निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जागू तू फोटो टाक पिकलेल्या अळूचे, मला बाजारात जायला मिळाले तर मी पण बघते, नवऱ्याला सांगितलंय बघायला ऑफीसहून येताना, बघूया आणतो का?

गूगल इमेजवर "अळू" असे सर्च केल्यावर अळूची पाने आणि अळुवड्याच दिसत आहेत. Sad

जागू, अळुवड्या भ्याआआआआअ. :भोकाड पसरणारा बाहुला:

शोभे, सध्या आमचे शेजारी गावाला गेलेत आणि मी त्यांच्या झाडांना पाणी घालतेय. जिप्सी म्हणाले तसं.

शेजार्‍यांना सांगुन जा. >+१

नाहितर कामवालीला.

रच्याकने पाणी टाकल्यावर आंब्याच्या पेट्यातले गवत मातीवरुन कव्हर सारखे टाकाणे. बाष्पीभवन कमी होईल.

नाहीतर बीसलेरी ची बाटली तळ कापुन उलटी खुपसुन ठेवणे व जाताना त्यात पाणी भर, होपफुली पाणी जरा जरा मातीत जावे ही अपेक्षा. प्रयोग आधी करुन पहा. एकाच कुंडीत नाहीतर त्याच बाटलीने मला मारशील Uhoh

तुम्ही जे अळू बोलतायेत त्याला सरळगाव-मुरबाड साईड्ला आळीव म्हणतात. मी कायमच पिकलेले पाहिलेत. साधारण चिकू सारखेच दिसतात फक्त जास्त नाजूक आणि रसरशीत असतात आळीव.लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपल्यावर जूनच्या पहिल्या आठवड्यात माळशेज घाटातून एस टी महामंडळाच्या बसने घरी परत येत असताना घाट उतरल्यावर प्रत्येक थांब्यावर तिथले कातकरी आळीव विकायला येत. आंबट पण जरा वेगळीच चव असते आळीवची.य वर्ष झालीत आता आळीव खाउन.
शोभा, कुंडीत किंवा कुंडी खाली जाड गोणपाटाचा मोठा तुकडा ओला करून ठेव आणि झाडांना पाणि घालून निघ जाताना.
त्याच कापड जाड असल्याने ते २-३ दिवस पाणि धरून ठेवेल आणि झाडांना जरूरी पुरते पाणि मिळेल.

शेजार्‍यांना सांगुन जा. डोळा मारा>>>>>>>>>>जिप्स्या, तु पुण्यात ये.शनीवार वाड्यावर तुझा जाहीर सत्कार करते. Proud

शोभे, सध्या आमचे शेजारी गावाला गेलेत आणि मी त्यांच्या झाडांना पाणी घालतेय. जिप्सी म्हणाले तसं.>>>>>>>>>>.मी कुठेही चालली नाही. मैत्रिणीच्या घरी पेस्ट कंट्रोल करणार आहेत. त्यामुळे ४ दिवस ते नातलगांकडेजाणार आहेत. व घर उघडायचे नसल्याने हा प्रश्न निर्माण झाला. मी तिला दुधाच्या १ लिटरच्या पिशवीत पाणी भरून त्याला सुईने फ़क्त एक छिद्र पाडून ठेव असे सांगितले. पण ते पाणी ४ दिवस राहील का? Uhoh

नाहीतर बीसलेरी ची बाटली तळ कापुन उलटी खुपसुन ठेवणे व जाताना त्यात पाणी भर, होपफुली पाणी जरा जरा मातीत जावे ही अपेक्षा. प्रयोग आधी करुन पहा. एकाच कुंडीत नाहीतर त्याच बाटलीने मला मारशील>>>>>>>>>..मोनालिप, मी काही येणार नाही मारायला. तुझा पत्ता दे मैत्रीणीला देते. Wink

उजु करेक्ट. माझ्याकडे कामाला येतात त्या ताई मुरबाडच्या आहेत आणि सासर नेरळ्-कर्जत आणि त्या अळीव म्हणतात आणि माझ्यासाठी आणतात पण.

जिप्स्या कधी येतोयस बोल अळूवडी खायला? अजुन तुझे केळवण बाकी आहे. बायको सकट ये आमच्याइथे काही गड किल्ले चढायचे नाहीत. Happy

रात्री शोधते फोटो अळूचे.

शोभे बाटलीचीच आयडीया बरोबर वाटते मला.

चार दिवस घर बंद असेल तर बिसलेरीच्या बाटलीला खालून सुईने छोटी भोकं पाडा दोन तीन. अन मग त्यात पाणी भरुन ती बाटली झाकण न लावता मुळांपाशी ठेवा. थोडं थोडं पाणी झिरपत राहील. इथे ऐन उन्हाळ्यात काही फुलझाडं फार कोमेजतात , तर त्यांच्या मुळापाशी अशा पाण्याच्या बाटल्या ठेवते मी.

नाहीतर मोठ्या बादलीत पाणी भरुन त्यातून जुन्या चादरीच्या पट्ट्या एक टोक पाण्यात बुडेल अन दुसरं टोक मातीवर रेस्ट होईल असे ठेवता येईल. वातीतून तेल कसे शोषले जाते त्या अ‍ॅक्शनने पाणी माती पर्यंत पोचेल.

अगदी कोवळी छोटी रोपे असतील तर सरळ बरोबर घेऊन जावीत.

ह्म्म्म... कदाचित तो कोकीळ असू शकतो पण गुगल आणि विकिपीडिया वरच्या फोटोंमध्ये कोकीळचे डोळे लालभडक दाखवले आहेत परंतु याचे डोळे लाल नव्हते .

@जिप्सी तो डोमकावळा नसणारच कारण तो पूर्ण काळा असतो डोळे सुद्धा..! Lol

हि कोकिळा Happy

koel female1.JPG

नीर, मिस्टर आणि मिसेस कोकिळ दिसायला वेगळे असतात. मिस्टर गातात, मिसेस नुसत्याच किंचाळतात ( कोकिळांच्यातल्या )

उजू म्हणतेय तेच अळू.. नितीनला पण माहीत असणार कारण त्या भागातही भरपूर असतात. त्याची चव नेमकी सांगता येणार नाही. सगळ्यांना आवडतीलच असेही नाही.

दिनेशदा अळूच्या चवीबद्दल अनुमोदन, काल नवऱ्याला त्याची चवच सांगता येईना मला. अरे अशी वेगळीच असते तुला दिलं होतं खायला तू विसरलास हेच सांगत होते.

ईन मिन तीन ह्यांनी दिलेल्या फोटोपे़क्षा थोडे वेगळे मिळते अळू, जरा अजुन डार्क कलर आणि थोड्या सुरकुत्या असतात, पिकलेली असतात तेव्हा, थोडे पिठुळ लागते.

आता आळू / आळीव फोटोत तरी बघायची उत्सुकता लागलीये.. जागु लौकर शोध..

मला वाटतं मी या फळाचा उल्लेख ,' श्याम ची आई' या पुस्तकात वाचला होता... Happy

मला नाही आवडत अळू खायला. मी आपली शिडीने छपरावर जाऊन हुंदडायला मिळतं म्हणून जायचे अळू काढायच्या नावाखाली. बाकीच्या मामे भावंडांना खूप आवडत.

अश्विनी.. मी झाड नाही बघितलं.. कोल्हापूरला अंबाबाईच्या देवळासमोर असतात विकायला.

दिनेश, वादिहाशु.बराच उशीर झाला.सॉरी
जिप्सी, त्या गेळा फळाला गोव्यात गेळे म्हणतात. ह्या फळांना चेचून पाण्यात टाकतात, ज्यामुळे पाण्यातले मासे मरतात आणि तरंगायला लागतात. जंगलातहि मासे खायची ईच्छा झाली तर विनासायास मासे मिळवायचा हा उपाय आहे.( अदिजो ने जी लिंक दिली आहे त्यात म्हटलं आहे-ते मत्स्यविष आहे. पण आपल्याला काही होत नाही.) इथे मला पॅपिलॉन- ॥ (ले-. हेन्री शॅरियर) ह्या नॉवेल मधला उल्लेख आठवला. कि पाणकुत्रा किंवा माकड, कुठल्यातरी झाडाचा पाला कुस्करुन पाण्यात टाकायचा. काहीवेळाने मासे मरुन पाण्यावरती पालथे झाले कि ते खायचे. हा उद्योग लपून पाहिल्यामुळे दाट जंगलातही शास्त्रद्न्यांच्या टिमला हा लेखक माश्याचं जेवण रोज खिलवू शकला.

सगळ्या गप्पा छान. वाचनाचा बॅकलॉग भरुन काढतेय.

जागू - तुझ्या काश्मीर च्या फोटो मधील फुले - Pansy - http://en.wikipedia.org/wiki/Pansy

तुझ्या काश्मीर च्या फोटो मधील पक्षी - अमेरिकन रॉबिन
http://www.birdspix.com/north-america/thrushes-turdidae/american-robin

अंजली, आभार.
मला वाटतं समुद्रफळाच्या पानांचा पण असा वापर करतात. मॅन व्हर्सेस वाइल्ड मधे पण असे दाखवले होते.

आता प्लीजच त्या अळूच्या फळांचा फोटो टाकाच कोणीतरी. मी आईकडून खूप ऐकलंय या फळांबद्दल. त्यामुळे पहायची उत्सुकता आहे.

बघु या आवंदा पीक पाणी कसं आहे ते.>>>>>>> ममो अगदी अगदी! Proud
डीसीत(मंडळी माफ करा पण डीसीतल्या निसर्गाच्या गमती जमती संपेपर्यन्त हेच पालुपद रहाणार बरं! हरदासाची कथा मूळ पदावर!) एक शेजारीण आहे. पलोमा नावाची. व्यवसायाने नर्स. तिथे कम्युनिटीत फिरताना ओळख झाली. साधारण माझ्याच वयाची. असंच कधी तरी भेटल्यावर म्हणाली.............तुम्ही या वीकेन्डाला काही खास करत नसलात तर...व्हाय डोन्ट यू विजिट माय बार्न?
आम्ही काय एका पायावर तयार!
तर ही पलोमा आणि हिची एक मैत्रिण यांचं एक प्रचंड मोठं बार्न आहे. काही एकरात. कडेने संपूर्ण कंपाउंड. एक मस्त छोटंसं खोपट. त्यात सगळं घोड्यांशी रिलेटेड सामान!
आम्ही एका वीकेन्डास गेलो बार्नवर. तर दोघी मैत्रिणी अगदी शेतकरणीच्या वेशात कुदळ फावडं घेऊन स्वता: जमीनीत भराव घालण्याचं काम करत होत्या. इथे यूएसेत श्रमप्रतिष्ठा अनुभवली. हे काम बायकांचं, हे पुरुषांचं असं काही नाही. आणि कुणी तरी या कामाला येईल आणि हे माझं काम करून देईल असंही नाहीच. (यात कोणत्याही देशास कमी लेखण्याचा प्लीजच हेतू नाही!)
मी पलोमाला विचारलं ..........तू हे फक्त छंद म्हणून करतेस की .........................?
ती म्हणाली......माझे २ घोडे आणि एक पोनी आहे. पोनी माझ्या नातीचा (वय ७) आहे. आणि मी तरी फक्त छंद म्हणून हे करते.
मी आणि माझी मैत्रिण वीकेन्डास इथे असतो. तिथे एक छोटा गोड दिसणारा ट्रॅक्टरही होता. पलोमा म्हणाली.....हा मी जुन्या बाजारातून घेतला आहे. खूप उपयोग होतो याचा.
पलोमाच्या ..." मी तरी" वरून असं वाटलं की मैत्रीण हे फक्त छंद म्हणून करत नसावी.
तर तिथले हे फोटो. (पलोमाची परवानगी.....या मीन इट..... घेऊन इथे डकवते :फिदी:)


Pages