मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> ये रे तिरडी बान्धते रे रसिका

Lol Biggrin
नाही म्हणजे, आम्ही ऐकले होते "रसिक बलमा दिल क्यू लगाया" आणि इथे थेट तिरडीच... Rofl Rofl Rofl Rofl Rofl
डोळ्यात पाणी येईपर्यंत हसलो राव. Seriously u made my day!

>> ये रे तिरडी बान्धते रे रसिका

बाकी या गाण्याचे संगीत रहमान साहेबांनी आपल्याच एका पूर्वीच्या हिंदी गाण्यातून जसेच्या तसे इथे वापरलेले दिसते:

https://www.youtube.com/watch?v=ta21eWMuAgk

यात सुद्धा मध्ये मध्ये अनेक ठिकाणी "मुझे रख दे मुझे रख दे" असे ऐकायला येते

यात सुद्धा मध्ये मध्ये अनेक ठिकाणी "मुझे रख दे मुझे रख दे" असे ऐकायला येते >>>>>>>>>> मुझे रन्ग दे मुझे रन्ग दे असे आहे ना ते?

वृंदावनी वेणू वाजे... ह्या गाण्यातली,' देव विमानी बैसोनि स्तुती गाती!!!' ही ओळ माझी ताई ' देव विमानी बैसोनि कुठे जाती!!' अशी म्हणायची.. Biggrin

आणि माझ्या एका मैत्रिणीने डायरीत गाणी लिहून ठेवलेली, त्यात तिने कांदेपोहे हे गाणं पण लिहिलेलं.. त्यातली एक ओळ, ' आणि सजवला खोटा रुखवत भाड्याच्या भांड्यांनी' ती तिने ,' आणि सजवला खोटा रुखवत झाडाच्या फांद्यांनी' अस लिहिलेलं .. मी प्रचंड हसले होते तेव्हा.. :p

आणि माझ्या एका मैत्रिणीने डायरीत गाणी लिहून ठेवलेली, त्यात तिने कांदेपोहे हे गाणं पण लिहिलेलं.. त्यातली एक ओळ, ' आणि सजवला खोटा रुखवत भाड्याच्या भांड्यांनी' ती तिने ,' आणि सजवला खोटा रुखवत झाडाच्या फांद्यांनी' अस लिहिलेलं .. मी प्रचंड हसले होते तेव्हा.. Proud

लहानपणी प्रिटी वुमन,धुम चंtitle song,बुमरो,ले जा ले जा सारखी गाणी विचित्र ऐकु यायची आणि ती मोठमोठयाने विचित्र आवाजात confidence ने गायचेसुद्धा.आता आठवलं तरी हसु येतं. Biggrin

मला काही इंग्रजी गाणी lyrics पाठ करुनपण विचित्र ऐकु येतात.उदा: shape of you

आणि माझ्या एका मैत्रिणीने डायरीत गाणी लिहून ठेवलेली, त्यात तिने कांदेपोहे हे गाणं पण लिहिलेलं.. त्यातली एक ओळ, ' आणि सजवला खोटा रुखवत भाड्याच्या भांड्यांनी' ती तिने ,' आणि सजवला खोटा रुखवत झाडाच्या फांद्यांनी' अस लिहिलेलं .. मी प्रचंड हसले होते तेव्हा>>
ते मला "आणि सजवला खोटा रूखवत बाणाच्या पात्यांनी किंवा पाण्याच्या भात्यांनी ' असं ऐकू यायचं Happy सुनीधीचे काहीकाही उच्चार नीट कळत नाहीत. अट्टाहास चा उच्चारही विचित्र केला आहे.

क्लासमेट्स ह्या सिनेमातल्या 'तेरी मेरी यारीयाँ' या गाण्यातली
थोडीसी मनमानीयाँ.. थोडीसी बदमाशियाँ..या ओळीतल्या बदमाशियाँ हा शब्द मी एकदा मधमाशीयाँ असं म्हटलेलं...
थोडीसी मधमाशीयाँ होsssss!!!!!! Lol

Happy एक गाणं आहे.... "अगर तुम मिल जाओ , जमाना छोड देंगे हम..." मला वाटतं..की ती मिळाल्यावर का बुआ जमाना छोडायचा...मग तर जिंदगी जगायची ना? Uhoh
का ते "अगर तुम मर जाओ..." असं आहे?... हे जास्ती लॉजिकल वाटतं...! Happy

>> "अगर तुम मिल जाओ , जमाना छोड देंगे हम..." मला वाटतं..की ती मिळाल्यावर का बुआ जमाना छोडायचा...

तसेच आहे ते. "तू मिळाल्यानंतर जगाशी काही देणे घेणे नाही" अशा अर्थाने.
बादवे हे गाणे म्हणताना पुढच्या ओळीत दुसऱ्याच गाण्यात शिरतो मी नेहमी.

तुम्हे पाकर जमाने भर से रिश्ता... भूल जाते भूल जाते है... ये आँखे देख कर हम सारी दुनिया भूल जाते है
Biggrin

मै ना भूलूंगा... गाणे लहानपणी "मै ना बोलूँगा, मै ना बोलूँगी" असे कितीजण म्हणत/ऐकत होते? Lol हिरो हिरोईन कट्टी-कट्टी खेळत असावेत असे वाटायचे Happy

हे गाणं तर आम्ही
कहदोके तुम होमे रीवरना
असं ऐकायचो. Happy त्या वयात खरंतर होमे रीवरना काय असेल असा प्रश्नही पडला नव्हता. Lol

'मस्त' सिनेमात गाणं होतं--- रूकी रूकी सी थी जिंदगी

त्यातील " मजा ले ले हर घडी" , मी " मसाले ले हर घडी" असं ऐकायचे.

जब वी मेट मध्ये मौज्जा हि मौज्जा गाण्यात काहीतरी भयंकर lyrics आहेत. ते मधेच जो chorus आहे ते मला अजूनही 'तात्या तुम्ही पोहे खाऽऽ /घ्याऽऽ' असाच ऐकू येतं ,
सेम movie मध्ये ये इश्क हाये गाण्यात त्या बायका जे काही म्हणतात ते 'केळे भाजी वाला रे ऽऽऽऽ' असं ऐकू येतं,
नवीन पैकी खलिबली गाण्यात 'भरदिया गॅस भला, भरदिया गॅस भलाऽऽऽऽ' एकूणच माझं lyrics शी फारच सख्य वाटतंय! Lol

ते जलदी आ गॅस वाला असं आहे बहुमताने.गाण्यात रणबीर सिलिंडर संपून शहामृग पुलाव न झाल्याने आणि गॅस वाला वेळेत न आल्याने भडकलाय. ☺️

Pages