मोदकाची उकड ( मोदकाच्या फोटो सहीत )

Submitted by मनीमोहोर on 31 July, 2014 - 13:31
modakachi ukad
लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

श्रावण महीना सुरु झाला, आता थोड्याच दिवसात गौरी गणपतीचे वेध लागतील. गणपतीच्या नेवैद्यासाठी सुबक, कळीदार मोदक करण्याची प्रत्येकीलाच इच्छा आणि हौस असते. पण मोदक चांगले होण्याच गुपित त्याची उकड चांगली होण्यात आहे. ती एकदा जमली की मोदक वळण काही अवघड काम नाही. मी आज उकड करण्याची एक हमखास जमणारी रेसिपी सांगत आहे. अ़जून दोन तीन रविवार आहेत मध्ये. एखाद्या रविवारी रंगीत तालीम करा म्हणजे गणपतीत अधिक आत्मविश्वासाने मोदक करता येतील.

क्रमवार पाककृती: 

साहित्य

सुवासिक तांदुळ ( आंबेमोहोर किंवा बासमती) एक वाटी
एक छोटा चमचा प्रत्येकी तेल आणि तूप . किंचितस मीठ.

तांदुळ धुवून त्यातील सर्व पाणी काढून टाकावे. मोजून दीड वाटी पाण्यात ते चार तास भिजन घालावेत.
नंतर ते मिक्सर मध्ये अगदी गंधासारखे बारीक वाटावेत. वाटताना तांदुळ भिजवलेले पाणीच वापरावे जास्त पाणी घालू नये. पण दीड वाटी पाणी घालावेच. ( एक वाटी तांदुळाला दीड वाटी पाणी हे माप आहे उकडीचे)
ही पेस्ट एका निर्लेप पातेल्यात काढून घ्यावी. त्यात चवीपुरत मीठ, आणि वर लिहीलेल तेल आणि तूप घालून ते गॅस वर ठेवावे आणि लाकडी कालथ्याच्या मागच्या बाजूने सतत ढवळत रहावे. थोड्याच वेळात ते घट्ट होईल. घट्ट झाल की त्यावर झाकण ठेवून चांगल्या दोन तीन वाफा आणाव्यात. मोदकांसाठी लागणारी मऊ, कडा न फुटणारी , जास्त मळायची गरज नसलेली अशी उकड तयार आहे. नारळाच पुरण त्यात भरा आणि कळीदार मोद़क विनासायास बनवा. मी केलेल्या मोदकांचा हा फोटो.

From mayboli

अधिक टिपा: 

सर्रास सगळीकडे बारामहीने मोद़काची तयार पिठी चांगली मिळत नाही, विशेषतः परदेशात आणि लहान गावात. त्यांच्यासाठी ही पद्धत छान आहे.

पाणी दिलेल्या प्रमाणा एवढेच वापरावे. जास्त अजिबात नको. काकणभर कमीच चालेल एकवेळ पण जास्त नको.

साधारणतः एक वाटीचे मोठ्या आकाराचे ८-९ मोदक होतील.

माहितीचा स्रोत: 
अंजली ( बहिणीची मैत्रीण)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाव.. मला आवडली ही पद्धत. मी नेहमी तयार पिठी वापरुन केरते उकड. नक्की करुन बघते उकड. माझ्याकडे इथे भारतात मिळतो तसा मिक्सर नाहिये. मी फुड प्रोसेसरचा ज्युसर वापरते. त्यातच नेहमीचे वाटण, इडलीचे वाटण करते. त्यात होईल का हि पिठी?

मॄणाल. अगदी बारीक वाटायचे आहे. कणी राहिली वाटताना तर उकड मऊ होणार नाही.
भारतातल्या मिक्सर मध्ये अगदी सहजच होतात तांदुळ वाटून. परदेशातल्या मिक्सरचा अनुभव नाही मला. पण ट्राय करता येईल.

मनीमोहोर;मोदक आजच केले.मस्त झाले.सकाळी वाचले व आत्ता मोदक पोटात.नो तयारी नो टेंशन.तुझीकृती परफेक्ट!आता गणपति ना नक्किच करीन.तुझ्या कृती ला व लिहीण्याच्या टायमिंगला मनापासुन दाद देते.फोटो मात्र विसरले.वाढायचि घाई झाली ना! पुढच्यावेळी पाठवते.खूप खूप थँक्स।.

मनीमोहोर;मोदक आजच केले.मस्त झाले.सकाळी वाचले व आत्ता मोदक पोटात.नो तयारी नो टेंशन.तुझीकृती परफेक्ट!आता गणपति ना नक्किच करीन.तुझ्या कृती ला व लिहीण्याच्या टायमिंगला मनापासुन दाद देते.फोटो मात्र विसरले.वाढायचि घाई झाली ना! पुढच्यावेळी पाठवते.खूप खूप थँक्स।.

नेहमी गणपतीच्या आधी कुणीतरी मोदकांची पाककृती मायबोलीवर देतेच. पण ह्या वर्षी तुम्ही एक वेगळीच पद्धत दिली आहे. फक्त फोटो पाहूनच तुमच्या कौशल्याची ओळख पटते. अतिशय सुंदर कळीदार मोदक खाण्या पेक्षा मला नुसते पाहत राहावयास सुद्धा आवडेल. इतके सुरेख जमून आले आहेत......मानिमोहर तुमचे खर कौतुक.

सर्वांचे प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद.

पण मीरा, तू म्हणजे कमालच केलीस. तू आजच्या आजच रंगीत तालीम घेतलीस. आणि प्रयोग यशस्वी सुदधा झाला.
मला हे वाचून खूप छान वाटल. आता गणपतीत करशील तेव्हा फोटो टाकायला विसरु नकोस.

अनन्या, खरं आहे तुझं. पटल अगदी. कळीदार सुबक मोदक खावा असं नाही वाटत मला सुद्धा.

सुरेख मोदक! उकडीची ही नवी पद्धत नक्की करुन बघणार. धन्यवाद.

जागू, तुझे मोदक पण सुरेख झालेत. आमच्याकडे देखील नागपंचमीला मोदक आणि शेंगा(करंज्या) करतात.

हेमा ताई, खर्‍या सुगरण आहात तुम्ही... तुमच्या पा.क्रु हमखास जमणार्‍या आणि वेगळ्या असतात.
उकडी चा मोदक म्हण्जे लेकीचा विक पोईन्ट.... मी करते तो आपला नेहमीसारखा तांदळाच्या तयार पीठाची
उकड करुन... पण आता तुमच्या पद्धतीने करुन पाहीन... खुप सुरेख, एकसारक्या चुण्या पडल्या आहेत मोदकाला
अगदी साच्यातुन काढल्या सारखे वाटतायत...:)

जागुचा पण फोटो छानच... मोदका बरोबर ज्या करंज्या करतात त्याला मुरडपोळी म्हणतात ना ग?

स्वाती, अंजू धन्यवाद .

सायली, तू प्रतिसाद किती छान आणि सविस्तर देतेस. माझी गाडी छान, अप्रतिम यापुढे जात नाही म्हणुन मला जास्त कौतुक वाटत. तुला ही मनापासून ध्न्यवाद.

जाई, काल तु हह ची आठवण झाली माझे मोदक पाहून असं लिहिल आहेस. आज मी त्यांनी केलेले मोदक बघितले. ते अप्रतिम आहेत. मी केलेले मोदक पाहून तुला त्या मोदकांची आठवण यावी हा मी माझा बहुमान समजते. त्याबद्दल तुला धन्यवाद.

तुला धन्यवाद. >>>>>> नुसते धन्यवाद ? Sad

मला खायला बोलवा की .

कळिदार मोदक तयार करता येण हे माझ किती दिवसापासूनच स्वप्न आहे .
:स्वप्नात रंगलेली बाहुली:

मनीमोहोर ,
तुमचेही मोदक सुबक आहेत हह सारखे .
इन्फक्ट कळिदारपणा हाच तुम्हा दोघिंच्या मोद्कामधला युएसपी आहे . त्यामुळे सहज हहच्या मोद्काचा उल्लेख केला

कृपया गैरसमज नसावा Happy

खुपच मस्त. छान लिहिलस मनीमोहर , तुमच लिखाण खुप बोलक असत. आणि प्रेझेन्टेशन सुद्धा. फारच छान. रुमाल देखिल तेव्हडाच छान. खुप आवडला

Pages