निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानुषीताई, दिसल्या नाहीत बर्‍याच दिवस. मायदेशी परतल्या का?

साधनाला झरबेरा काही कॉम्यू देत नाही वाटते.>>>> तेच बरंय. Happy

अग नाही आज ऑफिसमध्ये एक जण आली नव्हती तिथे काम होत तिच्या पिसीवर गडबड झाली. Happy पण वर दुरुस्त्या केल्यात ग.

जिप्स्या ????????? थांब साधनाला पिन मारते वॉट्स अ‍ॅप वरून. Lol

मानुषी ताईना पण कोणी कॉम्प्यु देत नाही की काय?

जागू, सापाचे फोटो एकदम थ्रिलींग आहेत. साप साळुंकी सप्तमीला साळुंकी खातातच. नाही खाल्ली तर 'माणूस पकडून दात काढून घेइल' अशी शिक्षा त्यांच्या माणूसकवच स्तोत्रात सांगितली आहे. Happy

मोनाली, पिल्लोबा कसे आहेत आता?

जिप्सी, मला पण हवी आहे मोगर्‍याची फांदी.

जागू, काश्मीरला मासे नाही मिळाले म्हणून इतका राग आलाय का की काश्मीरचे फोटोच टाकत नाहीयेस?

घरि माबो बॅन आहे, विथ पासवर्ड. सो मी अनबॅन करु शकत नाही. आता पार्ल्याला आलेय भावाकदे. तिकडे चिकटलेय माबोला

सगली माहिती मस्त. आमच्या मांजराना रेबीज द्यायचे आहे. ओपरेशन हि कराय्चे आहे. ऐशु च्या मते मी असा टीपी करत राहिले तर लवकर्च रॉबीनचे पाय भारी होतील आणि मला ऑपरेशनच्या जागी सिझेरियन करायची वेळ येईल...

साधना, Rofl

वर्षू... जांभळासाठी साडी म्हणजे काही तोट्याचा सौदा नाही ! मला वाटतं तूमच्या बाल्कनीतून काठीने पाडता येत असतील.
साधना... अननस संपला का ?

जागू तुझं सर्पाख्यान थ्रिलिंग.

कसे काय ग काढलेस फोटो? मस्तच आलेत. त्या अनुषंगाने झालेल्या गप्पा, मिळालेले नवीन विचार सर्वच छान.

वर्षुदी, जांभुळाख्यान मस्त.

साधना, बरं वाटलं तुला बघुन.

विसरू नका दिनेश ला वाढदिवसाच्या शुभेच्छा..द्या.........

दिनेश तुला वादि च्या खूप सार्‍या शुभेच्छा!!!!!!!

बघ सूर्यफुल तुला खडी ताजिम देतंय..

दिनेशदा, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!
तुम्ही दिलेली आफ्रिकाची क्लिप बघितली. फार ऑसम आहे! ह्याची सीडी पुण्यात कुठे मिळू शकेल का मला?

दिनेशदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

ती धामण गेली आणि काल आमच्या जागेचा मालक म्हणतात तो खरा साप सगळ्यांच्या दर्शनाला आला होता. मी ऑफिसला असल्याने मला दर्शन झाले नाही. बाकी सगळ्या घरातल्यांना झाले. घरातल्यांनी माझी आठवण काढलीच की ही असती तर आता फोटो काढत बसली असती. Lol

खरं म्हणजे काल माझा खरा वाढदिवस असतो.. अश्विनीमामीनी फेसबूक वर खरी तारीख द्यायची नाही असे सांगितल्याने तिथे ३० जानेवारी तारीख आहे.... त्यामूळे मला वर्षातून दोनदा शुभेच्छा मिळतात.. त्यामूळे डबल थँक्यू Happy

दिनेश चेक मेरा मेसेज.. तुला मी काल ३० मे लाच पाठवलाय Happy

पण शुभेच्छा दोन चार वेळा नाही रे.. नेहमीकरताच दिलेल्या असतात मित्रांनी , नै का???

आज खूप दिवसांनी इकडे आले. मस्त माहिती, फोटो.
दिनेशदा, वाढदिवसाच्या शुभेच्छा!

ही बोर्डीजवळ "सावे फार्म" ला भेटलेली वॉटर लिली. इथे फार सुंदर झाडं आहेत. लिची, रुद्राक्ष, गुलाब जाम अशी काही झाडं प्रथमच बघितली. आम्हाला नियोजित वेळेआधीच तिथून निघावं लागलं, त्यामुळे निवांत भटकत झाडांचे फोटो काढायचं राहून गेलं. Sad

हाय निगकर्स
गुर्जी, जागूले, अंजू sooooooooooo sweet of you! Thanks a lot! तुमाखमि!!!!!
पण Going through something very unexpected in life. So was feeling low.
But now everything seems to be fine!
जागूले……काळजी नसावी. मला कुणी कॉम्प देण्याचा प्रश्न उद्भवतच नाही...क्योंकी
"मेरे पास आय पॅड हय" (मेरे पास मा हय …य़ा चालीवर वाचावे)" आणि आय्यम द बॉस! Wink :स्मितः Light 1
बाकी निगकर्स मी पण तुम्हा सर्वांना मिस करत होते. असो......मी १८ मी ला देशात परत आले.
मुंबई विमान तळावर उतरल्यावर लेकीकडे खूप बेकिंग केलं त्याची आठवण झाली.
वाटलं अगदी अव्हनचं दार उघडून मी आता केक/कुकीज बाहेर काढणार आहे! Proud
आता सगळं वाचते हळूहळू! आणि खूप काही लिहायचं आहे आणि फुट्टू बी डकवायचे हायती!
पण सध्या नेटबुकावरून आय पॅडवर मुव्ह झालेय. नेटबुक बिघडलंय. आणि आयपॅड्साठी घरी वाय फाय करून घ्यायचंय!
त्याला वेळ लागेल. आणि हपिसातले सगळे कॉम्प्स सकाळी ८.३० ते रात्री साधारणपणे ७ पर्यंत बीझी असतात. त्यामुळे स्टाफ यायच्या आधी किंवा नंतर मला वापरता येतात. हे सगळं नंतर डिलिट करीन.
दिनेश वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

Pages