निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.
"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.
आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.
वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.
गौराम्मा , स्वागत! मानुषी ,
गौराम्मा , स्वागत!
मानुषी , फोटो मस्तच.
जिप्सी, अंजिर पाहून हैराण झाले.
uju, manushi tai mast
uju, manushi tai mast photo.....
shashank ji kharicha kissa khasach ahe..
anjir pahun jiv jalala...
Gaurama, welcome....
हे काय आहे कोणाला माहिती आहे
हे काय आहे कोणाला माहिती आहे का ?
उत्तर अमेरीकेत दलदलीच्या भागात बर्याच झाडांवर दिसून येतं....
मंडळी माफी असावी. इकडे येत
मंडळी माफी असावी. इकडे येत नाही आजकाल. पण निसर्गप्रेम अखंड आहेच
हे नक्की पहा. सूSSSपर क्यूट : http://www.boredpanda.com/cute-animal-parenting/
आणि फोटोग्राफर्स ची पण कमाल आहे. काय टायमिंग साधलय एकेका फोटोचं.
जिप्या रानजाई कुठे सापडली ??
जिप्या रानजाई कुठे सापडली ??
तन्मय हे कोणत्यातरी किटकाचे घर वाटते आहे
malaa tar ful vatatey.
malaa tar ful vatatey.
शकुन (ज्योती) - अॅनिमल
शकुन (ज्योती) - अॅनिमल पेरेंटिंगची लिंक फारच भारीये - शेअर केल्याबद्दल मनापासून धन्स ....
वा शकुन, मस्तच आहेत फोटो
वा शकुन, मस्तच आहेत फोटो ते.
तन्मय, किटकाचे घर असण्याचीच शक्यता आहे. खुपदा ओकच्या बाबतीत असे होते कि काही किटक त्याच्या कोवळ्या फळात अंडी घालतात, मग ते फळ अत्यंत वेडेवाकडे वाढते.
केनयामधे काही बाभळीची झाडे मुंग्यांसाठी घरे निर्माण करतात आणि त्या बदल्यात मुंग्या त्या झाडाचे सरंक्षण करतात. ( त्याचा फोटो मीच इथे टाकला होता ) त्यामूळे हे वरीलपैकी असावे.
आमच्या बागेत हे एक रोप आहे -
आमच्या बागेत हे एक रोप आहे - याची सगळी पाने लालसर असल्याने याला कॅरेबिअन कॉपर प्लांट असे नाव आहे. नुकतीच याला अतिशय नाजुक व अगदी म्हणजे अगदीच छोटीशी फुले आली आहेत. पण खाली देत असलेले फोटो मात्र आंतरजालावरुन साभार ....
Common name: Caribbean Copper Plant, Mexican Shrubby Spurge, Red Spurge
Botanical name: Euphorbia cotinifolia Family: Euphorbiaceae (castor family)
सूSSSपर क्यूट >>>>>>>>
सूSSSपर क्यूट >>>>>>>> +११११११ खुSSSSSSSप क्यूट
शकुन... तुम्ही दिलेल्या
शकुन... तुम्ही दिलेल्या लिंकमधले प्राण्यांचे फोटो खरच क्युट आहेत!
एरवी हिंस्त्र असणार्या प्राण्यांमधे पिल्लु झालं की मातृत्वाची भावना कुठुन कशी येते कोण जाणे!
छानच फोटो. मागे मी या फुलांचा
छानच फोटो. मागे मी या फुलांचा फोटो टाकला होता त्याचवेळी शांकलीने नाव सांगितले होते. पण आमच्याकडच्या झाडांच्या पानांची ठेवण जरा वेगळी आहे.
खरं तर हि फुले आकाराने ५/६ मिमीच असतील. असा फोटो बघितल्याशिवाय त्यांचे सौंदर्य लक्षातच येत नाही.
व्वा! इथे गप्पा अगदी मस्त
व्वा! इथे गप्पा अगदी मस्त रंगल्या आहेत.
जिप्सी,चिंचेचे फूल सुंदरच!
चिंचेच्या फुलांची एक रेसिपी लिहावीशी वाटते आहे.
गावठी गुलाब पाकळ्यांपासुन आपण जसा गुलकंद करतो,त्याचप्रमाणे चिंचेची फुले वापरायची .काचेच्या बरणीत एक थर फुलांचा,एक खडीसाखरेचा/साखरेचा असे एकाआड एक थर घालून बरणी उन्हात पाक होईपर्यंत ठेवायची.
नाव.....तुम्हीच सुचवा!
इथे बरेचअंजीरप्रेमी दिसताहेत.
इथे बरेचअंजीरप्रेमी दिसताहेत.
खास त्यांच्यासाठी आमच्या घरची ही अंजिरे.
1.





2
3.
4
5.
मस्त फोटो सरिवा... अंजीर
मस्त फोटो सरिवा... अंजीर तोडणी हे अगदी कष्टाचे काम असते ना ?
सरिवा, अहाहा! तो फोडलेल्या
सरिवा, अहाहा! तो फोडलेल्या अंजिरांचा आणि टोपल्यातल्या अंजिरांचा फोटो काय मस्त आहे? आत्ताच ते टोपलं समोर घेऊन ताव मारावासा वाटतोय. कुठे राहता तुम्ही?
सरिवा, मस्त. फोटो बघून
सरिवा, मस्त. फोटो बघून तोंडाला पाणी सुटले. अंजीरं माझी आवडती. खाल्ल्यानंतर गार वाटतं पोटात.
आहा मस्त अंजिरे.. चिंचकंद नाव
आहा मस्त अंजिरे..
चिंचकंद नाव ठेवा, आणि आम्हाला खायला द्या.
वॉव... कसली रसरशीत अंजिरं
वॉव... कसली रसरशीत अंजिरं आहेत! ते फोडलेले अंजिर तर एकदम तोंपासु.
सरिवा, मस्त. घरचा पत्ता काय
सरिवा, मस्त. घरचा पत्ता काय बर तो?
सर्वांचे फोटो सुंदर, सुंदर,
सर्वांचे फोटो सुंदर, सुंदर, सुंदर.
मानुषीताईच्या पोतडीतून अजूनही अमेरिका बाहेर पडतेय.
शशांकजी पाने सुंदर आहेत, नाव अगदी सार्थ आहे.
सारिवा अंजीर खूप आवडतात.
जिप्या रानजाई कुठे सापडली
जिप्या रानजाई कुठे सापडली ??>>>>>सचिन, सासवडला
तुला पाहिजे का विदाऊट वॉमा फोटो तुझ्या ब्लॉगवर अॅड करायला?
सरीवा, अंजिराचे फोटो अप्रतिम!!!
रच्याकने, चिंचेची फुलं पण खातात? मी फक्त पानं (आणि अर्थातच चिंचा
) खाल्लीत. 
शकुन....मस्त आहे लिंक फेसबुक
शकुन....मस्त आहे लिंक
फेसबुक वरच्या एका ग्रुपवर माहिती मिळाली काल टाकलेल्या फ़ोटो बद्द्ल....
It's azalea leaf gall - usually caused by an insect or fungal infection.
अॅनिमल पेरेंटिंग फारच गोडु
अॅनिमल पेरेंटिंग फारच गोडु आहे..
दिनेश, माझ्या घरासमोरचा वृक्ष की काय हा कुंभ म्हंजे.. तूच सांगितले होतेस याची फळे फुले दुर्गंधी असतात म्हणून.. पर्टिक्युलर एका मौसम मधे येतो वास.. आत्ता गारेगार हिरवी फळं भरून लागलीयेत..
अंजीर बाजारात आले कि प्रत्येक दिवशी एक बॉक्स घरी येतो.. पण घरची .... वॉव.. स्वर्गसुख असेल..
मानुषी तिकडलं आभाळ पोल्युशन विरहीत असल्याने रंग अगदी निखरलेले असतात.. नै??
वर्षू, तो जंगली बदाम.. फुले
वर्षू, तो जंगली बदाम.. फुले देखणी पण वास भयानक.
जिप्सी, चिंचेच्या मोहोराला चिंगूर म्हणतात.. वरणात वगैरे घालता येतो.. पण चिंचा का खायला लागलास ?
( वर्षू.. मी निर्मळ मनानेच विचारतोय आणि तोही जिलेबीसारखे सरळ उत्तर देणार आहे. )
दिनेश तुला दर वेळी निर्मळ
दिनेश
तुला दर वेळी निर्मळ मनाचं एक्स्प्लेनेशन का बरं द्यावं लागतंय हल्ली..
दिवे देणार नाही 
मी तर चिंचांचे फोटोच बघत
मी तर चिंचांचे फोटोच बघत नाही...उगा तोंडातून लाळ टपकत राहायला नको
फायनली आमचा लाल गुलाब फुलला. यंदाच लावलेलं रोप आहे..मध्येच ढेपाळलं होत. आला बाई एकदाचा
वेका, पाने अशीच आहेत का ?
वेका, पाने अशीच आहेत का ? तीपण सुंदर दिसताहेत.
वर्षू... माझ्याकडून क्लीयर केलेलं बरं ना ! आता उद्या साधना, शोभा येऊन करतील ती मस्करी !
नाही ती पिवळी पडली आहेत (असं
नाही ती पिवळी पडली आहेत (असं मला वाटतं) पण आम्ही अगदीच बाळ कलम घेतलं होतं. बघुया अशीच राहतात की रिपेअर होतात ते. वरची पानं हिरवी आहेत नं म्हणजे ही पिवळी खराब झाली असावीत.
आभार्स दिनेशदा
पण चिंचा का खायला लागलास ? (
पण चिंचा का खायला लागलास ?
( वर्षू.. मी निर्मळ मनानेच विचारतोय आणि तोही जिलेबीसारखे सरळ उत्तर देणार आहे. )
>>>>>..
kaay he.. kiti ushira vichartaay asle prashna.......... mi kitti vela ha prashna vicharlaa ahe pan konni konni majhya posti vachat naahi...
khopachit ghyaa ata tyaalaa aani vicharaa... gaabhulalyaa chinchanchi rahasye.....
Pages