निसर्गाच्या गप्पा (भाग २०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2014 - 05:56

निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.

आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.

वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गौराम्मा, तुमच्या फोटोंचा साईज जास्त असावा. exceeding the maximum file size of 153.6 KB असा मेसेज मिळतो का तुम्हाला?

रोजमेरी

rosemary.jpg

हे कसले फुल आहे? -
उत्तर - स्पायडर लिली मधले Crinum augustum जातीचे फुल आहे. Happy
( पुरंदरे शशांक उत्तराबद्दल थँक्यु )

हे कंद आज्जीने अनेक वर्षापूर्वी गावात लावले असावेत. पाऊस पडला की आपोआप कोंब फुटतात आणि मग अशा कळ्या / फुले येतात. त्यातला एक कंद मी घरी आणुन कुंडीत लावला आहे. अगदी मंद सुवास आहे. पण या फुलांचे नाव माहीत नाही.

flr_IMG_20140702_105043.jpg

कळी आणि पानांचा फोटो. या दिसणार्‍या एका कळीमधे खरंतर अनेक कळ्या आहेत. कळीचा देठ अतिशय मोठा झालाय आणि कळा एकेक दोन दोन करुन फुलताहेत
flr_IMG_20140623_092441.jpg

फुल सुंदर आहे.
गोव्यात बांबोलिम बीचवर अशी फुले बघितली होती. पण त्यांच्या पाकळ्या जरा रुंद होत्या. तिथे समुद्राला जो ओहोळ येऊन मिळतो त्याच्या काठाने फुलतात. केनी नावाचे एक रोप असते, पण ती फुलेपण यापेक्षा लहान असतात.

अरे वा! शशांक, थँक्यु.
स्पायडर लिली मधले Crinum augustum जातीचे फुल आहे. Happy

ही स्पायडर लिली हारांमध्ये वापरतात. मुंबईत अग्दी रस्त्याच्या कडेलाही चुकुन उगवलेली दिसते. नेरुळला डिमार्टच्या आधी एक गार्डन आहे तिथे याचे खुपच मोठे बन आहे.

सावली, धन्स गं, स्पायडर लिलीमध्ये खुप प्रकार आहेत. नेमके नाव कुथे कोणाला माहित.

साधना, हारांमधे वापरतात ती थोडी वेगळी दिसते. इथे आहे तशी.

अगं मला नाही. शशांक यांना धन्यवाद दे. त्यांनी नाव सांगितल्यावर शोधलं मी गुगल वर. तिथे तीन प्रकार सापडले.
ही Crinum
हारात वापरतात ती Hymenocallis
आणि लाल तुरे Lycoris (plant)

ही स्पायडर लिली हारांमध्ये वापरतात. >>>> ही हारात वापरतात ती स्पायडर लिलीच आहे पण ती hymenocallis या जीनसची - ही जास्त सुगंधी असते... Happy

ओहओ.. मला चटकन ती हारवालीच वाटली. आता परत पाहिल्यावर फरक कळला.

हारवाल्यांमध्ये पण परत दोन प्रकार आहेत काय?? एकात ते मधले जोडकाम नसते (बदकाच्या पायासारखे) आणि एक hymenocallis च्या फोटोत दिसते ते जोडकामवाले असे काही आहे का? मला बिन जोडकामाच्या लिली पाहिल्याचे आठवतेय पण कदाचित ते जोडकाम खुप लहान असेल, फुलाच्या मुळापाशी आणि त्यामुळे मला आठवत नसेल.

जिप्स्या तुझे ते संयोजकवाले डायलाग आठवुन मला परत परत हसायला येतेय रे... तु संयोजक आहेस हे मला माहितच नव्हते. आता पुढच्या वेळेस मला आधीच सावधगिरीचा इशारा देऊन ठेव...

माझी बाग

desert rose / अडेनियम
desert rose_web small.jpgdesert rose5_web small.jpg

बाळ अडेनियम
desert rose4_web small.jpg

वाढदिवस गिफ्ट (नवर्याकडून) अडेनियम
desert rose3_web small.jpg

पुदिना
pudina3_web small.jpg

सदाफुली
sadafuli_web small.jpg

मनीप्लांट
money plant_web small.jpg

हेलीकोनिया
heliconia_web small.jpgheliconia2_web small.jpg

साधना, माहित नाही. बहुधा हेच एक पाहिलेले आहे.
गौरम्मा, छान आहेत फुलझाडं. सदाफुली छाटलं तरी चालेल. छाटून वरची फांदी पुन्हा खोवली तर बहुधा त्याला मुळही फुटतात.

दिनेश विश्वास सगळ्यांवरच् आहे रे.. पण पार्सल कोण पाठवेल याचा विश्वास नाही... जागु भेटणार असली तर तिला दे.. उसका पार्सल मेरेपर उधार है Wink Lol हो ना गं जागुले??

साधना.. हीही.. तुझ्याकडे सेफ राहील अगदी खात्रीये..

नलिनी सुंर्रेख आहे रोजमेरी... पहिल्यांदाच पाहिली इतकी जवळून..
सावली, स्पायडर लिली ची बहीण फार् गोड दिसतीये..
गौराम्मा.. कसली गोड बाग आहे तुझी.. वाह!!! सुंदर दिसत असणार तुझी बाल्कनी..

जिप्स्या थांकु थांकु... Happy

गौराम्मा, छान आहे तुमची बाग. परीसर पण हिरवगार आहे.
सायली, तुझ्याकडची स्पायडर लिली पण छान आहे. आमच्याकडे पुर्वी ती हारात वापरतात ती hymenocallis होती.
माझ्या बागेत सध्या रोजमेरी, थाईम, पुदीना आहे.
घरापासून जवळच जंगल आहे त्यात सध्या आकाराने अतिशय लहान पण चवीला अप्रतिम अशा जंगली स्ट्रॉबेरी खायला मिळतात. लवकरच ब्लू बेरी पिकतील मग चेरी, प्लम, पेअर आणि सफरचंद. घराच्या जवळपास असल्याने ही फळ पण मुबलक खायला मिळतात.

साधना, वाशीतले एखादे ठिकाण सांग.. १९ तारखेला किती वाजता जमेल तेही सांग. ( सगळ्यांना विचारून )

गेल्या वेळी भेटलो तिथेच भेटता येईल. मला संध्याकाळ ५ नंतर वाशीत कुठेही चालेल. तेव्हा पाउस असेल त्यामुळे आत बसलेलेच बरे. नेरुळचे वंडर्स पार्कही छान आहे पण नमुबाहेरच्या लोकांना अजुन आत यावे लागेल. तेव्हा उगीच नको..

कोणाकोणला सोईचे होईल ती मंडळी इथे लिहितीलच. त्याप्रमाणे करुया मॅनेज.

वर्षू, मी अगदी प्रेमाने संभाळेन तुझे पार्सल (काश मी त्यातले काही चाखु शकले असते) .. तु मात्र पनामा मधले फोटो आण येताना. तुला हॅप्पी जर्नी आणि हप्पी स्टे... Happy एन्जोय.

जर संध्याकाळचा बराच वेळ एकत्र घालवायचा असेल तर विल्लेज मध्ये बुकिंग करावे का? पण मग किती जण ते ठरले पाहिजे आधी. आणि कोणाला किती वेळ जमेल तेही.

तसे जर होत नसेल आणि तरीही जेवायचेच असेल तर मग इनॉरबिटमध्ये भगत ताराचंद बरेय.

धन्यवाद सावली, वर्षू नील, मोनालिप ....

"छाटून वरची फांदी पुन्हा खोवली तर बहुधा त्याला मुळही फुटतात"- ओके..

सदाफुलीला शेंगा लागल्यात ... त्यातच लेकाने कारल्याच्या बीया लावलेल्या... त्याची ही दोन रोप आलीयेत..

मनीप्लांट चा पॉट .. मला होमटाऊन मध्ये गो ग्रीन नर्सरीत मिळाला.

आता गुलाब आणि पावसाळी लीली फुलली की फोटो डकवते...

Pages