
सुवासिक तांदुळ ( आंबेमोहोर किंवा बासमती) एक वाटी
एक छोटा चमचा प्रत्येकी तेल आणि तूप . किंचितस मीठ.
श्रावण महीना सुरु झाला, आता थोड्याच दिवसात गौरी गणपतीचे वेध लागतील. गणपतीच्या नेवैद्यासाठी सुबक, कळीदार मोदक करण्याची प्रत्येकीलाच इच्छा आणि हौस असते. पण मोदक चांगले होण्याच गुपित त्याची उकड चांगली होण्यात आहे. ती एकदा जमली की मोदक वळण काही अवघड काम नाही. मी आज उकड करण्याची एक हमखास जमणारी रेसिपी सांगत आहे. अ़जून दोन तीन रविवार आहेत मध्ये. एखाद्या रविवारी रंगीत तालीम करा म्हणजे गणपतीत अधिक आत्मविश्वासाने मोदक करता येतील.
तांदुळ धुवून त्यातील सर्व पाणी काढून टाकावे. मोजून दीड वाटी पाण्यात ते चार तास भिजन घालावेत.
नंतर ते मिक्सर मध्ये अगदी गंधासारखे बारीक वाटावेत. वाटताना तांदुळ भिजवलेले पाणीच वापरावे जास्त पाणी घालू नये. पण दीड वाटी पाणी घालावेच. ( एक वाटी तांदुळाला दीड वाटी पाणी हे माप आहे उकडीचे)
ही पेस्ट एका निर्लेप पातेल्यात काढून घ्यावी. त्यात चवीपुरत मीठ, आणि वर लिहीलेल तेल आणि तूप घालून ते गॅस वर ठेवावे आणि लाकडी कालथ्याच्या मागच्या बाजूने सतत ढवळत रहावे. थोड्याच वेळात ते घट्ट होईल. घट्ट झाल की त्यावर झाकण ठेवून चांगल्या दोन तीन वाफा आणाव्यात. मोदकांसाठी लागणारी मऊ, कडा न फुटणारी , जास्त मळायची गरज नसलेली अशी उकड तयार आहे. नारळाच पुरण त्यात भरा आणि कळीदार मोद़क विनासायास बनवा. मी केलेल्या मोदकांचा हा फोटो.
From mayboli
सर्रास सगळीकडे बारामहीने मोद़काची तयार पिठी चांगली मिळत नाही, विशेषतः परदेशात आणि लहान गावात. त्यांच्यासाठी ही पद्धत छान आहे.
पाणी दिलेल्या प्रमाणा एवढेच वापरावे. जास्त अजिबात नको. काकणभर कमीच चालेल एकवेळ पण जास्त नको.
साधारणतः एक वाटीचे मोठ्या आकाराचे ८-९ मोदक होतील.
जर तंंअदळंंअपीठ घेतल तर चालतं
जर तंंअदळंंअपीठ घेतल तर चालतं का?
करा मोदक या पद्धतीने उकड
करा मोदक या पद्धतीने उकड करुन. माझे करायचेत अजुन.
नाना , तुम्हाला काय विचारायचे आहे तेच नाही समजले.
मनीमोहोर, आज करुन बघितली ह्या
मनीमोहोर, आज करुन बघितली ह्या पद्ध्तीने उकड. इंद्रायणी आणि बासमती तांदूळ प्रत्येकी अर्धी वाटी घेतले होते. छान मऊ झाली होती उकड आणि चवही उत्तम! धन्यवाद.
मागच्या वर्षी पहिल्यांदा
मागच्या वर्षी पहिल्यांदा उकडीचे मोदक केलेले ही पद्धत वापरुन.. घरात कोणालाही येत नव्हते अन त्यामुळे अजिबातच मार्गदर्शन नव्हतं.. पण बेस्ट झालेले..
यावर्षी बघु कधी करायचे ते
हस्तकौशल्य अप्रतिमरित्या
हस्तकौशल्य अप्रतिमरित्या पेश केलेयत.
चिमुरी +१. मागच्या वर्षी मी
चिमुरी +१.
मागच्या वर्षी मी उकडीचे मोदक केलेले ही पद्धत वापरुन.. .. बेस्ट झालेले.. >> माझे पण.
मनीमोहोर तुम्हाला अनेक धन्यवाद.
हेमाताई, अनेक धन्यवाद. मी या
हेमाताई, अनेक धन्यवाद. मी या पद्धतीने केली उकड, अप्रतिम टेक्स्चर आलय. पहिल्यंदाच इतके छान मऊसूत मोदक जमलेत आमच्याकडे. मुलांनीही साच्यात बनवले. अजिबात न तुटता सुरेख झाले. फोटो टाकायचं जमवतेय.
मनीमोहोर ही पद्धत छान आणि
मनीमोहोर
ही पद्धत छान आणि सोपी वाटतेय. यावर्षी करुन बघावे म्हणतेय.
मला वाट्ते नानांना म्हणायचे आहे की तांद्ळाचे पीठ घेतलं तर चालतं का?
प्रिय मनीमोहोर अनेक धन्यवाद.
प्रिय मनीमोहोर
अनेक धन्यवाद. मी या पद्धतीने केली उकड. पहिल्यांदा उकडीचे मोदक केले ही पद्धत वापरुन.बेस्ट झालेले.
All Credit goes to you. Because of you i gain confidence which i have lost due to some reason.
Thanks to you all who have always participated and giving valueable suggessions and tips on this Forum and special thanks to our dear Maayboli
खुप छान नक्कि
खुप छान
नक्कि करेन.................
शंभर प्रतिसादा बद्द्ल
शंभर प्रतिसादा बद्द्ल अभिनंदन..
हा माझा मेरु मणी.. १०१ वा प्रतिसाद..:)
आज उद्या कडे करणार आहे मोदक, फोटो देईनच..
घाबरत घाबरत अर्धी उकड तुमच्या
घाबरत घाबरत अर्धी उकड तुमच्या पद्धतीने काढली आणि अर्धी नेहमीसारखी पिठीची.
अशीसुद्धा सुंदर होते - मोदक छान झाले. धन्यवाद.
छानच दिसताहेत मोदक! करून
छानच दिसताहेत मोदक! करून पहायला हवेत... +१
सध्यातरी आईला हि रेसिपी पाठवते... प्रश्न उत्तरांसाहित.
धन्यवाद .
मी करणार आहे ह्या पद्धतीने
मी करणार आहे ह्या पद्धतीने थोडेसे.... गेल्यावेळी केलेले तर थोडेसे पीठ खूपच नरम झालेले. पाती वळताना माना टाकत होती. म्हणजे तूटत न्हवती पण उभी रहात न्हवती...
आणि कळ्या येत न्हवत्या.( मलाच कळत नाही कसे सांगावे).
पाणी ज्यास्त झाले का?
मी केले या पद्धतीने. खूप मस्त
मी केले या पद्धतीने. खूप मस्त झाली उकड. धन्यवाद ☺
धन्यवाद सर्वाना
धन्यवाद सर्वाना प्रतिसादांसाठी. झंपी, पाणी जेवढं लिहिलंय तेवढंच घाला काकणभर कमी चालेल एक वेळ पण जास्त नको . थोडं कमी झालं तर मळताना पाण्याचा हात लावून मळता येत पण जास्त झालं तर काही नाही करता येत . हं, पण काकणभरच कमी चालेल खूपच कमी घातलं तर उकड शिजणार नाही नीट . लिहिलंय तेवढं घालून करून बघा . निर्लेप पातेलं घ्या उकड करण्यासाठी म्हणजे खाली लागणार नाही
मी काल केले या पद्धतीने. खूप
मी काल केले या पद्धतीने. खूप मस्त झाली उकड. धन्यवाद .
मी ह्या वर्षी परत ह्या
मी ह्या वर्षी परत ह्या पद्धतीने उकड करून मोदक केले.
हो मीही आज या पद्धतीने केले
हो मीही आज या पद्धतीने केले मोदक. फारच सोप्पे झाले काम! मस्त पातळ पारीचे झाले मोदक.
थॅन्क्यू ममो !!
नलिनी, मोदक सुंदरच झालाय .
नलिनी, मोदक सुंदरच झालाय .
सुनीता, मैत्रेयी , तुम्ही पण फोटो दाखवा ना
बिग थँक यु...तुमच्या
बिग थँक यु...तुमच्या पद्ध्तीने उकड एक्दम छान झाली आणि मोदक पण छान.
गेल्या वेळेस या पद्धतीने
गेल्या वेळेस या पद्धतीने केलेले छान झाले होते. धन्यवाद (दिले होते का आधी? असले तरीही परत एकदा)
यावेली माजी आई म्हन्ली जास्ती कामं काडू नकोस. भाकरीसाटीचं पीट घे नी त्यात कढत पानी नी वाय्च त्याल टाक नी मळ थोडंथोडं. गपगुमान केलं. झ्याक झाले. जास्ती कळ्या पण पडत होत्या पण त्यासाटी पन धीर धरायचा नवता. फटाफटा कर म्हनली. बाकीची लय कामा व्हती ना म्हनून! तरी पोराबाळांच्या इच्छेखातर वाय्च वाय्च रंग सोताच घालून दिला माऊलीनं.
शरी, सोनु धन्यवाद . सोनू,
शरी, सोनु धन्यवाद .
सोनू, लै झ्याक आयड्या . उकड बिकड भानगड न करताच इतके सुंदर मोदक होतात तर . आता असे नक्की करून बघते.
खूपच छान , एकसारखे झालेत
खूपच छान , एकसारखे झालेत
सोनू, मी पण ह्याच पद्धतीने
सोनू, मी पण ह्याच पद्धतीने केले या वेळी. यु ट्युब वर बघितलं होतं. चांगले झाले होते. पण माझ्या साबांना नाही आवडली ही पद्धत. उकड शिजलीच नाही म्हणाल्या.
नेहमीच्या पद्धतीमधे तांदळाची
नेहमीच्या पद्धतीमधे तांदळाची पिठी २ वेळा उकडली जाते, वर लिहिल्याप्रमाणे मोदक करता येतात पण ती डब्बल उकडीचे चव येत नाही.
ती डब्बल उकडीचे चव येत
ती डब्बल उकडीचे चव येत नाही.>> ह्या कृतीत मोदक करून पुन्हा वाफवायचेत ना? की नाही?
हेमाताई, सांगा ओ! फ्रिजात मोदकाचं पुरण उरलं आहे, मी अशी उकड करून बघणार आहे.
मंजूडी, हो ! मोदक
मंजूडी, हो ! मोदक नेहमीसारखेच वाफवायचे.
मंजूडी, मी सोनू. यांनी जी
मंजूडी, मी सोनू. यांनी जी पद्धत लिहिली आहे त्याबद्द्ल लिहिले आहे.
मंजू ,अग सोनू ने उकड न काढता
मंजू ,अग सोनू ने उकड न काढता गरम पाण्यात मोदकाच पीठ भिजवून त्याचे मोदक केले त्याबद्दल चाललीय वर चर्चा . ( रंगीत मोदकांचा फोटो आणि पोस्ट बघ ). त्यामुळे शब्दाली म्हणाली की डबल वाफवले जात नाहीत असं
मी लिहिलेल्या पद्धतीत मोदक झाले की वाफवायचे आहेतच.
Pages