मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

विस्कटली हरा (देवा) आम्ही येथ फुले,
पुढचे मला अचपुक गौरिवर .. असे काहिसे ऐकू येते . (हे कुठल्यातरी लेखकाचे अचपुकबाश्रिबुंजिकमोघी.. वगैरे होते तसे वाटते).

‘रंग’ चित्रपटातील एक गाणं - दिल चीर के देख तेरा ही नाम होगा

‘तेरा ही नाम’ मी काल पर्यंत ‘तेरा ईनाम होगा‘ असं म्हणायचे.. काल ओला मधे व्यवस्थित ऐकलं Happy
ईनाम मिळणार म्हटल्यावर कोणीही हसत हसत चीरून टाकेल

मै लवली होगई यार नाम तेरा फडके
नाम तेरा फडके Proud
शाहरुख फडके

मला माहिती आहे की हे पढके आहे पण मला फडकेच ऐकू येतं.

शाहरुख फडके Lol

"तूम पुकार लो..." गाण्यातली ओळ "रात ये क़रार की बेक़रार है" मला परवा सीमंतिनी यांच्या एक पोस्टमुळे कळले.
मी ऐकायचो "रात बेक़रार की बेक़रार है" (आपण मराठीत नाही का म्हणत "अख्खा च्या आख्खा" किंवा "तसा च्या तसा")

"मी ऐकायचो "रात बेक़रार की बेक़रार है" - Happy अतुल, बरं झालं ह्या गाण्याचं रसग्रहण नाही लिहीलंत ते. Wink

अचपुकबाश्रिबुंजिकमोघी - व पु काळे...
अनरसा चकली पुरणपोळी करंजी बासुंदी श्रिखंड बुंदी जिलेबी कडबोळे मोदक घीवर

इसो कटली हरा किंवा वि स क ट ली हारा आम्ही वेचून फुले म्हणजे काय ब्बॉ ? >> हरा म्हणजे मोठी टोपली असं मी आठवणीतलीगाणीडॉटकॉमवर वाचलं.

ते एक विगल विगल नावाचं इंग्रजी गाणं आहे. ते माझ्यासकट आमच्या ओळखीच्या बर्‍याच (मराठी माध्यमात शिकलेल्या) लोकांना बेडूक-बेडूक असं ऐकू यायचं. पुण्यात असताना गणपतीत अनेक ठिकाणी हे लावलेलं ऐकलं आहे. सगळे नाचणारे लोक पण बेडूक बेडूक म्हणायचे. अतिशय घाणेरडं गाणं आहे ते म्हणे. कधी बाकीचे शब्द कळले नाहीत, त्यामुळे नक्की माहित नाही. सुरुवात 'डोण्ट स्टोप मूव्हिंग बेबी, बेडूक बेडूक' अशी काहीतरी होती.

मला लहानपणी एक अकेला इस शहर मे गाणं ऐकताना त्यात ते आब-ओ-दाना ढुंढता है होतं ते साबुदाणा ढुंढता है वाटायचं कारण हिंदीचाच आनंद होता तर उर्दू काय कळणार.
त्यातून साबुदाणा खिचडी प्रचंड आवडत असल्याने साबुदाणा ही जीवनावश्यक व शोधण्यायोग्य वस्तू यात शंकाच नव्हती.
जिहाले मुसकीन गाण्याच्या वेळी प्रश्न पडायचा की बहार ए हिजरा हा काय प्रकार आहे कारण तेव्हा हिजडा म्हणजे छक्के इतकंच माहीत होतं आणि हिंदीत ड चा र होतो हेही. आमच्या लहानपणी छक्का वगैरे शब्द सरळ वापरत असत. LGBTQ+ वगैरे प्रकार अमेरिकेत आल्यावर कळले. मला अजूनही त्या गाण्याचा अर्थ माहीत नाही.

मला पूर्ण गाण्याचा अर्थ नाही येत पण हिज्र म्हणजे विरह... हिज्र की उंची दिवार बनाई...लंबी जुदाई... चार दिनांदा प्यार...
जिहाले मिस्कीन हे अमिर खुस्रो च्या ओरिजिनलचे गुलजार रूप आहे. हे ओरिजिनल
https://youtu.be/FKojb_16X5Q (अर्थासाठी)
https://youtu.be/LV5UibHJZyQ?t=143 (गाण्यासाठी)

हिंदीत ड चा र होतो >> मला वाटते उलट आहे, काही भागात र चा ड होतो. ड चा र इंग्रजीने केला.

आपण मराठीत नाही का म्हणत "अख्खा च्या आख्खा" किंवा "तसा च्या तसा" >>> हे एक्स्प्लनेशन आवडलं Biggrin

मी इथे आधी लिहिलंय की नाही ते आठवत नाही. पण 'क्या हुआ तेरा वादा.. ' च्या पुढे मला 'वो कसम वोही राधा' असं ऐकू यायचं लहानपणी Lol

हो Proud

उडे दिल बेफिकरे गाणं मला आधी 'उडे दिल के ठीकरे' असं ऐकु आलेलं.

हो मलापण पढ़ के असेल हे लक्षात येतं पण फडके ऐकू येतं. >>>> आमच्या ऑफिस मध्ये एक फडके आडनावाचा मुलगा आहे. त्याचा बॉस त्याला चिडवायचा " ये देख , आ गया तेरा गाना ".
तात्पर्य : ती फडकेच म्हणते. सगळी लोक चुकीचे ऐकणार नाहीत Happy .

ते धूम च्या कुठल्या तरी भागात ऐश्वर्या चं 'क्रेझी किया रे 'गाणं आहे ते माझे पप्पा नेहेमी 'नदी किनारे' असंच म्हणतात...

@हरचंद ..तुम्ही जे गाणं म्हणताय ते आम्ही पण
नॉन स्टॉप ऍक्शन ऍक्शन बेडूक बेडूक .. असं म्हणायचो. Lol

Snap's Ooops Up असे एक गाणे आहे. ह्या गाण्याच्या एका वर्जन वर जुही चावलाने डर मध्ये थोडा नाच केला आहे.

या गाण्याच्या सुरूवातीला काहीतरी "Say op-ah-la" असे ऐकायला येते ... नंतर नंतर त्याचे "निळू फुला" असेच वाटते. खालील लिंक वर हे गाणे पहा आणि एका मिनिटानंतर तुम्हालाही तसेच वाटेल.
Snap's Ooops Up

कोल्हापुरला डर चित्रपट बघत होतो तेव्हा ह्या गाण्याला आख्खे थेटर निळू फुला म्हणत हसत होते. जुहीने सेक्सी डान्स केलाय या गाण्यावर ..त्यामुळे समोर निळू फुले लोकांच्या अंगात येत होता असे वाटत होते.

Pages