मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चली गोरी , पी के मिलन को चली >>> आजकालच्या आंग्लाळलेल्या पोरांनी ऐक्लं तर काय अर्थ लावतील असा विचार मनात आला.

>> चली गोरी , पी के मिलन को चली. तसेही , इतकं शुद्ध हिंदी कळतही न्हवतं.
>> बर्‍याच नंतर कळलं, ते , “पी“ म्हणजे ढोसून नाही, आणि , “पी” म्हणजे पिया.
>> Submitted by झंपी on 21 August, 2020 - 11:20

माझ्या बाबतीत, पी म्हणजे पिया हे कळून सुद्धा "ढोसून झुलत झुलत चाललेली गोरी"ची कल्पना करून तेंव्हा हसायला यायचे Biggrin

याच सिरीज मधले अजून एक गाणे: पी के घर आज प्यारी दुल्हनिया चली

हि अजरामर नाट्य गीते,

"लाडुबंधाच्या कुठून पडल्या गाठी "

"दाढीमिश्या कश्या फुटल्या , दाढीमिश्या"

संध्याचे सुप्रसिद्ध " पंख मुठीत धर आती रे "

आणि एक
"धुंधम धुमती नाच रे नाच रे "

माझ्या मागेच पंढरी
गाये भीम रे त्या तीरी >>> भारी Lol

ईचक दाना, बीचक दाना दाने ऊपर दाना, इचक दाना...
छत के उपर लडकी नाचे लड़का है दिवाना

चुकीचे ऐकू आलेले गाणे नाही, पण ते हिमेश रेशमियाच्या आशिक बनाया गाण्याची चाल रिक्षात बसल्यावर सुचली असावी असे वाटते. रिक्षावाला कधीकधी दोन तीन वेळा हॅंडल किक ओढतो मग इंजिन चालू होते.

आशिक बनाया... (भडूरर्रर्.... इंजिन बंद पडले)
आशिक बनाया... (भडूरर्र्ररर्रर्र.... इंजिन पुन्हा बंद पडले)
आशिक बनाऽऽऽया.... आपने! तेरे बिन सूनी सुनी... (भडूरर्र्ररर्रर्र.... भड् भड् भड् भड्... झाले चालू एकदाचे)
Happy

ईचक दाना, बीचक दाना दाने ऊपर दाना, इचक दाना...
छत के उपर लडकी नाचे लड़का है दिवाना >>>>>> असच गाण आहे ना ते खर?

कांदेपोहे च 'आणि सजवला खोटा रुखवत खाण्याच्या भाताने ,
अंधेरी रातोंमे सुमसान राहोपर च्या पुढे... कोईई आए जाए मेरे खयालों मे..ऐसा पहली बार हुआ है.... असंच असेल असं वाटतं.

>>कांदेपोहे च 'आणि सजवला खोटा रुखवत खाण्याच्या भाताने ,

मला ते 'आणि सजवला (सजौला) खोटा रुखवत भाड्याच्या भांड्यांनी ' असं वाटायचं. खखोदेजा

मला ते 'आणि सजवला (सजौला) खोटा रुखवत भाड्याच्या भांड्यांनी >>

आणि मला ' बाणाच्या पात्यांनी' तर कधी 'पाण्याच्या भात्यांनी ' Happy भाड्याच्या भांड्यांनी हे actual आहे.

सुनीधीचे मराठी उच्चार काही फार खास नाहीत..विशेषतः 'अट्टहास' शब्दाचा उच्चार.

कहर आहे हे Lol

'हम दिल दे चुके सनम' मधील 'मनमोहिनी' या गाण्यातल्या ओळी मला कायम अशा ऐकू यायच्या :

मनमोहिनी तेरी अदा
तुझे जब देख ले तो कोई गधा 

मग lyrics शोधल्यावर समजले कि ते असे आहे:

मनमोहिनी तेरी अदा 
तुझे जब देख ले तो फिर घटा  

नटरंग उभा ललकारी नभा!
स्वरताल जाहले दंग

परवा सैराट झालं जी ऐकत होते त्यात

अग कडाडलं… पावसामंदी…
अन् आभाळाला यात आलं जी…

'यात' म्हणजे काय? की मी चुकीचं ऐकतेय?

सुलू, च्रप्स घ्या टाळी , >>>>>>> घेतली टाळी Happy

अंधेरी रातोंमे सुमसान राहोपर च्या पुढे... कोईई आए जाए मेरे खयालों मे..ऐसा पहली बार हुआ है.... असंच असेल असं वाटतं. >>>>>>>>> अंधेरी रातोंमे सुमसान राहोपर च्या पुढे हर जुल्म मिटाने को एक मसीहा निकलता है, जिसे लोग शहेनशहा कहते है अस आहे.

Pages