निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काजळ काळी गर्द रात अन् कंप कंप अंगात
सळसळणार्‍या पानांनाही रातकिड्याची साथ

दोनच दिवसांपूर्वी अमावस्या होऊन गेल्याने चांगलाच अंधार दाटलेला. साधारण नऊच्या दरम्यान गावातल्याच एका वाटाड्याला घेऊन आम्ही निघालो. वाट गर्द रानातून जात्या, त्यात तृतियेच्या चंद्रकोरीचा कितीसा तो प्रकाश. विजेर्‍यांच्या प्रकाशात चालत होतो. सोबत फक्त पानांची सळसळ आणि रातकिड्यांची किरकिर.
घाटमाथ्यावर असल्याने हवेत किंचितसा गारवा होता पण सह्याद्रीतील चढउतारात आणि मे महिन्यामुळे अंगात घामाच्या धारा लागलेल्या. पुढे पुढे वाट अधिकच दाट झाडीतुन जाऊ लागली. अंधारातुन चालत होतो आणि अचानक एका वळणावर...... एका झाडावर अगणित काजवे चमकताना दिसले. संपूर्ण झाड काजव्यांनी भरलेलं होतं. एकाच वेळी सगळ्या काजव्यांचे स्विच ऑन ऑफ होत होते. झाडासोबतच समोरची दरीही हजारो काजव्यांनी लखलखत होती. Happy निसर्गाचा तो अद्भुत खेळ पाहताना भान हरपले. आयुष्यात पहिल्यांदाच सगळं पहात होतो, अनुभवत होतो. Happy वर नभांगणात लाखो तारका तर इथे जमिनीवर हजारो काजवे लुकलुकतं होते. आयुष्यात एकदा तरी अनुभवावी अशी हि "लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया". मे महिन्याच्या अखेरीस किंवा जून महिन्याच्या सुरूवातीला हा "काजवा महोत्सव" भरतो. हा सारा खेळ कॅमेर्‍यात साठवला नाही पण मनात मात्र कायमचा जपून ठेवला आहे.
Believe me कधीही विसरता येणार नाही असे दृष्य होते. Happy

जिप्स्या आता हे काय नविन काढलस? सांग निट काय झाल ते.

काश्मिरच्या सगळ्या गार्डन मध्ये असणारी ही फुलाची जात.

जिप्स्या मी लहानपणी असे हिरव्यागार शेतात एका मोठ्या झाडावर पुर्ण काजवे चमचमताना पाहीले होते.

फोटो का नाही काढलास? निदान मोबाईलमध्ये तरी काढायचास.

जिप्स्या, ते दृष्य अनुभवावे असेच असते. कॅमेरातही नाही पकडता येत.
खुप वर्षे झाली काजवा बघून. मलकापूरजवळ जोगाई येळवण नावाचे गाव आहे तिथे बघितली होती.
केनयात नाहीत, अंगोलातही नाहीत.. नायजेरियात मात्र होते.

अमानवीय लिहितोय कि काय हा ?>>>>> काजवीय लिहुन कासावीस करतोय हा.

फोटो का नाही काढलास?> निषेध. जिप्स्या म्हणेल इथे कोणी फोटो काढला म्हणुन निषेध करतो तर कोणी नाही काढला म्हणुन. Wink

असो तर मी पण आत्ताच निवळी (ईथला धबधबा स्पेशल आहे) येथे गेलेले, तिथे पण अंगणातल्या झाडावर (एका विशिष्ठ) भरपुर काजवे होते. हे असे ठरावीक झाडावर का असतात?

मला आठवते, कॉलेजला असताना (२००० च्या मागे पुढे) दिवा डोंबीवली दरम्यान रेल्वे ट्रॅकच्या दोन्हीकडे रात्री हे काजवे लुकलुकायचे. त्यावेळी मात्र त्यांचा असे संघटनात्मक वावर नसायचा. हल्लीच का मग? (त्यांना (राज)कारणाचे वारे लागले काय? वेगवेगळे पक्ष निघताहेत Uhoh )

आता औषधालापण मिळायचे नाही पण ते त्या भागात. Sad

काजवीय Proud

हि आंतरजालाहुन मिळालेली माहिती.

मे-जून महिन्याचे हे दिवस म्हणजे काजव्यांचा प्रजनन काळ असल्याचे अभ्यासक सांगतात. आपल्या जोडी दाराला आकर्षित करण्यासाठी हा कीटक चमचम करीत असतो. नर आणि मादीच्या मिलनानंतर नराचे जीवनचक्र थांबते. काजव्यांची ही वाढत जाणारी संख्या पावसाच्या आगमनाची आणि त्याच्या स्वरुपाची वर्दी देतात, असे स्थानिक आदिवासी मानतात. मोसमी पाऊस दाखल झाला की, पुढे तो चांगलाच जोर धरतो, नंतर त्याचे रौद्र तांडव सुरु होते. या रपाट्या पावसामुळे इटुकल्या-पिटुकल्या काजव्यांच्या जीवनचक्राचीही अखेर होते... तशी ही मयसभादेखील संपून जाते.

अमानवीय लिहितोय कि काय हा ? पण तो माझ्याच गणाचा आहे. त्याला वारं लागत नाही.>>>>> पण त्याच्या अंगी भटकंतीचं वारं भरलंय त्याचं काय ???? Happy Wink

सुदुपार.... दिनेश दा नी सांगीतल्या प्रमाणे बेलाचे सरबत... रविवारी केले होते....
जाम भारी लागते.... धन्यवाद दा!

bs1.jpgbs_0.jpg

अरे वा छान दिस्तंय सरबत Happy

जिप्स्या , काजवे पाहून युगं लोटलीयेतशी वाटताहेत.

लक्कीयेस..

जागु सुर्रेख आहे गुलमोहोर..

जिप्स्या , काजवे पाहून युगं लोटलीयेतशी वाटताहेत. >>>> काय सांगतीये वर्षुदी - माझ्या डोळ्यांसमोर तर अधून मधून का होईना पण काजवे चमकतातच .... Happy Wink

जिप्सी, सुरेख अनुभव, काश क्यापचर केला असता... असो..तरी वर्णन इतक सुंदर केलं आहे की... डोळ्यासमोर चित्र उभे राहिले... आणि खुप छान माहिती...

वर्षु निल, खरच छान लागतं हे सरबत, त्यात मि काळं मीठ पण घातलं होतं...

आयुष्यात एकदा तरी अनुभवावी अशी हि "लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया". >>>>>>>>>>>.हे आम्ही (मी व प्रज्ञा) बापलणीच अनुभवलयं. (टुकटुक) .
एकदा असेच रात्री खिडकीतून बाहेर लक्ष गेले आणि एकाच वेळी सगळे दिवे उघडझाप करताना दिसले. (तेव्हा लाईटच माहीत नसल्याने लाईटींग वगैरे डोक्यातल्या कुठल्याच कप्प्यात नव्हते. होते ते वेगळेच होते. :डोमा:) आजूबाजूला
गुडूप अंधार आणि त्यात हे दिसल्यावर आम्हाला भितीच वाटली. पण वडीलांनी त्वरीत माहिती दिली की "हे काजवे आहेत. " पण त्या क्षणी, आमच्या बालसुलभ मनाला ते पटलं नाही. आम्हाला वाटल हा काहीतरी 'बाहेरचा' प्रकार आहे. आणि आम्ही घाबरून नये म्हणून वडील समजूत घालत आहेत. पण मग दररोज बघून बघून भिती पळाली. Happy
प्रज्ञा, आठव ते दिवस. Proud

शशांक Proud

शनिवार/रविवार आम्ही पुण्यापासुन साधारण ७०-८० किमी अंतरावर असलेल्या रायलिंग पठारावर गेलो होतो. तेथे जांभळाच्या झाडासारखी (म्हणजे पाने आणि फळे) झाडे दिसली. जांभळासारखेच घोस लागलेले पण फळं आकाराने थोडे लहान. पान तोडुन, चुरगाळुन वास घेतला तर डिट्टो जांभळासारखाच. एका मित्राने चव घेतली पण खास लागली नाही. गावातल्या एका लहानग्याला विचारलं तर त्याने सांगितले हे "रान जांभूळ", पण खात नाही. तर दुसर्‍याने सांगितलं कि खातात म्हणुन. फोटो काढायचा विसरून गेलो.

अजुन एक झाड पाहिले त्याला हिरवट फळ लागलेलं, विचारलं असता ते "अळू" म्हणुन सांगितलं. पानांचा आणि फुलांचा फोटो आहे. उद्या येथे टाकतो. Happy

हे आम्ही (मी व प्रज्ञा) बापलणीच अनुभवलयं. (टुकटुक)>>>>>शोभे, काजवे लहानपणापासुन पाहतोय. Happy पण
काजव्यांनी भरलेलं झाड आणि दरी पहिल्यांदाच पाहिली. Happy

जिप्स्या.. गाणं मात्र चुकलास ( का मुद्दाम केलेस ? )

अंधारच मज हवा... काजवा उगा लावितो दिवा..

( वर्षू.. मस्करी नाही ही Happy )

बेलफळाचे सरबत.. अगदी चव तोंडावर आली.

रान जांभूळ का ? तसेच पार जांभूळ पण असते.. आता अळूची फळे येत नाहीत का ? भाजीचे अळू नव्हे हे वेगळे झाड असते. चॉकलेटी रंगाची आवळ्याएवढी फळे असतात. अगदी वेगळीच चव असते त्याची. मला वाटलं ठाण्यात, डोंबिवली त मिळत असावीत. ( अन्जू, मोनालि ?)

जिप्सी, मी पण हेच विचारणार होते, अमानवीय वगैरे लिहिताय का? पण आमचे लाईट गेले.

जिप्सी, जागू मस्त फोटो.

वा सायली, बेलाचे सरबत.

अळूची फळे मोठ्या भाजीमार्केटमध्ये मिळतात. मी गेले नाहीये तिथे. नवऱ्याला ऑफीसहून येताना बघायला सांगेन. दिनेशदा मागे तुम्ही लिहिलं होतंत त्याबद्दल, माझ्या बहिणीला फार आवडतात आणि मागे माझ्याकडे काम करतात त्या ताईनी पण मला त्यांच्या गावची दिली होती (कर्जतजवळची).

शोभे..दिनेश मस्करी करतो त्यामुळ त्याला मुद्दामून कंसात लिहावं लागतं मस्करी नाही म्हणून Wink

काजव्याचं झाड, दरी...वॉव क्या नजारा असेल रे .. खरच मोबाईल ने तरी काढायचास फोटो जिप्स्या..

किंवा एखादा पकडून आगपेटी च्या डबीत तरी ठेवून आणायचास ना.. फॉर नॉस्टेलिजिआ सेक

आता जा परत तिथे आणी काढ फोटो.. Happy

सयाली खरंच रिफ्रेशिंग आहे सरबत.. खूप लहानपणी एखादवेळा चाखलं होतं..

रान जांभूळ, अळू ची फळं Uhoh पहिल्यांदाच ऐकलं..

शशांक Rofl ,' वो' वाले काजवे पाहूनही युगे लोटलीत Lol

मानुषी चं मिकी माऊस फूल नवीन अवतार घेऊन आलंय..

जिप्सी, सुरेख अनुभव, काश क्यापचर केला असता... >>>> काही अनुभव असे असतात की ते फोटोत पकडताच येत नाहीत - काजव्यांचा अनुभव असा दाट काळोखात अनुभवण्यातलाच - ना याचे फोटो काढता येतील ना हा शब्दात वर्णन करता येईल ....
ज्याला कोणाला हे अनुभवता आले तो भाग्यवानंच ...... Happy

रच्याकने - सध्या जरा उशीरा आकाशात ( आकाशाच्या दक्षिण भागात ) अतिशय सुंदर वृश्चिक रास दिसते - जरुर पहा - ती वळणदार नांगी लगेच लक्षात येईल ... एकदा का चंद्र लखलखायला लागला की मग काही उपयोग नाही -आत्ताच दोन -चार दिवसात (म्हणजे रात्रीच हां Happy ) पाहून घ्या ... (ढग असतील तर मात्र उपयोग नाही... )

काय वेगाने धावतो हा धागा!

३ वर्षांपुर्वी देवरूखला खाल्लेली जांभळं. स्टिलच्या भांड्यात आहेत ती रानजांभळं. खास तुमच्यासाठी.

jambhul.jpg

दिनेशदा, वादिउहाशु! Proud

सध्या डिस्कव्हरी एच्डी वर वर्ल्ड फ्रॉम अबूव्ह ही मालिका दाखवत आहेत.

यात एरियल फोटोग्राफी निव्वळ अप्रतिम आहे. कोणत्याही ठिकाणचे वरून घेतलेले चित्रण त्या त्या ठिकाणाला एक वेगळेच परिमाण देते. एक पर्यटक म्हणून आपण बारीक सारीक गोष्टी बघतोच पण हा असा सगळा भूभाग एकत्र बघणे खूप मस्त वाटतं.

सायली, बेलाचे सरबत मस्त.

नलिनी, जाभळं खूप छान. रानजांभळं म्हणताच लगेच हजर.

बाकी महिती उत्तमच नेहमीप्रमाणे.

नले... तूला काही वाटतं का ? मी जातो त्यावेळी यापैकी काहीच नसतं आता.

काजव्यावरुन मला नेहमी, पाकिजामधल्या, मौसम हे आशिकाना या गाण्यातली, जुगनू है या जमींपर, उतरे हुए है तारे या ओळीच्या वेळचे दृष्य आठवते. ( हेमा, धरमचा पण जुगनू नावाचा अति टुकार चित्रपट होता. )

अन्जू.. डोंबिवली, ठाणे, बोरीवली अश्या मोजक्याच ठिकाणी आता असा रानमेवा मिळतो.

शशांक, सध्या गेले दोन दिवस चंद्रकोरीसोबत एक ठळक तारा दिसतोय. वृश्चिक रास मात्र दिसली नाही.. इथले आणि तिथले आकाश वेगळे असणार !

Pages