निसर्गाच्या गप्पा (भाग २०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2014 - 05:56

निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.

आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.

वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त फुले.
माझ्याकडे त्या पावसाळी लिली मधला पिवळा रंग आहे. फुलं उमलून गेली की त्याला बियाही येतात आणि त्या बियांपासुनही रोपं तयार होतात. कुणाला बिया हव्या असल्यास देऊ शकते. ( मला हा गडद राणी रंग हवाय )

मोनालीप, देवकी, मनीमोहर धन्यवाद

वेका, आशिका..पावसाळी लिलीच म्हणतात हिला...
जागु ताईंनी आणखी एक नाव सांगितलय...नागदमणी... (जागु ताईं ती हिच का?)

सावली...माझ्याकडे भरपुर आहे हि... मी देऊ शकते तुला...

लीली/ नागदमणी (जागु, नाव खुपच आवडले) खुप छान...

जागु, ताजे मध आहाहा! आणि ब्रम्हकमळ तर तोड नाही...

गटग च्या डीटेल्स येऊ दे...
सावली मझ्या कडे आहेत दोन्ही पिवळी, राणी आणि आता पांढरी पण आणायचा विचार करते आहे ...
जागु तुझ्या पोरीने बोलायला सुरवात करताना पहिले शब्द 'आई मासे..' हेच काढले असतील ना ++++:)

सावली माझी उत्सुकता वाढवलीस. पिवळ्या फुलांचा फोटो टाक लवकर. आणी मला बिया हव्यात.

साधना राधा मासेखाऊच झालेय. कोलंबी, बाऊ, चिंबोरी बोलते.

पांढरी माझ्या आईकडे आहे.

माझ्याक्डे गुलाभी भरपूर आहे. कुणाल्या हवी असल्यास देईन. मला सायली नाहीतर सावली तुम्ही कुणीतरी पिवळी द्याच. Happy

साधना तुला मी १९ तारखेला भेटेन तेंव्हा ब्रह्मकम्ळाचे पान आणेन.

लिलीच्या जातीलाच त्या पेपरमध्ये नागदमणी म्हटले होते.

डन जागु, पत्ता दे, कोरियर करते उद्याच..

आणि ब्रम्हकमळाची पानं का? म्हणजे रोप, फुलं, बिया, फळ वगैरे ठीक आहे, पण पानं का? पानं पण उपयोगी असतात का?

सायली ह्याच्या पानापासून रोप येते. पान पानफुटी च्या पानापासूनही अशीच रोपे येतात.
तुला मेल करते. धन्स धन्स धन्स.

इकडे आले की मस्त प्रसन्न वाटते. पावसाळी लिली आणि जागूकडचे फुलं पण सुंदर आहेत.

जागू, पुढच्यावेळी मुंबईत आले की नक्की येणार तुझी बाग पाहायला तसेच मासे खायला.
सायली, मला पण हवय पिवळ्या लिलीचे बी तसेच इन्सुलिन प्लांटचे रोप.

इथले सगळे फोटो पाहुन खुप छान वाटत.

जागू ताई मला पण दया मी पण येनार आहे, अजुन काही असेल तर ते पण द्या,

इन्सुलिन प्लांट कुठे मीळेल???

जागू ताजा ताजा मध! आणि ब्रम्हकमळं काय सुरेख आहेत! मागच्या आठवड्यात सांगलीला भावाच्या बागेतही अशीच काही २०/२५ उमलली होती!
अगं मुलींनो .......सायली आणि मोनाली ......वडिलांनी ४थी ५वीतच ढकललं होतं पुराच्या पाण्यात. दर पावसाळ्यात ते स्वता: पोहायचे आणि आम्हाला शिकवायचे. त्यात माझं धाडस बिडस काही नाही गं!
बाकी सर्वांना धन्यवाद.
सगळ्यांचेच फोटो आणि माहिती मस्त!
कामिनी हे सुंदर फूल कसलं?
गौराम्माची लिली मस्तच!
साधना ..........आमच्या नगरात सीना नदीला पाणीच नसते. पण मुलांनाही मी क्लबच्या डबक्यात(स्विमिन्ग पूल :फिदी:) शिकवलं.............काय करणार?

nerulchyaa narsarit aahe>> k

Mala nerul madhe sector 2 pasun sty cha saral road itakach mahit aahe, kiti sector la aahe ti nursery.

Mala nerul madhe sector 2 pasun sty cha saral road itakach mahit aahe

सेक्टर २ म्हणजे तु पश्चिमेला राहतेस. तिथे सीवुड्स स्टेशनरोडला जे समांतर रस्ते आहेत किंवा डिमार्टच्या समोरचा रस्ता जो स्टेशनला समांतर आहे, त्या रस्त्याच्या टोकाला एक मोठी नर्सरी आहे. तिथे मिळेल कदाचित. माझ्या इथल्या नर्सरीत आहे जी पुर्वेला आहे.

सीवुड्सला फिरत जा ना, तिथले रस्ते खुप मोठे आहेत, रस्त्याच्या दोन्ही बाजुला प्रचंड मोठे वृक्ष आहेत. एकदा मी आणि लेक भल्या सकाळी कॅमेरा घेऊन गेलो होतो फोटो काढायला. नविन फ्लायओवर जिथे संपतो त्या रस्त्यावर या वर्षी बहावा इतका फुललेला की रस्ते वातावरणात नुसता पिवळाधम्मक रंग दिसत होता...

वरचे लाल फुल ब्रम्हदंडाचे आहे. (सॉसेज ट्री) पारसिक हिलवर या झाडांचे राज्य आहे आणि या झाडांवर वटवाघळांचे राज्य असते. मी रोज फिरयला जाते तिथे सडा पडलेला असतो यांचा.

सेक्टर २ म्हणजे तु पश्चिमेला राहतेस.>> ताई मी खारघरला राह्ते, नेरुळ ला २००८ -२०१० ला होते रहायला.

खारघर ला एक खुप मोठी नर्सरी आहे, Green world Nursery तिथे मी एकदा जाउन बघते इन्सुलिन प्लांट मीळते का.

ग्रीन वर्ल्ड उत्सव चौकच्या अगदी समोर आहे ,१० ते ६ चालु असते trusty ची आहे ती, central park त्यांच्या अंडर आहे झाड पुरवतात ते लोक आणि कधी पाहीली नव्हती अशी झाड मी तिथे पाहीली आहे, आता ह्या शनीवारी जाणार आहे.

सुप्रभात.... कामिनी खुप सुरे़ख फुल !

मनुषी ताई Happy

साधना, ब्रम्हदंड म्हणजे तेच ना वडासारखी उंच झाड असतात आणि लांबोळकी फळं लागतात..

अग पलक तू कशाला एवढ शोधतेस? तू १९ ला येणार आहेस ना वाशीला तेंव्हा मी आणेन. तु मला वॉट्स अ‍ॅप वर नंतर सांग काय हव ते.
आणि खारघरच्या नर्सरीचे फोटो टाक.

ब्रह्मदंडीचे अलिबाग मध्ये लहान मुलांसाठी औषध मिळते. ते वर्षभर तरी आमच्याइथे कंपलसरी देतातच. माझ्या दोन्ही मुलींनाही दिले आहे.

अग पलक असे प्रतिसाद वॉट्स अ‍ॅप वर स्माईली सकट द्यायचे इथे प्रतिबंध आहे
इथे फक्त निसर्गावरचे प्रेम व्यक्त करायचे आणि त्यासाठी झाडा-फुलांच्या स्माईली वापरायच्या. Lol

ब्रम्हदंड म्हणजे तेच ना वडासारखी उंच झाड असतात आणि लांबोळकी फळं लागतात

हो..

त्याच्या फळांचे औषध बनवतात हे माहित नव्हते मला.

सोनचाफा - अहाहा... सुंदर
कुणाकडे पिवळा सोनटक्का असेल तर मला द्या ना....प्लिज

Pages