मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्स गं सुलू.. सिनेमा सुद्धा चुकीचा निघाला.. गाण्याच्या अर्थाबरोबर. >>>>>>> Lol

असंच मला ते जॅकलीन चं.... कलाइयाँ वे मेरी.. कलाइयाँ वे
मध्ये चक्क चिठ्ठियाँ वाटतं. >>>>>. चिठ्ठियाँ कलाइयाँ वे मेरी असच आहे ना ते? Uhoh तसही त्यात जॅकलीन हाताच्या मुठया वळवळून चिठ्ठियाँ ची एक्शन करते त्यावरुन ते चिठ्ठियाँच वाटत. जाणकारान्नी प्रकाश टाकावा यावर.

चिट्टियां कलाईया. गोरी है कलाइयां चं पंजाबी व्हर्जन. ते म्हणतात ना, गोरा चिट्टा. त्यातले चिट्टियां.

" शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा" ह्या गाण्यात घोडा म्हणाला नंतर मी ऐकायचे, ' ह्याला धरीन, त्याला धरीन,, मीही माझ्या शेपटीने असेच करीन.' एकदम उधळलेला घोडा डोळ्यासमोर यायचा.

नंतर समजलं, ते ' ध्यानात धरीन' असं होतं.

मला अजूनही ह्याला धरीन, त्याला धरीन च ऐकू येत+१
हे वाचेतो, त्यात काही चुकीचा अर्थ आहे , असंही वाटलं नाही.

ध्यानात धरीनच आहे. पण माझ्याकडे असलेल्या लहान मुलांच्या एका सीडीतही ह्याला धरीन त्याला धरीन असं आहे. जिंगल टून्सच्या सीडीत मात्र बरोबर आहे, ध्यानात धरीन असंच.

ध्यानात धरीनच आहे. पण माझ्याकडे असलेल्या लहान मुलांच्या एका सीडीतही ह्याला धरीन त्याला धरीन असं आहे. जिंगल टून्सच्या सीडीत मात्र बरोबर आहे, ध्यानात धरीन असंच>>असं होय??!! आत्ताच कळतंय .. आत्ता गुगलून पाहिल
इथे बघा वर्जिनल असावं

ध्यानात धरीन असं आहे ते??
मला अजूनही ह्याला धरीन, त्याला धरीन च ऐकू येत .. >>> मला पण.
हे वाचेतो, त्यात काही चुकीचा अर्थ आहे , असंही वाटलं नाही.>>> अगदी

" शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा" >>>>>>>> ह्याच गाण्यातली 'मित्रान्नो' नन्तरच कडव देवाघरचे नो अस ऐकू यायच मला. आता इथे वाचल्यावर ते 'देवाघरची लूट' अस आहे कळल. Proud बादवे, वरची लिन्क छान आहे. Happy

Happy
आणि "शेपटीने मी मारीन माश्या" असं नसून "शेपटीने मी वारीन माश्या" असं आहे !!! हे पण आत्ताच कळतंय Lol Lol
मुळात ध्यानात धरीन म्हणजे काय ? लक्षात ठेवेन या अर्थी का ? पण काय लक्षात ठेवेन? कि मला शेपूट आहे असं का ?

सिनेमा - कुर्बानी
झीनत अमान

त्यातले त्या वर्षीचे सुपर डुपर हिट गाणे

आप जैसा कोई मेरी जिंदगीने आये
तो बात बन जाये अहाहा बात बन जाये

आमच्या बरोबरचं एक कार्ट त्याला अर्थ कळत नसताना
ते गाणे भयंकरच म्हणायचे .
एकदा लै मार खाल्ला त्याने मास्तरांचा

कारण
तो म्हणायचा -

आप जैसा कोई मेरी जिंदगीने आये
तो बाप बन जाये अहाहा बाप बन जाये

>> " शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा" ह्या गाण्यात घोडा म्हणाला नंतर मी ऐकायचे, ' ह्याला धरीन, त्याला धरीन

असेच अजून एक बालगीत होते "खोडी माझी काढाल तर..."
हे अख्खे गाणे काय च्या काय ऐकू यायचे. "फटक्यामध्ये विरून जाईल सारी तुमची आई" वगैरे वगैरे काहीही.
त्यात पुढे एक ओळ आहे "अंगामध्ये ताकत आहे मग कोण भितो" हे शब्द 'मग कोण भितो' असे आहेत हा शोध अगदी अलीकडे लागला. लहानपणी ते "मऊ कोण पितो" असे ऐकायला यायचे. अर्थ मात्र अजिबात कळत नव्हता.

अतुल पाटील.. ह्याच गाण्यात सारी तुमची आई ऐवजी मला बरीच वर्षे '' साली '' तुमची आई असं ऐकू येत असे.. फिदी :बालशिव्या

>> साली '' तुमची आई
Rofl Rofl

बाकी "तुमची आई" हे शब्द मात्र आजही युट्युबच्या जमान्यात सुद्धा तसेच ऐकायला येतात इथे ऐका

पण काय लक्षात ठेवेन? >>>>>>
गाईने जे सांगितले ते... शेपटीने माश्या उडवणे...

मीपण ते मारीन माश्या असंच ऐकत होते.

खुदा गवाह मधल्या तू न जा मेरे बादशाह एक वादे के लिए एक वादा तोड़ के गाण्यातली एक ओळ अशी ऐकायला येते...

हो दादा तुझे वासता लौटकर आना तेरा देखूंगी मैं रास्ता

हो दादा तुझे वासता लौटकर आना तेरा देखूंगी मैं रास्ता>>
हे मलाही असेच ऐकू येते. फ़क्त मी वास्ता ऐवजी वाजता ऐकायची

आणि एक जब तक है जान सिनेमामधील 'हीर '
ओरिजनल बोल असे..
हीर हीर ना आँखों अड़ियो
मैं ते साहेबा होई
घोड़ी ले के आवे लै जाए..

यात मला नेहमी गोली ले के आवे लै जाए अस ऐकू येत

कहो ना प्यार है , या चित्रपटातील "ना तुम जाणो ना हम" या गान्यात ते नेमकं काय शब्द आहेत ? ये अल्ले ओ , ये अर्रे ओ ....पोरं शाळेत ये अंबे ओ , ये अंडे ओ , अन्ते ओ असं बरच काय म्हणायची Proud

मागे लिहिलं आहे का आठवत नाही, तरी पुन्हा एकदा लिहितो.. Wink
त्रिदेव मधलं "गजर ने किया है इशारा" गाणं, त्यात एक ओळ आहे.... नही कुछ् कहेंगे के हस कर सहेंगे सितमगर सितम हम तुम्हारा.....
मी ते कित्येक वर्ष ... नही कुछ् कहेंगे के हस कर सहेंगे सितम्बर सितम हम तुम्हारा...ऐकायचो, आणि विचार करायचो बाकी च्या महिन्यांनी काय घोडं मारलंय की ह्य तीन तीन बायका एका त्या सितम्बर च्या च मागे आहेत Lol

मेरी चढ़ती जवानी तड़पेऽऽऽ एऽऽ
तू मुँह ना मोड़, वादा नको... वादा नको... >>>>>>>>> मी सुद्दा सेम तेच ऐकायची. Proud नन्तर कळल, वादा न तोड आहे ते.

ये अंबे ओ , ये अंडे ओ , अन्ते ओ नही कुछ् कहेंगे के हस कर सहेंगे सितम्बर सितम हम तुम्हारा...ऐकायचो, आणि विचार करायचो बाकी च्या महिन्यांनी काय घोडं मारलंय की ह्य तीन तीन बायका एका त्या सितम्बर च्या च मागे आहेत >>>>>>>>>> Rofl

Pages