मला चुकीची ऐकू आलेली गाणी -२

Submitted by परदेसाई on 4 February, 2015 - 09:29

आधीचा बाफ २०००+ पोस्टीनी भरल्याने हा नवीन धागा....
बर्‍याच वेळा आपल्याला गाणी माहित असतात पण काही शब्द कळत नाहीत, किंवा भलतेच शब्द तिथे चपखल बसतात आणि आपल्याला तेच बरोबर वाटू लागतात.

या आधीची गाणी

http://www.maayboli.com/node/2660

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजोबा >>>>> Biggrin
संस्कार संस्कार काय म्हणतात ते हेच हो ! गुणी पोर

लहानपणी कुर्बानी मधले..आप जैसा कोइ मेरी जिन्दगी मै आये...तो बाप बन जाये..अस ऐकायचो... ते बात आहे हे नन्तर कळाल...

बाप बन जाये...... मी सुद्धा तसंच ऐकायचे.

पण ते नीट ऐकले तरी बाप असा उच्चार खूपदा जाणवतो.

मलापण बापच ऐकू यायचं
यमक वगैरे नियमांनी आप ला बात पेक्षा बापच जास्त सुटेबल आहे.

मामाच्या गावाला जाऊ या, ह्या गाण्यात एक ओळ मी,
" मामाची बायको गोरटी, 'बनेल' कुठली 'चोरटी' ,
भाज्यांंची नावे सांगू या " अशी ऐकायचे.
आणि ते पटायचं मला. म्हणजे बर्याच कथा, चित्रपटांंमध्ये दुष्ट , खलनायकी मामी आणि गरीब बिचारा मामा अशी पात्रं असायची. हे तसंच काहीतरी प्रकरण असेल आणि गाण्यात मामीला टोमणा मारलाय, असं समजत होते मी. बरं त्या बनेल, चोरट्या मामीला भाज्यांची नावं का सांगायची, याचं काही logic नव्हतं. कदाचित मामी दम देऊन अभ्यास घेत असेल , असं वाटायचं.
आणि हा गैरसमज बरीच वर्षं टिकला.माझं लग्न ठरल्यानंतर मी पहिल्यांदा माझ्या नणंदेकडे गेले होते. माझ्या ४ वर्षाच्या भाच्याची आणि माझी पहिलीच भेट. तेव्हा रेडिओवर हे गाणं लागलं होतं. आणि नेमकी ती ओळ चालू असतानाच भाचा माझ्याकडे बघायला लागला. आणि जिजी ( माझी नणंद) मला ते दाखवून हसायला लागल्या. ते बघून मी पण वरवर हसले. Uhoh मनात मात्र तो मला चोरटी मामी म्हणून बघत असेल , अशी लाजिरवाणी भावना दाटून आलेली.
आता माझ्या लेकीसाठी बालगीते ऐकणे आणि तुनळी वर पाहणे हे प्रकार १- १.५ वर्षांपासून चालू झालेत,,,,, तेव्हा कळलं मला की ते " म्हणेल कुठली पोरटी,, भाच्यांची नावे सांगू या " असं आहे. Proud Proud

मामाची बायको गोरटी, 'बनेल' कुठली 'चोरटी' , भाज्यांंची नावे सांगू या >>> हो, मलाही ' भाज्यांची नावे' ऐकू यायचं. तेव्हा मला वाटलं होतं की मामाची बायको अभ्यास घालते, नद्यांची नावे, भाज्यांची नावे वगैरे वगैरे! त्यामागे पण 'खलनायकी मामी आणि गरीब बिचारा मामा' ही चित्रपटकृत प्रतिमा हीच कारणीभूत होती. (सुट्टीच्या आणि मजेच्या काळात अभ्यास घेणारे ते खलनायक - असं लॉजिक होतं)

हो, मलाही ' भाज्यांची नावे' ऐकू यायचं. तेव्हा मला वाटलं होतं की मामाची बायको अभ्यास घालते, नद्यांची नावे, भाज्यांची नावे वगैरे वगैरे! >> सेम मलाही असंच वाटायचं

मामाची बायको गोरटी, 'बनेल' कुठली 'चोरटी' , भाज्यांंची नावे सांगू या >>> मलाही तेच वाटायच. मामाची बायको गोरटी, 'बनेल' कुठली 'चोरटी ह्या कडव्यानन्तर गायिका हम्म?, हा!, असे उदगार काढते तेव्हातर खात्रीच पटायची.

उदबत्ती हैरान है आज्जी की पार्टी आजोबा, नीट बघून चाला, पुढे वीज पडलेली आहे >>>>>>> Rofl

बाबूजी जरा धीरे चलो बिजली खडी यहाँ बिजली खडी.. हे धूम मधलं गाणं गाजत होतं तेव्हाची गोष्ट >>>>>> ते गाण दम मधल आहे.

ते लम्बोर्गिनी गाणं -- पंजाबी शब्द फारसे कळत नाहीत .
पण जे काही एकू येत आणि त्याचा अर्थ लावला तर ...
लम्बोर्गिनी चालवतोयेस रे बाबा !
(मला) थोडेसे सुट्टे दे दे
आता मी कुठे गल्लोगल्ली फिरूरे

स्वस्ति, असंच मला ते जॅकलीन चं.... कलाइयाँ वे मेरी.. कलाइयाँ वे
मध्ये चक्क चिठ्ठियाँ वाटतं. अजुनही त्याच्या शब्दात मेरी शादी करा दे इतकंच (महत्त्वाचे) कळतं

तेरा वॅक्स मुझे जीने ना दे जीने ना दे
तेरा पर्स मुझे जीने ना दे जीने ना दे
तेरा बॉक्स मुझे जीने ना दे जीने ना दे

बये!! हवय तरी काय तुला?
शेवटी मित्राने सांगितलं
तेरा बझ मुझे जीने ना दे जीने ना दे
पटलं नाही पण अशी अनेक नपटणारी गाणी गातोच आपण

अजुनही त्याच्या शब्दात मेरी शादी करा दे इतकंच (महत्त्वाचे) कळतं<<<<
ते 'मन जा वे... तू मैनू शॉपिंग करा दे' असं आहे.

हाँस्टेलला असताना बाजूच्या कॉलनीत बऱ्याचदा स्पीकरवर लागलेली गाणी कानावर आदळायची. त्यातलं
' नाखवा बोटीने फिरवाल का '.... हे गाणं माझी रुममेट , "नागवा बोटीने हलवाल का " असं गायची. पहिल्यांदा ऐकून जाम हसले मी. नंतर तिला समजावून सांगितलं, तर म्हणाली, "बोटीत बसलं की सगळं हलतं ना... ते हलवाल का असंच असणार. " आणि नाखवा हा शब्द माहितच नव्हता बहुतेक. पण 'नागवा' मुळे अर्थाचा अनर्थ होतोय, हेही तिला कळत नव्हतं.
शेवटी तिला २-३ वेळा सांगूनही ती तसंच गाते, हे लक्षात आलं. मग ती गायला लागली की मी ओरडून गप्प करायचे तिला.
पण कधीही ते गाणं ऐकलं की तिचं व्हर्जन आठवतंच.

सरगम चित्रपटातलं - रामजीकी निकली सवारी - या गाण्यात एक ओळ आहे -
धोखेसें हरली रावण ने सीता
रावण को मारा, सीताको जीता

ही ओळ मी बरेच दिवस
धोखेसें हरली रावण ने सीता
रावण को मारा, सीताको पिटा

अशी म्हणायचो. आणि याचं एक स्पष्टीकरणही मी मनातल्या मनात ठरवून ठेवलं होतं की युद्धाच्या रणधुमाळी मधे अशी "गलतीसें मिष्टेक" होणे स्वाभाविकच नाही का ?

धोखेसें हरली रावण ने सीता
रावण को मारा, सीताको जीता>>>>>> सीताको नही रे बाबा...... लंका को जीता असे आहे ते. अब लंका को पीटते रहो.

एक कायम गाणे लागते

ते मला, कोल्हा पिसाळला रे बाबा कोल्हा पिसाळला असे ऐकू येते.

ओरिजिनल माहीत नाही. ...... रखं लो नाम .... असे काहीतरी आहे

Pages