निसर्गाच्या गप्पा (भाग २०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2014 - 05:56

निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.

आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.

वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुप्रभात... व्वा छान गप्पा, फोटोज... मस्त चालय ...
नलिनी त्या तुती आहेत का? तो.पा.सु..
दिनेश दा, काय चमत्कार ना?
सिव्हेट कॅट पहिल्यांदाच बघते आहे...

नलिनी मस्त फळे. कोणती आहेत?
शशांकजी कॅट मध्ये मांजर,कुत्र, मांजर मिक्स वाटत आहे.
परवा एका प्रदर्शनातून मी मारुती चित्तमपल्लींची रानवाटा आणि रातवा पुस्तके घेतली.

रीया गुड जॉब. अश्वे _____/\____
बुचाची फुले Happy मस्त.
नलिनी तोंपासु, रच्याकने आम्ही पण अस्तो मुंबईत Wink

माझ्या बागेतला हा खाऊ खास तुमच्यासाठी
>>>
नलिनीतै, काय आहे ते? मी पहिल्यांदाच पाहिलं ते.... तुती असेल तर मला ३-४ मुठ भरुन दे Proud

शशांकदादा डेंजर असतो का तो प्राणी? Uhoh

दिनेशदा, पुण्यात कधी येणारेत? मला पण भेटायचं त्यांना Sad

जिप्सी, बुचाची फुल मस्त. नलिनी, खरचं कय नाव आहे ह्या फळांचं ?
गप्पा नेहमीप्रमाणे इंटरेस्टिंग. मजा येते वाचायला.

सिव्हेट कॅट>>> हायब्रीड वाटतेय दिसायला. कुठे सापडली? >>>> हायब्रिड नाहीये हा प्राणी. नैसर्गिकच आहे -आपण कधी पाहिला नाहीये म्हणून जरा वेगळा वाटतोय इतकेच..
Viverra किंवा Viverricula या जिनसचा असावा .. (अधिक माहितीकरता या नावाने गुगलून पहा .... ) Happy

रिया - तुला सगळे प्राणी डेंजर का वाटतात ?? Happy सगळे बिचारे निसर्ग नियम पाळून रहात असतात (अपवाद - माणूस - माणूस काय वाट्टेल ते करेल - कधी अ‍ॅटमबाँब सारखे अत्यंत विचित्र शस्त्र निर्माण करेल तर कधी काय करेल हे निसर्गही सांगू शकणार नाही ... माणूस सगळ्यात डेंजरस आहे... )

नमस्कार,...........
हा धागा मला खूप आवडला... पाककलेतिल पदार्थ तर अप्रतीमच आहेत .... निसर्गाची माहिती मिळाली जी कधीच माहिती नव्हती . सगळ्याचे प्रतिसाद वाचुन आनद झाला आणि मजा सुद्धा आली... सायली ताईचा लेख फार आवडला....

सायली ताई वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा............

नलिनीच्या बागेतली ती रास्पबेरीज आहेत.

शशांक जिथे राहतात त्याच्या जवळच एक लहानसे जंगल आहे. जंगलात कोण कोण राहते त्याची मुन्सिपाल्टी कुठे नोंद ठेवतेय?? त्यामुळे ते जंगलातले लोक शहरविहार करायला बाहेर पडले की आपण लगेच त्यांना पकडुन पिंज-यात घालतो. जरा विचार करा, आपण वनविहार करायला गेलो आणि दोनचार वाघांनी आपल्याला पकडुन त्यांच्या मुलांचे मनोरंजन व्हावे म्हणुन पिंज-यात ठेवले तर आपण कित्ती बोंबाबोंब करु.....

परवा मी दुपारी गाडी घेऊन जात होते तेव्हा मला एक पुर्ण वाढलेले मुंगुस आडवे गेले Happy यावरुन निष्कर्ष हा की आपण कितीही हुसकावुन दिले तरी या मंडळींना जायला जागाच नसल्याने ते मिळतील त्या झाडीत गुपचुप दडी मारुन राहतात.

रिया, आमच्या इथेही एका कुत्रीने तिचे मेलेले पिल्लु समोर ठेऊन् दोन्-तिन दिवस दु:ख केलेले. एकाच जागी बसुन होती बिचारी. बहुतेक मी इथे लिहिलेले. तिला १५ पिल्ले होती तरी त्यातले एक गेल्याचे प्रचंड दु:ख .... Sad असतात त्यांनाही भावना. आपण आपले डोके लावुन एकेक अर्थ काढत बसतो. आपल्या डोक्याबाहेर प्रचंड मोठा निसर्ग आहे ज्याची फार थोडी रहस्ये आपल्याला कळालीत.

परवा मी दुपारी गाडी घेऊन जात होते तेव्हा मला एक पुर्ण वाढलेले मुंगुस आडवे गेले यावरुन निष्कर्ष हा की आपण कितीही हुसकावुन दिले तरी या मंडळींना जायला जागाच नसल्याने ते मिळतील त्या झाडीत गुपचुप दडी मारुन राहतात. >>> aamachya Society madhe khup aahet. agadi sahaj yeta jata distat.

मी ८ जुलैला संध्याकाळी पुण्यात असेन. साधारण ७ वाजता पोहोचेन. नेहमीप्रमाणे बालगंधर्वाच्या तिकिट विंडो
जवळ भेटू. माझ्याकडे तो **** २९३७ नंबर असेल. प्लीज एकमेकांना सांगा ! मला पण भेटायचे आहेच सर्वांना.

रेणुका, थ्यांक्स! Happy

रेणुका, हा धागा निसर्गाच्या गप्पांचा आहे, पाकक्रुती चा धागा आहारशास्त्रात आहे...
मला वाटत तुला एकंदर मायबोली बद्द्ल च बोलायचे आहे....

८ जुलैला मंगळवार आहे Angry
माझा उपवास Sad

वर्किंग डे असल्याने यायला उशीर होईल पण मी येईन Happy

माझ्यापर्यंत संयोजकांनी पोहचा प्लिज Happy

शशांकदादा, माहीत नाहीका पण मला सगळ्याच प्राणी, पक्षांची भितीवाटते Sad आणी प्राणी, पक्षी निरिक्षण किंवा हे असं झू/अभयारण्य मध्ये जाऊन बघणं आवडत नाही..... का असावं असं कुणास ठाऊक.

पण हेच मी झाडं, फळं, फुलं यांमध्ये रमते Happy

साधना, यू ऑल्वेज सेज एव्हरीथिंग करेक्ट जानेमन!

gulab.jpg

नलिनीच्या बागेतली ती रास्पबेरीज आहेत.>> अगदी बरोबर.
धन्यवाद साधना .

दिनेशदादा, ह्या भारतभेटीत सर्वांना सांगून ठेवशील की पुढच्या वर्षी जुलै महिन्यात मला भारतात येता येणार नाही ते. Happy

अगं पण तूम्हीच आफ्रिकेतले सिंह बघायला येणार आहात ना ? मी सांगून ठेवलंय सिंहांना Happy वाघोबा येणार आहे म्हणून.

१८ ला आहे मुंबईत. १९ ला रात्री मी परत जाणार आहे. सांगा कुठला दिवस तो. १९ ला रात्री पार्ल्यातही शक्य आहे.

दिनेश दा, पुण्यात येताय.. शीट:(... थोडक्यात चुकामुक होईल आपली... मी गेला आठवडा भर होते पुण्यात..

नलिनी, काय सही रास्सबेरीज आहेत तुमच्या बागेतल्या... लकी आहात बुवा तुम्ही..:)

रीया, रात्री उपास सोडायचा असेल ना ? आणि तशीही चॉकलेट्स उपवासाला चालतात !
>>
yesssssssssssss! Happy

mazyashi koni tari sampark sadha pleaseeeeeeeeeeeee

नमस्कार निसर्ग मंडळी , एक मदत हवी होती , घराभोवती बागेत लावण्यासाठी सदाहरीत , छोटी ,उगाचच न पसरणारी झाडं /फुलझाडं , वेली सुचवाल का ?

बाजिंदा कुठे राहता ?
नुसती फुलझाडे लावण्यापेक्षा मी नेहमी हर्ब्ज वगैरे लावण्याचा सल्ला देत असतो. भाज्याही लावाच.

तशी झेंडू, गुलबक्षी, सदाफुली विनातक्रार वाढणारी झाडे आहेत.
तुळस, बेसिल, पुदीना, गवती चहा, मिरच्या, आले, हळद पण जरूर लावा. कडेने टोमॅटोही लावता येईल.

मुळा, मोहरी, अळशी, कारळे, गाजर यांना शोभिवंत फुलेही येतात.

Pages