मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण,
उसने जाना असच अतिविश्वासाने म्हणायचे.
मग, तुनळी आली आयुष्यात आणि आयुष्य पार बदलले.. Proud

ते हुस्न ए जाना आहे.

>>>>>"गिर गया झुमका गिरने दो" गाण्यात पुढे ऐकू यायचे "हो गयी मुंडरी"

"खो गयी मुंडरी" असे शब्द आहेत. "मुंडरी" म्हणजे अंगठी.

त्या लुटन कबुतर गाण्यात सोना कबुतर ले उडा चुनरी, चुनरी के सांग मेरी ले उडा मुंगरी आहे त्यात ही मुंडरीच असेल(मी इतके दिवस 'ओढणी आणि मेबी डोक्यावर बांधलेला रुमाल घेऊन गेलं' असं काहीतरी समजत होते.)
त्यातलं ते ऊंनीस से कम इक्कीस से जादा गाणं मला कधीही समजलेलं नाहीये.म्हणजे वीस आकडा म्हणायचंय का?मग सरळ वीस म्हणा ना.वीस म्हणजे काय व्हॉल्डेमार्ट आहे नाव न घ्यायला?(तसं भिकार आहे त्यामुळे कष्ट घ्यायची गरज नाहीये)

त्यातलं ते ऊंनीस से कम इक्कीस से जादा गाणं मला कधीही समजलेलं नाहीये.म्हणजे वीस आकडा म्हणायचंय का? >> ते त्या पुलंच्या गुरुजींनी केलेल्या राधेच्या वक्षस्थळाच्या वर्णनाप्रमाणे आहे. राधा, हुझ दॅट पार्ट ऑफ द फिजिक बिलो द नेक अँड अबौव्ह द ऍबडोमेन

त्यातलं ते ऊंनीस से कम इक्कीस से जादा गाणं मला कधीही समजलेलं नाहीये.म्हणजे वीस आकडा म्हणायचंय का?मग सरळ वीस म्हणा ना>>

वीस म्हणजे उन्नीस से जादा इक्कीस से कम हवं ना? Happy

अरे हां
म्हणजे 19-21(19 आणि 21 एक्स्क्यूडिंग) असा प्रॉडक्ट सेट हवाय असे ते सांगतायत.
ते गाण्यात ना लावतायत म्हणजे if(!.....) साठी टेस्ट करतायत.

ते त्या पुलंच्या गुरुजींनी केलेल्या राधेच्या वक्षस्थळाच्या वर्णनाप्रमाणे आहे. राधा, हुझ दॅट पार्ट ऑफ द फिजिक बिलो द नेक अँड अबौव्ह द ऍबडोमेन >>> Biggrin

मधुबन में जो कन्हैया किसी को पी के मिले ... असे वाटायचे... सुरूवातीला ऐकले तेव्हा वाटले की आता मोर्चे निघणार..

नंतर लक्षात आले की किसी गोपी को मिले असे आहे ते...

ह्यावरुन ते गाणे आठवले ,
चली गोरी , पी के मिलन को चली. तसेही , इतकं शुद्ध हिंदी कळतही न्हवतं.

बर्‍याच नंतर कळलं, ते , “पी“ म्हणजे ढोसून नाही, आणि , “पी” म्हणजे पिया.

हो ना, आणि तशात त्या गाण्यावर नाचणारी मीना कुमारी, त्यामुळे ....

पण ते पी से मिलन को आहे. पिण्याच्या पी वाटला की पुढे आपसूक के ऐकू येत असावे.

दिल से मधलं , जिया जले जा जले मधलं ते दाक्षिणात्य कडवं ..

उंजीरगुंजी XXXX क्यो ..
मुंजीरगुंजी XXXX क्यो
ताकधीनिया XXX... आणि काय वाट्टेल ते , पण ऐकायला लै गोड आहे .

तामिळ व्हर्जन पण मस्त आहे

>>> पण ते पी से मिलन को आहे. पिण्याच्या पी वाटला की पुढे आपसूक के ऐकू येत असावे.<<<
गाणं , पडद्यावर नाही तर रेडिओवर एकताना लहानपणी वाटायचे.
गाणं अजून पाहिलच नाही; पहायला हवे.

Pages