मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हिजरी= डिपार्चर , हिजरी कॅलेंडर >> नाही अहो ते हिज्र आहे. हिज्र म्हणजे जुदाई, वियोग, विरह

Lol

तुम्हाला मी, हिजरी कॅलेडरचा संदर्भ का दिलाय ते कळलाच नाहीच. असो सगळ्यांना कळणे कठिणच आहे,तेव्हा हसून घ्या दात दाखवून...
ते हिज्र वगैरे इस्लामिक रित्या संबोधतात म्हणून लिहितात वगैरे ठिक आहे. पण ते कॅलेंडर का असते त्याने संदर्भ पटकन लक्षात येण्यासाठी लिहिलेय. आणि मराठीत हिजरी वर्ष म्हणूनच संबोधतात.

सुसंग तीसदा
घडो सुजनवा
क्यकानी पडो

राष्ट्रगीत मी तरी कधी असे ऐकले नव्हते.
बाकी ज्या कोणी असे ऐकले असेल त्याला एव्ढंच म्हणेन, कर्णा गंजला असेल किंवा ध्वनीफीत खराब असेल.

जिंदादिल, हलके घ्या.
३-४ वर्षांच्या लहान मुलांना राष्ट्रगीत जसे ऐकू येते किंवा ते त्यांच्या मनाप्रमाणे जे उच्चार करतात, तेव्हा ही व्हर्जन्स तयार होतात.

राष्ट्रगीत ऐकताना कळत तरी कि पोरगं राष्ट्रगीत गुणगुणतंय.. लहानग्यांच्या तोंडुन वंदे मातरम ऐका! एकशे एक नवनवीन वर्जन ऐकु येतील.. Happy

मला चुकीची ऐकू आलेली गाणी असाच आहे ना धागा?
जर इतरांना चुकिची ऐकू आलेली गाणी असा धागा असता किंवा अमुक-तमुक असे गाणे म्हणत होता असे जर लिहीले असते तर मला तो प्रतिसाद देण्याची गरज नव्हती.

मी मज हरपुन बसले गं
ह्या गाण्याचे शब्द सुद्धा वेगवेगळे ऐकायला येतात

मी मज, ने मज, हरकून, हरवून वगैरे वगैरे

ते एक सॅटरडे सॅटरडे नावाचं गाणं आहे त्याची ओळ नक्की काय आहे? मला 'सॅटरडे सॅटरडे करती है एमबीए' असं ऐकू येतं.
Happy

३-४ वर्षांच्या लहान मुलांना राष्ट्रगीत जसे ऐकू येते किंवा ते त्यांच्या मनाप्रमाणे जे उच्चार करतात, तेव्हा ही व्हर्जन्स तयार होतात.>>>> +1
आणि ज्या फुल कॉन्फिडन्स ने जोशात म्हणतात की मजा येते. रच्याकने, मी
'all creatures big and small' चे 'all teachers big and small' असे वर्जन पण ऐकले आहे. (प्री प्रायमरी शाळेतली प्रार्थना होती) Proud

Teach little flowers that open, Teach little birds that Sing... प्राची मी पण म्हटली आहे ही प्रार्थना.. .

लहानपणी प्रतिज्ञा म्हणताना 'त्या परंपरांचा पाईप होण्याची पात्रता' असं म्हणायचो. पुस्तकात बघितल्यावर कळलं की पाईक आहे, पण पाईप तोंडात बसला होता. Happy

मलाही, पाईप‘च’ वाटायचे. सगळीच मुलं पाईप‘च’ म्हणायचे.
एकदा माझ्या बाबांनी एकले मी पाईप म्हणताना, व हसायला लागले तेव्हा कळले.

लहानपणी घरी रेडिओ किंवा टेप वर लावलेल्या गाण्यांच्या चाली पाठ असायच्या आणि न कळलेल्या ठिकाणी रँडम शब्द घालून गुणगुणलं जायचं .

इन हवाओं में अकेले ना फिरो, राह में काली घटा रोक नाले
मुझको इन काली गटारों* से है क्या

नंतर ते घटाओं से आहे समजलं

इमली का बुटा बेरी का पेड गाण्यात इस जंगल मे हम दो शेर आहे ते मी इस जंगल मे हम डोसे बोलायचो.

इस जंगल मे हम डोसे>>> Lol
मग इमली का बुटा ऐवजी इडली का बुटा वैगेरे पण असेल Lol

ते "हफ्ते में चार शनिवार होने चाहीये" असे गाणे आहे. पहिल्यांदा कोठे तरी रस्त्यावर लागलेले होते तेव्हा ऐकले.. त्यात सुरूवातीच्या ओळी अशा ऐकू आल्या...

रूल सारे ब्रेक करो
जो कभी ना किया वो करो
पॉटीकरने का मूड़ बने तो
वीकेंड का ना वेट करो

"पॉटी करने का मूड" असल्या ओळी ऐकून डोक्याला हात लावला होता. फार नंतर लक्षात आले की ते "पॉटी" नसून "पार्टी" आहे. नंतर कोठल्याही गाण्यात पार्टी ऐकले की त्याऐवजी पॉटी टाकून म्हणायला लागलो. फार विचित्र अर्थ निघतात. (अभी तो पार्टी शुरू हुई है...)

Pages