निसर्गाच्या गप्पा (भाग २०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2014 - 05:56

निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.

आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.

वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पावसामूळे किती येतील ते नाही ना सांगता येत ! मी जर इथे आलो नाही तर तू नावे जमव. मी आल्यावर फोन करतो. ( मी भारतात येऊन परत भारताबाहेर जाणार आहे. )

Sadhna jara time 5 chya aadhicha thevlas tar bare hoil.

जागू, मी येईन हवे तर आधी. तूला उशीर होणार असेल तर जा परत लवकर. पण हे सगळे ठरवायला मी नसेन. मी १८ ला सकाळी भारतात येणार आहे. तेव्हा तूम्ही ठरवा.

मला १९ वाशीपण चालेल, पण वेळ थोडी आधीची ठेवली तरच. मला ७ किंवा ७-३० पर्यंत परत अंबरनाथला पोहोचायला हवे. एकतर मी ट्रेनने कधी वाशीला आले नाहीये अन त्यात पाऊस.......
दुपारची वेळ ठरवायची का????

दुपार असेल तर मलाही बरे पडेल पावसाळ्याचे दिवस असल्याने. मी हाफ डे टाकून येईन मग त्या दिवशी. साधना तू थोडी लवकर नाही का येऊ शकणार?
३ च्या नंतर भेटलो तरी चालेल ना?

सध्या सांगलीत आहे. परवा वहिनीच्या आजोळी जाण्याचा योग आला. कर्नाट्कातल्या बेळगावजवळ्च्या हलशी नावाच्या गावी.
तिथे नरसींहाचं एक अप्रतीम मंदिर आहे. तिथे वहिनीच्या आजोळ्चे लोक ...म्हणजे तिच्या आईचे मामा पुजारी आहेत.
त्यांचं घर, परिसर आणि ते मंदिर इतकं सुंदर आहे....सग्ळे फोटो आणि थोडी माहिती प्रचि विभागात टाकीन सावकाश.
सध्या इतकंच... मामांच्या घरातली विहीर. ही अगदी किचनच्या शेजारीच.

नरसिंहमंदिर्

हं.....मला दाट शंका होतीच....हे माबोवर पाहिल्याची. गुर्जींचंच काम का हे ????
ओक्के मग मंदिराचे फोटो कॅन्सल.(सूर्यापुढे काजवा इ.इ.)
तरी पुजार्‍यांच्या घराचे डकवीन सावकाश. गुर्जी बहुतेक तिकडे गेले नसावेत Proud

दिनेशदांनी ग्रिन सिग्नल दिला आहे उजू. आता साधना, जिप्सी, पलक यांचे प्रतिसाद आले की साधना ठरवेलच ठिकाण.

तरी पुजार्‍यांच्या घराचे डकवीन सावकाश. गुर्जी बहुतेक तिकडे गेले नसावेत

जास्त वेळ लावू नकोस फोटो टाकायला नाहीतर तोपर्यंत जिप्स्या जाऊन फोटो काढून येईल पुजार्‍यांच्या घराचे. Lol

सामी अग दिनेशदा मुंबईत पण येणार आहेत.

ह्या फुलांची वेल श्रावणीच्या शाळेच्या कुंपणाला आहे. इतकी भरभरून फुले आलेली असतात की अगदी काही डेकोरेशनच केले आहे फुलांचे कुंपणावर.

जास्त वेळ लावू नकोस फोटो टाकायला नाहीतर तोपर्यंत जिप्स्या जाऊन फोटो काढून येईल पुजार्‍यांच्या घराचे. >>>>>
जागू अगदी खरंय बाई!
श्रावणीचा वेल मस्तय. खरंच कुंपणावरद्डेकोरेशन वाटते!
शाळेत आसताना या फुलाचा दांडा काढून उरलेले फूल गोलाकार असं वहीत प्रेस करून वाळ्वायचो. मग वर थोडी कलाकुसर ़ करून मुलगी काढून तिच्या फ्रॉकचा हा घेर म्हणून वापर करायचा. लै भारी वाटायचं!

ag malaa chaalela tin vaajataa... tumhi laambun yenarya mandalini vel tharavaa. mi javal rahate, malaa chalel kuthalihi vel.

जागू, फुलाच्या पाकळ्या ओवरलॅपिंग आहेत का ग? रंग, आतला भाग आणि पुकेसर मस्त दिसतायत.

ओक्के मग मंदिराचे फोटो कॅन्सल.>>>>>नाही मानुषीताई. तुम्ही काढलेले फोटो प्लीज वेगळा धागा काढुन टाकाच. वेगवेगळ्या नजरेतुन मंदिर पहायला आवडेल. Happy
तरी पुजार्‍यांच्या घराचे डकवीन सावकाश. गुर्जी बहुतेक तिकडे गेले नसावेत>>>>:फिदी:

जास्त वेळ लावू नकोस फोटो टाकायला नाहीतर तोपर्यंत जिप्स्या जाऊन फोटो काढून येईल पुजार्‍यांच्या घराचे. >>>>>जागू :फिदी:. नाही जाणार. आता परवापासुन ९ दिवस बाहेर चाल्लोय भटकायला. उद्या बहुतेक जमणार नाही माबोवर फिरकायला. १९ तारखेला कुठेही आणि केंव्हाही गटग चालेल.

मनुषी ताई, काय मस्त फोटोस आहे आणि आसमंत ही....

जागु, ही नीळी / जांभळी फुलं पावसाळ्यात खुप दिसतात... गणेश वेला सारखे दिसतात पण पाने
अगदी वेगळी दिसतात नाही!

गौरम्मा ची बाग छानच! पदिना आणि मनी प्लांट खुप आवडला...

हे पिल्लु आज नेट वर सापडले... इथे शेयर करावेसे वाटले...parrot.jpg

८ तारखेला पुण्याला, संध्याकाळी सात वाजता, बालगंधर्व पुणे, बुकिंग विंडो
१८ तारखेला, संध्याकाळी सात वाजता, दादर ( शिवाजी पार्क, जिप्सी जवळ )
१९ तारखेला, ४ वाजता वाशीला, सेंटर वन, फुड कोर्ट

मी १० ते १७ भारतात नाही. त्यामूळे त्या फोनवर नसेन मी..( इमेल बघेन, पण खात्री नाही) प्लीज एकमेकांना कळवा !

दा, १९ ला दुपारी २ वाजता नाही का जमणार?
१८ ला पण जमेल मला दादरला, पण तेही दुपारी किंवा सकाळी. सध्या इशूच्या बाबाला उशीर होतोय ऑफिसहून यायला, सो मला संध्याकाळी फार वेळ नाही थांबता येणार.
दोन्ही तारखांपैकी कधीतरी दुपारी/सकाळी ठरवाल का? मी दादर , वाशी कोठेही येऊ शकेल.

धन्यवाद दिनेश दा. दादर ला कोण कोण येतय आणि वाशी ला कोण हे प्लीझ सांगा.

मानुषी ताई, मस्त पिक्स. जागू फूल मस्त आहे ग. रंग आणि पाकळ्या मस्त दिसत आहेत.

Pages