निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.
"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.
आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.
वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
बायबलमधे ज्यू लोकांनी
बायबलमधे ज्यू लोकांनी वाळवंटातून ४० वर्षे प्रवास केला असा उल्लेख आहे. ( सध्याचा इथिओपिया ते सध्याचा इस्रायल ) त्या काळात त्यांच्याकडे मैना नावाचे अन्न तयार करण्याचे यंत्र होते ( देवाने दिलेले ) असे लिहिले आहे.
पण ते अन्न म्हणजे काय याचा नेमका अर्थ लागत नाही, काहिंच्या मते ते शेवाळापासून अन्न तयार करत असावेत.
या शेवाळासंबंधीच आजच्या लोकसत्तामधली माहिती..
http://www.loksatta.com/navneet-news/fossil-fuel-production-from-moss-64...
सध्या इंधनतेलाचे भाव गगनाला भिडले असल्यामुळे तेलाचा दुसरा कुठला तरी अवांतर स्रोत शोधण्याच्या प्रयत्नात शास्त्रज्ञांना असे आढळून आले की, शेवाळाचा उपयोग या कामासाठी होऊ शकतो. सूक्ष्म शेवाळे प्रकाश संश्लेषणाच्याद्वारे वातावरणातील कार्बन डायऑक्साइड व पाणी वापरून इतकी कबरेदके, स्निग्ध पदार्थ व प्रथिने तयार करतात की त्यावर त्यांचे व समुद्रातील सर्व प्राण्यांचे पोट भरते. अगदी पृथ्वीवरच्या वनस्पतीप्रमाणे!
१९४२ पासून सूक्ष्म शेवाळे मोठय़ा प्रमाणावर निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला. आतापर्यंत जवळ जवळ ३००० शेवाळाच्या जातींचे परीक्षण करण्यात आले असून त्यांमधील स्निग्धतेचा अंश कसा वाढवता येईल यावर काम सुरू आहे. पाण्याचे तापमान, त्यातील क्षार, रसायने, त्यात वाढणारे जीवजंतू व इतर सूक्ष्म गोष्टींवर त्यांची वाढ अवलंबून असते. शेवाळापासून किती व कशा प्रतीचे तेल मिळेल हे त्या शेवाळाच्या जातीवर, त्यांच्यामधील जनुकांवर व वातावरणाच्या परिणामावर अवलंबून असते. शेवाळे कुठेही वाढतात. त्यांना जगण्यासाठी सूर्यप्रकाशाची आवश्यकता असते. सहसा शेवाळांची वाढ लहान-लहान तलावांत करतात. तलावांत विशिष्ट शेवाळाच्या जाती (उदा. Scenedesmus dimorphus, Dunaliella tertiolecta, Bacilliarophyta (diatom) वाढवतात. यातील काही शेवाळांमध्ये तर अनुकूल वातावरणात ३७ टक्क्यांपर्यंत तेल तयार होऊ शकते. असे म्हणतात की काही शेवाळांच्या जातीपासून दर वर्षांला एकरी ५००० ते १५००० हजार गॅलन इतके उत्पादन मिळू शकते. हे तेलबियापासून मिळणाऱ्या तेलापेक्षा कितीतरी पटीने जास्त असते. शेवाळांना नेमके कोणते क्षार किती प्रमाणात घालावे की त्याची चांगली वाढ होईल ते शोधून काढावे लागते. काही शेवाळांना कर्बोदके घालावी लागतात, तर काहींना सिलिकॉनची गरज असते. काही शेवाळे नायट्रोजनचा पुरवठा कमी केला की जास्त मेदाम्ले बनवितात. शेवाळांची वाढ झाली की पाण्यामधून निथरून मगच त्यापासून तेल काढावे लागते. तेल काढल्यानंतर राहिलेल्या ढेपेत खूप प्रथिने असतात व ती पूरक खाद्य म्हणून वापरता येतात. हे तलाव उघडे असतात. त्यामुळे त्यावरील वातावरणावर अंकुश ठेवणे व वाढ होणाऱ्या शेवाळाच्या प्रतीची शुद्धता ठेवणे कठीण जाते. सध्या तर शेवाळाची जनुके बदलण्याचा शास्त्रज्ञांचा प्रयत्न चालू आहे.
डॉ. जयश्री सनिस (मुंबई)
मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org
नि.गकर्सकडुन (मनीमोहर) फक्त
नि.गकर्सकडुन (मनीमोहर) फक्त एकच लेख लेखनस्पर्धेसाठी? काय हे?
चला इतर निगकर्सने लेख लिहायला सुरूवात करा.
दिनेशदा, तुम्ही कधी पाठवताय लेख?
जिप्स्या, तु किती पाठवलेस
जिप्स्या, तु किती पाठवलेस रे?????
दिनेश, तुम्ही वाशीलाच या.. ऑड डे ला पार्ले आणि तेही संध्याकाळनंतर.. मला जमायचे नाही.
हो हो तुम्ही वाशीलाच या मि पण
हो हो तुम्ही वाशीलाच या मि पण भेटेन. माझ्या झाडांसाठी आशीर्वाद पाहीजे ना.
जिप्स्या, तु किती पाठवलेस
जिप्स्या, तु किती पाठवलेस रे?????>>>>बाळे, संयोजकांना असं उलट उत्तर करू नै.
उन्हाळ्याचा अधिक मास संपुन पावसाला सुरूवात झाली. सकाळपासुन धो धो कोसळतोय. आता आल्यासारखा चार महिने निवांत रहा म्हणावं त्याला.
दा,पार्ला-वाशी खुप लांब पडेल
दा,पार्ला-वाशी खुप लांब पडेल मला.
दादरला भेटायच ठरवल तर सगळ्यांना (म्हणजे सेंट्रल, हार्बल, वेर्स्टन वाले सगळे) सोयीच पडेल.
१८-१९ कधीही मला चालेल.
इथेही मस्त पाऊस पडतोय. कोसळत
इथेही मस्त पाऊस पडतोय. कोसळत नाहिये. रिमझिमतोय.
नयनरम्य मेजवानी -
नयनरम्य मेजवानी - https://www.facebook.com/photo.php?v=1591943614546&set=vb.1714583248&typ...
हे मी चेपु वर पण शेअर केले आहे.
धन्यवाद दिनेशदा , मी
धन्यवाद दिनेशदा , मी कुर्डुवाडीचा , अजुन काही रोपांची माहीती सांगा प्लीज.
उन्हाळ्याचा अधिक मास संपुन
उन्हाळ्याचा अधिक मास संपुन पावसाला सुरूवात झाली. सकाळपासुन धो धो कोसळतोय >>> पुढे पाठवा त्याला पटकन. इथे 'वाट पाहूनी जीव शिणला' अशी अवस्था आहे.
अके, स्निग्धा आमच्या इथे
अके, स्निग्धा आमच्या इथे सकाळपासुन खरंच धो धो पाऊस कोसळतोय.
हे वाचा: जांभूळ खा, जलसंधारण
हे वाचा:
जांभूळ खा, जलसंधारण वाढवा!
मोनालिप व्वा! काय सुरेख
मोनालिप व्वा! काय सुरेख मेजवानी दिलीस सकाळी सकाळी... दिल खुष हो गया!....
सगळ्यात मजा लाल गुलाब, झेंडु आणि सुर्यफुलाला बघतांना आली...
दा छान माहिती...
बाजिंदा... फ्लोरा नावाचा गुलाबाचा एक प्रकार येतो... पांढरा आणि गुलाबी रंग आहे माझ्या कडे...
जास्त पसरत नाही, आणि गुच्छानी फुलं येतात..
तसेच बटण गुलाब पण लावता येईल..
देव घरात छोट्या छोट्या मुर्त्यांना वाहिला की छान वाटते..मोठे फुल वाहिले
( हे माझ मत आहे.)
की देवाचा चेहराच दिसत नाही..मोठे फुलं फोटो ला आणि छोटी फुलं मुर्तीला..
जिप्स्या, तु किती पाठवलेस
जिप्स्या, तु किती पाठवलेस रे?????>>>>बाळे, संयोजकांना असं उलट उत्तर करू नै.
हायला......... तु संयोजक कधी झालास??????? वा... छान.. हे बरेय..
जिप्स्या, मी लिहिणार आहे .
जिप्स्या, मी लिहिणार आहे . स्पर्धेत अनेक दिग्गजांचे मस्त लेख आलेत त्यामुळे बक्षिसासाठी नाही पण माझं लिखाण थांबून टिवल्या बावल्या सुरू झाल्यात म्हणून
या वीकेण्डला लिहिन
मला गटगबद्दल अजुन काहीही कळालं नाहीये

अंधेरीत पाऊस कोसळतोय आज बहुदा
अंधेरीत पाऊस कोसळतोय आज बहुदा बॅकलॉग भरतोय.
मी कुर्डुवाडीचा >> बाजिंदा तुम्ही मी कुर्डुगडाच्या मी कुर्डुवाडीचे का ?
जिप्सी भाऊ तु नाही आहेस का १८,१९ ला मुंबैतच.
इथे ही धो धो पडतोय..
इथे ही धो धो पडतोय..
बाल्कनीतून हिर्र्र्र्वी स्वच्छ झालेली झाडं, झुडुपं पाहायला मस्त वाटतंय..
आहाहा... चिडचिड करवणार्या गर्मी पासून सुटका झाली...
दिनेश रस्त्यावरचा चिखल नाही पाहात आहे हां मी.. नुस्तं वरच..
चलो निग मित्रमंडळी... दोन दिवसांनतर लॉगिन फ्रॉम पनामा... ब्बाबाय!!!!
दिनेश गटग ला खूप मजा करून घे.. पुढच्या सहा महिन्यांची शिदोरी बांधून घे
चलो निग मित्रमंडळी... दोन
चलो निग मित्रमंडळी... दोन दिवसांनतर लॉगिन फ्रॉम पनामा... ब्बाबाय!!!! >>> वर्षूदी कॅमेरा आठवणीने न्या बर
आम्हाला आमची मेजवाणी पाहीजे 
हो रे नितिन , नक्कीच..
हो रे नितिन , नक्कीच.. कॅमेरे के बिना जीना भी कुछ जीना आपलं जाना है..
जिप्स्या मी लेख लिहायला
जिप्स्या मी लेख लिहायला घेतलाय रे. पूर्ण होईल २ दिवसांत मग पाठवते. सलग वेळ मिळत नाही.
दिनेशदा खरच वाशीलाच या
वाशीला आलात तर मी येऊ शकते.
१८ ला दादरला जमेल का ?
१८ ला दादरला जमेल का ? संध्याकाळी ?
वर्षू.. फायरी मिर्च्यांचे पार्सल कोणाला देऊ ? ( म्हणजे कोणावर विश्वास आहे ? )
सायली... देवावरच्या फुलाची आयडीया छानच.
वर्षू नील, हप्प्य जोउर्नेय
वर्षू नील, हप्प्य जोउर्नेय गं. Happy Journey
वर्षू.. फायरी मिर्च्यांचे
वर्षू.. फायरी मिर्च्यांचे पार्सल कोणाला देऊ ? ( म्हणजे कोणावर विश्वास आहे ? )>>> मी एकदम विश्वसनीय आहे दा.
वर्षू.. फायरी मिर्च्यांचे
वर्षू.. फायरी मिर्च्यांचे पार्सल कोणाला देऊ ? ( म्हणजे कोणावर विश्वास आहे ? )
माझ्यावर ठेवा कारण फायरी मिर्च्या माझ्या घरात कोण्णी कोण्णी खाणार नाही, त्यामुळे ते पार्सल माझ्या हातुन अज्जिबात हरवले जाणार नाही, ज्याला हवे त्यालाच मिळेल.
मला वाशी सोडुन दुसरे काही अजिबात जमणार नाही. वाशीलाही येतेय ते नशीब.
गेले सहा महिने ऐशुची तब्येत नरम गरम आहे. प्रतिकारशक्ती खुप कमी झालीय त्यमुळे एका आजारातुन उठली की लगेच दुसरे मागे लागतेय. त्यामुळे तिला आई घरातच हवी असते, मीही टाळतेय कुठेही जायचे, गावी तिची परवानगी घेऊनच गेलेले पण तेही अर्धवट कामे टाकुन परतावे लागले. ती बाहेरही फक्त कॉलेजसाठीच जातेय. त्यामुळे दादरला ती येणार नाही. त्यामुळे मला वाशी सोडुन दुसरे कुठलेही ठिकाण जमणार नाही.
वर्षु, हॅप्पी जर्नी. फोटो
वर्षु, हॅप्पी जर्नी. फोटो पाठव तिकडचे.
१८ ला दादरला जमेल का ?
१८ ला दादरला जमेल का ? संध्याकाळी ?>> १८ असेल तर मला वाशी प्रेफर आहे. अर्थात माझे येणे घरच्या चिमुकल्या मंडळींवर अवलंबुन असेल सो मी आत्ता फक्त रुमाल टाकते. नक्की नाही सांगत.
हुश्श!!! आलो एकदाचा ऑफिसात.
हुश्श!!! आलो एकदाचा ऑफिसात. पहिल्याच पावसाने अर्धा-पाऊण तास उशीर, पण नो प्रॉब्लेम. उशीर झाला, ट्राफिक लागले तरी तु मात्र जोमाने बरस.
जिप्सी भाऊ तु नाही आहेस का १८,१९ ला मुंबैतच.>>>>>नितीन, मी आहे रे, पण १८ ला ऑफिस असणार आहे. १९ ला कुठेही चालेल.
रीया, जागू ओक्के :-). दिनेशदा, तुम्ही कधी देताय लेख?
वर्षूदी, हॅप्पी जर्नी
भरपूर क्लिकक्लिकाट कर. 
१८ ला दादरला जमेल का ? > मला
१८ ला दादरला जमेल का ? > मला जमेल , पण बाकिच्यांना जमत आहे असे वाटत नाही.
सुदुपार सगळ्यांना... मला
सुदुपार सगळ्यांना...
मला माझ्या छोटुकल्या बागेचे प्रचि डकवायचे आहेत.... पण ईथे "मजकूरात image किंवा link द्या." upload होत नाहित... upload failed ... हाच मेसेज दिसतो. काय चुकतय... कोणी मदत करा ना?
वाशीहून पार्ल्याला जायला
वाशीहून पार्ल्याला जायला जवळचा मार्ग कुठला. ( सध्या बरेच नवे मार्ग झालेत ना )... समजा मी वाशीला आलो तर जास्तीत जास्त ९/१० वाजेपर्यंत थांबेन. मग थेट एअरपोर्ट्वर जाईन.. सगळ्यांना १९, वाशी जमणार आहे का ?
मला ठिकाणही सांगा... आणि काही वस्तूंची फर्माईश असेल तर तिही सांगा.
ज्यांना वाशी शक्य नाही ( उजू, नितिन, सामी ) त्यांनाही मी दादरला रात्री १८ तारखेला भेटेन.
Pages