निसर्गाच्या गप्पा (भाग २०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2014 - 05:56

निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.

आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.

वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अश्विनी नाही, ते पोपटाचे पिल्लु आहे...

सामी, नि.ग. मुळे आळुच्या मोहात पडलीस ना! Happy असच होतं... दिवस भर नि.ग. वर
सगळ्यांशी गप्पा मारायच्या, मी तर घरी गेल्यावर पण मनातल्या मनात सगळ्यांशी बोलत असते Happy

काल वर्ष भराचं (साठवणीच) आंब्याच लोणचं घातलं! हेमा ताईंची खुप आठवण आली...

पुण्याहुन परत येतांना, गाडी मधे एक अनओळखी मध्यम वयीन ग्रुहस्थ होत... ते अंबोली बद्द्ल सांगत होते...
तेव्हा साधना ची आठवण झाली...:)

सामी, आम्ही या आळूच्या फोटोची वाट बघत होतो. मऊच चांगले लागतात. थोडाफार उग्र वास असतो. ( साधारण आक्रोडासारखा ) पण छान लागतात.

दादर, वाशीचे तूम्ही ठरवा... आणि मला मेल करा.
मानुषीला पुण्याला यायला जमेल का ?

शोभा, प्रज्ञा, शांकली यांना शशांक प्लीज कळवणार का ? ( ८ तारखेला, संध्याकाळी ७ वाजता बालगंधर्व )
स_सा व सौ..., सई...सर्वांना.

शोभा, प्रज्ञा, शांकली यांना शशांक प्लीज कळवणार का ? ( ८ तारखेला, संध्याकाळी ७ वाजता बालगंधर्व )
स_सा व सौ..., सई...सर्वांना. >>>>> येस्स येस्स येस्स येस्स ... नक्कीच कळवेन ... Happy भेटूच आपण सारे ...

दिनेश
मी उद्या सांगलीहून पुण्यास प्रयाण. मग नगरास. पण मी ८ ता ला जमवण्याचा प्रयत्न नक्की करीन.
फक्त अजून सांगलीत असल्याने आत्ताच काही सांगता येत नाही.

सायली, तु लिहिलेलं अगदी सेम मला पण वाटत.
आज ट्रेन मध्ये सोनचाफा विकायला आला होता तर मला तुझी आठवण आली.

हेमा ताई :)...

मागच्या जन्मी आपण एकाच झाडाची फुलं असु किंवा एकाच झाडावर बसणारी पाखरं असली पाहिजे...
त्याशीवाय का असे सुंदर,अदभुत प्रकारे जोडले गेलोत.... Happy

सुप्रभात.

माझ्या नणंदेने मागील वर्षी हे केन सारखे दिसणारे छोटे रोपटे दिले होते. (नाव केनच ना? की मी गडबड करतेय?) ह्याचा रोज एक एक पाला खाल्याने मधुमेहाला नियंत्रण होते म्हणून तिला तिच्या ऑफीस कलिगने दिले होते. ते त्यांनी श्रीलंकेवरून आणले होते असे तिने सांगितले. मला वाटत होते की श्रीलंका कसल हे आपल्या रानात उगवणार केनचे झाड आहे. तरीपण ते आम्ही कुंडीत लावले. मी वाट पाहत होते फुल येण्याची. फुलाची बोंडे आली तेंव्हा पण मी उत्सुकतेने फुलाची वाट पाहू लागले आणि आता फुल आले की लगेच फोटो काढून नणंदेला वॉट्सअ‍ॅपवरून टाकते आणि सांगते की बघ आपल्याकडच जंगली झाड आहे हे Lol

पण त्याचे फुल उमलले आणि मला आनंद झाला की अरे वा हे वेगळेच झाड आहे. नाव शोधायच काम आता शशांकजींवर Lol

हा अलू प्रकार काय आहे? सायली लोणच्याची चव हवीये बर का! केनच फूल कोंबड्या सारंखं दिसतंय!

मंजू, अळू नावाचं एक फळ आहे, जे कर्जत, मुरबाड, रायगड वगैरे परीसरात होते आणि दादर, ठाणे, डोंबिवली इ. ठिकाणी वटपोर्णिमेच्या आसपास बाजारात मिळतं. त्याची चव वेगळीच असते अशी सांगता येणार नाही. मला विशेष खायला नाही आवडत.

दिनेशदा यांनी ते कोल्हापुर साईडला बघितलं होतं.

पण त्याचे फुल उमलले आणि मला आनंद झाला की अरे वा हे वेगळेच झाड आहे. नाव शोधायच काम आता शशांकजींवर >>>>> काय जागू, तुला वेगवेगळ्या झाडांची (रोपे, पाने, फुले, फळे, इ.ची) नावं माहित माहीत असे कधी झालंय का ??

हे रोप(विशेषतः पानांची रचना) पहाताक्षणी मला "पेवा" सारखे वाटले - पण मधुमेहावर हे वापरले जाते असे जेव्हा वाचले तेव्हा लक्षात आले की हे इन्सुलिन प्लांट आहे तर - Costus pictus हे याचे शास्त्रीय नाव
व याचे इन्सुलिनसारखे गुणधर्म या लेखात आहेत -
http://www.biospectrumasia.com/biospectrum/analysis/159396/a-leaf-day-di...

Costus speciosus म्हणजे कोशी. पण यालाच पेव म्हणतात का मग ???

http://www.maayboli.com/node/19304 या जागूच्या धाग्यावर पांढर्‍या फुलांचा जो फोटो आहे ते कोशी.

या पिवळ्या फुलांबद्दल मी लिहिले होते मागे. आपल्याकडे कमी दिसतात ती, त्या मानाने पांढर्‍या फुलाचे पेव, रस्त्याच्या कडेने खुप दिसतात... अगदी याच दिवसात !

या वर्षी तेरडा, वाघनखी, भारंगी पण उशीरा फुलेल ना ? श्रावणात तेरडा हवाच.

रमझानसारखे नको व्हायला श्रावणाचे. त्यांच्यामधे अधिक महिना नसल्याने, रमझानचा आणि हवामानाचा काही
संबंधच नाही. उन्हाळ्यात ( या वर्षी आलाय तसा ) रमझान आला तर गल्फ मधे कडक उन्हाळा, मोठा दिवस यामूळे उपास करणार्‍यांना खुप त्रास होतो... ( मी नेमका जातोय तिथे पण प्रवासी लोकांवर म्हणजेच एअरपोर्ट्वर खाण्यापिण्यावर बंधने नसतात. )

जागुचे रोपटे मीही पाहिलेय. इंसुलिन प्लांट आहे.

पेव पण असेच दिसते. पांढरी फुले असलेले.

हे आळू प्रकरण मला अजिबात माहित नाही. मी आईला दाखवले तर ती येळू का काय असेल असे म्हणाली पण तिला नक्की माहित नाही.

वाशीला मी, जागु आणि बहुतेक जिप्सी एवढे नक्की आहोत. तो लाहौल स्पितीवरुन परतेल तोपर्यंत. १९ तारिख शनिवार असल्याने मला दिवसभर जमण्यासारखेच आहे. तेव्हा बाकिच्यांनी विषेशतः पोरेबाळे असलेल्या मंडळींनी स्वतःची सोय पाहुन वेळ सांगा.

शशांकजी ते आपल्याकडच पेवच मी केन आठवत नसल्याने लिहीलय. आमच्याकडे भरपूर येतात पेव.

आणि त्या इन्सुलीन प्लांटची माहीती दिल्याबद्दल धन्स.

साधना ३ वाजता चालेल का? उजूला विचारायला हवे. आणि पलक पण येणार आहे.

अगं मला कधीही चालेल लिहिलंय ना मी. तुम्ही मंडळी दुरून येणार, घरी कच्चीबच्ची आहेत तेव्हा तुम्हाला कसे जमतेय ते पाहा. मी मोकळीढाकळीच आहे. ऐशुचा क्लास असला तर असेल पण तोही वाशीलाच आहे त्यामुळे तोही प्रॉब नाही.

वाशीला मी, जागु आणि बहुतेक जिप्सी एवढे नक्की आहोत. >>>>हो मला चालेल दुपारी किंवा कधीही.
रच्याकने आपण बाहेरच जेवणार आहोत, कि जेऊन यायचे कि जेवण बांधून घेऊन यायचे कि दिनेशदा जेवण करून सोबत आणणार आहेत?
लवकर कळवा उद्या सकाळपासुन १० दिवस ऑफलाईन असणार.

few more hours to go.....feeling excited Proud

वाशीला मी, जागु आणि बहुतेक जिप्सी एवढे नक्की आहोत. >>>> मला विसरलात का रे, शप्पथ मी कुठे जाऊ भ्याआआआआ....

रच्याकने आपण बाहेरच जेवणार आहोत, कि जेऊन यायचे कि जेवण बांधून घेऊन यायचे कि दिनेशदा जेवण करून सोबत आणणार आहेत?

मला काहीच फरक पडत नाही..

१. रच्याकने आपण बाहेरच जेवणार आहोत - चांगलेच आहे.

२. जेऊन यायचे - ठिक ठाक.... चालेल

३. जेवण बांधून घेऊन यायचे - मासे जागु आणेल, तु बाकीचे आण. मी मन लाऊन खाईन, एकही घास टाकणार नाही.. प्रॉम्म्मिस.. अगदी गळ्यावर हात ठेऊन

४. दिनेशदा जेवण करून सोबत आणणार आहेत - असे झाले तर सोन्याहुन पिवळे....

नितीन, तु नवी मुंबई टिममध्ये येतोयस?? स्वागत.. वरीलपैकी तिसरा पर्याय जर निवडला जात असेल तर मग तु पण काहीतरी नक्की आणच.. मी खाईन काळजी नसावी.

few more hours to go.....feeling excited
+
+

मी जळतेय, त्याच्यामुळे नो कोमेंट...

वरीलपैकी तिसरा पर्याय जर निवडला जात असेल तर मग तु पण काहीतरी नक्की आणच.>>>>>साधना, यावेळेस आपला टर्न आहे.पर्शियन दरबार विसरलीस का? Wink

पर्शियन दरबार???? मला आठवतोय आणि मी काहीतरी आणलेले हेही आठवतेय.. मग तु हे 'आपला' वगैरे अनेकवचन का वापरतोयस?? प्रथमपुरूषी एकवचनी शब्द चालेल तिथे.

(तुही तेव्हा काहीतरी आणलेलेस असे मला अंधुकसे आठवतेय.. पण ते बहुतेक होममेड नव्हते)

कंदी पेढे Lol

नितीन तुम्ही दादरला भेटणार आहात ना? >>> ओ जिप्सि भाऊ आदरार्थी लिहीताय का अनेकवचनी ?
जल्ला नको तीथे आदर दाखवु नको Proud

Pages