मुंबईवर अतिरेकी हल्ला

Submitted by समीर on 26 November, 2008 - 15:36

मुंबईत सध्या युद्धजन्य परिस्थीती झाली आहे. ATS चे ४ प्रमुख अधिकारी मारले गेले आहेत. अनेक ठिकाणी गोळीबार, बाँबस्फोट होत आहेत..त्याची चर्चा /माहिती देण्यासाठी हा धागा.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अजुन एक आठवडा पुरेल इतका शस्त्रसाठा अन रसद आहे त्या लोकांकडे! असा एक रिपोर्ट आहे..... वरातीमागुन!
पण ओलीसांची सुटका झाल्यानंतर एन एस जी दोन दिवसात हॉटेल तपासुन ऑल क्लीयर चा सिग्नल देतील असा अंदाज आहे.......तोवर्.......वाट पहाणे.

अन त्यानंतर.......

किंवा मला तर वाटत भारतीय सामन्य नागरिकाला सवय झालीय आपल आपल बघुन घ्यायची... त्यांना फरकच नसेल पडत कुठल सरकार आहे त्याच...>>>>>>> एकदम पुर्ण सत्य!

किमान एका आतंकवाद्याला जिवंत ठेवायला हवे होते...

डोळे फोडून..
जीभ छाटून...
हातापायाची बोटं तोडून...
सर्वांगावर खाजकुयलीची भुकटी टाकून....
त्याला ताज अथवा ट्रायडेंट च्या स्वागतकक्षात एका पिंजर्‍यात ठेवायचा...
आणि येणार्‍या जाणार्‍या प्रत्येकाला त्याचा अंगावर थुंकायची आणि खाजकुयली ची भुकटी टाकायची संधी द्यायची...

_______
आँखोंमें सपने लिये
घर से हम चल तो दिये
जाने ये राहें अब ले जाएगी कहाँ...!

मृ मी सुद्धा ऐकल ते, त्या पत्रकार बाबा नी विचारल पण तो अतिरेकी मुसलमानांवर झालेले अत्याचारच सांगत होता...
एक मात्र जाणावल तो एकदाही खुप चिडला वगैरे नाही, शिवीगाळ सुद्धा आजिबात नाही केली, अतिशय कलेक्टेड होता तो.... त्याला विचारल काय गॅरंटी तुम्हे नरिमन मध्ये आहत, तुम्हाला आजुबाजुला काय दिसतय, तर म्हणाला की काय दिसायचय, हेलिकॉप्टर आलय आजुन काय... कमालीची तयारी होती...
मी तर म्हणतो दिल्ली, मुंबई सारख्या महत्वाच्या शहरां मध्ये एन एस जी टाईप १००-२०० ची तुकडी इमिजीयेट डिप्लॉयमेंट करता सतत स्टँड बाय वर असायला पाहिजे......
आपल्या लाईटली आर्मड पोलीसांन पेक्षा एन एस जी जर सामोर गेल असत तर नक्की डॅमेज कमी झाल असत...
यु एस मधल्या एनलिस्टीस नी वेपन्स, एम्मो बघुन अनुमान काढलय की येवढ सगळ करायला अवघे १.५ ते २ लाख डॉलर लागले असणार...... दाऊद/ लष्कर ए .. करता काहीच नाहीये ही रक्कम.......

प्रचंड चिडचिड होतेय हे सगळे बघुन. गेले ४०-४५ तास हे सगळे चालुच आहे. किती सामान्य लोक मेले यात विनाकारण. या सगळ्या नेत्यांनाच पाठवायला पाहिजे त्या दहशतवाद्यांकडे कमांडोजच्या आधी म्हणजे कळेल यांना स्वतःच्या जिवावर बेतल्यावर. नुसते टीव्ही वर फालतु भाषणं देताहेत. हे संपल्यावर जेवढे पकडले असतील ते दहशतवादी आणि नेते यांना भर चौकात संतप्त जमावाच्या हाती द्यायला हवे. काय करायचय ते लोक करतीलच.
आणि या लोकांना कळु नये की अश्या ठीकाणी सामान्य लोकांना जायला बंदी करायला हवी. आजुबाजुच्या सगळ्या इमारती वर आणि हॉटेलच्या बाहेर सर्कस बघायला आल्यासारखी गर्दी करताहेत लोक ते पण कुटुंबाला घेवुन. किती मूर्खपणा आहे हा. अकला गहाण टाकल्यात यांनी. Angry
त्यामुळे पोलीस यंत्रणेवर किती ताण येतोय. सगळे बिचारे गेले ४० तास रस्त्यावर उभे राहुन काम करताहेत.

आत्ता एका कोळ्याची मुलाखत ऐकली. त्याने त्या अतिरेक्यांना येताना बघितले होते, आणि त्या भागातल्या सगळ्या कोळ्यांना हे लोक दहशतवादी असल्याचं तेव्हाच कळलं होतं.
त्यांनी ही माहिती त्याच वेळी पोलीसांना दिली असती, तर हा अनर्थ टळला असता.

पोलीसांच्या अन सैन्यदलाच्या कामात आणखी एक फरक आहे. पोलीस राज्य सरकारच्या गृहमंत्रालयाचा भाग आहे व त्याचे काम अंतर्गत सुरक्शा आहे. गृह मंत्रालयाचे कर्मचारी म्हणून ते (म्हनजे त्यांचे गृहमंत्री )विधानसभेला जबाबदार आहेत म्हनजे त्यांच्या कृतींची चर्चा व जाब विधान मंडळ सद्स्य (म्हनजे सन्माननीय आमदार) विचारू शकतात /विचारतातही. त्यामुळे सगळ्याच खात्यावर विधिमंडळाचे एक अदृश्य दडपण असते..
सेनादलाबाबत हा प्रॉब्लेम थेट येत नाही त्यामुळे सेनाधिकार्‍याना प्रोसिजरल निर्णयाचे स्वातंत्र्य असतेच असते .फक्त सुरक्शेविशयी राजकीय निर्णय राष्ट्रपतींमार्फत घेतली जातात(युद्ध घोषित करणे, युद्धबन्दी करणे, जिंकलेला प्रदेश सोडणे:) इ.)
सेन्ट्रल फोर्सेस म्हणजे आर्मी , नेव्ही, बी एसएफ, बॉर्डर फोर्सेस हे अंतर्गत सुरक्षेसाठी बोलावण्याचे वेगळे प्रोटोकॉल्स आहेत. या म्हटल्याबरोबर ते पळत सुटत नाहीत्.राज्य सरकारमार्फत विनन्ती, संबंधित कमान्ड्स ना आदेश वगैरे त्याचे विशिष्ट चॅनेल्स असतात. शक्यतो अंतर्गत सुरक्षेसाठी सैन्यदलाचा अपवादात्मक वापर करावा असा संकेत आहे . त्यामुळे पोलीसांच्या आवाक्याबाहेर स्थिती असल्याने आर्मी बोलावणे हा फारच ट्रिकी विषय आहे. कारण एक तर आर्मीची निर्मिती या कामासाठी नाहीच आहे मुळी..
शिवाय त्याने खूप गम्भीर बाब आहे असा मेसेज जाऊन पॅनिकी पसरण्याचा धोका असतो. शिवाय आलेल्या फोर्सला स्थानिक स्थितीची म्हनजे भाषा, लोकेशन्स, शत्रू नेमका कोण याची माहिती नसते मग कम्बाइन फोर्स करून निर्णय घ्यावे लागतात. त्यात पुन्हा ऑफिसरांचे कमांडिंग प्रोटोकॉल ऑब्झर्व करावे लागतात्.शिवाय आर्मी शेवटचा पर्याय असल्याने दुर्दैवाने यश न आल्यास त्यानन्तर काय हाही प्रश्न..
शिवाय होस्टेजसारख्या प्रसंगी वाटाघाटी साठी सिव्हील ओथॉरिटीना राजकीय पॉलिसीप्रमाणे निणय घ्यावे लागतात. आर्मी ही सुरक्षा यंत्रणा आहे प्रशासकीय नव्हे,.(आपत्कालीन परिस्थितीतही सेनादलांची मदत घेतली जाते ती साधनसामुग्री, शिस्त आणि प्रशिक्षनामुळे. )

त्यामुळे एन एस जी चे लोक उशीरा येण्याचीही ही कारणे असू शकतात...

शक्यतो नागरीक व सेनादले यांचा सम्पर्क कमी ठेवन्याचा प्रयत्न केला जातो
---------हितगुज दॅट इ़ज....
पंडितसे मिले पंडित, हो जाय दो दो बातें..
गधेसे मिले गधा, हो जाय दो दो लातें.....

दहशतवादाचा निषेध म्हणून उद्या सर्वांनी काळे कपडे घालावेत, असं आवाहन काही नागरिकांनी केलं आहे..

टोण्ग्या माहिती बद्दल धन्यवाद..
राज्य सरकारमार्फत विनन्ती, संबंधित कमान्ड्स ना आदेश वगैरे त्याचे विशिष्ट चॅनेल्स असतात. शक्यतो अंतर्गत सुरक्षेसाठी सैन्यदलाचा अपवादात्मक वापर करावा असा संकेत आहे >>>>>>>> थोडक्यात सैन्याला पाचारण केल्यावर त्याना जागेवर यायला फिक्स लीड टाईम आहे.... आणी जसे आपले पोलीस भांबावले, तसे राज्य सरकार, गृह खाते ही भांबावले असणारच..... भारताला हा लेसन लर्न्ड म्हणता येईल फक्त खुप मोठी किंमत मोजल्या नंतर.....

आज भारताला तुझ्याचसारख्या शूर लोकांची गरज आहे...
किती दिवस झाले अमेरीकन सिटीझनशिप मिळून....? >>>> तिथे चाललय काय, तुम्ही बोलताय काय ? गच्चीत, कठड्यावर उभे राहुन गम्मत बघणारे बघे आणि आपण ह्यात काहीच फरक नाही म्हणायचा का ? काही नवी-जुनी बातमी वाचायला इथे यावं तर दर १०-१२ पोस्टांनंतर इथेच युद्ध पेटलेले. इतक्या गंभीर परिस्थीतीत ही स्वतःचेच घोडे दामटायचे बघताएत सर्व...त्या राजकारण्यांना काय नावं ठेवा Sad

परागबी...
तुम्ही दिलेल्या लिंकमधला कुमार केतकरांचा लेख शांतपणे वाचलात का? माझ्या मते तरी त्यांनी जागतिक दहशतवादाचे योग्य विश्लेषण केले आहे. दहशतवादी हा दहशतवादी असतो... मग तो कुठल्याशी धर्माचा असेल !!

झक्कीकाका,
अतिशय योग्य पोस्ट. मी हेच लिहायला आले. अमेरिकेत ९/११ झाले तेव्हा, यांच्या प्रेसिडेंची स्थिती काय होती? आख्या जगाने डोळे फाडून पाहिले आहे. D.C. मध्ये CIA च्या ऑफिसपासून काही अंतरावर कट शिजत होता तरी यांना पत्ता लागला नाही. हे काय आपल्या देशाची अक्कल काढतायत?
पण आपल्या थोर राजकारण्यांनी कुठल्याही दबावाला बळी न पडता देशाच्या हिताचे निर्णय घ्यावेत. एकदा तरी दाखवून द्या रे की तुम्हाला कणा आहे..

आता जयसिंगराव गायकवाडांची मुलाखत ऐकली. निर्लज्ज माणुस सांगतोय तिथे ताजमध्ये अडकला असताना मतदारसंघातल्या गावांची लिस्ट केली आणि निवड्णुकीच्या तयारीची उजळणी केली. आपल्या रुममध्ये लपलेल्या ह्या (तथकथित) जनतेच्या प्रतिनिधीला हॉटेलमध्ये अडकलेल्या इतर प्रवाशांची काळ्जी वाटली नाही की कमांडोज, पोलिस यांची चिंता.. व्वा. यांना आम्ही निवडुन द्यायचं. खरं तर कमांडोजच्या मदतीने पळुन न येता ह्याने म्हणायला हवं आधी इतर सर्व प्रवाशांचे प्राण वाचवा.. काश असं नेतृत्व आम्हाला लाभतं

आत्ताच ibnhindi वर हा संपूर्ण plan अतिरेक्यांनी कसा, कुठे आणि कोणी रचला हे सविस्तर पणे दाखवले.
हि माहिती कितपत खरी असते.
सुरक्शीततेच्या द्रुष्टीने हे कितपत योग्य असते.

Fox News वरचे Analyst स्पष्टपणे बोलताहेत. भारत हा मुस्लिमांची सर्वाधिक लोकसंख्या असलेला ३ रा देश आहे. त्यामुळे असे अतिरेकी हल्ले होणे साहजिक आहे. भारतातल्या कांगावाखोर राजकारण्यापेक्षा असे स्पष्ट बोलणे त्याना परवडत कारण तीथे असल्या विधानामुळे कसला दंगा वैगेरे होणार नाही.
सध्या परिस्थिती बघता संयम ठेवणे चांगले, प्रश्न असा पडतो की जर कदाचित हेच उलटे असते तर 'दहशतवादाला धर्म नसतो' हे शहाणपण दाखवले असते का? शिवाय दुसरीकडुन संयम ठेवल्या गेला असता का? ताज केंव्हा मोकळे होते याची वाट पहात आहेत, किती काळ लागेल हे सगळया अतिरेक्यांचा खातमा करायला कोण जाणे.

ईकडे तर २४ तास मुंबईतल्या हल्ल्याचे प्रसारण केले जात आहे. मन अतिशय उद्विग्न झाले आहे.

आणखी एक धक्कादायक (खरं तर अपेक्षीत) बातमी म्हणजे अतिरेक्यांपैकी काही जण कामगार बनुन राहिले होते ताज मध्ये, गेले काही महिने तर काही customer म्हणुन येत होते. मग नकाशे बनवले गेले. त्यामुळेच सगळ्यांना अंतर्गत रचनेची पूर्ण माहिती होती. एका कामगाराने मरताना घरी फोन करुन सांगितलं की गेले काही महिने त्याच्याबरोबर काम करणार्‍यानेच त्याला मारलंय आणि तोही अतिरेकी आहे. किती मोठं षडयंत्र आहे हे...

इथल्या शूर वीरात एवढा दम आणि धर्माभिमान होता तर का नाही आत्मघातकी पथके पाकिस्तानात पाठवून बॉम्बस्फोट घडवले?

अहो तुम्ही आम्हाला मानवतेचे शत्रु म्हटले असते मग.

आपल्याकडे लोक इंटीग्रेशन का वापरतात कळत नाही.दहशतवादाला धर्म नसतो हे वक्तव्य राजकारणी,पत्रकारांबरोबरच इथेही काही लोकांनी केलय्.साध्वीचा दहशतवाद आणि इस्लामी दहशतवाद यांच्यात काहीही फरक न दिसणार्‍यांची कीव येते.काय तर म्हणे दहशतवादी मराठी बोलत होते. असतील मराठी बोलत्.महाराष्ट्रातील मुस्लिमांना मराठी येतं.सर्वच्या सर्व दहशतवास्दी पाकी होते हे कोणी सांगितलय्???ज्या पध्दतीने सर्व प्लॅनिंग झालय त्यावरुन हे स्पष्ट होतय की स्थानिक मुस्लिमही त्यात सहभागी आहेत्.काल टाईम्स नाउ ला एका इस्राईलच्या मोठ्या अधिकार्‍याची मुलाखत ऐकली.त्याने सरळ कुराणातली वाक्येच सांगितली आणि म्हटले की हे जगभरातील मुस्लिम लोकांच्या मनावर बिंबवण्यासाठी हे हल्ले होत आहेत्.दहशतवाद्यांना धर्म नसतो,देश नसतो म्हणणार्‍या पाकीस्तानी एक्स आयएसआय ऑफिसरला त्याने ठाम विरोध केला.त्या ज्युने सांगितले पाकीस्तानातील दहशतवादालाही वेगवेगळी कारणे आहेत्.त्यामुळे तेथील वेगवेगळ्या दहशतवादाला संपवण्यास वेगवेगळी उपाययोजना करावी.जे इस्राईलच्या अधिकार्‍याने सांगितले ते अगदी बरोबर आहे.इस्लामी दहशतवाद्,नक्सली दहशतवाद्,तामिळी दहशतवाद्,शिया दहशतवाद्,सुन्नी दहशतवाद्,शिख दहशतवाद्,हिंदु दहशतवाद हे वेगवेगळे आहेत .या सर्वांना एकाच तराजुत मोजणे ऐकायला जरी बरे वाटते तरी त्या त्या दहशतवादाविरुध्द लढण्यास ते घातक आहे.प्रत्येकाच्या कारणाचा विचार करुन वेगवेगळी उपाययोजना करणे आवश्यक आहे.पण ज्यांना दहशतवादाचा बिमोड करण्यापेक्षा आपल्या मनातील (पण अस्तित्वात नसलेल्या)बेगडी एकात्मता भावाबद्दल जास्त प्रेम आहे ते दहशतवादाला जात्,धर्म्,भाषा नसते अशी साफ चुकीची वक्तव्ये करतात.

करकरेंच्या कार्यपध्दतीत जेंव्हा चुक वाटत होती तेंव्हा त्यांना विरोध केला पण जेंव्हा दहशतवाद्यांविरुध्द लढताना त्यांना मरण आले तेंव्हा आम्हीच त्यांना हिरो केला यात तुम्हाला आमचा चांगल्याला ऍप्रिशिएट करण्याचा भाव दिसायला हवा.'साध्वीला त्रास दिल्याने असे अकाली मरण आले' किंवा 'आपल्या पापाची फळे भोगावीच लागली' वगैरे वक्तव्येही आम्ही करु शकलो असतो पण शौर्‍याला ,देशभक्तीला मान देण्याची ,त्याचा गौरव करण्याची आमची विचारसरणी आहे त्यामुळे करकरेंना हिरो बनवायला आम्ही कचरत नाही.प्रत्येक माणसाच्या सर्वच गोष्टी ,विचार्,कृती पटतातच असे नाही.
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

दहशतवाद्यांविरुध्द लढताना त्यांना मरण आले तेंव्हा आम्हीच त्यांना हिरो केला
--- सर्वस्वाचा ज्याने देशासाठी त्याग केला त्याला हिरो बनवणारे आपण (माझ्या सकट) कोण? ते हिरो होते, राहिले आणि रहाणार... आपण त्यांना हिरो केले असे म्हणतांना त्यांच्या वर अन्याय होतो आहे, तसा तुमचा उद्देश नसेलही.

आपण त्यांना हिरो केले असे म्हणतांना त्यांच्या वर अन्याय होतो आहे, तसा तुमचा उद्देश नसेलही.

माझ्या म्हणन्याचा अर्थ आहे की त्यांचे हिरोत्व मानण्यात आम्ही संकोच बाळगला नाही.
----------------------
सरणार कधी रण प्रभू तरी, हे कुठवर साहू घाव शिरी|| दिसू लागले अभ्र सभोती, विदीर्ण झाली जरी ही छाती, अजून जळते आंतर ज्योती, कसा सावरु देह परी || होय तनूची केवळ चाळण , प्राण उडाया बघती त्यातून, मिटण्या झाले अधीर लोचन, खङग गळाले भूमीवरी

आताच सी एन एन वर ओबेरॉय मधुन सुटलेल्या एका अमेरिकन ज्यु माणसाचि मुलाखत ऐकलि. शेवटि त्याच म्हणण त्याच्याच शब्दात " There are 100 billion people in India and only 10,000 jews its really funny that they (terrorists) are only targetting jews!"

इतकच नाहि
Persident Bush "I am saddened by loss of two american lives"

त्यामुळे एन एस जी चे लोक उशीरा येण्याचीही ही कारणे असू शकतात...>>>
झकास ! अजुन काही असतील ती ही ऐकवा... तसेही कारणे देण्या शीवाय प्रषासन काही क्रेल अशी शक्यता नाही. कुणाचा पाय्पोस कुणाच्या पायत नाही. प्रत्येक संगठना वेग वेगळ्या बात्म्या सांगतय... पण तुम्हि सांगा आम्ही ऐकतोय!

आय अस आय सोबत पाकचे लष्कर (?) प्रमुख येणार होते (हे आश्वासन आपल्या पंतप्रधानांना पाकच्या प्रधान मंत्र्यांनी दिले होते) तपास कामात मदत करायला. आता ते नाही पण त्यांचे केवळ प्रतिनिधी येणार आहेत (indian express).

पाकमधे सरकार कोणतेही असो. लष्कर, आय एस आय ला स्वत: चे 'डोके' असते, त्यांना कुणी ही आदेश देऊ शकत नाही. हे आश्वासन दोन (भारत - पाक) प्रधानां मधले होते, ते पाळणे आय अस आय साठी बंधनकारक थोडी आहे. आपल्या प्रधान मंत्र्यांनी तशीच विनंती (काही कारण असेल) केली होती तर मग आता प्रतिनिधीची देखील अवशक्ता काय आहे?

वेळ आलेली आहे.

बापू करन्दिकर

१] रतन टाटांनी सरकारच्या सुरक्षा [अ] व्यवस्थेबद्दल टीका केलीय. तशी सगळ्यांनीच केलीय पण टाटांच्या ताजमधल्या सुरक्षा व्यवस्थेचं काय? आम्हाला सायबर कॅफेमधून इ-मेल चेक करायची झाली तर आय-कार्ड आणि फोटोकॉपी मागतात. २४ नोव्हेम्बरला ताज मधे २ अतिरेकी गेस्ट म्हणून चेक-इन करतात आणि २ अतिरेकी हाऊसकीपिन्गची नोकरी मिळवतात! त्यांची आय्-डी चेक होत नाही.
२] हेडलाईन्स नाउ, २४ / ७ आणि टाईम्स यासारख्या न्यूज-चॅनेल्स वरून ताज आणि ओबेराय मधल्या घटनांना प्राधान्य होते. लीओपोल्ड कॅफे आणि व्ही.टी. स्टेशनवरच्या घटनांना त्यामानाने काहीच महत्व दिले गेले नाही. चॅनेल्ससुद्धा 'एलिटीस्ट' आहेत.
३] अतिरेक्यांच्या बोटी राजरोसपणे ससून डॉकला लागतात. आमच्या नेव्हीचा मोठा तळ मुम्बईत कुलाब्यालाच आहे. त्याना किंवा कोस्टलगार्डला त्याचा पत्ताही लागत नाही! उद्या पाकीस्तानची नेव्ही गेटवे ऑफ ईंण्डियाला लॅण्ड होईल!!
४] ताजमधे काम करणारा एक वेटर नाइट शिफ्टला कामावर जाण्याकरता कोळीवाड्यातून ताजकडे निघाला असता त्याला दोन अनोळखी मुले खान्द्यावर जड बॅगा घेऊन चाललेली दिसली म्हणून त्याने त्या मुलांना हटकले. पण त्यांनी सांगीतले की आम्ही सहज जॉय राइडला बोटीवरून फिरायला आलो होतो! काही वेळानंतर तेच दोघेजण ताजमधे अन्दाधुन्द गोळीबार करत घुसले. ताजच्या तळमजल्यावरच्या किचनमधे त्यांनी अनेकांना ठार केलं, त्यात दहा-बाराजण किचन-स्टाफपैकी होते. त्या वेटरने त्याच दोघां मुलांना गोळीबार करताना पाहीलं आणि ओळखलंहि पण तोपर्यंत फार उशीर झाला होता !!
५] कोळीवाड्यांतल्या काही लोकांनी एक अनोळखी बोट ससून डॉकला आल्याची वर्दी पोलिसांना दिली होती पण पोलीसांनी दुर्लक्ष केले. गुजरातमधल्या मच्छीमारांबरोबर मुंबईच्या मच्छीमारांची नेहमीच झकापक चालते त्यांतलाच हा प्रकार असं समजून पोलीसांनी ती तक्रार नोंदवून घेतली नाही !

बापू करन्दिकर

चीड... प्रचंड चीड.
एव्हढा हाहा:कार माजवू शकतात... आपल्याच मातीतले गद्दार असणार त्यांना मदत करणारे, शस्त्रं पुरवणारे....
त्या अतिरेक्यांना सोडलेलं मला एकवेळ चालेल (ह्यावर इथे चर्चा नको. मी त्यांच्या बाजूने नाही, आधीच सांगते! )....पण त्यांना हे करण्यात हातभार लावणार्‍यां आपल्याच जमीनीवरच्या "भारतियांना" मात्रं औरंगजेबी शिक्षा हव्यातच....
चार पैशांसाठी अवघ्या देशाशी, इथल्या निरपराध माणसांशी गद्दारी....

त्याचबरोबर बेजबाबदार आणि नालायक राजकारण्यांनाही भर चौकात उभं करून येणार्‍या जाणार्‍या प्रत्येकाने....
माहीत नाही... शब्दं नाहीत... नक्की काय शिक्षा हवी...
पण अशी हवी की, जेणेकरून त्या खुर्चीवर टेकणारं पुढचं बुड धडावरच्या डोक्याचा देशासाठी आधी मगच स्वतःसाठी विचार करील.
(नुस्ता नपुंसक राग असला की असले शब्दांचे बुडबुडे फक्तं... येतात... )

कारणं बाहेर शोधायला लागत नाहीत. आपल्याजवळच असतात ती उत्तरं... आपण शोधतो ते "खरी सोडून बाकी सर्वं" कारणं.....
त्या शोधाबरोबर सुरू होतो स्वतःशीच व्यभिचार....

मुळात अशा व्यभिचारी राजकारण्यांना आता "बॉम्बस्फोटांची कारणं" शोधावी लागतिलच आणि ती मिळतिलच मिळतिल....

ATS च्या पदाधिकार्‍यांनी घातलेली जॅकेट्स फॉल्टी होती... ह्या बद्दल टेस्ट रिपोर्ट येऊनही, ती जॅकेट्स घालूनच ही मंडळी त्या युद्धात उतरली... त्यांना नक्की कोणी मारलं म्हणायचं मग? अतिरेक्यांनी की आपल्याच लोकांनी... ज्यांनी ही जॅकेट्स माहीत असूनही वापरात आणली....
श्शी... घृणा घृणा वाटते....

ऑपरेशन ताज संपले.

लायकीचा एकही नेता नाही. सगळे शेपूट घालून बसलेत.
१५ वर्ष झाली श्रीवर्धन ला आरडीएक्स उतरून पण अजून आपला पश्चिम किनारा संपूर्ण गार्डेड नाही. जिथे सुरक्षा यंत्रणा अस्तित्वात आहे ती किडलेली आहे. पैसे दिल्यावर ती विकत घेता येते. कस्टम्सचंही तेच.
पोलिसांकडे जुनाट शस्त्रास्त्रे. अत्याधुनिक सोयी सुविधा (शस्त्रे व इंटेलिजन्स संदर्भातल्या) असणं म्हणजे चोचले.
जीवावर खेळून पोलिसांनी काही कारवाई केलीच की हे दळभद्री नेते काहीतरी राजकारण खेळणारच. त्यामुळे मोठ्या आणि गंभीर गुन्हेगाराला कधीच शिक्षा होत नाही.
आणि आपल्याकडे पुळकेवाले लोकही कमी नाहीत. समाजवादी नावाची एक जमात आहे. या लोकांचा वास्तवाशी संपूर्ण संपर्क तुटलेला आहे. एकांगी बटबटीत रॉमॅन्टिसिझम एवढंच त्याला म्हणता येईल. 'दिल मे झाक के देखो' हा ताजा गाढवपणा त्यातलाच.

मग यापेक्षा वेगळं काय होणार?
-नी
http://saaneedhapa.googlepages.com/home

ithe sms pathawale jat aahet,
wicharle jat aahet

"KUTHE AAHE MARATHI MANUS"
"TAJ WAR JE KAMANDO LADHAT AAHET TE SOUTH INDIAN WA ITAR LOK AAHET"
 
TAR MALA ASE SANGAWE WATATE KI JE
14 POLICE MARLE GELE AAHET TE MARATHI HOTE
JAR KA RASTYAWAR TE ATIREKI ASECH BECHUT GOLIBAR KARAT GELE ASTE
TAR KITI BHAYYA KITI BIHARI ANI KITI PANJABI MARTIL??? KINWA KITI MARATHI MARTIL YACHA HISHOB KARAT BASLE NAHIT.
 
TAR YACHA WICHAR NEWS CHANNEL NE KARAWA KI AAPAN KAY BOLAT AAHOT.
ARMY MADHE KITI MARATHI AHET YACHI PANCHAYAT KARU NAYE.

शामल

अरे काय बिनडोकपणा आहे हा.. इथेही परत मराठी-भय्या, हिंदू-मुस्लीम वाद.
I swear तुमच्यापैकी कोणाचे जीवलग आत अडकायला हवे होते. मग अक्कल ताळ्यावर आली असती..
सैन्याला, मृतांना इतकंच काय पण दहशतवाद्यांना धर्म नसतो ही साधी अक्कल कधी येणार? आपण कुत्र्याच्या मौतीनंच मरायचं.. हीच लायकी आहे आपली..

चिनुक्स

अनुमोदन मी पण हेच लिहिणार होतो. काय घाणेरडे राजकारण चालु आहे...........
यात मराठी हिंदु मुस्लीम हा वाद कशाला............ हा हल्ला हिंदुस्तानवर झालेला आहे...........

बंदुकीची गोळी जात धर्म विचारत नाही...........

Pages