मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे लॉजिक चुकीचे आहे Happy 19 वर्षाच्या बाईला मुलगा असेल आणि एखादी 35 ची अनमॅरिड असेल तर :दिवा

राजेश खन्नाच्या दुष्मन मधलं गाणं आहे बहुधा. लहानपणी नेहमी रेडिओवर लावायचे.
वा दाते रवा दा ! मी विचार करून करून अक्षरशः भंजाळलो होतो कि काय अर्थ असावा याचा !!
Submitted by पशुपत on 13 March, 2020 - 09:23

>>>वा दाते रवा दा ! मी विचार करून करून अक्षरशः भंजाळलो होतो कि काय अर्थ असावा याचा !!<<<<
सेम पिंच पशुपत...
Submitted by निरु on 13 March, 2020 - 18:24

वा दाते रवा दा ! मी विचार करून करून अक्षरशः भंजाळलो होतो कि काय अर्थ असावा याचा >>>
मी ही लहानपणी हे असंच ऐकलं होतं.
पण यात भंजाळण्या सारखं का वाटावं?
आपल्या दादाने सुचवलेल्या दातेंच्या रव्याचा शिरा, उपमा आवडणारे दादा पुढे त्याची तारीफ करू शकत नाहीत का?
Submitted by मानव पृथ्वीकर on 13 March, 2020 - 21:08

सूचना: २००० पेक्षा जास्त पोष्टी झाल्याने हा धागा बंद केलेला आहे. पुढिल चर्चा याठिकाणी चालू आहे...
https://www.maayboli.com/node/52599 >>>>> इथे करा पुढची चर्चा
Submitted by धनुडी on 13 March, 2020 - 21:32

ठीक आहे धनुडी , इथे चालू करत आहे.

निरू , ते अगदीच obvious आहे ना !!

मानव , आवडले तुमचे स्पष्टीकरण / अन्वयार्थ !!

विनिता... ही चर्चा (चुकून ) जुन्या धाग्यावर चालू झाली.. मग तिथे नवीन धाग्याची लिंक दिली गेली....
आणि मग सगळे संभाषण इथे कॉपी/पेस्ट केले गेले म्हणुन self Link तयार झालीय...

"ऐ दिल मुझे बता दे, तू किस्किया गया है| वो कौन है दिवाकर, खाबो मचा गया है |" Biggrin Lol

कितीतरी लोकांचे कान आपल्यासारखेच खराब आहेत वाचून बरे वाटले. Proud

खरे तर गूगल येइपर्यंत असंख्य गाणी आपण चुकीचीच म्हणत होतो हा शोध लागला. आणि त्यासाठी केलेले भांडणं आठवून हसाय्ला येतेय. आणि सगळ्यांचे हिंदी सुद्धा अचाट असल्याने, आपण एकले तेच बरोबर पटवले सुद्धा होते भांडतना...

वरच्याच गाण्यात, दिवाकर मुलाचे नाव आहे म्हणून मुलगी असे म्हणतेय, आहे कि नाही पटण्यासारखे?

यारा तेरी यारी को मैने तो बुरा माना......
समजायचेच नाही की असं का म्हणतोय........ एकीकडे तर फार तारीफ करताना...

ऐ दिल मुझे बता दे, तू किस्किया गया है| वो कौन है दिवाकर, खाबो मचा गया है | >>> Lol

इब्तिदा-ए-इश्क़ में हम सारी रात जागे

हे भगवान. हा शब्द इब्तिदा-ए असा आहे हे मला काल कळले. मला वाटत होते "इश्क-दाई" असे काहीतरी असेल.

मुलाचा घरून डान्स क्लास सुरू असल्याने दररोज प्रॅक्टीसच्या निमित्ताने हे गाणं कानावर आदळतं पण या बम डीगी बम बम चे लिरिक्स कळतील तर शप्पथ Proud

तु अखियां मिला के मेरे कोन आजा
इश्क दिया गल्ला तु करके वखाजा
तु गला हिल पाके वे तेरे उते मरदा
मेरे नैना तु आजा सोनिया … आ.. आ.. आ

पगला हारा धर दिपक आजा वा रा धर दिपक

असलं काहीबाही ऐकू येतं Happy

ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे
दे देंगे दम मगर तेरा साथ ना छोडेंगे

अस्मादिकांना जेव्हा दम या शब्दाचा हिंदी अर्थ माहीत नव्हता तेव्हाची गोष्ट!

>>>>>>>>>>>>>दो दिवाने शहर मे, रात मे या दोपहर मे
साबुदाणा धुंडते हैं....>>>>>>>>> हे अत्युच्च भारी वाटलं Lol

अमिताभच्या अग्निपथ मधलं जुम्मा चुम्मा' हे गाणं मला music मूळे आवडत....माझ्या प्लेलिस्ट मध्ये आहे हे गाणं...
पण कविता कृष्णमूर्ती च pahil कडव जाम कळत नाही..कितीतरी वेळा ऐकलंय पण शेवटची ओळ काय आहे कळतच नाही...

त्या आफरीन आफरीन गाण्यात 'उसने जाना' की तारिफ मुंकिन नहीं - असं ऐकू यायचं मला. वाटलं होतं की काहीतरी गडबड आहे.

Pages