मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाही.त्याने छान नाच केलाय म्हणून सगळ्यांना (आळीपाळीने एकेका पायावर उड्या मारत हवेत सुरा भोसकल्याचा अभिनय करून) नम्र आवाहन करतोय
"खलीबलीहा डान्स बघा..खलीबलीहा डान्स बघा"

आज हा धागा संपुर्ण वाचला. एकदम स्ट्रेसबस्टर धागा आहे. अनेक रत्ने या धाग्यावर सापडली ज्याने खळाळून हसवले. पण खाली जे रत्न देत आहे ते या धाग्यावरील पारसमणी आहे असे म्हटले तरी चालेल.

<<<<<< ते दिल्से पिक्चरमध्ये जे आहे, 'उंदीर गंजी कुंजी क्यो? मंदीर वत्तड चंद्री क्यो? उंदरीवरनं सुंदरी व्हावे .. टांगु नक्को तगदनी याडू नंतरी व्हावे ...... सांग कौसल्ये कुरु पुरि यल्ले? मारिन मरियल्ले' - ही काय भानगड आहे कधीच कळाली नाही!
Submitted by शंतनू on 11 July, 2017 - 14:25 >>>> Lol

जिंदादिल, दुसरं रत्न नाहि मिळालं?

हिजडा दिल, मुकुन्द मस्ती वालं?
Submitted by झंपी on 29 August, 2019 - 00:56 >>>>
अहो इथे तर रत्नांची खाण आहे. पण पारसमणी तो पारसमणीच. Proud
जेव्हा कधी मी त्या गाण्यातील हे कडवे ऐकेन तेव्हा हेच शब्द मला आठवत राहतील. Lol

... जे रत्न देत आहे ते या धाग्यावरील पारसमणी आहे असे म्हटले तरी चालेल >> हाहाहा! धन्यवाद जिंदादिल. मी ज्यांना ज्यांना ते शब्द ऐकवले आहेत, त्या सर्वांकडून अजूनही शिव्या खातो आहे. Happy

Pages