निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह मानुषी, काय मस्त माहिती आणि मस्त फोटो आहेत. मी जिथे काम करतो त्या पूनावाला साहेबांचे स्टड फार्म असल्याने आम्हाला कायमच अतिशय रुबाबदार, उमदे घोडे पहायला मिळतात. अगदी सुरुवातीला जेव्हा मी ऑफिसला येत असे तिथल्या मेन बिल्डिंगसमोर एक मोठे रिंगण होते आणि स्वतः पूनावाला साहेब आणि इतर काही स्टडचे अधिकारी, व्हेट्स वगैरे तिथे उपस्थित असत. मग एकेका घोड्याला घेऊन ती स्टडची माणसे येत व एक फेरी मारुन निघून जात - मी तिथल्या एका माणसाला विचारले की हे सगळे काय करतात तेव्हा कळले की त्या घोड्याच्य नुसत्या चालीवरुन त्याला काही दुखणे आहे का त्या घोड्याच्या खाण्यात काही बदल करायचा का हे सगळे ठरवले जाते - आणि सगळ्यात आश्चर्याची गोष्ट म्हणजे आमचे पूनावाला साहेब या सगळ्यातले तज्ज्ञ आहेत ... त्यांना घोड्यांबद्दल प्रचंड प्रेम (पॅशन) आणि माहितीही आहे ...

घोडा हा अतिशय उमदा प्राणी व अतिशय बुद्धिमान. "ब्लॅक स्टॅलियन" या चित्रपटात घोड्याने जे काम केले आहे त्याला तोडच नाहीये - जर कोणाला हा चित्रपट पहाता आला तर जरुर पहा - फारच भारी - त्या घोड्याने त्याच्या हालचालीतून, डोळ्यातून वेगवेगळे भाव असे प्रकट केलेत की उत्तम नटानेही त्याच्याकडून काही शिकावे ...

अळुचे शास्त्रीय नाव Meyna laxiflora
पार जांभूळ Olea dioica

याच्याच बरोबर एक झाड सापडले. कोकणात खुपदा " कडू काजर्‍याचे बी " असा उल्लेख बोलण्यात येतो.
तो काजरा म्हणजे Strychnos nuxvomica असेल का ?

काजरा म्हणजे Strychnos nuxvomica च.
त्यलाच कुचला असेही म्हणतात. अतिशय विषारी. Strychnine हे जालीम विष यत असते. पण ही फळे धनेश पक्ष्यांना आवडतात. तळकोकणात धामापूरच्या तलावाजवळ याचा मोठा वृक्ष पाहिला होता. त्यावर प्रचंड संख्येने धनेशही होते.

तळकोकणात धामापूरच्या तलावाजवळ याचा मोठा वृक्ष पाहिला होता. त्यावर प्रचंड संख्येने धनेशही होते.>>>>>>>.....आमचयकडे पण कोकणात नदीच्या काठावर याचं खूप मोठ झाडं होतं. पण तेव्हा धनेश वगैरे बघायची अक्कल नव्हती. Proud

अदीजो.. पक्ष्यांना विषारी बिया, फळे खाल्ल्यावर त्यावर उपाय काय करायचे ते पण माहीत असते. अमेझॉन काठावरच्या पोपटांना नदी काठची माती खाऊन असा विखार घालवताना बघितले गेले आहे. हे धनेशही असे काहितरी करत असतील.

मानुषीताई, मस्तच.
आदीजो, माहितीबद्दल धन्यवाद. Happy

आमसुल - कापून वाळवलेल्या कैर्‍या
आमसुलं - कोकम

वरीलपैकी नक्की कुठलं बरोबर आहे?

कापून वाळवलेल्या कैर्‍यांना आमचूर म्हणतात.

रातांब्याच्या साली त्याच्या रसात बुडवून वाळवतात त्याला सोलं, कोकम, आमसूल अशी नावे आहेत. मनीमोहोर त्याबद्दल लिहिणार आहेच.

कच्ची रातांब्याची फळे कापून देखील वाळवतात. कर्नाटकात आणि गुजराथमधे ती वापरतात. त्याने फक्त आंबटपणा येतो, रंग येत नाही. गुजराथमधे त्याला ओट्स म्हणतात असे वाचल्याचे आठवतेय.

आमचूराचा प्रसार मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पंजाब वगैरे भागामधे जास्त आहे. तिथे कोकमाची झाडे नाहीत ना.
गोव्यातही कैर्‍यांची कापं वाळवून ठेवतात. मराठीत आंबोशी असा एक शब्द आहे. ती म्हणजे पण वाळवलेली कैरीच. त्याचे लोणचे करतात. ते खुप छान लागते.

कापून वाळवलेल्या कैर्‍यांना आमचूर म्हणतात.
रातांब्याच्या साली त्याच्या रसात बुडवून वाळवतात त्याला सोलं, कोकम, आमसूल अशी नावे आहेत>>>>>>मी हेच सांगत होतो. आज लंच टेबलवर एकाशी चर्चा चालू होती. त्याच्या भाजीत सुकवलेल्या कैरीच्या फोडी होत्या. तो त्याला आमसूल म्हणत होता आणि मी "आमसूल" म्हणजेच कोकम याच्यावरच अडुन बसलो होतो. अर्थात आमचूरबद्दल आमचं एकमत होतं. Happy
ऑफिसमध्ये माझ्या शेजारी बसणारी माझी कलिगही आमसूल म्हणजे वाळवलेल्या कैर्‍याच सांगत होती. योगायोगाने दोघांचेही गाव "चिपळूण" आहे. Happy

कापून वाळवलेल्या कैर्‍यांना आमचूर म्हणतात.>>>>रच्याकने, वाळवलेल्या कैर्‍यांची पावडर म्हणजे आमचूर ना? Uhoh

हो पावडरच.. पण त्या वाळवलेल्या कैर्‍यांच्या तुकड्यांना पण गोव्यात आंब्याची सोले म्हणतात, असे अंधुकसे आठवतेय.. खात्री नाही. बाजारात असायच्या त्या. मला आधी ते वाळवलेले मासेच वाटायचे. नंतर कळले काय ते.

मानुषीताई घोडे मस्त.

अळू बाजारात विकायला येत तेव्हा अजून डार्क कलर असतो.

कापून वाळवलेल्या कैऱ्याच्या पावडरला आमचूर म्हणतात, करेक्ट.

रातांबे, अरे वा कोकणात हाराभर रातांबे घेऊन आजूबाजूला ते फोडत बसतो गप्पा मारत त्याची आठवण झाली, मस्त हात लाल लाल होतात आणि मधेच तोंडांत टाकल्यावर तोंडही लाल होते.

खाद्यपदार्थात आंबटपणासाठी राज्याराज्यानुसार वेगवेगळे घटक वापरतात. दक्षिणेकडे चिंचेचा वापर जास्त ( म्हणून त्यांच्याकडे किडनी स्टोन्सचे प्रमाण कमी आहे ) तर पंजाबकडे टोमॅटोवर भर.. (म्हणून.... )

धन्यवाद अन्जू, दिनेशदा Happy

बहुतेक चिपळुणसाईटला वाळवलेल्या कैर्‍यांना आमसुलं म्हणत असतील. (not sure) Happy

अरे कोकमाला वाळवले - पुटं देऊन की झाले आमसुल
अर्ध्या कच्च्या कैरीच्या फोडी वाळवल्या की - आंबोशी
त्याचीच पावडर केली की - आमचूर
अजुन एक प्रकार आहे - कैरी किसुन भरपुर मीठ घालून ठेवायचे. चटणी / आंबा डाळीसाठी कधीही वापरता येते.

एवढा वाद घालणारी कोण ती ? आणि मायबोलीवर नाही म्हणजे काय ? आँ !>>> Lol
आण तिला ईकडे.
इथे बराच स्कोप आहे तिच्या स्किल्स ना Wink

Pages