निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

'आम'साल>>>>>>माझा केजरीवाल झालाय >>> तु गपगुमान भाजी खायची सोडुन त्यावर पिएचडी करु लागलास. Proud

उजू, नितीन Proud

तु गपगुमान भाजी खायची सोडुन त्यावर पिएचडी करु लागलास.>>>>>भाजी आवडीची नव्हती म्हणुन त्यातलं फकस्त आमसूल (???) कि (वाळवलेल)) कैरीच खाल्ली. Wink

आमसोलं, आंबोशी, कोकम सही चर्चा चाललीय.
जिप्सी, कुठुन फंदात पडलात या ? कोकणातलं का SSS ही म्हणजे का SS ही सोप नसतं . जास्त लिहायला वेळ नाहीये म्हणुन नाहीतर मी सुध्दा आणखी थोडं कन्फ्युज करु शकते. .

अरे मग दोघांनाही आण इथे... !
फुटी कढी, सोलकढी, ओसामण, आमेर कासुंदी, आमसूलाची चटणी, कालवण, तिखलं... सगळं जेवायला घालू..
आणि गैरसमज दूर करू.. तिच्या घोवाला कोकण दाखवू !

कोकणातलं का SSS ही म्हणजे का SS ही सोप नसतं >>> निष्कर्श = कोकणची माणस साधी भोळी ...... सर्व आंबट सालींना सोपा शब्द आमसुल वापरतात. Happy

मनीमोहम, सायली धन्यवाद Happy

यापुढे मी कोकमाला "कोकम" आणि वाळलेल्या कैरीला "वाळलेली कैरी"च म्हणेन. म्हणजे कन्फ्युजनच नको. Proud

रच्याकने, यानिमित्ताने गेळा, अळु आणि आमसूल याबद्दल् (मला माहित नसलेले) वाचायला मिळाले, हे हि नसे थोडके. Happy तुम्हा सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद!!

तिच्या घोवाला कोकण दाखवू !>>>>दिनेशदा, ते दोघेही कोकणातलचे आहेत, मीच सातार्‍याचा. Happy

नितीन Happy Happy

महाबळेश्वरमध्ये भरपुर गेळ्याची झाड आहेत. गेळ्याचा उपयोग साबण बनवायला करतात. त्याची फळ पक्षी-प्राणी कोणीही खाण्यासाठी करत नाहीत.

कोकणचा मेवा

रातांबे
kokanMeva_Ratambe.jpg

करवंद
kokanMeva_Karwand1.jpgkokanMeva_Karwand2.jpg

काजू
kokanMeva_Kaju.jpg

फणस
kokanMeva_Phanas.jpg

हापूस
kokanMeva_Hapus.jpg

झाडावरचे रातांबे अजुन पाहिले नाही. हे बारमाही असतात का? >>> नाही जिप्सी, साधारण आंब्याच्या मोसमातच येतात. पुढच्या वर्षी आपली कोकण विजिट मस्ट

धन्यवाद सर्वांना!

फणसाच्या शेजारी कुकूला ऊभे करायचे होतेस ना !>>> तो तेव्हा महत्वाच्या कामात व्यस्त होता.

kuku_1.jpg

Pages