निसर्गाच्या गप्पा (भाग २१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 July, 2014 - 13:39

निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्‍यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.

नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!

वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अदिजो, आम्ही याचा एक खेळ खेळायचो!
एका राज्याचे राजा राणी हरवले होते. मग सैनिकांनी एक खंदार उघडले त्यात एक भिंत होती . ती भिंत फोडली तर त्यात अजुन एक भिंत होती वगैरे वगैरे.
असं म्हणत रुईच्या फुलाची एक एक लेयर काढत जायचं
आणि मग फायनली आत बसलेले राजा राणी म्हणजे २ तुरे दिसतात Proud

नक्षत्रवनः आपली संस्कृती निसर्गातून फुलली आहे. आपल्या पुर्वजांनी विविध वनस्पती, प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावात एक राखीव जंगल असे त्याला देवराई म्हणत. विविध धार्मिक ग्रंथाचा आधार घेऊन हि नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्म नक्षत्रानुसार एक वृक्ष "आराध्यवृक्ष" मानला जातो. त्याचे पुजन केल्यास त्या व्यक्तीला आरोग्य, सौख्य लाभते असे मानले जाते. नक्षत्र बागेतून आपआपल्या राशींचे आराध्यवृक्ष पाहत आपण गावात प्रवेश करतो.
(माझ्याच आधीच्या एका लेखातुन साभार Happy )

हे ग्रीन अंब्रेलाच्या सहकार्याने कळवा येथे उभारलेले नक्षत्रवनः

मनीमोहोर, हो पांढरी फुले येणारी रुईची जात म्हणजे मंदार.
रीया Happy
जिप्सी, नक्षत्रवन सुंदरच!

-अश्विनी

त्या सिंह राशीचे आराध्यव्रुक्ष पिंपळ आहे का? >>>>
तो बहुतेक पळस आहे>>>>येस्स अश्विनी तो तीन पानांचा पळसच आहे. Happy

खरंतर नक्षत्रवनात लावलेली हि सगळी झाडे अतिशय उपयोगी आहेत. आपल्याकडे एखाद्या गोष्टीला दैवत्व बहाल केल्यावर त्याची सुरक्षितता जास्त जपली जाते (भले मग तो पारावरचा शेंदुर फासलेला दगड असो) त्यामुळेच कदाचित या सगळ्या झाडांची "आराध्यवृक्ष" म्हणुन जपणुक केली जात असावी. म्हणजे कसं कि एखाद्याला सांगितले कि हा तुझा आराध्यवृक्ष आहे याचे पुजन केल्यास तुला आरोग्य, सौख्य लाभेल, असं सांगितल्यावर ती व्यक्ती साहजिकच त्याची जास्त काळजी घेणार. अर्थात हेमावैम Happy

(मला नीट सांगता/मांडता येत नाहीए, I hope माझ्या भावना पोहचल्या असाव्यात. Wink )

पटलं तुझं म्हणनं जिप्सी!
माझी पणजी पाण्याला लक्ष्मी म्हणायची.
म्हनायची की जितकं पाणी वाहू द्याल तितकी तुमची लक्ष्मी वाहुन जाणार.
मग अपोआपच घाबरून नळ पटकन बंद करणं वगैरे

पांढरी फुले येणारी रुईची जात म्हणजेच मंदार, त्यात गणपतीचे वास्तव्य असते असे मानतात.

श्रीरामपूरला अशीच पांढरी रुई बघितली, तिथे सगळीकडे तीच दिसायची, आपल्याकडे कमी दिसतात.

त्यालाच मांदार असे पण नाव आहे का?

ओके पळस आहे तर !
नक्षत्रवनात लावलेली हि सगळी झाडे अतिशय उपयोगी आहेत. आपल्याकडे एखाद्या गोष्टीला दैवत्व बहाल केल्यावर त्याची सुरक्षितता जास्त जपली जाते (भले मग तो पारावरचा शेंदुर फासलेला दगड असो) त्यामुळेच कदाचित या सगळ्या झाडांची "आराध्यवृक्ष" म्हणुन जपणुक केली जात असावी. ++ अगदी अगदी

अन्जू,
मंदार आणि मांदार या रुईच्याच जाती आहेत, दोन्हीत थोडासाच फरक आहे. (मराठी विश्वकोश आणि efloraofindia वरुन माहिती मिळाली)
मंदार - calotropis gigantea - म्हणजे वरच्या फोटोंतील. याच्या फुलातला मधला भाग उंच असतो आणि कळ्या लंबगोल असतात.
मांदार- calotropis procera : याचे लहान झुडूप असते, कळ्या गोल, फुलाच्या पाकळ्या मधल्या भागापेक्षा उंच. फुले वरच्या कडांना जांभळट.

नक्शत्र वन छान आहे. नक्षत्रवनात लावलेली हि सगळी झाडे अतिशय उपयोगी आहेत. आपल्याकडे एखाद्या गोष्टीला दैवत्व बहाल केल्यावर त्याची सुरक्षितता जास्त जपली जाते (भले मग तो पारावरचा शेंदुर फासलेला दगड असो) त्यामुळेच कदाचित या सगळ्या झाडांची "आराध्यवृक्ष" म्हणुन जपणुक केली जात असावी. +१
सायली - विदर्भात तान्हा पोल्याला खूप महत्व आहे. होली करतो त्याप्रमाणे पोल्याला ही रुईची झाडं जालतात का?

हा आहे "काजरा". कोकणात सर्रास आढळणारा. जितका औषधी तितकाच विषारी. याच्या पानावर जेवलो तरी विषबाधा होते अस म्हणतात. या झाडाबद्दल मला काहिच माहिती नव्हती. हि माहिती विक्रमने आणि मायबोलीकर विवेक देसाई यांनी दिली.

श्रीरामपूरला अशीच पांढरी रुई बघितली, तिथे सगळीकडे तीच दिसायची>>> अन्जू वरचा फोटो सुद्धा श्रीरामपूरचाच आहे. Happy
नक्षत्रवन हि संकल्पनाच भारी आहे.

इथे कोणताही नवा विषय काढला की लगेच भरभरून माहिती मिळते, म्हणून तर सगळ्यात आधी इकडे हजेरी लावली जाते.

हो!

ओके नलिनी आम्ही तिथे पाहुणे होतो, नवऱ्याच्या नोकरीनिमित्याने २००२ ते २००६ असे चार वर्षे.

sorry लोक्स फॉर अवांतर.

नक्षत्रवनाची छान आहे कल्पना... हि झाडे वाढून बहरायला हवीत.
मी निळी करडी आणि गुलाबी.. अशी दोन प्रकारची रुई बघितली आहे. डॉ. डहाणूकर म्हणायच्या हिची लागवड कुणी मुद्दाम करत नाही.. तरी सगळीकडे असते. तिला त्या सूर्यपुत्री पण म्हणायच्या. खरजेवर औषधी आहे असे त्यांनी लिहिल्याचे आठवतेय.

इथे अंगोलात पण भरपूर आहे, पण इथे त्यावर केशरी काळ्या रंगाच्या फुलपाखरांच्या अळ्या खुप दिसतात. पानेच काय, कळ्या पण खातात त्या अळ्या. ( आपल्याकडे कमी दिसतात या अळ्या. ) त्यामूळे झाडे नीट डेरेदार नसतातच.

जागू.. कडू काजर्‍याचे बी.. असा उल्लेख अनेक औषधात येतो पण ते सिद्ध करून घ्यायचे असते.

जिप्सी, नक्षत्रवन सुंदरच!
नक्षत्रवन कधीही पाहता येते का.
मी गुलमोहर- ललीत लेखन मध्ये 'मी येतोय' हा लेख लिहीला आहे.
काही बदल / सुचना असतील तर सांगा.

sorry MALA MARATHI MADHE TYPE KARANE TITKASE JAMAT NAHI. "NAKSHTRA VRIKSHA" VARUN EK SANGAVASE WATATE. DR. SHARDINI DAHANUKAR YANCHE " NAKSHTRA VRIKSHA MHANUN PUSTAK AAHE. FARACH RESEARCH KARUN TYANNI HE PUSTAK LIHILE AAHE. SWATA ALOPATHY DOCTOR ASSUN TYANI VRUKSHYANCHE AYURVEDIC GUNDHARMA ANI MANASACHI PRAKRUTI ANI NAKSHTRA YANCHA PARASPAR SAMBANDH, YACHA ABHYAS KELA ANI HE PUSTAK LIHILE AAHE.
JAROOR VACHAVE

Pages