मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला दिन है बहार के .... गाण्याच्या 'छोटीसी जिंदगी है हस के गुजार दे' ऐवजी 'दो दिन जिंदगी के..' असं ऐकू यायचं.

मला लहानपणी ' मधुबन मे राधिका नाचे रे 'हे गाणं ' मधुबन मेरा धिका नाचे रे ' असं ऐकू यायचं आणि अर्थ लावण्यासाठी प्रयत्न करुन करून थकायचो..

Lol आणि त्यापुढची ओळ
गिरी धरकी मुरलिया बाजे रे
म्हणजे अरे मुरली गिरी, धर की

जरा विचित्र वाटेल कारण कृष्णाचे गाणे आहे, ....पण,
'भरजरी गं पीतंबर दिला फाडुन' ऐवजी 'फेडुन' वगैरे तोंडातून निघू नये म्हणुन खूप सतर्क रहावे लागते, मला तरी Happy

<<मला ते मै खिलाडी तु अनाडी गाण्यात' आयला उपमा उपमा आयला पोरे आले आले' असं ऐकू येतं<<
अय्यो, असच आहे ना ते? मी अजुनही असेच ऐकतेय. Proud

क्या जानू सजन होती है क्या गमकी शाम या गाण्यात लहानपणी मला दुसरी ओळ नेहमी 'जल उठे सौतने जब लिया तेरा नाम' अशी ऐकू यायची Happy
नंतर कळलं की ते सौ दिये आहे ते !! पण आधीची ओळही तशी अर्थपूर्ण वाटायची Happy

रच्याकने या गाण्यातील भाव मला अजूनही पूर्णपणे समजत नाही. प्रियकराच्या आठवणीने, त्याच्या सहवासाने, स्पर्शाने नायिका आनंदित झाली आहे आणि हे आनंद व्यक्त करणारं गाणं आहे असं शब्दांवरून वाटतं पण आर. डी. चा पूर्ण आदर राखून म्हणावसं वाटतं की मग या गाण्याची चाल (जी चाल म्हणून अप्रतीमच आहे) अशी व्याकुळ, गंभीर वाटणारी अशी का आहे? थोडी अजून आनंदित चाल चालली असती का? नुसत्या चालीवरून हे शोकसंगीत आहे असे विधान आमच्या मित्राने कधी काळी केले होते आणि आम्ही समस्त आर. डी. प्रेमी जनांनी त्याची शाब्दिक धुलाई केली होती. पण आता हे गाणं परत ऐकताना त्याचे मत अगदीच काही फोल नव्हते असं वाटतं.

मला ते मै खिलाडी तु अनाडी गाण्यात' आयला उपमा उपमा आयला पोरे आले आले' असं ऐकू येतं<<
अय्यो, असच आहे ना ते? मी अजुनही असेच ऐकतेय. >>>>>>>>>>>>>>>

साला आयला ऊफ्फ्मा आईग्ग पोरी आले आले ...... मला असं ऐकू येतं

उपमा पोहे आले आले Lol

ते त्या 'पह्यलं नमन' लोकगीतात 'आम्ही करितो वंदन तुम्ही ऐका हो दुर्जन' असं ऐकू येतं. श्रोत्यांना दुर्जन का म्हणत आहेत हे कधी कळलं नव्हतं. नंतर कुणीतरी सांगितलं की ते गुणीजन आहे! मी पुन्हा ते ऐकून पाहिलं, पण दुर्जनच ऐकू येतंय. बाकी कुणाला गुणीजन ऐकू आलं का?

चीकू,
गाण्याच्या ओळीतच आहे की,
गम की शाम..
प्रियकर नसताना असलेला एकटेपणा आणि मग भेटल्यानंतर परत असलेला विरह, एकटेपणा... ते प्रेम हरवले तर काय होइलची भिती म्हणून गाण्यात आर्तता आहे वगैरे वगैरे( असा मी लावलेला अर्थ)...
गाण्याचं चित्रीकरण वेड्यासारखं केलय असं मला वाटतं पण असेल(दिगदर्शकाच्या मते) ठीक.
गाणी सर्व मस्त आहेत. राजेश खन्नाचा पहिला मूवी..

एब ने मे तोता....देढ इश्किया Lol
मला वाटायचे 'बन मे तोता; असे काही असेल. गाणे मी नीट पाहीलेले नाहीये.

आत्ता 'अलादिन' बघतांना मुलाने सांगितले ते 'ईब्ने बतुता' आहे.

आजकालचे एक नवे पंजाबी गाणे रेडिओवर शेजारी ऐकू येत असते, ते असे।ऐकू येते (नक्की काय शब्द आहेत माहीत नाही)
स्वतः साठी केळवणी करता
काय मग पेरणी करता
मैं ही मेरे पिछे पिछे आउंगी हां...
-----------
सापडलं हे गाणं

ते नवरात्रीचे गुजराती गाणे पण नक्की काय शब्द आहेत कळतच नाहीत. नुसत्या ताराच भरलेत गाणंभर

ओय रे रंगीला तारा, ओये रे ढिला तारा, ओय ओय <अजून कसला तरी> तारा

स्वतः साठी केळवणी करता
काय मग पेरणी करता
<<<<<< Lol

तू तो साड्डी केर (केअर) नी करदा
टाइम सपेअर (स्पेअर) नी करदा
वे मै ही तेरे पीछे पीछे औनीआं..
मै ही तेनु फोन मलौनी (मिलौनी)आं..

मानव Lol

हो ना
वाडा तारा रंगीला तारा असे काय काय तारे आहेत.

मी पण पाहिले ते फार झटावं लागलं , पंजाबी शब्दांचा घोर कंटाळा आला आहे.... Lol
श्रद्धा नी जे काय लिहीलयं ते वाचताना पण बोबडी वळतेयं Lol

ना सिर झुकाके जिओ,न सिर उठाके जिओ असं ऐकायांचे मी,मलाच प्रश्न पडायचा झुकवून नै नि उठवून नै मग नक्की कसं जगणं हवंय यांना

रच्याकने या गाण्यातील भाव मला अजूनही पूर्णपणे समजत नाही>>>>

मला आता नीटसे आठवत नाही पण यातले नायक नायिका अभावग्रस्त असतात पण स्त्री स्वभावानुसार नायिकेला त्याच्यासाठी नटावेसे वाटतेय. आता पैशाचे सोंग आणणार कुठून? म्हणून मग त्याची आपल्या मनगटावरची बोटे म्हणजे बांगड्या, त्याची नजर म्हणजे आपली बिंदी, चेहऱ्यावर ची धूळ साक्षात चांदणचुरा व व स्वप्नरंजन सुरू....

गाणे खूप आवडते आहे पण बांधलेल्या चालीवर शब्द बसवताना खूप कसरत केलेली आहे. उलटसुलट शब्दरचना...

मला मुखडा खूप आवडतो... नायिकेच्या नशिबी दुःखाची काळोखी सायंकाळ/रात्रच आहे. पण ती बहाद्दरीण म्हणते की दुःखी सायंकाळ कशी असते हेच मला माहित नाही कारण तुझे नुसते नाव मनाशी घेतले तरी दुःखाच्या काळोखात शेकडो दिवे उजळल्याचा भास होतो..

पण दुर्जनच ऐकू येतंय. बाकी कुणाला गुणीजन ऐकू आलं का?>>>>>>>>>>>>>>> आम्ही फारच गुणी. गुणीजनच ऐकू आलं. या गाण्यावर डान्स केला होता त्यामुळे असंख्य वेळा ऐकलंय. पण त्यातले अजून एक दोन शब्द कळले नाहीत. गुगलायचे कष्ट घेतले नाहीत.

इसो कटली हरा किंवा वि स क ट ली हारा आम्ही वेचून फुले म्हणजे काय ब्बॉ ?

ओय रे रंगीला तारा, ओये रे ढिला तारा, ओय ओय <अजून कसला तरी> तारा>>>>>>>>>> चोगाडा तारा, ओय रंगीला तार, ओ छबीला तारा

विस्कटली हरा आम्ही येथ फुले
विस्कटली हरा आम्ही येथ फुले
आज गज-गौरीवर चवरी डुले
हो, आज गज-गौरीवर चवरी डुले -- > असे आहे म्हणे...

Pages