निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा>>य मानु .. वेलकम बॅक!!!!!!! Happy

सर्वांनी तुला खूप मिस केलं..

गर्मी, जेट लॅग ना ????

हाय ममो आणि वर्षू!
गर्मीची सवय होतीये आणि जेट लॅगही पहिले एक दोन दिवसच!
आता वाचतीये सगळं हळूहळू!

मला असं वाटतं की पाकिस्तानातील कसुरी या भागातील ती आहे म्हणुन कसुरी मेथी. त्या भागात होणार्‍या मेथीला एक विशिष्ट स्वाद असतो

जसे आपल्याकडे कराड भागातल्या गोट्याची वांगी तसे.

शुभेच्छांसाठी परत आभार.
आता मानुषीच्या फोटोंची आणि लेखनाची वाट बघतोय.

वर्षू, ती मेथीची वेगळी जात असते. स्वादही वेगळा असतो. आपली मेथी सुकवली तर अगदीच लेचीपेची होते. त्या मेथीसारखी कडक रहात नाही.
कसुरी मेथी वापरताना ती जरा गरम करून हाताने चुरडून घालायची, म्हणजे चांगला स्वाद येतो. पण फार कमी वापरायची नाहीतर पदार्थ कडवट होतो.

हां तेच पाहात होते अजून दिनेश ची कमेंट कशी काय नाही आली .. Happy
ओक्के.. थांकु

वादि कसा केलास साजरा..

पाच जण एकत्र उभे असताना बाजुलाच एक नारळ झाडावरुन पडला.
डोक्यावर पडला असता तर ....
एक जण म्हणाला की नारळ कधीही डोक्यात पडत नाही.
आमच्या गावी खुप नारळाची झाडे आहेत. पण
मीही कधीही असे ऐकले ही नाही. कोणाच्या डोक्यात नारळ पडला आणि इजा झाली.
कोणाला काही अनुभव आहे का?
दीनेशदा ना नक्कीच माहित माहीत असेल याबद्दल.

वादि... तूम्हा सगळ्यांची आठवण काढत साजरा केला. तूम्ही सगळे भेटता तोच वाढदिवस आणि तोच दसरा !

नारळाच्या बाबतीत अशी श्रद्धा आहे खरी. इव्हन वादळात नारळाचे झाड पडले तरी ते घरावर पडत नाही असे मानतात. याला काही शास्त्रीय आधार आहे असे मी वाचले नाही कधी. झावळी देखील डोक्यावर पडत नाही असे मानतात, पण तसे व्हायला त्या पानांचा आकार आणि हवेचा अवरोध यामूळे मोठा आवाज येतो आणि बाजूला व्हायला वेळ मिळतो.
नारळाच्या बाबतीत, तो डोक्यावर पडल्याच्या घटना दुर्मिळ असल्या तरी मी ऐकल्या आहेत.
केरळमधले अनुभव काय आहेत ते बघायला हवे.

सांगलीला (माहेरी) घराभोवती १० नारळीची झाडं आहेत. कधीच डोक्यात नारळ पडला नाही. आणि आता इथेही अंगणात २ ना. झाडं आहेत. पण इथेही कधी डोक्यात नारळ पडला नाही. गेटकडे जायचा रस्ता या झाडाखालूनच आहे.
आता मानुषीच्या फोटोंची आणि लेखनाची वाट बघतोय.>>>>>>>>>>> दिनेश आय्यम आनर्ड ! :इश्शः

हो दिनेश.........मी पिकासावर एडिट करते कधी कधी. तिकडे लेकीकडे ईन्स्टाग्राम म्हणून काही तरी आहे, त्यात फार मस्त ऑप्शन्स आहेत एडिटिंगचे. त्यात एक फोटो केला होता....इथे टाकला होता.

हो तो आठवतोय ना ! मोठ्या स्क्रीनवर इफेक्ट्स आणखी छान दिसतात. क्रॉप आणि ऑटो कॉन्ट्रास्ट ने बर्‍याच वेळा काम होते. कधी कधी आपल्याला जाणवतही नाहीत एवढे डीटेल्स कॅमेराने टिपलेले असतात.

वाळवंटातील टेकड्या स्थिर नसतात, वार्‍याने त्या जागा बदलत असतात. हे आपण भूगोलाच्या पुस्तकात वाचलेले असते. मला ते प्रत्यक्ष ओमानमधे बघायला मिळाले. रस्त्याच्या डाव्या बाजूची टेकडी अक्षरसः रस्ता ओलांडून उजव्या बाजूला जाताना बघितली. दोन टेकड्यांना जोडणारा एक फुटभर रुंदीचा वाळूचा पट्टा रस्त्यावरून सरकताना दिसत होता. त्यावेळी डिजीटल कॅमेरा बाजारातही आले नव्हते. पण ते दॄष्य बघताना विचार आला, किती काळ लागत असेल याला ?

त्याचे उत्तर आफ्रिका मालिका बघताना मिळाले. वाळूच्या टेकड्यांची अशी हालचाल टिपण्यासाठी बीबीसी ने एक कॅमेरा एका जागी स्थिर ठेवला. त्या कॅमेरांनी टिपलेली टाईम लॅप्स दॄष्ये डोळ्याचे पारणे फेडतात. काही सेकंदाची ही दृष्ये टिपण्यासाठी किती काळ तो कॅमेरा लावून ठेवला असेल याची कल्पना आहे ? तब्बल ६०० दिवस.. !

दिनेशदा,
वाढ्दिवसाचा शुभेच्छा.....जरा बिझि असल्यामुळे इकडे फिरकले नव्हते...हा आम्रस तुमचा वाढ्दिवसानिमित्त
mango0008.JPG Happy

दिनेशदा, वाढदिवसाच्या उशीराने खुप खुप शुभेच्छा!!!!!

सगळेच फोटो मस्त.

नारळ झाडावरुन पड्ण्याबादाल माझे बाबा असेच म्ह्णायचे पण आमच्या कॉलनी च्या बाजूला सम र्थ नगर म्हणून एक कॉलनी आहे, तिथे नारळाची बरीच झाडे आहेत. नारळ डोक्यावर पडून अपघात व्हायचे दोन किस्से झाले आहेत.
आम च्याच बिल्डींग मधील एका काकांच्या डोक्यावर नारळ पडला होता आणि ते खूपच सिरीयस होते.

कसुरी मेथी साठी मी जी बाजारात मेथी मिळते ती वाळवून\सुकवून ठेवली आहे. तीची चव मला विकतच्या कसुरी मेथी सरखीच वाटते. Happy

२० वर्षा पूर्वीची घटना आहे, माझ्या घरा जवळ एका देवळाच्या बाहेर एक बाई बसली होती। . वाऱ्या मुळे ज़जड हालत होते। . अचानक ज़ाद पडल्याचा आवाज झाला । तशी ती बाई उठून आसरा शोधायला बाजूला धावली पण । बिचारी झाडा खाली सापडून मरण पावली ...

अजून एक बाळाच्या डोक्यावर नारळ पडला होता । बाल आईच्या खंद्या वर झोपलेले होते …बरेच दिवस ते हॉस्पिटल मध्ये होते … आता कसे आहे ते माहित नाही

२० वर्षा पूर्वीची घटना आहे, माझ्या घरा जवळ एका देवळाच्या बाहेर एक बाई बसली होती। . वाऱ्या मुळे नाराळाचे झाड हालत होते। . अचानक ज़ाद पडल्याचा आवाज झाला । तशी ती बाई उठून आसरा शोधायला बाजूला धावली पण । बिचारी झाडा खाली सापडून मरण पावली

अजून एक बाळाच्या डोक्यावर नारळ पडला होता । बाल आईच्या खंद्या वर झोपलेले होते …बरेच दिवस ते हॉस्पिटल मध्ये होते … आता कसे आहे ते माहित नाही

अरे वा... मस्त आमरस.. आणि परत आभार. उशीर झाला ते छानच की मला आणखी काही दिवस मिळाले साजरा करायला.

ते गुलमोहोराचे झाड बघून माझ्या मनात म्हंटला तर क्रूर विचार आला... अशी जोरदार सर यावी आणि गुलमोहोराची फुले, कळ्या सर्व रस्त्यावर पडावे.. प्रत्येक सात जूनला भारतात मी हे अनुभवले आहे !

shobha mast photo.

gulmohor sadhya mast phulalay sagalikade.

Pages