निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.
"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.
आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.
वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
Here is a burning flower.
Here is a burning flower. चुकलेल्या फ्लॅशचे प्रताप.
साधने बाई अगं, तो तरी कुठे
साधने बाई अगं, तो तरी कुठे वाचतो 'त्या' पोस्टी???
सरळ दुर्लक्ष करुन पुढे जातो की.
fakt nisargachya gappavaach
fakt nisargachya gappavaach malaa computer devnagarit type karayalaa det naahi.. dahaadaa refresh kele, donda browser band karun ughadalaa tari tech. aataa dusa-yaa dagyavar post kele marathit, parat ithe ale tari tech..
ghari aamachi bayaa niga baghyalaa det naahi, aani ithe officaat computer..... kuthe jaun doke fodu te sangaa...
साधने बाई अगं, तो तरी कुठे
साधने बाई अगं, तो तरी कुठे वाचतो 'त्या' पोस्टी???
सरळ दुर्लक्ष करुन पुढे जातो की.
>>>>>>>>
ho.. sutaasaarakha saral mhanataa mhanataa tyaachi jilebi jhaale.....
साधना अग मग दुसर्या धाग्यावर
साधना अग मग दुसर्या धाग्यावर टायपुन कॉफी + पास्ता ( कॉपी + पेस्ट) कर इथे.
हाकानाका.
तळटीपः तिकडुन मात्र डिलीट मार.
तळटीपः तिकडुन मात्र डिलीट
तळटीपः तिकडुन मात्र डिलीट मार
>>>>>..
ho...
जिलेबी???? अख्खी इमरती असणार
जिलेबी???? अख्खी इमरती असणार ती बघच तु
स्वगत (काडी ओढलीये पण पेटणारे का???)
मोनालि, बर्निंग फ्लॉवर बेस्ट
मोनालि, बर्निंग फ्लॉवर बेस्ट !
साधना, वारीला गेलाय तो !
kasalyaa kaadya petataahet.
kasalyaa kaadya petataahet. thand..
ala varivarun parat.. gelaa varilaa aani aanalyaa chinchaa....
आजपासून पाणी कपात का ? वाईट
आजपासून पाणी कपात का ? वाईट वाटलं. एवढा कधी लांबत नाही पावसाळा सहसा.
ये रे बाबा लवकर !
सरिवा अंजिरं काय तोंपासु!
सरिवा अंजिरं काय तोंपासु!
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल!!!!
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल!!!!

वर्षा विहार
वर्षा विहार
साधना , प्रतिसाद तपासाच्या
साधना , प्रतिसाद तपासाच्या खिडकीवर जायचं आणि लिहायचं
मग नीट टाईपलं जातं 
प ण इट्स व्हेरी इरिटेटिंग
सुदुपार... आज पासुन रुटीन
सुदुपार...
आज पासुन रुटीन चालु...
बाकी पुण आवडलं बुवा आपल्याला... हिरव गार आहे...
जागो जागी वड आणि पिंपळ आहे...दर १० मी. च्या अंतरावर गणपती चे देऊळ दिसले...
नागपूर ला कडुलिंबाची झाड जास्त आहे.... आणि मारोती चे देऊळ ठीकठीकाणी दिसतील....
सरिवा काय रसाळ अंजीर आहेत व्वा...
शशांकजी खुप सुंदर झाड तुमच्या बागेतले..
वेका ते गुलाबाचे रोपटे एखाद्या पेंटीग सारखे भासते आहे.... खुप सुंदर...
शकुन अप्रतिम लिंक.... शेयर केल्या बद्द्ल धन्यवाद....
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल!!!! स्मित स्मित +++++ अरेच्या नारायण नारायण वरुन थेट विठ्ठल विठ्ठल!!!!
...
काय पण लोकं रंग बदलतात
घरचा कढिलिम्ब . (आपली देशी
घरचा कढिलिम्ब . (आपली देशी नगरी पोतडी)....
अन्जू...वाचतेस ना? :स्मितः
मस्त मानुषीताई. अहो मस्करी
मस्त मानुषीताई. अहो मस्करी केली अमेरिकेबाबत, ते फोटो आवडतातच बघायला.
कढीलिंब अगदी मस्त फोफावलाय.
शकून, फार मस्त लिंक
शकून, फार मस्त लिंक आहे.

दिनेशदा,
मानुषी मस्त कढिलिंब.
जिप्सीने चिंचेचा विषय आपल्यासमोर ठेवला चर्चेला आणि स्वतः गेला वारीला, तरीपण तो नक्की रोज येऊन "चिंच चर्चा कौनसे मोड पे आयी है" हे नक्की पाहात असणार
मस्त मानुषीताई. अहो मस्करी
मस्त मानुषीताई. अहो मस्करी केली अमेरिकेबाबत, ते फोटो आवडतातच बघायला.
>>>>>>> इश्श्य...एवढं स्पष्टीकरण कशाला ते अन्जू...मला आवडली तुझी मस्करी.
आणि ती पोतडीही अजून उलटी करून झट्कलेली नाहीच्च!
मानुषी, ही फळे खायला कुठले
मानुषी, ही फळे खायला कुठले पक्षी येतात का ? गोव्याला माझ्या घराशेजारी एक झाड होतं आणि त्यावर एकदा कावळा आला आणि फळ खाल्लेही पण खरं सांगतो त्याला ते आवडले नाही, चक्क टाकून दिले त्याने. बाकी क्वचितच कुठला पक्षी आलेला दिसला.
माझ्या मते ही फळं कोण्ताच
माझ्या मते ही फळं कोण्ताच पक्षी खात नसावा.
कारण फुलचुखे, बुलबुल, होले, कावळे असे अनेक पक्षी असतात आसपास. पण कुणी ़ खाताना नाही दिसला.
आता लिंबोण्यांबरोबर याही फळांचा सडा पड्तोय अंगणात.
बर्निंग फ्लॉवर मस्त मोनालीप.
बर्निंग फ्लॉवर मस्त मोनालीप.
सुप्रभात.... मनुषी ताई
सुप्रभात.... मनुषी ताई कढीलिंब मस्तच......
सुप्रभात. आज बर्याच
सुप्रभात.

आज बर्याच दिवसांनी आले.
पण मोबाईलवरुन रोज छान चाललेल्या गप्पा वाचत होते.
काल मी भाज्यांच्या बिया लावून दिवस सत्कारणी लावला.
जागू - हे जांभळं फुल -
जागू - हे जांभळं फुल - Thunbergia grandiflora आहे का ?
अॅनिमल पेरेंटिंग आवडलं ना ?
अॅनिमल पेरेंटिंग आवडलं ना ? त्या साईट वर असेच मस्त मस्त फोटोज आहेत.
आज ईसकाळ वर कर्णिक बाईंचा लेख वाचला. बुचाच्या झाडाला 'आकाशमोहोर' म्हणलंय त्यांनी. (म्हणजे सगळेच म्हणत असतील कदाचित पण मी आजच वाचलं/ऐकलं). काय नाव आहे. वाह !! जितकं लाडकं झाड तितकच हे नाव पण आवडलं.
आजकाल नवीन बांधल्या जाणार्या बिल्डिंग्ज ना उगीच इंग्लिश नावं देतात. त्यापेक्षा अशी फुलांची नावं द्यावीत ना. कुठेतरी नाल्याकाठी चाळ टाईप बिल्डिंग बांधतात आणि नाव काय तर म्हणे 'विंडसर', 'हार्मनी', 'रॉयल अमूक ढमूक'. काहीही. असो.
शशांक, शनिवारी सिव्हिल
शशांक, शनिवारी सिव्हिल हॉस्पिटलला हेल्प डेस्कला असताना ३ कुत्रे चावलेले पेशंट्स आले होते. त्यातला एक माणूस डॉक्टरांनी सांगूनसुद्धा इंजक्शन न घेण्यासाठी काहितरी बहाणे करत होता, नखच लागलं असेल, भिंतीवर पाय आपटूनच रक्त आलं असेल वगैरे वगैरे.... त्याची बायको मला विचारत होती की काय करु? मला एक्दम ह्या धाग्यावर मोनालिच्या लेकाच्या निमित्ताने झालेली चर्चा आठवली आणि मी त्याला इंजक्शन घ्यायची मानसिक तयारी करुन दिली आणि तो इंजक्शन घ्यायला गेला
मस्त फोटो आणि माहिती बाकी
मस्त फोटो आणि माहिती
बाकी इतर काही मी वाचलंच नाही
जितकं लाडकं झाड तितकच हे नाव पण आवडलं.>>>>शकुन +१
हि घ्या बूचाची फुले
अके, मस्तच
अके, मस्तच
अश्विनी - मला एक्दम ह्या
अश्विनी -
मला एक्दम ह्या धाग्यावर मोनालिच्या लेकाच्या निमित्ताने झालेली चर्चा आठवली आणि मी त्याला इंजक्शन घ्यायची मानसिक तयारी करुन दिली आणि तो इंजक्शन घ्यायला गेला >>>>> ये बहोतही नेक काम किया है आपने.... व्हेरी, व्हेरी गुड जॉब - त्या माणसाचा पुनर्जन्मच झालाय आता ....
Pages