मित्र - काही ओळखीचे.... काही.....

Submitted by पुरंदरे शशांक on 5 May, 2011 - 14:29

मित्र - काही ओळखीचे.... काही.....

काहींची दोस्ती लहानपणापासूनची तर काही...कुठे तरी पाहिल्यासारखे वाटतात खरे.........

१] चिऊताईंना बहुतेक काहीतरी किड्यांचा खाऊ मिळालेला दिसतोय....

Picture 005.jpg

२] आणि चिमणेदादा बिचारे... तांदूळच टिपतात झालं !

Picture 002.jpg

३] हा कोण - लाल लाल डोळ्यांचा कावळा की काय ? कावळाच, पण "देवकावळा" किंवा "भारद्वाज" विहिरीत घुमल्यासारखा ओरड्तो -हू हू करत, अतिशय लाजरे-बुजरे आहेत बच्चमजी...

Picture 120.jpg

४] हा कोण ओळखा पाहू

Picture 001.jpg

५] आणि हा कोण पिटुकला का धिटुकला ?

Picture 018.jpg

६] जरा क्लोज अप या पिटुकल्याचा

Picture 020.jpg

७] हा तर नेहेमीच दिसतो - शेपूट नाचवीत बागडताना -

Picture 125.jpg

८] हा तर खूप ओळखीचा...... तो आपला......

Picture 128.jpg

९] याला कोण ओळखत नाही - हा तर आपला "राष्ट्रीय पक्षी " (इति पु ल )-

Picture 006.jpg

१०] आणि हा वरचा जर राष्ट्रीय पक्षी, तर "ही" ला काय म्हणणार?

Picture 013.jpg

गुलमोहर: 

धन्यवाद मनापासून....स्मितहास्य..
बाकी कोणी मंडळी पक्षी ओळखण्यात रस घेत नाहीत की काय......?

७. सिट्राईन वॅगटेल ?
(ग्रिमेटमधे पाहून आणि नवर्‍याला विचारून सांगीतले) Happy

मस्तच! Happy नवीन पक्ष्यांची नावं अर्थातच माहिती नव्हती! डास आणि माशी ह्या 'राष्ट्रीय पक्ष्यांचे' फोटो कोणी काढून लावेल असे वाटले नव्हते. मज्जा आली त्यामुळे! Lol

मस्तच.

मी चिमणीचा फोटो घ्यायचा बर्‍याचदा प्रयत्न केला आहे. पण का माहीत नाही, एकदाही तो चांगला आलेला नाही. तुम्ही काढलेले फोटो फारच छान आहेत.

७ - ग्रे वॅगटेल - धोबी

८ - अ‍ॅशी

देवकावळा अतिशय लाजरा असल्याने माणसासमोर अजिबात येत नाही, त्यामुळेच बहुतेक त्याचे दुर्मिळ "दर्शन" शुभ समजले जाते व अनेकजण त्याला नमस्कार करतात.
पक्ष्यांचे फोटो काढणे हे फार पेशन्सचे काम आहे व लक ही पाहिजे जोडीला.
जिवंत डासाचा फोटो काढायला मिळेल असे कधी वाटलेदेखील नव्हते.
प्रतिसाद देणार्‍या सर्वांचे मनापासून आभार....

खुप भारी आहे हं! धोबी पहिल्यांदाच बघते आहे. तसेच भारद्वाग ला देवकावळा पण म्हणतात माहिती नव्हते..

वा काय सुरेख प्रचि आहेत शशांकजी, जबरदस्त सुंदर Happy
हा तर आपला "राष्ट्रीय पक्षी " (इति पु ल )- Lol

मित्र चांगले आहेत, पण पु.ल. नी ज्याला राष्ट्रीय प़क्षी म्हटलय त्याच्याशी दोस्ती जरा सांभाळून.