या आधीची उत्तर कर्नाटक भटकंती:
२. उत्तर कर्नाटक (१) — बेळगाव आणि परीसर
३. उत्तर कर्नाटक (२) — सौंदत्ती (यल्लमा देवी आणि हुळी मंदिर )
४. उत्तर कर्नाटक (३) — पारसगड (सौंदत्ती किल्ला)
===============================================
===============================================
कदंब राजवंशाच्या राजा रवि वर्मनची राजधानी "हलशी". बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यापासुन अंदाजे १४ किमी अंतरावर हलशी गाव आहे. येथील १२व्या शतकातील पुरातन नृसिंह-वराह हे एक देखणे मंदिर. या मंदिरात नृसिंह, वराह नारायण, सूर्य, विष्णु यांच्या पुरातन मूर्ती आहेत.
या मंदिराच्या आत दोन गर्भगृह एकमेकांसमोर असुन दोघांच्या मध्ये एक विशाल कासव आहे. एका गाभार्यात श्री विष्णुची बसलेली मूर्ती असुन त्याच्या समोरच्याच गाभार्यात भूवराह नारायणाची ११८६-८७ सालातील पुरातन आणि अतिशय देखणी मूर्ती आहे. सध्या पुरातत्व खात्याच्या अखत्यारीत असलेल्या कंदब स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुना असलेल्या या अतिशय सुंदर आणि पुरातन मंदिराला अवश्य भेट द्या.
प्रचि ०१
प्रचि ०२
प्रचि ०३
प्रचि ०४
प्रचि ०५
प्रचि ०६
प्रचि ०७
प्रचि ०८
प्रचि ०९
प्रचि १०
प्रचि ११
प्रचि १२
प्रचि १३
मुख्य मंदिरापासुन जवळच असलेले भग्नावस्थेतील एक पुरातन शिवमंदिर.
प्रचि १४
प्रचि १५
प्रचि १६
प्रचि १७
प्रचि १८(क्रमश:)
या देवतांची देवळे दुर्मिळच
या देवतांची देवळे दुर्मिळच आहेत. सुंदर फोटो.
व्वा!! हे पण फोटो
व्वा!! हे पण फोटो मस्तच!
प्रचि १२ व १६ मधली श्रीशंकराची पिंडी नेहेमीपेक्षा वेगळी आहे ... चैकोनी/आयताकृती वाटत्येय.... आधी बघितली नव्हती अशी. नेहमी गोलच बघितली आहे.
मस्त फोटो.
मस्त फोटो.
सर्व प्रचि - नेहेमीप्रमाणेच
सर्व प्रचि - नेहेमीप्रमाणेच अप्रतिम.
प्र चि ४,५,८,९ मधील मूर्ति काय सुंदर आहेत - किती नजाकतीचे कोरीव काम / शिल्प काम....... शब्द नाहीत वर्णन करायला....
व्वा रे.. सुंदर मंदिर. ७ आणी
व्वा रे..
सुंदर मंदिर.
७ आणी ११ आवडले...
लाजो ला अनुमोदन...
प्र चि ४,५,८,९ मधील मूर्ति
प्र चि ४,५,८,९ मधील मूर्ति काय सुंदर आहेत - किती नजाकतीचे कोरीव काम / शिल्प काम>>>अगदी अगदी
चैकोनी/आयताकृती वाटत्येय.... आधी बघितली नव्हती अशी.>>>>मीपण पहिल्यांदाच पाहिली.
छानच आहे रे..
छानच आहे रे..
मस्त आहे रे फोटो. अशा जुन्या
मस्त आहे रे फोटो. अशा जुन्या वास्तुंमध्ये गेलो की काहीतरी वेगळाच गुढ असा फिल येतो.
छान... वराह नारायण आणि विष्णु
छान... वराह नारायण आणि विष्णु यांच्या मुर्ती खुप आवडल्या...
निवडक १० त टाकणार होतो पण आपण माझे एकुलते एक मुंडके उडवले म्हणुन... (प्रचि २)
छान, सुंदर, मस्त,
छान, सुंदर, मस्त, अप्रतिम्....मझा शब्दकोश संपला राव...प्रत्येक वेळी नवा शब्द कुठे शोधणार यार... नेस्ट टाईम प्रतिसादात फक्त डॉट (.) देणार... भावना समजुन घे
हां.. मलाही साधना सारखंच
हां.. मलाही साधना सारखंच वाटलं.. या प्राचीन वास्तूंमधून हिंडताना नेहमी एकप्रकारचं रहस्यमयी वातावरण तयार होतं आसपास..
सुरेख मंदिर आणि फोटो. शांत
सुरेख मंदिर आणि फोटो.
शांत वातावरण असावे असे वाटते.
माझ्या मित्राचं आजोळ हलशीचं. त्याला मी तुझे आधीचे फोटो दाखवत असताना त्याने हलशीच्या नृसिंह-वराह मंदिराचा उल्लेख केला होता. आत्ता ही लिंकपण त्याला पाठवतो.
अप्रतिम. कदंबांचा गोव्याशी
अप्रतिम. कदंबांचा गोव्याशी जवळचा संबंध. म्हणजे या हलशी कदंबांची एक शाखा गोव्यात चंद्रपूर (चांदोर) इथून राज्य करत होती. या शैलीतली काही देवळे पोर्तुगीजांच्या विध्वंसातून वाचून अजून दिमाखाने उभी आहेत.
यातील एक म्हणजे तांबडी सुर्ला इथलं महादेव मंदिर. आणि खांडेपारचं सप्तकोटेश्वर. या देवळातही चौकोनी पिंडिका असलेलं शिवलिंग आहे.
हलशी इथे जायची खूप इच्छा आहे. त्याशिवाय 'आमचे गोंय' मालिका पूर्ण झाली असं वाटणार नाही. गोव्याहून अनमोडच्या घाटातून बेळगावकडे जाताना कुठून रस्ता आहे?
जिप्सी, मी ठरवलं होतं की
जिप्सी, मी ठरवलं होतं की तुझ्या ट्रीपचे सगळे फोटो बघितले की मग प्रतिसाद द्यायचा. पण छे: कस्चं काय! इतके सुंदर फोटो बघून शेवटी राहवलं नाही. काय अप्रतिम फोटो आहेत!! फारच सुंदर!
मंदिर अप्रतिम ...
मंदिर अप्रतिम ...
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे
प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार!!!!

अशा जुन्या वास्तुंमध्ये गेलो की काहीतरी वेगळाच गुढ असा फिल येतो.>>>>अगदी अगदी
निवडक १० त टाकणार होतो पण आपण माझे एकुलते एक मुंडके उडवले म्हणुन...>>>>हो ना, तुलाच पूर्ण उडवायला पाहिजे होतं फोटो अजुन चांगला आला असता
धन्स सागर
कदंबांचा गोव्याशी जवळचा संबंध. म्हणजे या हलशी कदंबांची एक शाखा गोव्यात चंद्रपूर (चांदोर) इथून राज्य करत होती.>>>>येस्स ज्योति, अगदी बरोबर. कंदंबाचा गोव्याशी जवळचा संबध हे वाचल होत :-).
गोव्याहून अनमोडच्या घाटातून बेळगावकडे जाताना कुठून रस्ता आहे?>>>>मला पण नक्की माहित नाही पण, गोव्याहुन बेळगावला रामनगर, लोंढा मार्गे येताना खानापुरच्या आधी (साधारण ९-१० किमी आधी) एक रस्ता कित्तुरला जातो. त्या फाट्यावरून जवळच हलशी गाव आहे. (somebody please correct me if i am wrong
)
शांकली
सह्हीच.
सह्हीच.
खानापूर-रामनगर रस्त्यावर
खानापूर-रामनगर रस्त्यावर खानापूरच्या साधारण १०-१२ किमी नंतर नंदगड गावाला जायचा फाटा आहे. खानापूरात नंदगडला जायचा रस्ता विचारायचा. खानापूरहून दर १ तासाला नंदगड-हलशीसाठी टेम्पोही मिळतात. स्वतःचे वाहन असेल, तर सरळ या गाड्यांच्या मागे जाणे हा उत्तम पर्याय! हलशीला जायला व्हाया नंदगड जावे लागते. नंदगड-हलशी अंतर जेमतेम ६-७ किमी आहे.
जिप्सी फोटो भन्नाट आले आहेत. इतक्या वेळेला हलशीला जाऊनसुद्धा एवढे बारकाईने कधीच फोटो काढले नाहीत. लहानपणी बर्याचदा जायचो हलशीला, पण त्यावेळी मंदिर आणि परिसर याचा एकच उपयोग माहित होता... क्रिकेट/लपाछपी खेळणे :).... नाही म्हणायला प्रचि २ मधल्या विहीरीचा वापर गणपती विसर्जनासाठी व्हायचा, हल्लीच हा परिसर पुरातत्व विभागाकडे गेलाय. त्यामुळे विहीरीत गणपती विसर्जनाला बंदी आहे.
नृसिंह मंदिरातील नृसिंहाची मूळ मूर्ती (ही मूर्ती प्रचि ५ च्या गाभार्यातच आहे) :-

नृसिंह आणि वराह या देवतांची मंदिरं मुळातच कमी असतील. वराह देवतेची इतकी सुंदर-सुबक मूर्ती (प्रचि ४) अजून कुठे पहाण्यातही नाही आली.
प्रचि ३ मधला रथ लाकडी आहे. हलशीमधे दर १२ वर्षांनी लक्ष्मीची जत्रा असते, तेव्हा हा वापरतात. वर उल्लेखलेल्या नंदगड गावातही असाच रथ आहे. पण तो प्रचि ३ मधल्या रथाच्या दुप्पट ते तिप्पट आकाराचा आहे.
अजून माहिती आठवेल तशी लिहिन
धन्यवाद मित, अधिक माहिती आणि
धन्यवाद मित, अधिक माहिती आणि नृसिंहाची मूळ मूर्ती प्रचिकरीता. याचकरीता मी तुमच्या प्रतिसादाची वाट पाहत होतो
नृसिंह आणि वराह या देवतांची मंदिरं मुळातच कमी असतील. वराह देवतेची इतकी सुंदर-सुबक मूर्ती (प्रचि ४) अजून कुठे पहाण्यातही नाही आली. >>>>>अनुमोदन
सगळेच आवडले. आता तुला माहीती
सगळेच आवडले.

आता तुला माहीती आहे की तुझी फोटोग्राफी उत्तम आहे आणि आम्हाला त्याचं अमाप कौतुक आहे ते.. तेव्हा समजून घे, शब्दांशिवायच.
पहिल्या लेखानंतर गायबलेला
पहिल्या लेखानंतर गायबलेला जिप्सी-टच पुन्हा प्रकट झाला. मस्तच.
'देऊळ' विषयावरच्या विजेत्या छायाचित्रकाराला साजेशी छायाचित्रे.
त्यातही ११ अणि १३ खासच.
विहीरीचा फोटो खूप आवडला.
विहीरीचा फोटो खूप आवडला.
मस्त फोटो
मस्त फोटो
मालिका मस्त चाललीये हे
मालिका मस्त चाललीये हे प्र.ची. सुंदरच नेहमीप्रमाणे माहिती पण उपयोगी , धन्यवाद
एक नंबर फोटोज...सगळ्याच
एक नंबर फोटोज...सगळ्याच मूर्त्या खल्लास आल्यात...
प्रचि ३ मधले काय आहे रे....प्रतिकृती आहे का
प्रचि ८ मध्ये फोकल कलर्स ऑप्शन वापरण्यापेक्षा तुला अजून एक पर्याय देतो
सुरेख! कदंबांची स्थापत्यशैली
सुरेख! कदंबांची स्थापत्यशैली छानच आहे. ज्योति कामत म्हणतात त्याप्रमाणे मलाही तांबडीसुर्लातलं महादेवाचं देऊळ आठवलं. ही देऊळं तर एकमेकांची कार्बन कॉपी वाटावीत इतकी सारखी आहेत. फक्त तांबडीसुर्लाचं देऊळ काळ्या कातळात बेसॉल्टात बांधलेलं आहे इतकाच काय तो फरक!
सुंदर मालिका. मजा येते आहे.
जिप्सी हा पण लेख सुंदर!
जिप्सी हा पण लेख सुंदर!
अप्रतिम.
अप्रतिम.
मस्त प्रचि आहेत... माहिती हि
मस्त प्रचि आहेत...
माहिती हि छान.बाकि बेळगाव च नाव आल इथ कि भारि आनंद होतो....माहेर आहे शेवटी
जिप्सि छन प्रचि.मी अगदी
जिप्सि छन प्रचि.मी अगदी लहानपणी पाहिलय हल्शि.इतक्यांदा खानापुरला जाउन हल्शि पाहिल नाहि याची खंत वाटली.".बाकि बेळगाव च नाव आल इथ कि भारि आनंद होतो....माहेर आहे शेवटी + १ गोपिका.माझही माहेर खानापुर.बेळ्गाव नंदगड हल्शि गावाची नाव वाचुनही छान वाटल.हल्शि बसनी बेळगावहुन खानापुरला अनेकवेळा आलिय.
Pages