निसर्गाच्या गप्पांच्या २० व्या भागाबद्दल सगळ्या निसर्ग प्रेमींचे अभिनंदन तसेच पर्यावरण दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज पर्यावरण दिनाच्या शुभ मुहुर्तावर पर्यावरणाचे संतुलन राखण्याच्या दृष्टीने आपण आपाअपल्या परीने प्रयत्न करुन ह्या निसर्गाशी जडलेले नाते अजुन वृद्धिगत करुया.
"पा ऊ स" - निव्वळ तीन अक्षरातच त्याच्या कृतीचा भास होतो. "नेमेची येतो मग पावसाळा" असे असले तरी तो प्रत्येकाला हवाहवासा वाटत असतो. ग्रीष्मात "तप्त दिशा झाल्या चारी, भाजतसे सृष्टी सारी" अशी सर्वत्र स्थिती असताना त्याचे आगमन हा एक सुखद अनुभव असतो. तो येतो तेच गारव्याची आणि नवचैतन्याची चाहुल घेऊनच. एरव्ही उजाड वाटणारी धरतीही त्याच्या आगमनाने सुखावते. उन्हाळ्यात ज्या डोंगरावर साधे झुडुपही दिसत नाही तेथे हिरव्यागार झाडाझुडपातून लपंडाव खेळत दुधाच्या सहस्त्र जलधारा वेगाने दरीत झेपावताना दिसू लागतात. "बेरंगसी है बडी जिंदगी, कुछ रंग तो भरो" असे म्हणणार्या धरतीला तो आपल्या "हिरव्या" रंगात रंगवून घेतो. बरे या हिरव्या रंगाच्या छटा तरी किती विविध! झाडाझुडपांचा गर्द हिरवा, नवीन पालवीचा कोवळा हिरवा, डोंगर-पठारावर व्यापलेल्या गवताचा पोपटी हिरवा, जीर्ण पानांचा वाळका हिरवा, शेवाळ्याचे भस्म फासलेल्या दगडाचा शेवाळी हिरवा. अगदी "ऋतू हिरवा, ऋतू बरवा" सारखाच. निसर्गाला, कवीमनाला साद देणारा असा हा पावसाळा. ह्याच्या पहिल्या सरींचे तर सगळ्यांना अप्रुप. पहिल्या पावसाच्या आगमनानंतर येणारा मातीचा सुगंध तर कोणत्याही कृत्रिम सुगंधापेक्षा अधिक सुंदर असतो. अगदी "जाई जुईचा गंध मातीला आला" या गीताप्रमाणेच.
आभाळात आले काळे काळे ढग,
धारा कोसळल्या निवे तगमग
धुंद दरवळ धरणीच्या श्वासांत,
आला पाऊस मातीच्या वासात,
मोती गुंफीत मोकळ्या केसांत.
वरील फोटो व त्या खालचा मजकूर जिप्सी कडून.
स्थापना - ५ डिसेंबर २०१०
निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया ८३) नलिनी ८४) गौराम्मा ८५) पलक ८६) केशर
मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236
निसर्गाच्या गप्पा (भाग १९) http://www.maayboli.com/node/48774
निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

जिप्सि, मस्तच वाटल खुप
जिप्सि, मस्तच वाटल खुप दिवसांनी चिंचेच्या फूलाचा फोटो पाहून.
लहानपणी अंगणातच चिंचेचे झाड होते, तेव्हा आम्ही चिंचेची पाने, फूले, चिंचा सार काही खायचो ते दिवस आठवले. पाऊस होउन गेल्यावर आम्ही चिंचेखाली जमायचो अन कोणीतरी जनरली जो कोणी मोठा-उंच असेल आमच्यात तो चिंचेची फांदी हलवायचा. पानांवर जमून राह्यलेल्या पाण्याचा परत पाऊस पडायचा आणि जोडीला आमचा दंगा....... गेले ते दिन गेले........राहील्या फक्त आठवणी.............................
हे काय आहे बघा
हे काय आहे बघा

आवळा / रायआवळा
आवळा / रायआवळा
नितीन, करमळ आहे का? अळु??
नितीन, करमळ आहे का?
अळु??
नितीन, कवठ आहे का? पण पान
नितीन, कवठ आहे का? पण पान मोठी वाटताहेत.
नाही
नाही
पानं बदामाच्या पानांसारखी
पानं बदामाच्या पानांसारखी आहेत.
जाम आहेत का हे ?
जाम आहेत का हे ?
नमस्कार सगळ्या निसर्ग
नमस्कार सगळ्या निसर्ग प्रेमींना .....
मायबोली सभासद होऊन ३ वर्ष झाली पण एक दिवस असा गेला नाहि की निसर्गाच्या गप्पा हा धागा पाहिला नाही. आज निसर्गाच्या गप्पात काय झालं... जागुदि ने नवीन कुठली माहिती टाकली, जिप्सिने नवीन कुठलं फुल टाकलं... आणि ते दिनेशदा, शशांक, शांकली यांनी किती झटपट ओळखलं. हे सगळं घरी नवर्याला सांगायच....
त्याला खरंच वाटत नाही की माझी तुम्हां सगळ्याशी ओळख नाही ते....
आज मात्र फार ईच्छा झाली तुम्हा सगळ्याशी गप्पा मारायची..... जागुदि मलाही तुमच्या वरच्या लिस्टमध्ये अॅड करा ना....
पानांच्या आकारावरून 'कुंभा'
पानांच्या आकारावरून 'कुंभा' वाटतो आहे. Careya arborea.
धन्यवाद जिप्सी ...प्रश्न फोटो
धन्यवाद जिप्सी ...प्रश्न फोटो मस्त.. आणि बक्षीस तर फारच सहिये.. त्या फुलांची चव एकदम रेंगाळली.. आणि ते चिंचे चे भरलेले झाड ..आजचा दिवस सार्थकी लागला
पपनस ट्री आहे का??????
पपनस ट्री आहे का??????
चिंचेचं फूल .. वॉव किती
चिंचेचं फूल .. वॉव किती सुर्रेख आहे..
झाडाला फारच वर चिंचा लागतात त्यामुळे कधी फुलांकडे लक्षच गेलं नाही..
पानांच्या आकारावरून 'कुंभा'
पानांच्या आकारावरून 'कुंभा' वाटतो आहे. Careya arborea.>>>>> मलाही तेच वाटतंय ....
चिंचेचं फुल लै भारीए रे - मला नसतं ओळखता आलं ....
(तेथे पाहिजे जातीचे - दिनेशदा, साधना, सरिवा, जागू, इ. ... )
कुम्भच आहे. शशांक मलाही
कुम्भच आहे.
शशांक मलाही ओळखता आले नाही कारण जिप्स्या त्याच्या कॅमे-यातुम फोटो काढतो आणि नखाएवढ्या गोष्टी हाताएवढ्या करुन दाखवतो. चिंचेचे फुल एक सेमी, पण त्याच्या फोटोत ते गुलमोहर वाटतेय..... लोक हाय फाय फोटो टाकुन फशिवत्यात गरिबांना..
झाडाला फारच वर चिंचा लागतात त्यामुळे कधी फुलांकडे लक्षच गेलं नाही..
हमे तो आम से मतलब, पेड कौन गिनेगा.. त्यामुळॅ आम्ही फक्त चिंचा पाहतो, फुले पाहात नाही बसत.. है ना वर्षू???
कोणीतरी गौराम्मासाठी रायआवळा/आवळा याच्या पानाचा फोटो टाका रे.. आवळ्याने ही पाने बघितली तर आत्महत्या करेल, माझी पाने एवढी मोठ्ठी कशी झाली म्हणुन....
नमस्कार सगळ्या निसर्ग
नमस्कार सगळ्या निसर्ग प्रेमींना .....
मायबोली सभासद होऊन ३ वर्ष झाली पण एक दिवस असा गेला नाहि की निसर्गाच्या गप्पा हा धागा पाहिला नाही.>>>>>> गौराम्मा - स्वागतम् .... सुस्वागतम्.....
आज मात्र फार ईच्छा झाली तुम्हा सगळ्याशी गप्पा मारायची.. >>>>>> जरुर येत रहा इथे, गप्पा मारा, तुम्हाला काही माहिती असेल तर इथे शेअर करा, फोटो टाका ....
या रविवारी एका मित्राकडे गेलो
या रविवारी एका मित्राकडे गेलो होतो. त्याच्या बैठकीच्या खोलीला एक मोठी खिडकी होती आणि त्याला बाहेरच्या बाजूने ग्रिलवर जाळी लावली होती.
आम्ही सगळे गप्पा मारत असताना माझ्या लक्षात आले की त्या जाळीवरुन एक खार हळुहळु चालली आहे आणि तिच्या तोंडात काहीतरी आहे. मी हळूच त्या खिडकीकडे गेलो व डोकावून पाहिले तर काय खारुताईंच्या तोंडात एक गोडुली खारुताई (पिल्लू) - त्या आई खारीने त्या पिल्लाला अलगद तिथल्या कट्ट्यावर ठेवले - त्याचे अंग जरा पुसून काढले - परत त्याला तोंडात घेऊन खारुताई जवळच्याच झाडावर पसार ....
हा फोटो मात्र आंतरजालावरचा ....
जिप्स्या १८ तारखेपर्यंत परत
जिप्स्या १८ तारखेपर्यंत परत येणार ना.. १८ तारखेला मुंबईत भेटता येईल.. १९ सकाळही चालेल.. ( संध्याकाळी मी
परत जातोय. ) तूम्ही ठरवा.
शशांक, माझ्या गोव्याच्या घरी खारीने गवताचे घरटे बांधले होते. खिडकीची काच आणि जाळी याच्या मधे.
साधारण चिमणीसारखाच आवाज करायची. ते खारीचे घरटे आहे ते मला फार नंतर कळले ( खारी घरटे करतात हेच माहीत नव्हते. ) ३ वर्षे मी ती खिडकीच उघडली नव्हती.
पण कावळे कधी खारीच्या मागे लागलेले बघितले नाहीत. त्या फार नेटाने प्रतिकार करतील किंवा वेगाने पळतील तरी.
गौराम्मा... इथे सगळ्यांचेच स्वागत आहे.
उजू, कच्च्या चिंचा शेकोटीत
उजू, कच्च्या चिंचा शेकोटीत भाजून खुप मस्त लागतात. लहान मुलांना असल्या चवी आपणच शिकवायला हव्यात. लता मंगेशकरला पण त्या आवडायच्या लहानपणी. "आमचे चौदावे वर्ष" असा लेख तिने किशोर दिवाळी अंकात लिहीला होता.
गौराम्मा - स्वागतम् ....
गौराम्मा - स्वागतम् .... सुस्वागतम्.....
>>>>>> जरुर येत रहा इथे, गप्पा मारा, तुम्हाला काही माहिती असेल तर इथे शेअर करा, फोटो टाका ....>>>>+१. गौराम्मा स्वागत.
खारीचा फोटो आणी माहिती
खारीचा फोटो आणी माहिती इंटरेस्टिंगे.. खारीचं घरटं .. खरंच ऐकलं नव्हतं.. खार मॅमल आहे ना?? म्हणून तिच्या घराला घरटं नाव मजेशीर आहे..
साधना हाँ रे... चिंचा खानेसे मतलब..
आणी हा जिप्स्या ना मुद्दाम कोडं घालतोय.. आपल्यासारख्याना .. नाही .. नाही.. माझ्यासारख्यांना कोड्यात पाडायला
मस्तच शशांक. दिनेशदा, आम्ही
मस्तच शशांक.
दिनेशदा, आम्ही १३ला परत येतोय आणि १४ तारखेला मी सुट्टी घेतली आहे. १९ सकाळचं जमेल मला. शनिवार आहे आणि मला सुट्टी असते. १९ला सकाळी भेटुया नक्कीच
साधना, वर्षूदी
कदाचित खारीने चिमणीचे घरटे
कदाचित खारीने चिमणीचे घरटे हायजॅक केले असेल !
कुंभ ट्री?????????
कुंभ ट्री????????? बोटेनिकल नाव काय आहे??????
सासवडची अंजीर
सासवडची अंजीर
अंजीर अगदी यम्मी आहेत
अंजीर अगदी यम्मी आहेत !
शशांकजी, खारीची माहिती मस्तच. निसर्गाची किमया पाहताना थक्क व्हायला होतं.
गौरम्मा, सहर्ष स्वागत.
शांकली, दिसली नाही बरेच
शांकली, दिसली नाही बरेच दिवसात ?
वर्षू या सगळ्या झाडांबद्दल मी
वर्षू या सगळ्या झाडांबद्दल मी सविस्तर लिहिले होते, पण आता ते लेख गायब झालेत.
अगदी कुंभासारखी फळे असतात म्हणून हे नाव, फुलेही देखणी.. पण फुलांना आणि फळांना खुप दुर्गंधी येते.
जिस्प्या.. अगदी अंजीरी रंग ना... आपल्याकडे हिरवी, पिवळी आणि काळी अंजीरे दिसत नाहीत. चवीत फारसा फरक नसतो.
अॅड विनर आहे अदीजो - होय तो
अॅड विनर आहे अदीजो - होय तो कुंभा आहे.
विकतचे पॉपकॉर्न शक्यतो टाळा
विकतचे पॉपकॉर्न शक्यतो टाळा बरं ( इथे पहा काय लिहिलेय ते http://www.loksatta.com/navneet-news/the-smell-of-popcorn-628499/ )
आजकाल साधारणपणे जेवणातल्या डिशेसमध्ये मका असतो. मक्यामध्ये कार्बोहायड्रेट्स अन्न विपुल प्रमाणात असते, शिवाय त्याच्या दाण्याभोवती असलेले सेल्युलोजचे आवरण न पचणारे असते, त्यामुळे पचनमार्ग साफ ठेवायला मदत होते. मक्यापासून तयार केलेला पॉपकॉर्न हा पदार्थ तर मुलाबाळांचा नि तरुणाईचा आवडता पदार्थ होय. त्यातच लोण्यांत तयार केलेल्या पॉपकॉर्नची मजा काही वेगळीच असते, पण सावधान, बरं का!
कृत्रिम लोण्याचा थर दिलेल्या पॉपकॉर्नला खमंग वास येतो ना, त्याने 'पॉपकॉर्न लंग' ही व्याधी जडू शकते. आपल्या श्वासातून हा हवाहवासा गंध फुफ्फुसात जातो तेव्हा त्यासोबत एक रसायन आपल्या पोटात जाते. त्याचे नाव 'डायअॅसिटील' होय. वास्तविक, हे नसíगक रसायन लोण्याचा एक घटक असतो व तो दूध, लोणी, मस्का, चीज, बीअर, वाइन यांत सापडतो. या मूळ पदार्थातील त्याचे अस्तित्व मुळीच हानिकारक नसते. त्याचे रासायनिक सूत्र आहे H3COOCH3.. पण, हे रसायन वायुरूपात फुफ्फुसात घुसते तेव्हा तिथल्या लघुश्वासनलिकांना इजा पोहोचते. त्या खराब झालेल्या फुफ्फुसाच्या नळ्या कायमस्वरूपी निकामी होतात. त्याला 'ब्रोंकाओलिसीस अॅब्लिटेरंस' असे म्हणतात.
तुम्हाला पॉपकॉर्नची प्लास्टिक थैली हुंगण्याची सवय असेल तर तुमच्या आरोग्याला धोका आहे, हे लक्षात घ्यावे. पॉपकॉर्न भाजणारे विक्रेते आणि पॉपकॉर्नच्या फॅक्टरीत काम करणारे कामगार यांना फुफ्फुसाच्या आजाराचा धोका असतो. दिवसातून दोन वेळा मक्यापासून तयार होणाऱ्या लोणीयुक्त पॉपकॉर्नच्या पिशव्या हजम करणाऱ्यांनी सावधानता बाळगलेली बरी. त्याचप्रमाणे, चित्रपटगृहातील विक्रेतीमुलेसुद्धा या मक्याच्या पदार्थाच्या सतत सान्निध्यात राहिल्याने आपले स्वास्थ्य बिघडवू शकतात.
घरी पॉपकॉर्न तयार करताना एक खबरदारी घेता येते ती म्हणजे ओव्हनमध्ये भाजलेल्या नि फुललेल्या मक्याच्या लाह्य़ा द्रवरूप लोणी लावून खात मजा लुटता येते. शिवाय भाजलेले मकेदेखील खायला चविष्ट असतात, त्याला पसंती दिली तर उत्तमच.
जोसेफ तुस्कानो (वसई) मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई office@mavipamumbai.org
Pages