादवना आप(च्या कार्यकारिणीतून, सध्यापुरते) मधून बाहेर काढल्याचे आपच्या वाटचालीकडे उत्सुकतेने व आशेने पाहणारे भारतीय नागरिक म्हणून वाईट वाटले आहे. ते वाईट वाटणे व्यक्त करण्यापलीकडे इथे कोणी काही लिहिल्याचे जाणवले नाही. (मागची काही पाने घाईघाईत वाचल्याने मी चूक असू शकेन).

पारदर्शी कारभाराची (व चर्चेची) अपेक्षा करणार्‍या व आश्वासन देणार्‍या (आठवा : लोकपाल विधेयकाच्या मसुदा समितीच्या कामकाजाचे जाहीर प्रसारण करण्याची मागणी) लोकांना पक्षाच्या बैठकीतील चर्चेची बातमी झाल्याने धक्का का बसावा? राग का यावा?

प्रत्यक्ष लोकशाहीचे गोडवे गाणार्‍यांच्या पक्षात पक्षांतर्गत लोकशाही कितपत आहे?

प्रत्यक्ष लोकशाहीचे गोडवे गाणार्‍यांच्या पक्षात पक्षांतर्गत लोकशाही कितपत आहे?>>>> भरत मयेकर, तुमच्या ह्या प्रश्नाचे उत्तर आहे ०%.

सद्याच्या आआपमधील घडामोडी पाहता आम आदमी पक्षाचे झपाट्याने अरविंद केजरीवाल पक्षात रूपांतर होत आहे. जो अरविंद केजरीवाल यांना प्रश्न विचारेल तो सरळ पक्षाच्या बाहेर. जनलोकपालच्य मुद्यावरून सत्ता सोडणार्‍या पक्षाने त्यांच्याच पक्षाने निवडलेल्या लोकपालला काढून टाकले आता असं का करण्यात आलेले आहे हे सर्वश्रुत आहे.

सोनिया गांधी विरुद्ध त्यांच्या पक्षातील लोक मिडीया समोर किती बोलतात.किंवा मायावती बद्द्ल त्यांच्या पक्षातिल
किंवा समाजवादितील मुलायम सिंग बद्दल पण इथेतर योया प्र भु,अजुन बरेचजण २४ तास मिडियाला खाद्य पुरवत आहेत आता ही लोकशाही नाही तर काय आहे?
बाकी पार्ट्यामध्ये हाय कमांड विरुद्ध बोलायची हिंमत तरी करत का कुणी.

नंदीनींच्या पोस्टला +१

बाकी पार्ट्यामध्ये हाय कमांड विरुद्ध बोलायची हिंमत तरी करत का कुणी
>>>
नारायण राणेनी केली दोन वेळा. एकदा निलंबन करुन घेतलं स्वतःचं आणि मग परत आले काँग्रेसमध्ये. दुसर्‍या वेळी काहीच उपयोग झाला नाही.

मिर्ची,

मागच्या धाग्यावर अनेकदा तुम्ही एक मुद्दा हिरीरीने मांडला आहेत.

दिल्लीच्या पहिल्या विधानसभा निवडणूकीच्या तुलनेत लोकसभेत आपच्या मतदानाचा टक्का वाढला आहे. अगदी १% का होईना पण वाढला आहे. पक्षाचं कार्य व्यवस्थित सुरू आहे, नवीन लोक येत आहेत वगैरे वगैरे...

या धाग्यावरच्या मागच्या काही पानात म्हणालात, लोकसभेनंतर पार रसातळाला पोहोचलेल्या पक्षाला केजरीवालनी सत्तेवर आणलं...

मतदानाची टक्केवारी वाढली तरी पक्ष रसातळाला गेला?

यातलं नक्की तुमचं मत कोणतं ते जरा स्पष्ट कराल काय?

सुरेख१, परत तेच. बाकी पार्ट्या नालायकच आहेत. त्यांच्याकडून कुणालाही काहीच अपेक्षा नाहीत. पण "आप" या सर्व पक्षाहून भिन्न आहे असा वारंवार सांगितलं गेलं आहे. ते राजनीती करत नाहीत तर "वैकल्पिक राजनीती" करत आहेत (हिंदीमय मराठी पण ठिक आहे!!!) मग इतर पक्ष जे काय करत आहेत त्याचा इथं संबंध कुठं येतो?

पण इथेतर योया प्र भु,अजुन बरेचजण २४ तास मिडियाला खाद्य पुरवत आहेत आता ही लोकशाही नाही तर काय आहे?<< ओह. यांची लोकशाहीची व्याख्या मीडीयापासून सुरू होते आणि मीडीयापर्यंत येऊन संपते.

यानंतर मी केवळ मिर्ची यांच्या प्रतिसादाच्या प्रतीक्षेमध्ये आहे.

बाकी पार्ट्यामध्ये हाय कमांड विरुद्ध बोलायची हिंमत तरी करत का कुणी.>>>> आआप हा भारतातील प्रस्थापित राजकीय पक्षापेक्षा वेगळा आहे हे आआपवाले ओरडून सांगत होते. आमच्यात कोणीही हायकमांड नाही आआपमध्ये सर्वांच्या मताचा आदर होतो वगैरे वगैरे.

प्रशांत भुषण, योगेंद्र यादव आणि अन्य दोन केजरीवाल विरोधकांना ज्या कोअर कमिटीच्या बैठकीत कार्यकारणी मधून लाथ मारून बाहेर काढले(प्रोफेशनल बॉऊनसर्सना बोलावून बर्रका असं कोणत्याही पक्षात विरोधकांबरोबर झाल्याचे माहित नाही). ती बैठक बोलावली गेली होती केद्र सरकारच्या विशेष भुसंपादन विधेयकाच्या विरोधासाठी रणनीती ठरवण्यासाठी असे वाचनात आले आहे मग त्या रणनीतीचे काय झाले सांगू शकेल का कोणी केजरीवाल भक्त. की आपल्या विरोधकांचा सफाया करण्याच्या अभियानामुळे पक्षाचे कामकाजच गुंडाळून ठेवत आहेत केजरीवाल आणि कंपनी?

आपच्या बाबत काहीही प्रश्न विचारला की बाकीच्या पक्षांचे दाखले दिले जातात. त्या सगळ्या पक्षांत एक भर हे आपचे स्वरूप आहे का? मग आपकडे आशेने का पाहावे?
बाकीचे पक्ष हुकुमशाही वृत्तीचे आहेत, त्यांचा कारभार पारदर्शी नाही. पण म्हणून तो आपचाही असू नये का?
प्रश्न पुन्हा विचारतो. लोकपाल मसुदा समितीच्या बैठकीत संपूर्ण पारदर्शी चर्चेची मागणी होती. आपच्या कारभारात पारदर्शीपणा का नको? बैठकीतली माहिती बाहेर आल्याने असं काय भयंकर समोर आलं?
दुसरा प्रश्न : आपला प्रत्यक्ष लोकशाही हवी. म्हणजे प्रत्येक निर्णयात सगऴ्यांचा सहभाग. लोकप्रतिनिधींना निर्णयाचे अधिकार नाहीत. मग या तत्त्वालाही आप अपवाद का?
समजा देशात स्वराज राबवलं , प्रत्यक्ष लोकशाहीने सगळे निर्णय होऊ लागले, तर त्या निर्णयापेक्षा वेगळी मते असलेल्यांचे योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण करणार का? कसे?

योया प्र भु,अजुन बरेचजण २४ तास मिडियाला खाद्य पुरवत आहेत आता ही लोकशाही नाही तर काय आहे? >>>> पार्टीतल्या कारभाराविरोधात बोलणार्‍यांना काढून टाकत सुटल्यामुळे पक्षांतर्गत लोकशाही दडपली गेल्याचंही सिद्ध होतं आहे.

भमंच्या पोस्टमधील <<<<विचारल्यास तुम्हाला तसे प्रश्न विचारायचा हक्क नाही कारण तुम्हीच तशा प्रश्नांची उत्तरे देऊ शकत नाही (म्हणजे आम्ही आधी प्रश्न विचारले म्हणून तुमच्यावर राज्य) (४) प्रश्न विचारल्यास प्रतिप्रश्नच विचारले जातील हीच स्ट्रॅटेजी दिसते आहे. वरच्या काही प्रतिसादांतून ती अधोरेखित झाली आहे.>>>> हे तर इथेही पुर्वीपासूनच दिसत आहे. प्रचारक आहेत म्हटल्यावर (असं इथेच कुठेतरी वाचलं होतं, स्क्रीनशॉट्स घ्यायची सवय नसल्यामुळे पुरावा देऊ शकत नाही) जश्या डायरेक्शन्स असतील तसंच आणि मुरलेलं बोलणार ना? सुटेबल वाटेल तेव्हा प्रतिप्रश्न करत हुकुमाची उतारी केल्यासारखं धबाधब विनोदी(?) मॉर्फ्ड फोटोज, लिंका सहजच टाकल्यासारख्या करत "ह्यावर काय म्हणणं आहे?" टाइप लिहिणं आणि सुटेबल नसेल तेव्हा इतरांच्या प्रश्नांना वेळ नाही किंवा इतर सबबी सांगून पास देणं, जंप मारणं हे कशाचं लक्षण आहे? बाकीचे लोक असा कुठला हेतू ठेवून लिहित नाहियेत इथे त्यामुळे फरक असणारच. अल्पनासुद्धा आपबद्दल सॉफ्ट कॉर्नर असला किंवा राजकारण घरातच बघत आली असली तरी बिगरराजकारणीच प्रतिसाद देत असे. तिच्या कुठल्याही प्रतिसादातील मटेरियल हे खास प्रचारासाठी पुरवलं गेलेलं मटेरियल कधीच वाटलं नाही.

जेव्हा मोदीविरोध हा एकमेव उद्देश ठेवून आपच्या बाजूने किंवा केजरीवालांच्या कौतुकाच्या पोस्ट्स येत होत्या तेव्हा खुश होणं आणि आता त्याच लोकांनी केजरीवालांविरुद्ध 'ब्र'ही काढल्यावर लगेच राग येऊन त्यांना नावं ठेवणं हे थेट जे दिल्लीत चाललं आहे त्याचीच छोटी प्रतिकृती आहे. राजकारण्यांचा सो कॉल्ड संयमितपणाचा मुखवटा अश्यावेळी गळून पडतो.

भरत मयेकर,

आपने आणि विशेषतः केजरीवालनी आम्ही सर्वांपेक्षा वेगळे आणि आम्हीच काय ते इमानदार असा आव आणत सामान्य जनतेची दिशाभूल करण्याचा पद्धतशीर प्रयत्न केला आणि दिल्लीच्या जनतेला ती भूल पडली. भांडवलशाही आणि कम्युनिझम मधल्या सगळ्या घातक गोष्टी जशा फॅसिस्ट तत्वज्ञानात ठासून भरलेल्या आहेत, त्याचप्रमाणे
काँग्रेस आणि भाजप यामधील 'गुणवान व पराक्रमी' लोकांना एकत्र करुन एखादा पक्ष काढला तर तो पक्ष कसा दिसेल याचं मूर्तीमंत उदाहरण म्हणजे आप!

Pages