निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.
"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.
आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.
वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

खरंय शशांक, मला तू ते मेंदूत
खरंय शशांक, मला तू ते मेंदूत जंतू जातात वगैरे सांगितलेलं सगळं आठवलं. त्याला न घाबरवता त्या चाव्याची गंभीरता सांगितली. बिन्धास्त जाऊन इंजक्शन घेऊन या असं शेवटी सांगून पाठवून दिलं. मग अगदी लढाईवर निघाल्यासारखा गेला तो.
हे हे अश्विनी तुझ्याकडून
हे हे अश्विनी तुझ्याकडून घडलेला हा पहिलाच गुड जॉब नाही तर ह्या वेळचाही गुड जॉब.
जिप्स्या बुचाच्या फुलांच्या फोटो ने सुगंध दरवळला.
आकाशमोहोर नाव मस्तच.
जागू, जिप्सी मस्त
जागू, जिप्सी मस्त फोटो.
बुचाच्या फुलांचा आई सुरेख हार करायची, खरंच सुगंध दरवळला.
अश्विनी गुड वर्क. hats off.
आजकाल नवीन बांधल्या जाणार्या
आजकाल नवीन बांधल्या जाणार्या बिल्डिंग्ज ना उगीच इंग्लिश नावं देतात. त्यापेक्षा अशी फुलांची नावं द्यावीत ना. कुठेतरी नाल्याकाठी चाळ टाईप बिल्डिंग बांधतात आणि नाव काय तर म्हणे 'विंडसर', 'हार्मनी', 'रॉयल अमूक ढमूक'. काहीही. असो.
+ १०००
मी इंद्रप्रस्थ हे एका घराचे नाव वाचुन तुफान हसलेले.
नावाची पार लाजच घालवल्यासारखी वाटली.
"शिरीन, झालीस का तयार?" "आलेच
"शिरीन, झालीस का तयार?"
"आलेच मी प्रीतम, जस्ट वन मिनीट"
"चला आटपा लवकर. सगळे जमले असतील"
.
.
.
आठवतोय का दुनियादारी? आठवतच असेल म्हणा. मैत्रीचा उत्सव म्हणजे दुनियादारी.
आणि उत्सव साजरा करण्याचं ठिकाण म्हणजे एसपीचा कट्टा
ह्यावर्षी आपल्या मायबोलीकरांच्या मैत्रीच्या उत्सवालाही लाभलाय असाच एक एसपीचा कट्टा
मग येताय ना आपल्या मैत्रीचा उत्सव साजरा करायला? आम्ही वाट बघतोय.
कसं यायचं म्हणताय?
मग वाचा की इथे पूर्ण आणि आत्तापासूनच लागा यायच्या तयारीला.
रेबीज वर हल्ली बर्यापैकी
रेबीज वर हल्ली बर्यापैकी जागृती आहे. तो माणूस बहुतेक इंजेक्शनला घाबरला असेल. खुप दुखतं ना ते ! ( मला विचारा
)
रेबीज वर हल्ली बर्यापैकी
रेबीज वर हल्ली बर्यापैकी जागृती आहे. तो माणूस बहुतेक इंजेक्शनला घाबरला असेल. खुप दुखतं ना ते ! ( मला विचारा ) >>>>> ती पोटावर घ्यायची इंजेक्शने केव्हाच इतिहासजमा झालीएत - आता सगळी सेल कल्चर बेस्ड रेबीज व्हॅक्सीन्स आलीएत - ही दंडावर घ्यायची असतात - अज्जिबात दुखत नाहीत ...
ओ संयोजक, या धाग्यावर कुठे
ओ संयोजक, या धाग्यावर कुठे जाहिरात करताय?
हा वाहता धागा नै!
काल मी सारसबागेत चाललेले बसने तेंव्हा बसस्टॉपवर उभी असताना एक कावळा दिसला. त्याच्या पंखाना इजा झाली असावी कारण तो उडत नव्हता आणि आ करून इकडे तिकडे भटकत होता
पाणी माझ्याकडे नव्हतं म्हणून इकडे तिकडे पाहिलं पण जवळपास पाणी दिसलं नाही. विकत आणावं असा विचार केला पण मग माझी बस आली आणि मी निघुन गेले
आणि मग लक्षच लागेना माझं. असं वाटलं मंदीरात येऊन काय उपयोग.. देव भेटल्यासारखं पहिल्यांना वाटलं नाही (खरचं
उगाच अलंकारिक वगैरे करायला नाही लिहितेय) 
परत गेले तरी तो कावळा तिथेच होता मग पटकन घरी गेले एका द्रोणात पाणी आणि वरण भात घेऊन आले आणि त्याला दिलं.
त्याने खाल्ला आणि मला बरं वातलं
पण इतकं वाईट वाटलं ना ... ४ तासात एकालाही नाही की त्याला पाणी द्यावं.
माणुसकी कुठे गेलीये?
रीया, भूतदया ठिक आहे पण
रीया, भूतदया ठिक आहे पण निसर्ग फार कठोर असतो. जखमी जीवांना तो जगू देत नाही. त्यांची काळजी घेणे त्याच्या जोडीदारालाही शक्य नसते. आणि त्यांना वियोगाचे दु:ख करत बसायला ना वेळ असतो ना स्मरणशक्ती.
शशांक...
हो दिनेशदा, पण किमान माझ्या
हो दिनेशदा, पण किमान माझ्या मनातून तरी ती अपराधी भावना पुसली गेली ना.
बास मला तेवढंच
जिप्सी : धन्यवाद... आता पाऊस
जिप्सी : धन्यवाद... आता पाऊस आला की येतीलच बुचाची फुलं. शाळेच्या गल्लीतून चक्कर मारणारे मुद्दाम. दाराशीच आहे आकाशमोहोर.
छान छान फुलं आहेत..
छान छान फुलं आहेत.. इंटरेस्टिंग गप्पा आहेत, सातत्याने नवीन माहिती मिळतच असते, झालं तर थट्टामस्करी करायला हक्काचे बकरे ( कि बकरा??
) ही आहेत .. पॉवरपॅक्ड नि ग पे सबकुछ मिलता है.. 
रियु.. सो क्यूट !!!
अश्वे गुड जॉब!!!
बुचाच्या झाडाचे आकाशमोगरा हे
बुचाच्या झाडाचे आकाशमोगरा हे नावही ऐकले आहे.
मला वाटतं प्राण्यांच्या
मला वाटतं प्राण्यांच्या स्मृतीमधे कसलेतरी कंडिशनींग होत असावे. अनेकदा कुत्री काही विशिष्ठ रंगाच्या गाड्यांवर राग काढत असतात.. कदाचित त्या रंगाच्या गाडीने त्यांना किंवा त्यांच्या मित्रमैत्रिणीला धक्का मारला असावा.
सायन रेल्वे स्टेशनच्या ४ नंबर प्लॅटफॉर्मवर एक कुत्रा असे.. आणि त्याला त्या लाईनवरून जाणारे सुटे इंजिन
अजिबात खपत नसे. इंजिनाबरोबर तो भुंकत धावत असे. आव तर असा असायचा कि त्यानेच त्या इंजिनाला पळवून लावले.
मला वाटतं प्राण्यांच्या
मला वाटतं प्राण्यांच्या स्मृतीमधे कसलेतरी कंडिशनींग होत असावे. अनेकदा कुत्री काही विशिष्ठ रंगाच्या गाड्यांवर राग काढत असतात.. कदाचित त्या रंगाच्या गाडीने त्यांना किंवा त्यांच्या मित्रमैत्रिणीला धक्का मारला असावा.
>>>
+111
सहमत!
मागे एकदा हायवेवर एक कुत्रं मरुन पडलेलं... कोणाच्या तरी गाडी खाली आलं असावं आणि बाजुला त्याचा पार्टनर किंवा कोणीतरी पण दुसरं कुत्रं होतं.... ते कोणालाही त्या कुत्र्याच्या आसपास फिरकू देत नव्हतं. जी गाडी येईल तिच्या पाठीमागे भुंकत भुंकत पळायचं अगदी लांबपर्यंत.... मग पुन्हा त्या मेलेल्या कुत्र्यापाशी यायचं आणि भुंकत बसायचं.... पुन्हा गाडी आली की तिच्या मागे पळायचं....
कित्ती तरी तास हे चालू होतं.....कारण मी ऑफिसमध्ये ही घटना सांगत होते तेंव्हा माझ्या नंतर ३ तासाने आलेल्या मित्राने देखील सांगितलं की अजुनही ते कुत्रं तिथेच होतं आणि असचं करत होतं..... दुपारी परत घरी जाताना सेम रस्त्याने गेले तेंव्हा तिथे मेलेलं कुत्रं दिसलं नाही पण ते भुंकणारं कुत्रं मात्र तरीही तिथे भुंकत भुंकत भटकत होतं
नारंगीच्या पोटात मोसंबी !
नारंगीच्या पोटात मोसंबी !
नारंगीच्या पोटात मोसंबी
नारंगीच्या पोटात मोसंबी !
>>>>
OMG!
ऐसन कैसन?
मलाही नाही कळलं... चव मात्र
मलाही नाही कळलं... चव मात्र संत्र्याचीच होती !
नारंगी म्हनजेच संत्रं
नारंगी म्हनजेच संत्रं का?
मोसंबी इज डिफरंट! मला संत्र्यापेक्षा मोसंबीच आवडते
मोसंबीच आवडते>>>>>>> रीया
मोसंबीच आवडते>>>>>>> रीया मोसंबी आवडते?
हो ते पण ताजी ताजी
हो ते पण ताजी ताजी
हो ते पण ताजी ताजी>>>>>>नशिब
हो ते पण ताजी ताजी>>>>>>नशिब पहिल्या धारेची नाही लिहिलंस ते.
मी ते जुलवायचा प्रयत्न करत
मी ते जुलवायचा प्रयत्न करत होते पण नाही जुळलं
नंतर लिहिणार होते पहिल्या धारेचं ज्युस वगैरे पण म्हणलं जौद्या झालं
जिप्सी,
जिप्सी,
(No subject)
आपण ज्याला संत्रे म्हणतो (
आपण ज्याला संत्रे म्हणतो ( पाकळ्यांचे ) त्याला इथे टँगरीन म्हणतात. मोसंबीचे रुप पण संत्र्याची चव ते ऑरेंज.
) त्याची साल वरच्यावर सोलून ( पोटॅटो पीलरने पोटॅटो सोलतो तशी ) वरची चकती कापून थेट तोंडातच पिळून खातात. पाण्यापेक्षा स्वस्त आहेत तिथे ती.
आपल्याकडची मोसंबी भारताबाहेर मी फक्त नायजेरियात पाहिली. तिथे ती भरपूर प्रमाणात पिकतात आणि
स्वस्तही आहेत ( तिथे त्यांना ऑरेंज म्हणतात
जिप्सी, बुचाच्या फुलांनी
जिप्सी, बुचाच्या फुलांनी बालपणीच्या आठवणी जागवल्या.
छान छान फुलं आहेत.. इंटरेस्टिंग गप्पा आहेत, सातत्याने नवीन माहिती मिळतच असते>> +१
दिनेशदादा, मुंबईला तुझ्यासाठी फ्रीजमधे खास काहीतरी ठेऊन आलोय आम्ही.
माझ्या बागेतला हा खाऊ खास तुमच्यासाठी
गेल्या रविवारी आमच्या
गेल्या रविवारी आमच्या ऑफिसच्या आवारात "सिव्हेट कॅट" नामक प्राणी मिळाला - त्याला नीट पकडून कात्रज बागेत पाठवलाय ...
पिंजर्यात असल्याने हा प्राणी कसा दिसतो हे नीट कळत नाहीये व मला प्रत्यक्ष पहाता आला नाही - गुगल्यावर अनेक चित्रे दिसताहेत ...
असा असावा हा प्राणी (सिव्हेट
असा असावा हा प्राणी (सिव्हेट कॅट) .... (फोटो आंतरजालावरुन साभार ....)
वॉव नारंगी च्या पोटात
वॉव नारंगी च्या पोटात मोसंबी.. किती गोड!!!
मलाही संत्री, मोसंबी अशी सायट्रस फळ खूप्प आवडतात..
जिप्स्या
नलिनी खूप सुंदर फळं आहेत.. मराठी नाव काये?
Pages