निसर्गाच्या गप्पा (भाग २१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 July, 2014 - 13:39

निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्‍यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.

नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!

वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्सी, वादिच्या थोडया उशीराने शुभेच्छा! काल सुट्टी असल्यामुळे ...
अच्छा २४/८ चे हे सीक्रेट होत काय?
सरिवा फोटो छानच ..

अदीजो. लेख उत्तम आहे तो. अलिकडेच हे कबुतरांना दाणे घालायचे फॅड जास्त झालेले आहे.. पुर्वी काही नेमक्या जागा होत्या मुंबईत. दादरचा कबुतरखाना, गेटवे जवळ वगैरे.. आता ठिकठिकाणी त्यांच्यासाठी अन्नछत्र उघडले गेलेय. आणि त्या प्रमाणात त्यांची लोकसंख्या वाढलीय.

अय्यो सॉरी !
उशिराने वादिहाशू.
आता याचा बदला म्हणून तू उशीराने मला पार्टी दे

हिरवी शाल.. हिरवी ग्गार!
https://fbcdn-photos-b-a.akamaihd.net/hphotos-ak-xfp1/v/t1.0-0/10354681_691219994297623_2810497947106308895_n.jpg?oh=2615a98f03148e997ecc1520058f5420&oe=54619022&__gda__=1417547691_5c5546f8e7abba0a1efb89fb24725344
आणि कृष्ण-कमळ
https://fbcdn-photos-d-a.akamaihd.net/hphotos-ak-xpf1/v/t1.0-0/10574400_691225447630411_7282564760476782591_n.jpg?oh=fba55fc7b43bc23ef9c9919bd57e1256&oe=546EA5DD&__gda__=1416882359_d9bd6ac5b9101bd3ae38d341bf247590

लोकहो... एक शेअर रहीलच. 30 ऑगस्ट च्या साप्ताहिक सकाळ च्या अंकात माझा "फुलपंखी रांगोळ्या" हा लेख आला आहे..फुलांच्या रांगोळ्यांतील तंत्र सांगणारा..
http://www.saptahiksakal.com/saptahiksakal/20140823/5644165961002911277.htm
नेट अव्रुत्तीवर तो काहिसा संक्षिप्त आहे. फोटोपण १ च आहे.. छापिलात सर्व आलय. Happy

अभिनंदन, अत्रुप्त आत्मा!!! Happy
मस्त लेख. शिर्षकही खुप आवडले.
मायबोलीवरही वेगळा धागा काढुन तो लेख प्रसिद्ध करा (अधिक फोटोसहित) Happy

अभिनंदन, अत्रुप्त आत्मा!!
हो तो लेख मूळ रुपात हवाच मायबोलीवर.. पेपरमधे फोटो छापण्यावर बंधने असतात, तसे काही मायबोलीवर नाही.

अभिनंदन, अत्रुप्त आत्मा!!
हो तो लेख मूळ रुपात हवाच मायबोलीवर>>> +१
आता दिवाळी जवळ येत आहे. ऑफिसात रांगोळी स्पर्धा असते. त्यामुळे मुळ लेख व अधिक फोटो हवेतच (परमार्थात स्वार्थ :डोमा:)

जिप्सीला उ वादिहाशु!
अभिनंदन, अत्रुप्त आत्मा!!
सायली, गुगलून पाहिलं करवंद दिसली नाहीत लाल रंगाची कोकणात असतात तशी तू फोटो टाकणार होती ना? अजून त्याला दुसरं काही नांव आहे का?

वर्षुताई, इंजेरा म्हणजे चक्क डोसा! मी सिअ‍ॅटलच्या इथिओपियन रेस्टॉरंटमध्ये खाल्लाय अनेकदा. आणि त्यासोबतच्या भाज्या म्हणजे अगदी आपल्या चवीच्या असतात. चक्क डाळ-बीळ पण असते.

वर्षू, मामी... इथिओपियन एअरलाईन्सच्या जेवणातही चण्याची डाळ असते. त्यांच्याकडे आपल्यासारखेच तूप पण वापरतात. त्या मुलींचा चेहरा खुप भारतीय असल्यासारखा वाटतो. सावळ्या असतात, एवढेच.
( इथिओपियावर कुणाही वसाहतवादी राष्ट्रांचा अंमल येऊ शकला नाही कधी. त्यामूळे त्यांची संस्कृती वेगळीच राहिलीय. )

सुप्रभात...
मंदार / श्र्वेतारक... (बाप्पाचे आवडते फुल Happy )
ऑफीस च्या वाटेवर, रस्त्याच्या कडेला एक झाड आहे... याच्या मंद सुवासाने मोह आवरला नाही...
mandar.jpg

कळे न काही, का अशोक हिरमुसला
थांब जरा मंदारा, विसरले न मी तूला
घाई नको, बाई अशी, आले रे बकुळफुला
देते जलसंजीवन, बंधुजीव आसुसला...

गायिका : आशा खाडीलकर, नाटक : धाडीला राम तिने का वनी ?
संगीत. पं. जितेंद्र अभिषेकी

वा! रुईची फुलं!
या फुलांच्या मध्यभागी जो पंचकोन आहे ना, त्याच्या प्रत्येक कोनापाशी सुईने किंवा पिनेने हळूच टोकरलं, तर तिथे असलेली पोलन सॅक सुईच्या टोकावर घेऊन बघता येते. अगदी दिसेल-न दिसेल अशी असते. परागकण साठवलेल्या दोन पिशव्या आणि त्यांना जोडणारा हुकासारखा भाग अशी रचना असते. कीटक या फुलावर बसला की हा हूक त्याच्या पायात अडकतो आणि त्याच्याबरोबर प्रवास करून या पिशव्या अलगद दुसर्या फुलावर पडतात. एकही परागकण वाया जात नाही. रुईची झाडे बेसुमार वाढतात याचं कारण त्यांची ही यशस्वी फलन पद्धत.

Pages