निसर्गाच्या गप्पा (भाग १९)

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 May, 2014 - 15:44

निसर्गाच्या गप्पांच्या १९ व्या भागा बद्दल सर्व निसर्ग प्रेमींचे हार्दिक अभिनंदन.

वरील कोलाज झरबेरा कडून.

अक्षय्य तृतीयेच्या मुहुर्तावर हा धागा सुरू होत आहे. साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त म्हणजे अक्षय्य तृतीया. अक्षय्य म्हणजे न संपणारे. ह्या दिवशी ज्या चांगल्या किंवा शुभ कामाची सुरुवात करण्यात येईल त्याचे अक्षय्य म्हणजे न संपणारे फळ मिळते असे म्हणतात. चला तर मग ह्या धाग्याची सुरुवात तर झाली आहे मुहुर्तावर आता आपल्या निसर्गाबद्दल ज्ञानात न संपणार्‍या माहीतीचे फळ मिळून आपल्या मार्फत निसर्ग समृद्ध, सजवण्यासाठी थोडा हातभार लागू दे.

स्थापना - ५ डिसेंबर २०१०

निसर्गमय झालेले आयडी
१) दिनेशदा, २) साधना, ३) जिप्सी, ४) शांकली, ५) जागू, ६) शोभा १२३, ७) अनिल ७६, ८) माधव,
९)चातक, १) प्रज्ञा १२३, ११) मामी, १२) अश्विनी के १३) पुरंदरे शशांक, १४) यो-रॉक्स, १५) उजू,
१६)मानुषी, १७) मी अमी, १८)सावली, १९) मोनलीप, २०) निराली, २१) शुगोल, २२) कळस,
२३) निकिता, २४) डॉ. कैलास गायकवाड, २५) मेधा, २६) श्रीकांत, २७)साक्षी १, २८) नादखुळा,
२९) चिंगी, ३०) गिरीकंद, ३१) जयू, ३२) सारीका ३३) स्_सा ३४) स्निग्धा ३५) जो_एस ३६) पद्मजा_जो ३७) मनिमाऊ ३८) रुणुझूणू ३९) मृदूला ४०) शुभांगी हेमंत ४१) अवनी, ४२) प्रिती १ ४३) शकुन ४४) आस ४५) मृण्मयी ४६) रावी ४७) इनमीन तीन ४८) रीमा ४९) आशुतोष ५०) वैजयन्ती ५१) सेनापती ५२) ज्ञानेश राऊत ५३) इन्डिगो ५४) गौरी ५५) चिमुरी ५६) शकुन ५७) बी ५८)वेका ५९) वर्षू नील ६०) बंडोपंत ६१) मुक्तेश्वर कुलकर्णी ६२) मधू-मकरंद ६३) सुर्यकिरण ६४) पिशी अबोली ६५) सुमंगल ६६) गमभन ६७) दक्षिणा ६८) आर्या ६९) येळेकर ७०) प्राची ७१) हेमा वेलणकर ७२) अन्जू ७३) झरबेरा ७४) चंद्रा ७५) Sayali Paturkar ७६) सामी ७८) anjalichitale@y ७९) वर्षा ८०) मृनिश ८१) सरिवा ८२) रिया

मागील धागे.
निसर्गाच्या गप्पा (भाग १) http://www.maayboli.com/node/21676
निसर्गाच्या गप्पा (भाग २) http://www.maayboli.com/node/24242
निसर्गाच्या गप्पा (भाग ३) http://www.maayboli.com/node/27162
निसर्गाच्या गप्पा (भाग ४) http://www.maayboli.com/node/29995
निसर्गाच्या गप्पा (भाग ५) http://www.maayboli.com/node/30981
निसर्गाच्या गप्पा (भाग ६) http://www.maayboli.com/node/32748
निसर्गाच्या गप्पा (भाग ७) http://www.maayboli.com/node/34014
निसर्गाच्या गप्पा (भाग ८) http://www.maayboli.com/node/34852
निसर्गाच्या गप्पा (भाग९) http://www.maayboli.com/node/35557
निसर्गाच्या गप्पा (भाग१०) http://www.maayboli.com/node/36675
निसर्गाच्या गप्पा (भाग ११) http://www.maayboli.com/node/38565
निसर्गाच्या गप्पा (भाग १२) http://www.maayboli.com/node/40660
निसर्गाच्या गप्पा (भाग १३) http://www.maayboli.com/node/41996
निसर्गाच्या गप्पा (भाग १४) http://www.maayboli.com/node/43114
निसर्गाच्या गप्पा (भाग १५) http://www.maayboli.com/node/43773
निसर्गाच्या गप्पा (भाग १६) http://www.maayboli.com/node/45755
निसर्गाच्या गप्पा (भाग १७) http://www.maayboli.com/node/47785
निसर्गाच्या गप्पा (भाग १८) http://www.maayboli.com/node/48236

निसर्गाशी निगडीत काही पुस्तकांची यादी १५ व्या धाग्यापर्यंत पाहता येईल.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शांडिल्य, नाव छान आहे... मैत्रीणी च्या बहिणीला मुलगा झाला, मी कणाद नाव सुचवले... त्यांच्याकडे आवडले...
आता परत जुन्या नावांचा ट्रेंड आलाय नाही! (माफ करा अवांतर लिहिते आहे...)

तिचा कूलवृक्ष कळम का कदंब असा प्रश्न पडला होता. त्या काळात मी अनेक दुर्मिळ वृक्षांचे फोटो आणि माहिती इथे लिहित असे.. त्यावरून तिने संपर्क साधला होता. आता ती माझी धाकटी बहीणच झालीय.

खुप छान धागा आहे हा... world environment day साठि काहि कल्पना आहेत का. आम्ही ऑफिस मधे रोप वाटप , green menu , paper less day. NO Paper cups .. असे बरेच ठरवले आहे .. अजुन काही सुचवा ....

व्वा दा, मस्त आहे कल्पना...
त्या दिवशी एक मेकांना त्यांच्या आवडीच्या फुला / फळांच्या नावने हाका मारा... Lol ( सौरी, फारच पोरकट वाटते आहे का?):अओ:

.यापुढे मी कोकमाला "कोकम" आणि वाळलेल्या कैरीला "वाळलेली कैरी"च म्हणेन. म्हणजे कन्फ्युजनच नको.
कोकम = आमसूल्,सोलं
वाळलेल्या कैरी = आंबोशी

आणखी एक प्रकार मी कोकणात पाहिला/खाल्ला तो प्रकार विट्याची सोले पांढरी-पिवळट रंगाची असतात.त्याची फळे असतात.फळे कापून वाळवतात.अत्यंत आंबट असतात.

मानुषी, किती सुंदर!>>>>>>>>>>>>>>>>>>>
मामे तुला नक्की काय म्हणायचंय?
"अनुभवसंपन्न!".......... अगदी अगदी वर्षू!
शशांक..................पूनावालांबद्दल व त्यांच्या अश्वप्रेमाबद्दल वाचून आहे!

आंबा गोड की शांडिल्य गोड?
सायली .....गुड आयडिया आणि आज्जिबात पोरकट नाहीये बरं!
कोकणातलं का SSS ही म्हणजे का SS ही सोप नसतं . >>>>>>>>>> ममो १००% सहमत! मी आईवडीलसासूसासरे सगळीकडून कोकणी आहे गो! म्हणून सांगितलेनी! काय समजलीस?(ममो हे प्लीजच अनुनासिक वाच अगदी कोकणात गेल्यासारखं वाटेल!)
आणि तुम्ही हो...... गुर्जीभौ केजरीवाल.........................काय घोळ घालून ठेवला राव? लग्नाचे असेही साइड इफेक्ट्स असतात माहिती नव्हतं! व्हॉट से वर्षू, शोभा, दिनेश ?

जागतिक पर्यावरणदिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा!!!!

धरित्रीच्या कुशीमधे, बियबियाणं निजली
वर पसरली माती, जशी शाल पांघरली

ऊनवार्‍याशी खेळता, एका एका कोंबांतून
प्रगटली दोन पानं, जशी हात ती जोडून

टाळ्या वाजवती पानं, दंग देवाच्या भजनी
जशी करती करुणा, होऊ दे रे आबादानी
(बहिणाबाई चौधरी)

जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्व निगकरांना शुभेच्छा!!!!

my phone 142.jpg

आजच्या दिनानिमित्त जास्तीत जास्त लोक निसर्गाच्या जवळ जावोत,निसर्गमय होवोत.

शांडिल्य कसला गोडूला आहे.नलिनी, फोटो खासच आहेत सगळे.
मानुषी, खरच हे पण आहेत वाट्टं शादी के साईड इफेक्टस Wink
दा, होम चित्रपट बघेल आज मी.
आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त मी आणि इशू आवारात एक बूचाच आणि एक अ‍ॅडेनियमच झाड लावणार आहोत.

नलिनी मस्त फोटो.
सगळ्यांचेच फोटो मस्त आहेत.

आज पर्यावरण दिवसाच्या मुहुर्तावर नविन धागा काढूया. थोड्या वेळात काढतेच.

जागतिक पर्यावरणदिनाच्या खुप खुप शुभेच्छा!!!!

bamboo.jpg

रिया, मनुषी धन्यवाद...

जिप्सी... अप्रतिम शुभेच्छा...

जागु... आज पर्यावरण दिवसाच्या मुहुर्तावर नविन धागा काढूया. थोड्या वेळात काढतेच....+१

Sayali, Lol
कसली मज्जा वाटतेय अगं Lol

आम्ही नावांच्या चिठ्या बनवलेल्या. ज्याला जे नाव येईल त्या नावाने बोलवायचं Rofl

नशिब मला जुई नाव आलं. आयेम सेफ Lol

पण ज्यांना धतुरा, नारियल अशी नावं आलीयेत त्यांची वाट लागतेय Lol

आता कॅफेटेरियामध्ये ब्रेफाला गेलेलो तेंव्हा एकाने दुसर्‍याला हाक मारली ,' अबे खरबुजे रुक तो' Lol
सगळा कॅफेटेरिया त्या खरबुज्याकडे बघायला लागला आणि तो पळून गेला पटकन तिकडून Lol

पण आता मॅनेजरने उचललेल्या चिट्ठीत त्याचं नाव ग्वावा आलाय. काही लोकं गवा असा उच्चार करतायेत Uhoh
जस्ट इमॅजिन 'गवा इज कॉलिंग यू' Uhoh Proud

रिया Lol

जागतिक पर्यावरण दिनाच्या सर्व निगकरांना शुभेच्छा!!!!

उजु, जिप्सी मस्त फोटोज!!!

पण ज्यांना धतुरा, नारियल अशी नावं आलीयेत त्यांची वाट लागतेय Proud

आता कॅफेटेरियामध्ये ब्रेफाला गेलेलो तेंव्हा एकाने दुसर्‍याला हाक मारली ,' अबे खरबुजे रुक तो' Proud
सगळा कॅफेटेरिया त्या खरबुज्याकडे बघायला लागला आणि तो पळून गेला पटकन तिकडून Rofl

त्या दिवशी एक मेकांना त्यांच्या आवडीच्या फुला / फळांच्या नावने हाका मारा...
>>
पण नशिब हे नाही केलं Uhoh

नाही तर लोकं मला कलिंगड म्हणाले असते Blush

रिया Proud

प्रगटली दोन पानं, जशी हात ती जोडून
टाळ्या वाजवती पानं, दंग देवाच्या भजनी>>>>या दोन काव्यपंक्ती आणि ते रोपं पहा. अगदी समर्पक आहे ना? Happy

जिप्स्या, खरच की रे..

बहिणाबाई ग्रेटच रे Happy
त्यांना जे दिसायचं ते रोज आपण पाहुनही आपल्याला दिसत नाही
(देअर इज डिफर्न्स बिटवीन दिसणे आणि पहाणे Happy )

Pages