दिल्लीमध्ये आज आपच्या सरकारची दुसरी इनिंग चालू झाली आहे. योगायोगाने मायबोलीवरच्या धाग्याचाही दुसरा भाग आज चालू होतो आहे. गेले वर्षभर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असूनही अरविंद केजरीवाल आणि आपने दिल्ली विधानसभेत ऐतिहासिक विजय मिळवून ज्या दिमाखात पुनरागमन केलं आहे ते निश्चितच कौतुकास्पद आहे.
सर्वात महत्वाची आणि पक्षनिरपेक्ष अशी गोष्ट म्हणजे देशातील सर्वांत स्वच्छ, सर्वात तरूण आणि सर्वात जास्त शिक्षित विधानसभा आपच्या निमित्ताने दिल्लीकरांना आणि पर्यायाने देशाला मिळाली आहे. राजकारणामध्ये चालू असणार्या ह्या सकारात्मक बदलाकडे लक्ष ठेवून आपली मते इथे मांडूया.
* टीप - इथे विरोधी मतांचंही स्वागत आहे. वैयक्तिक शेरेबाजी टाळण्याची आणि सभ्य भाषा वापरण्याची सर्वांना विनंती.
** पहिला भाग इथे वाचता येईल.
पान १७ - योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण ह्यांना राष्ट्रीय कार्यकारिणीतून काढल्याबद्दलची चर्चा
पान २४ - योगेंद्र यादव बोलले ते खरं की खोटं?
पान ३१ - आपमधील नेत्यांच्या ट्वीटर हॅण्डल्सची यादी
पान ५५ - दिल्लीतील नगरपालिका आणि कचर्याचं राजकारण
.
आपले विचार कळाले मेनका तै.
आपले विचार कळाले मेनका तै. आपण लांबर राहूयात एकमेका पासून. गुडबाय !>>.
गुडबाय ! म्ह्णुन परत मेनका चे नाव का बर घेताय बाळूभौ.
खरं नाव घेऊ काय ? फक्त
खरं नाव घेऊ काय ?
फक्त कंप्लेट हा शब्द योग्य रितीने लिहीत चला, कसं ?
घ्या की भौ कोन आडवलय. मिर्ची
घ्या की भौ कोन आडवलय.
मिर्ची ताई, माफ करा माझ्या कडून भौ ला हा शेवटचा प्रतिसाद.
खरच फारच सुंदर प्रतिवाद करतायत तुम्ही त्यात व्यत्यय नको.
हे काही खरे नाही.>> कळळ
हे काही खरे नाही.>> कळळ म्हणजे ! हुश्श्
मिर्ची ताई, अल्पनाने योयांच
मिर्ची ताई, अल्पनाने योयांच आप मधल योगदान काय याबद्दल लिहिले आहे
योया हे आपचा इंटेलेक्चुअल ब्रेन होते. ब्रेनच अकेनि काढून टाकल . त्यामुळे आता आपच्या वाटचालीबद्दल शंका निर्माण होतात
तुम्हाला हव असेल तर विश्वभर चौधरीनचि पोस्ट्स चिकटवु शकते
त्यांनी स्वत योया अकेसोबत काम केलेल आहे
बापरे, धाग्यावरच्या पोस्टस
बापरे, धाग्यावरच्या पोस्टस वाचता वाचता मेनका एकदम सुरेख दिसायला लागल्या.
मला पण माफ करा मिर्ची तै आणि सुरेख मेनका तै, पण खरंच रहावलं नाही.

<<आपच्या मुंबई आंदोलनात संसद
<<आपच्या मुंबई आंदोलनात संसद म्हणजे टॉयलेट, राज्यघटनेवर कुत्रं मुतताना दाखवणे हे प्रकार झाले. रामलीला आंदोलनाच्या वेळी संसदेला घेराव घाला असे आदेश अण्णा आणि केजरीवाल यांनी दिले होते. केजरीवाल यांचा लोकशाही मूल्यांवर असलेला विश्वास यातून त्या वेळी कळून आला होता.>>
<<आपच्या व्यंगचित्रकाराला राजद्रोहाचं कलम लावल्यावरून अभिव्यक्तीस्वातंत्र्याचे गळे काढले होते सर्वांनीच. >>
आपचं आंदोलन, आपचा व्यंगचित्रकार हे तुम्हीच लिहिलंत आणि वरून मलाच विचारताय की आपचा संबंध काय??
<<असीम त्रिवेदी आप मधे असल्याच्या लिंक्स बद्दल एव्हढं का लावून धरताय ? असीम त्रिवेदी आप मधे आहेत असं म्हटलेलं नाही मी. केजरीवालांचा लोकशाही मूल्यांवरचा विश्वास त्या वेळी दिसून आला असं म्हटलंय. याचा आप मधे त्रिवेदी असण्याशी काय संबंध बुवा ?>>
वरची आणि खालची दोन्ही वाक्ये तुमचीच आहेत. विरोधाभास लक्षात येतोय का? का उगीच अफवा पसरवता बाळूभौ? आप आवडत नसेल तर तटस्थ रहा की. अफवा का पसरवता?
बाकीचे मुद्दे आत्ता लिहू नका. मी उत्तरं देणार नाही.
योयांना बाहेर काढल्याबद्दल चिडलेल्या आयडींकडून योयांबद्दलच्या प्रश्नाच्या उत्तराची वाट पहात आहे. नंतर मी लिहीन. मुद्दे अजिबात संपलेले नाहीत. योया भयंकर खोटं बोलले आहेत. माझ्या ह्या मताच्या समर्थनार्थ योग्य ते पुरावे देईन. पण योया लोकांना नेमके का आवडतात किंवा विश्वसनीय वाटतात हे आधी जाणून घ्यायचं आहे. मी योयांची तारीफ उत्तम प्रवक्ता म्हणून आधीही केली आहे, ह्यापुढेही करत राहीन. ते आपमधून बाहेर झाले म्हणून त्यांचा हा गुण अमान्य का करायचा? पण ह्याव्यतिरिक्त त्यांच्याबद्दल मला आधी फार माहीत नव्हतं. इतर कुणाला माहीत आहे का त्याची उत्सुकता आहे. एनी वन?
<<मिर्ची ताई, अल्पनाने योयांच
<<मिर्ची ताई, अल्पनाने योयांच आप मधल योगदान काय याबद्दल लिहिले आहे>>
जाई, मी आपच्या स्थापनेच्या आधीचं योगदान विचारलं आहे. शब्द ठळक केले आहेत.
साती
आपच्या स्थापने आधी योगदान
आपच्या स्थापने आधी योगदान नक्की कशामध्ये अभिप्रेत आहे? राजकारण हाच एक मुद्दा धरला तर यादव २००९ मध्ये काँग्रेसचे निवडणूक सल्लागार होते. ९०च्या दशकांपासूनच ते राजकीय विश्लेषक आणि निवडणूक विश्लेषक म्हणून काम करत आहेत. आपच्या स्थापनेआधी योगेंद्र यादव यांनी विविध वर्तमानपत्रांमधून आणि न्युज चॅनलवरून त्यांनी राजकीय मते भूमिका मांडणे, इतरांच्या भूमिकांचे विश्लेषण करणे, त्यांचे जवळचे आणि दूरगामी परिणाम विषद करणे वगैरे केले आहे. थोडक्यात, अॅक्टीव्ह राजकारणात येण्याअधीपासून योगेंद्र यादव यांना जनमानसाची पल्स, इतर राजकीय पक्षांचे डावपेच, भारतीय राजकारणाचा चेहरामोहरा या सर्वांचा दांडगाईनं अभ्यास आहे.
गेले काही दिवस आप समर्थक आणि काही आपविरोधकदेखील यादव यांना आपला "पोलिटिकल ब्रेन" का मानत आहेत ते वरील माहितीवरून लक्षात येईल.
(अर्थात हे काम फारसं महत्त्वाचं नाहीच असा सुंदर प्रतिवाद करणारी पोस्ट येईलच. त्यासाठी आताच धन्यवाद)
<<आपच्या स्थापने आधी योगदान
<<आपच्या स्थापने आधी योगदान नक्की कशामध्ये अभिप्रेत आहे? >>
वैकल्पिक राजनिती आणि भ्रष्टाचारमुक्त भारत ह्यामधील योगदान अभिप्रेत आहे. कारण आपचा जन्म ह्या कारणासाठी झाला आहे.
'क्या मैं केजरीवाल को संदेह
'क्या मैं केजरीवाल को संदेह का लाभ दूंगा ?'
( ये चिट्ठी एक आम नागरिक ने आम आदमी पार्टी के नाम लिखी है )
http://www.bbc.co.uk/hindi/india/2015/03/150328_aap_voters_letter_pm
So without having any
So without having any contribution towards the issues which are supposed to be the core issues for aap, Mr. Yadav was not only inducted in the party but also given significant position. Btw, before it became a political party, kejriwal and company despised the indian form of democracy and all classes of politicians. I hope henceforth they take c.v.,an entrance test, an interview and a bond in writing from people willing to join it.... I find no difference between namo bhakts who call the namo opponents traitors and kejriwal bhakts who have labels for everyone.
केजरीवाल हेच अस्सेच करणार हे
केजरीवाल हेच अस्सेच करणार हे माहितच होते पण जनतेने आधीचे विसरून परत चांस दिला हे तो लक्षात ठेवेल आणि थोड़ी वर्षे निट काढेल असे वाटलेले. असो.
मी जनतेची सेवा करायला राजकारणात आलोय असे कोणी म्हणायला लागला की हां आता किती कोटींचा दल्ला मारायला सेवा करतोय हाच विचार मनात येतो. अति झाले आणि हसू आलेय, बाकी काही नाही. राजकारण आणि स्वच्छ माणूस हां विरोधाभास आहे. (याला काहीतरी इंग्रजी शब्द आहे आता नेमका आठवत नाहीय.)
ही विशंभर चौधरींची पोस्ट .
ही विशंभर चौधरींची पोस्ट . चौधरी काही उपरे नाहीत . सामाजिक चळवळीतल एक नाव महत्वाच आहे
---------------------------------
योगेंद्रजीं बद्दल नक्कीच वाईट वाटतंय. माध्यमांच्या नोकरीत मिळू शकणार्या करोडो रूपये प्रतिवार्षिक करियरवर पाणी
सोडून ते या पक्षासाठी मैदानात उतरले. खरंतर अण्णा आंदोलनात ते मार्गदर्शन करत पण फक्त सहानुभूतीदार सल्लागार म्हणून. त्यानंतर पक्ष काढण्यासाठी सक्रीय झाले ते केजरीवालांनी आग्रह केला
म्हणून. गरज सरो वैद्य मरो हीच केजरीवालांची भूमीका दिसतेआहे.योगेंद्र यांच्या जाण्याने हापक्ष "शून्य बुद्धीधारी" पक्ष होऊन जाईल कारण पक्षाला बौद्धिक ताकद आणि सामाजिक चेहरा देण्याची
जी योगेंद्र यांची क्षमता आहे त्या क्षमतेच्या एक दशांश क्षमता असलेलाही कोणी
साथीदार आता अरविंदला मिळणार नाही. आप मध्ये आता केवळ 'सुमारांची सद्दी'
उरलेली असेल.वैचारिक दृष्ट्या केवळ "गोल बुडाचे चंबू" असलेले लोक घेऊन 'वेगळा' पक्ष चालवता येत नसतो! फक्त इतर पक्षांसारखी आणखी एक "झुंड" चालवता येऊ शकते! सध्या केजरीवालांची गरज तेवढीच दिसते आहे.
------------+-------------------
मयेकर, नंदिनी +1
अर्थात हे मुद्दे मिर्ची ताईंना पटणारे नाहीत .
कैक आठवडे हा बाफ मुद्दाम वाचत
कैक आठवडे हा बाफ मुद्दाम वाचत नव्हतो कारण आप ह्या पक्षाची व्याप्ती दिल्लीबाहेरही प्रचंड वाढेल असे कधी मनापासून वाटलेच नाही. म्हणजे, एक दिल्ली दोन वेळा जिंकली म्हणून त्या पक्षाला फार गंभीरपणे घ्यावे असे कधी वाटलेच नाही. हे वैयक्तीक मत आहे अर्थात!
आप हा पक्ष फुटला. व्यक्तीशः उरल्यासुरल्या अपेक्षाही संपल्या. आता तेही सरकार भाजपप्रमाणेच निवडून आलेले असल्याने आपला कार्यकाळ संपेपर्यंत कारभार पाहत राहील.
जनतेच्या मनात आपबाबत आता बदललेली प्रतिमा काय असेल असा एक विचार मनात आला. नुकताच प्रचंड बहुमताने निवडून दिलेला पक्ष लगेचच फुटला व त्यांच्यातील (वैचारीक) लाथाळ्या जगजाहीर झाल्या हे पाहून वैतागले असतीलच की!
कोणत्याही राजकीय पक्षाचे अनुयायी हे कट्टरच असतात व स्वतःच्या कट्टरपणाला सूज्ञ पाठिंबा समजताना दुसर्याच्या कट्टरपणाला अंध भक्ती समजतात. अपवादही असतात, पण ते दिसतातही त्यापेक्षाही अपवादानेच!
मागे कुठेतरी म्हंटलो होतो की दिल्लीतील नागरिकांनी आपला मत देताना चूक केलेली आहे. त्यावर काहींनी टीका केली होती, आज मात्र माझे ते मत अधिक दृढ झाले.
(अवांतर - पण अनेक ठिकाणी वाचले की इथे वाचनीय चर्चा सुरू असून इतर राजकीय चर्चांच्या तुलनेत फारच मुद्देसूद चर्चा सुरू आहे. म्हणून आज पान क्रमांक पाच ते दहा वाचली व थेट एकविसाव्या पानावर आलो व भ्रमाचा भोपळा फुटला. येथील चर्चाही हास्यास्पद बनवण्याचे त्याच 'सुपरिचित' शैलीतील प्रयत्न होत आहेत जे इतर चर्चांवर चालतात. तरीसुद्धा बरीच चर्चा खरंच निदान 'स्वीकारार्ह' शैलीत झाली आहे. पण स्वीकारार्ह शैलीत झाली आहे ह्याचा अर्थ फक्त इतकाच की एकमेकांवर चिखलफेक करण्याची तंत्र ही खूप पॉलिश्ड, उच्च दर्जाची आहेत इतकेच. वास्तवात राजकीय मतभेदांपलीकडे काय वाचायला मिळणार म्हणा! )
नंदिनी, जाई, अगदी योग्य
नंदिनी, जाई,
अगदी योग्य वेळेला, योग्य शब्दात प्रतिक्रीया !
१०००००००० % अनुमोदन
वरची आणि खालची दोन्ही वाक्ये
वरची आणि खालची दोन्ही वाक्ये तुमचीच आहेत. विरोधाभास लक्षात येतोय का? का उगीच अफवा पसरवतबाळूभौ? आप आवडत नसेल तर तटस्थ रहा की. अफवा का पसरवता? >>>
या मुद्याचं स्पष्टीकरण दिलंच आहे की. मुंबईतलं आंदोलन झालं, तेव्हां आप अस्तित्वात आली नव्हती. त्यामुळं अरविंद केजरीवालांच्या परीवर्तन, आयआयएसी वगैरे आंदोलनाशी संबंधित कार्यकर्तेच त्यात होते. असीम त्रिवेदी हा केजरीवालांशी जुडलेला कार्यकर्ता असं केजरीवालांनीच टीव्हीवर सांगितलं होतं. तो माझा कार्यकर्ता असल्याने कट कारस्थान केलं असं त्यांनी म्हटलं होतं.
त्यामुळं एका त्रुटीच्या सुतावरून स्वर्गाला जाण्यानं काहीही होणार नाही. यात कसलाही विरोधाभास नाही. हल्ली आप आणि अरविंद केजरीवाल ही नावं एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू झाल्याने होतं तसं. बाकीच्यांना काहीच किंमत नसल्याने केजरीवालांचा कार्यकर्ता ऐवजी आपचा कार्यकर्ता असं चुकून लिहीलं गेलं. पण त्यामुळं स्टेजवर लावलेल्या व्यंगचित्रांची जबाबदारी झटकता येत नाही.त्याला अफवा पसरवणे वगैरे भाषा वापरणे तुम्हाला शोभा देत नाही.मुळात त्याने काहीच साध्य होत नाही. अहो, इकडे मोठा गदारोळ झाला होता हे सांगितलंय तुम्हाला. तुम्हाला, सुरेख आणि तक्रारकर्त्या एका आयडीलाच याबद्दल ठाऊक नाही असं दिसतंय. तर ते असो.
तुम्ही वगळलेले मुद्दे
दिल्लीत पाण्याची व्यवस्था काय ?
यमुना नदीच्या पाण्याचं शुद्धीकरण करण्याची वयवस्था आहे का ?
दिल्लीसाठी कायमस्वरूपी वीजनिर्मिती केंद्राची योजना आहे का ?
अण्णांना जसं वापरून फेकून दिलं तसंच योयांना वापरून फेकून दिलं नाही का ?
नेमके समाजवादी कार्यकर्ते का हाकलले जात आहेत ?
संघाच्या कार्यकर्त्यांना महाराष्ट्रात प्रमुख पदं का?
त्यांची काय कामगिरी पाहून त्यांना पदं दिली होती ?
संसदेला टॉयलेट दाखवल्याबद्दल केजरीवालांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली नाही की चार सिंहांच्या मानचिन्हाचं विडंबन केल्याबद्दल कसलंच स्पष्टीकरण नाही.
रामलीला मैदानावरून संसदेला घेराओ घालण्याचे दिलेले आदेश, संसदेत बसणा-यांना चोर म्हणणे आणि त्यांना घेराओ घालण्याचे आदेश देणे,घर से बाहर मत निकलने देना..असे आदेश देणे याबद्दल दिलगिरी नाही.
या मुद्यांना बगल मारल्याबद्दल तुम्हाला मी डिवचलेलं नाही. फक्त नोंद घेण्यात आली इतकंच म्हटलं. तुम्हाला फक्त असीम त्रिवेदीला आपचा व्यंगचित्रकार म्हटल्याने अब आया उट पहाड के नीचे असा आनंद झाला, जे तुमच्याकडून अपेक्षित नव्हतं असं मी म्हटलंय. असो. आज तुमच्याकडून ती मिर्ची पहायला मिळत नाही जिची सकाळी प्रशंसा केली होती किंवा तुम्हाला उत्तरे देणे अशक्य झालेले आहे.
थोडी विश्रांती घ्या. हे मुद्दे सुद्धा पटतील. तुम्ही खूप एक्स्ट्रीमला जाऊन केजरीवालांची बाजू घेताय हे नोंदवून आपली आणि या बाफची रजा घेत आहे.
हुश्श्
हुश्श्
एकविसाव्या पानावर कुठले आयडी
एकविसाव्या पानावर कुठले आयडी आढळले बेफिकीर ? असो, तुमचा भ्रमाचा भोपळा फुटलाच असेल तर कट्ट्यावर जाऊन पुन्हा ताजेतवाने होऊ शकता. तिथला दर्जा राखण्याची कुवर मात्र इथे कुणामधे ही नसावी. तिकडची चर्चासत्रं वाचण्याची क्षमताही अनेकांत नसू शकते.
तुम्ही एकविसाव्या पानावरील
तुम्ही एकविसाव्या पानावरील आयडींवर नका हो ओढवून घेऊ सगळे! जगात इतरही अनेकजण आहेत ज्यांच्यामुळे भ्रमाचा भोपळा फुटू शकतो.
असो, ह्या पोस्ट्स अवांतर ठरतील ह्याची जाण असल्याने हा विषय माझ्यापुरता इथेच थांबवतो.
बरं. एक पोस्ट शेअर करण्यासाठी
बरं.
एक पोस्ट शेअर करण्यासाठी दुसरा कुठलाही योग्य धागा सापडेना म्हणून ही जाता जाता.फेसबुकावरून साभार.
पोस्ट कर्ते आहेत उस्मानाबाद येथील राज कुलकर्णी.पेशा वकिली. (यांचं फेसबुक पेज वाचण्यासारखं आहे. जन गण मन या गीताबद्दल ते रविंद्रनाथ टागोर यांनी ब्रिटीश युवराजाच्या स्वागतासाठी लिहील्याचं जोरदार खंडन करताना नविच माहीती मिळते).
"सर, त्यावेळी मलाही असाच अनुभव आला. दिल्लीतल्या जंतर मंतर मैदानात 16 ऑगस्ट 2011 रोजी आण्णा हजारे यांनी उपोषन सुरू केले आणि 17 ला त्यांना अटक झाली. म्हणून 18 ऑगस्ट या दिवशी आमच्या न्यायालयतल्या कायद्याची आणि घटनेची जाण असणा-या समस्त वकिलांनी आण्णा हजारे यांच्या समर्थनार्थ एक मोर्चा काढला. मी मोर्चात सहभागी नसलेला एकमेव वकील होतो. आण्णांचे आंदोलन हे घटनाविरोधी असून ते संसदीय व्यवस्थेला आणि कायदेनिर्मीतीच्या प्रक्रीयांना डावलणारे आहे आणि देशात मुठभर लोकांची सत्ता आणण्याचा हा प्रयत्न असल्याची टिका मी केली आणि त्याच दिवशी म्हणजे 18 तारखेला मा. जिल्हाधिकारी उस्मानाबाद यांना निवेदन देऊन आण्णा हजारे यांच्यावर सरकारने केलेल्या कारवाईचे समर्थन करून आणि सरकारचे अभिनंदन केले. विशेष म्हणजे हे निवेदन एकट्याचेच होते, कारण आण्णामय झालेल्या वातावरणात या निवेदनावर सही करण्यासही कोणी तयार नव्हता. दुस- या दिवशी " अपरीपक्व वकिलाचा प्रसिद्धी स्टंट " अशी माझ्यावर व्यक्तीगत टिका करणारी द्वेषमुलक बातमी एका प्रतिथयश वृत्तपत्रात छापून आली. शिवाय कोर्टातील वकील मंडळात देखील कांही आण्णाभक्त वकिलांनी माझ्यावर अश्लाघ्य भाषेत टिकाटिप्पणी केली. त्यानंतर 19 तारखेला छ.शिवाजी विद्यालयात परीसंवादाच्या कार्यक्रमात आण्णांच्या विरोधात सरकारची बाजू मांडणारा वक्ता म्हणून आमंत्रण आले. तिथे गेल्यावर सुत्रसंचालन करणा-या एका तरूण कार्यकर्त्याने तर आण्णा बहुजन समाजातील असून, एक बहुजन व्यक्ती आज मोठा होत असल्यामुळे त्यांचे मोठेपण उच्चवर्णीयांना सहन होत नसावे, असा थेट आरोप माझ्यावर केला होता. त्यांतर 20 तारखेला मी त्या वृत्तपत्राच्या संपादकांविरूद्ध भा.द.वि.499, 500 अन्वये खटला दाखल केला. वारंट जारी झाल्यावर संपादक महाशयांनी स्वत: माझी भेट घेऊन माफी मागीतली आणि प्रकरण मिटले. पण आज हे पुर्वाश्रमीचे आण्णामय लोक आण्णा या विषयावर माझ्याशी चर्चा ही करत नाहीत, अगदी गप्प गप्प असतात. त्या काळात खूप त्रास झाला पण कांही मित्र माझ्यापाठीशी खंबीरपणे उभे राहीले. आपल्या पोस्टमुळे आलेला अनुभव सांगण्याची ईच्छा झाली म्हणून हे एवढे लिहीले.
Comment by Raj Kulkarni "
राज कुलकर्णी इथे सुद्धा सेमच.
राज कुलकर्णी इथे सुद्धा सेमच. पण अजूनही इथले लोक त्यातून बाहेर पडलेले नाहीत. इथे सक्रीय असणा-यात बहुमत हे अजूनही त्याच बाजूचे आहे. पण त्याची फिकीर करून कसे चालेल. अल्प काय एकच मत असेल तरी मांडायलाच हवे, अर्थात अफवा पसरवण्यापर्यंत आरोपांची मजल गेली तर ते असो.
ऍडमिरल रामदासनाही डच्चू
ऍडमिरल रामदासनाही डच्चू मिळालाय.
>>मिर्ची फारच सुंदर प्रतिवाद
>>मिर्ची फारच सुंदर प्रतिवाद करतायत.<<
हा हा. केजरीवालांच्या कृतीचं अजुनहि समर्थन केलं जातंय जे अतिशय केविलवाणं आणि हास्यास्पद आहे. उदाहरणादाखल योगेश यादव यांची प्रतिमा काहि महिन्यांतंच धुळीला मिळाल्याचं पाहुन गंमत वाटली. खरंच, वर बाळुंनी म्हटल्याप्रमाणे थोडे दिवस या धाग्यापासुन दुर रहा. अशी कल्पना करा कि, तुमच्यासकट आप क्विक सँड मध्ये फसलेले आहात. जेव्ह्ढे जास्त हात-पाय माराल तेव्ह्ढे जास्त आत गर्तेत फसत जाल...
<<हा हा. केजरीवालांच्या
<<हा हा. केजरीवालांच्या कृतीचं अजुनहि समर्थन केलं जातंय जे अतिशय केविलवाणं आणि हास्यास्पद आहे. उदाहरणादाखल योगेश यादव यांची प्रतिमा काहि महिन्यांतंच धुळीला मिळाल्याचं पाहुन गंमत वाटली. खरंच, वर बाळुंनी म्हटल्याप्रमाणे थोडे दिवस या धाग्यापासुन दुर रहा. अशी कल्पना करा कि, तुमच्यासकट आप क्विक सँड मध्ये फसलेले आहात. जेव्ह्ढे जास्त हात-पाय माराल तेव्ह्ढे जास्त आत गर्तेत फसत जाल...>>
योगेंद्र यादव किंवा आणखी कुणी ह्यांना सोबत घेऊन चालवतील, उत्तम राजकारणी होतील, पक्ष देशभरात पसरवतील ह्यासाठी मी केजरीवालांचं समर्थन कधीच केलेलं नाही. मी त्यांचं समर्थन मुद्द्यांसाठी करत आहे. भ्रष्टाचार केला का त्यांनी? लोकांच्या साठी काम करायचं बंद केलं का? हे करत नाहीत तोपर्यंत त्यांना फुल्ल पाठिंबा. ह्यातलं काहीही केलं असेल तर दाखवून द्या. ह्या धाग्याला कुलूप.
निवडून दिलेले लोक कामं करत आहेत की नाही ह्यावर कसलीच टिप्पणी न करता "योयांना काढलं म्हणजे आप संपली, नष्ट झाली" असं विधान करणारे माझ्यापेक्षा जास्त व्यक्तीपूजक आहेत असं म्हणावं का?
<<ऍडमिरल रामदासनाही डच्चू
<<ऍडमिरल रामदासनाही डच्चू मिळालाय.>>
त्यांचा त्या पदावरील कार्यकाल संपला आहे.
त्यांनाच पुढची टर्म का नाही मिळाली ह्यामागे 'त्यांनी लिहिलेली पत्रे आश्चर्यजनक रितीने मिडियाला लीक होणं' हे कारण असू शकतं असा अंदाज आहे. नॅशनल कौन्सिल मिटींगच्या आधी प्रभु/योयांसाठी मोठ्या प्रमाणावर फोन/मेल्स पाठवून लॉबिंग करण्याचा प्रयत्न झाला. त्यात त्यांच्या पत्नीचाही सहभाग होता. हे दुसरं कारण असावं.
जाई,
विश्वंभर चौधरींच्या परिच्छेदापेक्षा मला नंदिनीचं उत्तर आवडलं. कमी विशेषणं, ठोस मुद्दे.
<< संसदेला टॉयलेट दाखवल्याबद्दल केजरीवालांनी दिलगिरी सुद्धा व्यक्त केलेली नाही की चार सिंहांच्या मानचिन्हाचं विडंबन केल्याबद्दल कसलंच स्पष्टीकरण नाही.
रामलीला मैदानावरून संसदेला घेराओ घालण्याचे दिलेले आदेश, संसदेत बसणा-यांना चोर म्हणणे आणि त्यांना घेराओ घालण्याचे आदेश देणे,घर से बाहर मत निकलने देना..असे आदेश देणे याबद्दल दिलगिरी नाही.>>
पुन्हा तेच. केजरीवालांनी संसदेला टॉयलेट दाखवलं का? असीम त्रिवेदी, केजरीवाल आणि आप असा बादरायण संबंध का जोडताय तुम्ही? असीम त्रिवेदीची बाजू घेणं म्हणजे भाषणस्वातंत्र्याची बाजू घेणं. आता सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा असीम त्रिवेदीची बाजू घेतली आहे.
संसदेत चोर बसलेत हे म्हणण्यात काय चूक? खोटं आहे का? प्रतिकाला संभाळू नका. संसद, राज्यघटना ह्या प्रतिकांचा व्यंगचित्रांमध्ये अपमान केला म्हणून का दंगा करायचा? संसदेत बसून पोर्नो क्लिप्स बघणं, भांडवालदारांच्या घशात जमिनी घालण्यासाठीचे कायदे संमत करून घेणं ह्याने संसदेचा जास्त अपमान होत आहे.
बाकी दिल्लीतील आणि इतर प्रश्नांबद्दल नंतर चर्चा करूया. आत्ताचा फोकस योगेंद्र यादव आहेत. मला भरकटवू नका.
कमाल झाली आता. अफवा पसरवताय
कमाल झाली आता. अफवा पसरवताय मिर्ची ताई.
अण्णांच्या आंदोलनाचं जे स्टेज आहे त्याचं संयोजन मयंक गांधींकडे होतं. मग त्या स्टेजच्या दर्शनी भागात असीम त्रिवेदीची चित्रं कुणी लावली असतील ? मनमोहनसिंग, सोनिया गांधी, अरुण जेटली, मोदी, लालूप्रसाद यादव की रामदास आठवले.... काहीच्या काहीच उत्तरं.
राहवलं नाही खरंच.
प्रतिकांबद्दल चर्चा करू नका, ते का बरं ? मान्य नाहीत का भारतीय लोकशाहीची ही प्रतिकं ?
संघाला मान्य नाहीत. त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे. त्यांच्या मते चार सिंहांचा मानदंड हा सम्राट अशोकाचा आहे. त्यांना राज्यघटना मान्य नाही. संसदीय लोकशाही मान्य नाही. हेच कारण आहे का या व्यंगचित्रांमागे ?
आता मात्र पुन्हा फिरकणार नाही हे नक्की.
मागच्या पानावर ब-याचच लिंका दिलेल्या आहेत. पहा एकदा.
बाळूभौ, मला आठवतंय की तुमच्या
बाळूभौ,
मला आठवतंय की तुमच्या आधीच्या जन्मातही (बहुतेक) तुमच्याशी वाद घालताना "मला ह्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने समजावता येणार नाही. माझी लेखनसीमा" असं लिहिल्याचं आठवतंय. मुद्दा होता आप इतर लोकांवर मानहानीचे गुन्हे का दाखल करत नाही ह्याचा.
आजही तेच सांगते. आपली वाद घालण्याची फ्रिक्वेन्सी जुळत नाही. तुम्ही खूप सार्या मुद्द्यांवर एकाचवेळी फार वेगात विचार करू शकता. माझी पॅसेंजर ट्रेन एकावेळी एकाच मुद्द्यावर टुकुटुकु चालू शकते. त्यामुळे मला तुमचे पॅरा जंप करण्याशिवाय गत्यंतर नाही. सॉरी.
<<< विश्वंभर चौधरींच्या
<<< विश्वंभर चौधरींच्या परिच्छेदापेक्षा मला नंदिनीचं उत्तर आवडलं.>>> अपेक्शित ऊत्तर. आता सोयीनुसार तुम्हाला पोस्टी पटत जातील. बाकी मयेकरांच्या पोस्टीबद्द्ल काय म्हणण आहे ?
तुमच्याही पोस्ट्स आता नमोभक्तासारख्या येत आहेत. ब्रॅन्ड फक्त वेगळा. ते नमो ब्रॅन्डवाले आणि तुम्ही अकेकल्टवाल्या ! एकेकाळच्या तुमच्या बॅलन्स पोस्टीच कौतुक वाटल होतं , पण आता नाही. तुमचा आप आदमी पक्षाच्या समर्थक आणि अके कल्टच्या समर्थक हा प्रवास आश्चर्यकारक आहे.असो !!
बा़की या सर्वात ज्या विश्वासाने दिल्लीकरांनी अकेला निवडून दिलेय त्याच मातेर होऊ नये ही सदिच्छा ! ज्या शहराशी भावनिक नात जुळलेल आहे अशा दिल्लीचा विकास व्हावा ही इच्छा मागच्या बाफवर व्यक्त केली होती. हुकुमशहा बनण्याच्या नादात अकेने या बाबीकडे दुर्लक्ष करु नये ही प्रार्थना ..
मी त्यांचं समर्थन
मी त्यांचं समर्थन मुद्द्यांसाठी करत आहे. भ्रष्टाचार केला का त्यांनी? लोकांच्या साठी काम करायचं बंद केलं का? हे करत नाहीत तोपर्यंत त्यांना फुल्ल पाठिंबा. ह्यातलं काहीही केलं असेल तर दाखवून द्या. ह्या धाग्याला कुलूप.
निवडून दिलेले लोक कामं करत आहेत की नाही ह्यावर कसलीच टिप्पणी न करता "योयांना काढलं म्हणजे आप संपली, नष्ट झाली" असं विधान करणारे माझ्यापेक्षा जास्त व्यक्तीपूजक आहेत असं म्हणावं का?
>>> +१०१
Pages