निसर्गाच्या गप्पा (भाग २१)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 15 July, 2014 - 13:39

निसर्गाच्या गप्पांच्या २१ व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन.

नि. ग. च्या हया द्विदशकोत्तर धाग्यावर मनोगत व्यक्त करताना खूप खूप आनंद होत आहे. डिसेंबर २०१० मध्ये नि. ग. ला सुरवात झाली आणि आज इतक्या अल्पावधीत वीस भाग झाले ही ह्या धाग्याचे, ही खरं तर आपल्या सगळ्यांच्या
निसर्गावरील प्रेमाचीच पावती आहे. ह्या वर्षी जून महिन्यात पावसानी अढी दिली खरी, पण मागच्या आठवड्यापासून त्याने कम बॅक करुन मस्त बॅटिंग
करायला सुरवात केली आहे. मला असं वाटत की आपल्याकडे पावसाळ्या दरम्यानचा निसर्ग एरवी एवढा बहरलेला नसतो . आता शहरापासून थोड दूर गेलं तर
दिसतील आपल्याला हिरव्या रंगाच्या हर एक छटा, हिरव्या गवतातून हळूच माना उंचावून जग बघणारी इवली इवली गवतफुले, पाणी पिऊन तृप्त झालेली आणि
वार्‍यावर डोलणारी भातशेती, डोंगरमाथ्यावर विहरणारे ढग, उतारावरून वाहणारे छोटे छोटे निर्झ्रर आणि नशीबाने साथ दिली तर इंद्रधनुष्य ही. सगळेच नजरेला आणि मनाला शांतावणारे. सोनचाफा, सोनटक्का, प्राजक्त, तगर, ब्रम्हकमळ, लिली, अनंत ,
गावढी गुलाब, अशा विविध फुलांच्या बहरण्याचे ही हेच दिवस.

नि .ग. चा धागा म्हणजे माझ्यासकट अनेकांसाठी दिवसभराचा ताण तणाव विसरून एका निखळ आनंदाची अनुभुती मिळवण्याचा एक मार्ग आहे. हा भाग ही नेहमीप्रमाणेच उत्तमोत्तम फोटो, उपयुक्त माहिती, दिलखुलास गप्पा आणि
निखळ निरोगी थट्टा विनोद यानी बहरु दे हीच त्या निसर्ग देवतेच्या चरणी प्रार्थना!!!

वरील मनोगत व फोटो नि.ग. प्रेमी आय.डी. मनीमोहोर चे आहे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर ८७) कांचन कुलकर्णी

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाच्या गप्पा (भाग २०) http://www.maayboli.com/node/49280

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

नले, नैरोबीला अनाथ प्राण्यांना जोपासण्यासाठी " नैरोबी सफारी वॉक" अशी एक खास जागा आहे. तिथे आपल्या हाताने सिंहाच्या बछड्यांना बाटलीने दूध पाजता येते... आण तूझ्या वाघोबाला !

दिनेशदा : अवघी विठई माझी हे सर्व वाचले होते पण विसरले, कसावा ही वाचला होता आता लिंक पाहील्यावर लक्षात आले.

कबुतर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. कबुतरे खूप जीव लावतात. हाकलले तरी येत राहतात. त्यांच्या सुमधूर गायनाने आपल्या मनास नेहमीच उभारी येते. साधनाला कबुतरे खूप खूप आवडतात.

तर आमच्या बाल्कनीत आलेल्या एक असाच मुसाफिर. त्याचा रंग जरा इतरांपेक्षा वेगळा होता म्हणून त्याचे विशेष कौतुक! तर या पहा कबर्‍या कबुतराच्या काही करामती :

वि.सु. मध्ये काच असल्याने फोटो काहीसे पिवळे आले आहेत. पण कबुतर कबरेच आहे.

MAAME Happy Happy

SEM HYAACH RANGAACHE KABUTAR AAMACHYAKADE AAHE.

http://www.loksatta.com/chaturang-news/growing-vegetables-at-home-791880/2/

उद्या वर्ल्ड किचन डे... त्यानिमित्त लोकसत्तामधला हा लेख अवश्य वाचा.

उद्या (२४ ऑगस्ट) 'वर्ल्ड किचन डे' अर्थात 'जागतिक परसबाग दिन'. यंदाचे वर्ष कौटुंबिक परसबागकाम वर्ष (Family Kitchen Gardening Year) म्हणून संयुक्त राष्ट्राच्या अन्न आणि कृषी संघटनेने जाहीर केले आहे. जगात ८४ कोटी लोक कुपोषित आहेत. त्यापैकी ६५ टक्के जनता ही एकटय़ा आशिया-पॅसिफिक प्रदेशात आहे. या लोकांचे पोषण होण्यासाठी कौटुंबिक शेतीवर भर द्यावा, असे युनोचे म्हणणे आहे. आपणही आपल्या कुटुंबासाठी शहरी सेंद्रिय शेती करू शकतो का? या विचाराचा ध्यास घेतला. घरच्या घरी सेंद्रिय भाजीपाला पिकविण्यासाठी शहरी शेती फुलविण्यासाठी गच्ची, गॅलरी किंवा अगदी खिडक्यांवरील ग्रिलचाही वापर करू शकतो. ही शहरी शेती तुमच्याच स्वयंपाकघरातल्या कचऱ्यावर वाढवता येईल, म्हणजे कुटुंबाला सेंद्रिय अन्न, भाज्या मिळेल आणि कचरा डेपोवरचा भारही हलका होईल. कुटुंबाचे पोषण आणि पर्यावरणाचे रक्षण दोन्ही साधणारी ही शेती आनंदही देईल तो विरळाच! स्वयंपाकघरातल्या देठ, साली यापासून घरात खत तयार करून त्यावर भाजीपाला घेण्याच्या प्रयोगांचा हा वेध.. .............. पुढे वरच्या लिंकवर वाचा..

लेखिका : सरस्वती कुवळेकर -kuwalekar saraswati@gmail.com

दिनेशदा, मंजू खरच छान लेख.

बघता बघता श्रावण संपत आला. आज शेवटचा शनिवार. मारुतीला प्रिय असणारी ही रुई

From lonavala

जिप्सी,
आम्हा सर्वांकडून
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

शुभ संध्याकाळ!

बऱ्याच दिवसांनी तुम्हाला भेटायला येत आहे. छान वाटते आहे.
सायली,तू आवर्जून माझीही आठवण काढलीस याचा आनंद वाटला. कुणीतरी आपली आठवण काढणं ही
भावनाच किती सुखद असते नाही?

योगेश... वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

आता तू चलतचित्रणाकडेही वळावेस, व त्यातही असेच यश मिळवावेस. या शुभेच्छा समज वा मागणी समज.. पण आहे, हे नक्की.

प्रज्ञा, दिनेशदा शुभेच्छांबद्दल धन्यवाद Happy

दिनेशदा, तुमच्या फोनची वाट बघत होतो आज. Happy

अर्रे..मी काय काय मिसलंय इकडे ना.. जिप्स्याचे फोटो, अजून काय काय..

स्वारी मामी , साधना... आय नो लाईक कबुतरं.. टू नॉइजी... आणी घाण करुन ठेवतात.. Uhoh

आडिस अबाबा ला रम्मी होता तेंव्हा एका लोकल ने सांगितले होते कि ,' एंजेरा' नावाच्या धान्यापासून केलेले दोश्या, धिरडी टाईप चा पदार्थ ब्रेफा, लंच आणी डिनर ला खातात तिथे. हे स्टेपल फूड आहे तिकडले.. मग बरोबर तोंडालावणं काही का असेना...

दोन दिवस इथे आलं नाही तर हा धागा कुठल्याकुठे पोचलेला असतो!
सरीवा, खूप छान आहे फोटो.
मामी, कबुतरांचेही फोटो मस्त.
दिनेशदा, दुबईत खास ससाणे पाळलेत कबुतरांना हाकलण्यासाठी..>>
यावरून किरण पुरंदरेंनी लिहिलेला एक लेख शेअर करवासा वाटतोयः

कबुतरांशी कट्टी म्हणजे निसर्गाशी बट्टी - किरण पुरंदरे

मुंबईच काय, पण जगातल्या कुठल्याही मोठ्या शहरातील कबुतरे ही केवळ माणसाने त्याचे नकटे नाक खुपसल्यामुळेच एवढी वाढली आहेत. कबुतरे शाकाहारी आहेत म्हणून त्यांना खायला घातलं जातं. फक्त कबुतरेच नाही, तर जगातल्या कोणत्याही रानटी पशुपक्ष्यांना खायला घालणे पूर्णपणे चूक आणि अशास्त्रीय आहे. गेली कित्येक दशके आपल्या समाजातील हजारो माणसे निसर्गसंवर्धनाचा एकमेव मार्ग म्हणजे पशुपक्ष्यांना खायला घालणे, या गैरसमजुतीतून अक्षम्य चुका करत आली आहेत. हा टिपिकल मानवकेंद्रित विचार आहे. वास्तविक ज्या लोकांच्या धर्मात भूतदयेचा विचार सांगून त्याप्रमाणे कृती करण्यास प्रोत्साहन दिले गेले आहे, अशा लोकांच्या बैठका घेऊन त्यांच्या भूतदयेला शास्त्रीय वळण लावण्याची गरज आहे.
निसर्गाने पक्ष्यांना जन्माला घालताना चोच दिलेली असते, चा-याचीही सोय केलेली असते. त्यांना जर नैसर्गिक अधिवासात अन्न कमी पडायला लागले तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या विणीवर होतो. वीण घटते. याउलट अन्नब्रह्म कृपावंत असेल तर एरवी चार अंडी घालणारे पक्षी सहा किंवा आठ अंडीसुद्धा घालतात. लोकसंख्या चक्राच्या आ-या कशा फिरतात, हे एखाद्या नैसर्गिक अधिवासाची सद्य:स्थिती कशी आहे, त्याची गुणवत्ता कशी आहे, यावर अवलंबून असतं. लोकसंख्या नियंत्रणाची सर्व सूत्रे निसर्ग स्वत:कडे ठेवतो. असे असताना कोणत्याही जिवाला खायला घालणे म्हणजे शुद्ध (शाकाहारी!) मूर्खपणा आहे. आपण मुंबईत काय आणि पुण्यात काय; हजारो ऐतखाऊ कबुतरे निर्माण करून ठेवली आहेत. कबुतरे मस्त मजा करताहेत, आपणच भोगतोय. मला वाटते की, कबुतरांची निसर्गात जगायला अत्यंत नालायक अशी लोकसंख्या आहे. या कबुतरांची रसद तोडणे हा एकमेव आणि दीर्घकालीन परिणाम साध्य करू शकेल, असा उपाय आहे. यात कुठलीही हत्या नाही, हिंसा नाही. चोचीला अन्न मिळत नाहीये, हे एकदा कबुतरांना कळू द्या. ती जरा तरी हातपाय हलवायला लागतील. त्यांना व्यायाम घडेल. त्यांचा मेद झडेल. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती पांगतील. कारण अन्नाच्या शोधात त्यांचे रानटी भाईबंद जशी वणवण करतात तशीच वणवण, तसाच तडफडाट (आणि फडफडाट!) त्यांनाही फरावा लागेल. या प्रक्रियेत त्यांच्यात स्थानच्युती (Displacement
) होईल. कबुतरांच्या अंगावरची मुंबईकरांनी प्रदान केलेली कवचकुंडले एकदा का उतरवली की ती बाहेर पडतील. त्यांना स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. निसर्गाचा कायदा लागू होईल. मग हळूहळू एक इंटरेस्टिंग फेज येईल. जेवढ्या प्रमाणात चारा उपलब्ध असेल तेवढ्याच प्रमाणात यशस्विरीत्या जगणा-या लोकसंख्येचा प्रतिपाळ करून निसर्गदेवता स्वत:च समतोल साधेल. हा ख-या अर्थी परिणामकारक परंतु दीर्घकालीन उपाय आहे. लोकमानस तयार करावे लागेल. कारण हा धार्मिक प्रश्न आहे आणि म्हणूनच जास्ती गुंतागुंतीचा आहे.
कावळे, मांजरी, बहिरी ससाणे आणि काही प्रमाणात माणसाला खाद्य म्हणून उपयोगी पडणे हीच कबुतरांची निसर्गातील भूमिका आहे, हे मान्य करण्यासाठी धर्माचा चश्मा काढून शास्त्रीय ज्ञानाचा चश्मा चढवावा लागेल. शास्त्रीय ज्ञानाच्या चष्म्यातून कबुतरांची पांढरी अंडी फोडून खाणारे कावळे आणि पूर्ण वाढलेल्या कबुतरांवर लाजवाब चापल्या दाखवत झेपा टाकून त्यांना ठार मारणा-या वाघाच्या मावशा दिसतील. मुंबईत मांजरी किती आहेत हे मला माहीत नाही, पण समस्त मुंबईकरांनी मार्जारव्रत धरायला हरकत नाही. मांजरी वाढवा आणि कुत्र्यांना आवरा! मांजरांची संख्या वाढली तर कुबतरांबरोबर उंदीरही कमी होऊन माणसांना कमी कुत्री चावतील.
कबुतरांच्या विष्ठेत नेमके काय असते आणि त्याचा माणसावर नेमका काय परिणाम होतो याबाबत मला माहीत नाही. पण मला एवढे नक्की माहीत आहे की, अति झालं की बिघडतं! बाय द वे. कबुतरे पूर्णपणे शाकाहारी नाहीत बरं! पावसाळ्यात बाहेर पडणारी गांडुळे खाणारी कबुतरे काही पक्षी निरीक्षकांनी पाहिली आहेत. कबुतरांना पकडणे आणि त्यांना खेड्यापाड्यांमध्ये नेऊन सोडणे हा उपायसुद्धा करायला हरकत नाही. ती टोळधाडीसारखी पिकांवर तुटून पडणार नाहीत. कबुतरांना जाळी टाकून पकडता येईल. कदाचित काही कबुतरांचे ढाबळीवाल्यांमध्येही वाटप करता येईल. शहरांमधल्या ढाबळींमधून सुटून बाहेर पडलेल्या शोभिवंत पाळीव व रानटी कबुतरांमध्ये प्रजनन होऊन पाळीव कबुतरांचे वाण तयार झाले. त्यामुळे अशी ढाबळींमधली कबुतरे आणि फार मोठा प्रश्न झालेली कबुतरखान्यांमधली कबुतरे यांचे मेतकूट जमायला हरकत नाही. कबुतरखान्यांची, पशुपक्ष्यांवर दया करायला शिकवणारी जुनी परंपरा मोडीत काढण्यापेक्षा पुण्य मिळवण्याचे शास्त्रीय उपाय शोधून काढणे सयुक्तिक नाही का?
दरम्यान, काही पटकन करता येण्यासारखे प्रॅक्टिकल आणि अहिंसक उपाय सुचवावेसे वाटतात. 1. कबुतरांच्या घरटी करण्याच्या आणि दुपारच्या वेळी ‘टाइमपास’ करण्याच्या जागा बंद करणे. 2. दुपारच्या वेळी विश्रांती घ्यायच्या जागांवर उदाहरणार्थ - सदनिकांच्या सज्जांमध्ये वा-यावर फडफडणा-या, काळ्या रंगाच्या कपड्यांच्या गुढ्या उभारणे. (कबुतरे पाळून त्यांच्या लढती लावणारे ढाबळीवाले अशा गुढ्यांना ‘छापी’ म्हणतात.) 3. शिक्रा किंवा बहिरी ससाण्यासारख्या शिकारी पक्ष्यांचे आवाज ध्वनिमुद्रित करून ते कबुतरांचे दाट थवे आढळणा-या ठिकाणी मोठ्यांदा आणि वारंवार ऐकवणे.
यामुळे कबुतरे आपोआप कमी होतील. प्रयोगात्मक पातळीवर ही सेवा उपलब्ध करून देण्यास आमची ‘निसर्गवेध’ ही संस्था तयार आहे. 4. मुंबईतील कॉर्पोरेट जगातून निधी संकलन करून बहिरी ससाण्यांना प्रशिक्षण देणारे प्रशिक्षण आणि प्रत्यक्ष बहिरी ससाणे आयात करून त्यांच्या सेवेचा लाभ घेणे. या उपायांनी काही प्रमाणात कबुतरांचा त्रास कमी करता येणे शक्य आहे.

कबुतरांचा माला पण खुप त्रास झाला आहे. माझ्या सगळ्या लावलेल्या भाज्याचां नास केला तेव्हा पासुन खुप राग येतो , खारघर ला तर खुप प्रमाणात कबुतर आहेत, कुंड्यान मधे अंडी घालतात, त्यातच शी- सु करतात, पुदिना लावला होता तेव्हा त्या काड्या उपटुन बाजुच्या कुंडीत त्याच घरट तयार केल इतकी वाईट आहेत.

Pages