निसर्गाच्या गप्पा (भाग २०)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 5 June, 2014 - 05:56

निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.

"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्‍या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.

आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.

वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सासवडची अंजीर >> का उगा जळवता भुकेल्यांना जेवणाच्या वेळी यमी अंजीरांचा सुंदर प्रचि टाकल्या बद्द्ल निशेढ Wink

अंजिर सुरेख आहेत. मी पुण्याला गेले की स्वारगेटच्या बाहेर नेहमी अंजीर घेते परत येताना.

आषाढी वारी २०१४ची एक झलक Happy सध्या घरचा संगणक फॉर्मेट झाल्याने थोडा वेळ लागतोय प्रचि प्रदर्शित करायला.

आले सुखाला भरते चंद्र मोहरे भक्तीचा
दुजी भावना सरली बोध जाहला ज्ञानाचा
भाव समतेचा थोर असा वाटेत पेरला
दिंडी चालली चालली विठ्ठलाच्या दर्शनाला.....

(माऊलींची पालखी दिवेघाटातुन सासवडकडे जाताना)

बापरे, विकतचे मिळणारे पॉपकॉर्न एवढे धोकादायक असतात. (अर्थात मी ते घेत नाहीच) पण लहान लहान मुले आणि मोठी माणसेही किती खात असतात ....

masta foTo jipsy. manasaancha mahapur aalaay agadi..

ashvini, mIhI janevarit punyalaa gele hote tevha ghetaleli anjire.. mast lagataat. loving them...

जिप्स्या, वारीचे फोटो बघितले की वाटतं आपणही त्यातच कुठेतरी आहोत. रागावायचं, रुसायचं त्या विठ्ठलावरच, मन मोकळं करायचं त्याच्यापाशीच, आनंदाचं उधाण आलं तरी भरभरून तो व्यक्त करायचा त्याच्यापाशीच, रडू फुटलं तरी मनानेच त्याच्या कमरेला मिठी घालून रडायचं. हो, मी जेव्हा हे सगळं करते तेव्हा मी माझ्या मनानेच त्याची उंची अशी ठरवलेली असते की मी त्याची लेक म्हणून त्याला घातलेली मिठी त्याच्या कमरेलाच येईल. म्हणजे असं बघ, आपण आपल्या आई बाबांना आपल्या लहानपणी धावत येऊन मिठी घालायचो ती त्यांच्या कमरेशीच येत असे ना! त्यांनी उचलून घेण्यासाठी आर्जवं करायला आपला चेहरा आणि आपले हात आपल्याला वर करावे लागत ना!

खूप अवांतर झालंय पण तो दोष तू टाकलेल्या फोटोचा..... माझा नाही Wink

अके, अतिशय सुंदर प्रतिसाद Happy

पण तो दोष तू टाकलेल्या फोटोचा..... माझा नाही>>>>>असेच सुरेख प्रतिसाद येत असतील तर अजुन १०-१२ फोटोज टाकेन. Wink

अ‍ॅड विनर आहे अदीजो - होय तो कुंभा आहे.>>>>>
वा! धन्यवाद Happy

अंजिराचे फोटो मस्तच आहेत.

अंजीरवर्गीय फळांबद्दल थोडेसे:
वड, अंजीर, उंबर या झाडांची फुले ही फळांच्या आत असतात. त्यांचे परागीभवन विशिष्ट प्रकारच्या माशा करतात. ही झाडे काही रसायनांच्या द्वारे हिरव्या कच्च्या फळांच्या आतील फुले परागीभवनासाठी तयार आहेत असा संदेश देतात. fig wasp - आपण तिला उंबर माशी म्हणूया- तर उंबर माशी त्या रसायनांच्या आधारे योग्य झाड शोधते. फळाच्या आत जाण्यासाठी त्यावर एक छोटे छिद्र असते. त्यातून ती कशीबशी आत जाऊ शकते. बरेचदा त्या धडपडीत तिचे पंखही गळून जातत. आत गेल्यावर तिने आपल्यावरोवर आणलेले परागकण आतल्या फुलांवर पडतात. माशी काही फुलांच्या स्त्रीकेसरांच्या आत अंडी घालते. त्यातून बाहेर पडलेल्या अळ्या फुलांच्या बीजकोषातील अन्नावर वाढतात. आतल्या माशीची पूर्ण वाढ होते तेव्हा फळही पिकू लगलेले असते. आता ही माशीबाळे फुलातून बाहेर पडून फळाच्या मधे असलेल्या पोकळीत येतात. तिथे male आणि female माशांचे मीलन होते आणि नरमाशा मरून जातात. त्यांचा कार्यभाग संपलेला असतो.
एव्हाना पक्व झालेल्या परागकोशातले परागकण आता उंबरमाशीच्या शरीरावर चिकटलेले असतात. ते घेऊन ती फळातून बाहेर पडते आणि अंडी घालण्यासाठी दुसरे फळ शोधायला निघते. इकडे या झाडांची पिकलेली फळे आता आपल्या गोड वासाने बीजप्रसार करणार्या एजंटांना - पक्षी, माकडे, इत्यादींना आकर्षित करू लागतात!

मोनाली, जिप्स्या... खरंच रे. तो एकच असा आहे की टाकलेल्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देत नाही, आपण कसेही असलो तरी आपल्याला टाकत नाही, आपले चुकीचे/बरोबर वागणे आपलं माणूसपण लक्षात घेऊन पोटात घालत असतो, तोच आपला एकमेव आणि खरा मित्र असतो जो मैत्रीच्या खात्रीने पुढे केलेल्या हातावर विस्तव ठेवून चटका देत नाही, तोच असतो जो आपण झोपलेले असतानाही आपला राखणदार बनून आपल्या आसपास आणि आपल्या आतही असतो.

ए बास आता.... माझं त्याच्यावरचं प्रेम आत्ता खूप दाटून आलंय आणि त्या भरात मी लिहित सुटलेय. मी जातेच कशी!! Happy

अरेच्चा! Happy
दिनेशदा, खूप छान लिहिलंयत.
लेखाच्या शेवटी तुम्ही लिहिलेलयय >> ही व्यवस्था पहिल्यांदा समजल्यावर मी जो अवाक झालो होतो, तोच भाव आजही कायम आहे >>>
हे माझ्याही बाबतीत अगदी खरे आहे.

जिप्सी मस्तच रे... अश्विनी किती छान लिहितेस ग तू.

अदीजो छान माहिती.

दिनेशदा, मुंबइत कधी आहात???
आणि मुंबइकरांना नाही का भेटणार?????> दिनेशदा या भारत वारीत तुमची भेट चुकवायची नाही आहे. Happy

सामी, १८ ला रात्री किंवा १९ ला सकाळी ( दुपारपर्यंत ) जमेल मला. १८ ला सकाळच्या फ्लाईटने येणार आहे, १९ ला रात्रीच्या फ्लाईटने जाणार आहे. पण वेळ काढेनच. १९ ला सकाळी मुंबईत म्हणजे चौपाटी, बाबुलनाथ भागातही जमेल मला.

हि रानजाई, कोल्हापूरला काही घरांच्या कुंपणावर पण बघितली होती. थोडासा लेमनी सुगंध असतो.

अदीजो... बीबीसी ने या सगळ्याचे चित्रण क्वीन ऑफ ट्रीज या माहितीपटात केले आहे. ( मी पण एक बारीकसा लेख लिहिला होता इथे. )

खार, चिंच, अंजिर >>> वॉव!

ते चिंच आणि अंजिर पाहुन मला आत्ताच्या आत्ता पाहिजे वाली फीलिंग आली Sad

अंजिर माझं सेकंड मोस्ट फेव्हरेट फळ आहे Sad

जिप्स्या कुफेहेपा?

जिप्सीभौ चिंचेचं फूल आणि अंजीर अगदी तोंपासु! चिंचेचं फूल आणि रानजाई सुंदरच! खूप क्लोजप घेतलाय्स ना!
उजू फोटो मस्तच! झब्बू देऊ का? पण बहुतेक हे आधी इथे टाकलेत. तरी डकवते.


द्विरुक्ती झाली असेल तर सॉरीच! :स्मितः
अश्विनी .......तुझं अवांतर खूप आवडलं. आणि शशांकची खार भारी आहे.
गौराम्मा स्वागत आहे इथे!

हो दिनेश........असे रंग देशात फार्से पाहिले नव्ह्ते. किंवा असंही असेल की इथे कशाची नवलाई नसते म्हणून इतकं कधी लक्ष गेलं नव्हतं.
पण तिकडच्या आकाशाला अझुरे स्काय असं म्हणतात ना? तो टिपिकल निळा रंग?

काय काय लिहु ? फोटो, महिती, गप्पा, कोडी, त्यांची उत्तरं, चिंतन, नव्यांचं आगमन आणि स्वागत सगळचं छान.

खुप ्छान फोटो, गप्पा. ब-याच दिवसांनी आल्याने आधी सारं पाहून वाचून घेतलं. तुम्ही सर्व भेटताय असं कळालं.मलाही आवडेल यायला आणि सर्वांना भेटायला.
दिनेश, भारत भेटीत गोव्याचा प्लान आहे का नाही ? नाहीतर आपण ्सर्वांनी गोव्यात गटग करायचं कां? किंवा पश्चिम घाटात सोयीच्या ठिकाणी?

Pages