निसर्गाच्या गप्पा (भाग २०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2014 - 05:56

निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.

आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.

वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जिप्स्या आठवले आठवले..>>>>>भगवान के घर देर है अंधेर नही Proud

भगवान को अंधेरा दुर करनेके लिये ट्युबलाईट मिला है, उस वजहसे भाविकोंको अंधेरा जरुरत से ज्यादा देरतक सेहना पडता है....

तर मग तु पण काहीतरी नक्की आणच.. मी खाईन काळजी नसावी.
साधनाताई Proud

तुम्ही म्हणजे तु, सामी, उजु, दिनेशदा इ. इ. >> मग ठिकेय मला १८ लाच बर पडेल ठरवु कस काय ते.
तु हि.प्र. प्रवासासाठी शुभेच्छा हॅप्पी सफर ,
जाताना कॅमेरा रोल घेऊन जा,
येताना प्रत्येकी ५ किलो सफरचंद घेऊन ये Happy

जिप्सी, हॅप्पी जर्नि !
मी ८ तारखेला नक्की थोडा वेळ येऊन जाईन !
वरील सर्व फोटो खूप छान !
मला वाटते बालगंधर्व रंगमंदीर सुद्धा नि.ग्.च्या गटग ची जुलैमधे नक्की वाट पहात असणार. त्याची रोजनिशी पाहिली तर आपल्या गटगची नक्की नोंद असेल. Proud

जिप्स्या, तू पण यायचेस...१८/१९ ला... तुला शुभेच्छा म्हणजे हॅप्पी फोटोग्राफी अश्याच द्यायच्या.. !

प्रज्ञा, अन्जू, दिनेशदा धन्यवाद Happy

जिप्स्या, तू पण यायचेस...१८/१९ ला>>>>दिनेशदा, माझा शिफ्ट टायमिंग १२:३० ते ९:३० (युरोप टाईम) असल्याने १८ तारखेच जमवायला जरा कठिण आहे Sad पण १९ ला नक्की. Happy

आजच्या सकाळच्या पुरवणी मध्ये बुचाच्या झाडाला आकाशनिंब म्हटले आहे.

पावसाळ्यात उगवणार्‍या लिलीला नागदमणी

एक्झोरा ला रुक्मिणी.

अशी मराठी नावे किती छान वाटतात Happy

ही एक लिंक पहा.
http://www.misalpav.com/node/28219

जागू, अगं तू भाजीच्या बिया पेरल्यास ना ?
जरा डीटेल मंदी लिही बरं !
वेल चढवायला मांडव घातला असलास तर फोटो डकव.
मांडव कसा घालतात ते पण लिही.

आकाशमोगरा नाव मस्त आहे सायली.

जागु खरंच भाजीच्या मांडवाबद्दल लिही, आमच्याकडे गावाला पण खळ्यात (अंगणात) मांड्व घालून विविध भाज्या लावतात पडवळ, काकडी, चवळी,घोसाळी, शिराळी, तोंडली इ. भाज्या लावतात. छान वाटतं बघायला.

कामिनी रातराणीला संध्याकाळी सुगंध येतो तो रात्रभर दरवळतो पण सकाळी आजिबात येत नाही.

आकाशमोगरा पण खुप सुंदर नाव आहे.

अवनी अग आत्ता बिया रुजून कोंब आले आहेत. अजून मांडव घालायचा बाकी आहे. आमचा गडी बरेच दिवस आला नाहिये. तो आला की मांडव घालेल मग मी फोटो टाकेन इथे.

कढिपत्त्याच्या झाडावर पांढरी किड लागलीय. पानांची वाढ खुंटली आहे. ह्यावर काय उपाय करायचा. प्लीज उपाय सुचवा. किटकनाशक नको आहे.
kadipatta tree.jpeg

केशर,
ह्या किडीला बहुदा 'मावा' म्हणतात.पूर्णपणे झाड कापा नाहीतर इतर झाडांवर मावा पडेल.झाड कापल्यानंतर नवीन
फूट येईलच.

केशर, साध्या पाण्याच्या फवार्‍याने किड निघून जातील काय? कडूनिंबाच्या पाण्याचा फवारा ही वापरता येईल.

मावा म्हणजे हिरव्या रंगाचे किडे असतात. पाने चिकट आणि काळी होतात मावा पडला तर.
आभाळ भरून आले की झाडावर मावा पडण्याची शक्यता असते. पांढरा मावा असा प्रकार असू शकेल कदाचित.

आज लेकासोबत जंगलात फिरायला गेले होते. दोघांनी मिळून जंगली स्ट्रॉबेरी तोडल्या. वाटेत एक छोटा सळसळणारा मित्र भेटला. सकाळी लवकर किंवा संध्याकाळच्या वेळी जरा उशीराने बाहेर पडले की हरीण, ससे (हेअर), हेजहॉग भेटतात.

strawberry_0.jpg

Pages