केसरी.. सचिन.. गुरुनाथ.. गिरीकंद.. अनुभव ट्रॅव्हल्स वगैरे कंपन्यांच्या जाहिराती सतत वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्याला दिसतात...
आम्ही आत्तापर्यंत केलेला प्रवास हा..
आपण माहिती काढून.. प्रीबुकिंग करणे..
जे जाऊन आलेत त्यांना त्याविषयी विचारुन व्यवस्थित आखणी करुन आपल्या सहलीचे आयोजन करणे अशा स्वरुपाचा होता..
यात थोडा त्रास होतो पण आपल्याला हवे तसे एखाद्या आवडलेल्या ठिकाणी जास्त वेळ रमता येते हा फायदा.
पण आता एखाद्या ट्रॅव्हल कंपनीतर्फे प्रवास करावा वाटले. आपल्यांपैकी बर्याच जणांनी असा प्रवास केला असेलच.
तुमचा अनुभव कसा होता प्रवासाचा? सोयी कशा होत्या? त्यांचा स्टाफ.. जी ठिकाणं सांगितली ती दाखवली गेली का.. किंवा परदेशप्रवास कसा होता? काही छुपे खर्च नंतर सांगितले गेले का?.. या सगळ्यांची माहिती हवी आहे..
त्याचा मला निश्चितच फायदा होईल..
.............................
मायबोलीबाहेरच्या वेबसाईटसच्या लिंक्स धोरणात बसत नसल्याने काढून टाकल्या आहेत. मायबोलीकरांना या सगळ्या एकत्र असणे सुलभ वाटत असले तरी मायबोलीवर पैसे देऊन जाहिरात करणार्या जाहिरातदारांसाठी अशा लिंक्स असणे योग्य नाही. यातल्या प्रवासी कंपन्यांना हा बाफ प्रायोजीत करायचा असेल तर त्यांचे स्वागत आहे.
-वेबमास्टर
माझ्या माहितीप्रमाणे मेवाड
माझ्या माहितीप्रमाणे मेवाड म्हणजे उदयपूर माऊंटअबू इकडला भाग( गुजरात बॉर्डरला लागून असलेला )आहे आणि मारवाड म्हणजे बिकानेर जैसलमेर इकडचा भाग आहे रिया. पण राजस्थान मला स्वतःला खूप आवडलेलं
आईबाबांना पाठवतेयस तर ग्रुपतर्फे पाठवलेलं बर असं माझं मत. कधी प्लॅन करतेय?
डिसेंबर महिन्यात पाठवायचय
डिसेंबर महिन्यात पाठवायचय म्हणजे आत्ता मला बूकिंग करायलाच हवं. है ना?
ह्म्म. तेच सांगणार होते तुला.
ह्म्म. तेच सांगणार होते तुला.
(No subject)
रिया २७००० फ्लाइटने
रिया २७००० फ्लाइटने राजस्थानचे म्हणतायेत? लिंक देतेस का टुरची? किती दिवसांची आहे? मी केसरी वाल्यांची बघितली. ते ४०००० म्हणतायेत वेबसाइटवर. लिंक देते थांब
www.veenaworld.com/tour/rajas
www.veenaworld.com/tour/rajasthan-splendour/
http://www.kesari.in/India-Tours/Rajasthan-Mewad-13-RB.asp
यातली केसरीची टुर आवडली. पण ग्रुप टुर आहे. आणि किंमत पण खुप जास्त.
रिया, विहार ट्रॅव्हल्सना
रिया, विहार ट्रॅव्हल्सना विचार. आमचे ज्ये.ना. गेल्याच वर्षी त्यांच्यासोबत राजस्थान-मारवाड करून आले. करकरीत वाळवंटात तंबूत राहून आले. ज्ये.नां.ची अजिबात आबाळ होणार नाही अशी सोय होती तंबूंमधेही. बाकी ट्रीपही मस्त झाली त्यांची.
खर्च किती झाला याचा मात्र मला अंदाज नाही. (पण केसरी-वीणा वगैरेंपेक्षा नक्कीच कमी होता.)
साईटच्या लिंक एकत्र दिल्या
साईटच्या लिंक एकत्र दिल्या ,छान .
रीये वीणाज वर्ल्ड्ची लिंक दे
रीये वीणाज वर्ल्ड्ची लिंक दे लवकर. मला मिळालीये पण त्यात नोवेंबर ची राजस्थान नाहीये.
रिया मारवाड म्हणजे -बीकानेर
रिया मारवाड म्हणजे -बीकानेर /जैसलमेर/जोधपुर आणि मेवाड म्हणजे जयपूर/उदयपुर/अजमेर/पुष्कर/राणकपूर /माउंट अबू . दोन्ही एकत्रित केलीत तर पंधरा दिवस लागतातच लागतात. कदाचित खूप दमवणार सुद्धा होऊ शकत . वेग वेगळ ही करू शकता पण मग जास्त पैसे पडतात. सिद्धार्थ ट्राव्हल / अनंत ट्राव्हल/ विहार ट्राव्हल यांचा ही विचार करू शकतेस. फक्त त्यांच्या टुर्स मुंबईवरून असतात अस वाटत. सकाळ पेपर मध्ये खूप टुर्स च्या जाहिराती येत असतीलच ना
अग लिंक कुठुन देऊ? मी
अग लिंक कुठुन देऊ?
मी प्रत्यक्ष ऑफिसमध्ये जाऊन चौकशी करुन आलेय
ललिता, धन्स! विहार ट्रॅव्हल्स कुठे आहे पुण्यात?
http://www.vihartravels.in/co
http://www.vihartravels.in/contactus.html
पेरू आता ट्रिप ची किंमत
पेरू आता ट्रिप ची किंमत वाढलीये
अत्ताच वीणावाल्यांना कॉल केलेला... बूकिंग फुल होतय म्हणून त्यांनी ६००० डिस्काऊंट होता तो आता ३००० केलाय
त्यामुळे आधी जी ट्रिप मला २७००० ला पडत होती ती आता ३०९०० ला पडणारेय.
यामध्ये -
७ दिवस राजस्थान मेवाड
मुंबई टू मुंबई फ्लाईट
३ स्टार अकोमोडेशन
ऑल मील
इंटरनल ट्रॅव्हलिंग
साईट सीईंग
एंट्रान्स फीज
टूर मॅनेजर , टूर गाईड
या फॅसेलिटीज आहेत.विहार वाल्यांना फोन केलेला पण त्यांनी सांगितल की वरचं सगळं (प्रवास सोडून) २६०००ला .... आणि फ्लाईट टिकिट्स ते बूक करणार त्याचे जे पैसे होतील ते आणखी एडिशन
मी पुढच्या आठवड्यात वीणाज वर्ड मध्ये बूकिंग करुन येते य
आधीच करायला हवं होतं
रीये ३०,९०० पर पर्सन. म्हणजे
रीये ३०,९०० पर पर्सन. म्हणजे ३१ मग केसरी चे पण ३४ होते.
रिया २७००० होते तेव्हा बुक
रिया २७००० होते तेव्हा बुक करायला हवे होते, त्यांनी ती कंपनी नवीन म्हणून दिलेली ऑफर होती असे जाहिरातीत वाचले होते.
इंद्रा ह्यापेक्षा वीणाज बरंय
इंद्रा ह्यापेक्षा वीणाज बरंय असं मला वाटतंय. वर रीयाने दिलंय त्यात काय काय इन्क्लुड आहे ते.
ह्या दोन लिंकात एअर टिकीट नाहीये तसेच जेवण ही नाहीये.
ओंकार टूर & ट्रव्हल्स आयोजित
ओंकार टूर & ट्रव्हल्स आयोजित यात्रा सहल..
केरळ तिरुपतीसह रु. ११,५००/-
संपर्क : ९८२१९६३०४५
मी पुढच्या आठवड्यात वीणाज
मी पुढच्या आठवड्यात वीणाज वर्ड मध्ये बूकिंग करुन येते. रीये ३०,९०० पर पर्सन.
केलीस का बुक? कारण मला वीणाज वर्डची मेल आली त्यात म्हटलयं की *Rates are not applicable from December 15, 2013 till January 15, 2014 मला डिस्काउंट (२०००) देऊन २९३८०
सांगितले. सिनियरना २४०० + फॉऊंडर ४००वजा करून २८९६८/- सांगितले.१/११/२०१३ ची फ्लाइट आहे.
येळेकर, मी अजुन बूकिंग नाही
येळेकर, मी अजुन बूकिंग नाही केलय.
ते २९३८० + सर्व्हिस टॅक्स असं असेल ना?
मी सगळं धरुन सांगितलं.
आणि मी २० डिसेंबर साठी बूकिंग करतेय.
आणि आमचे जेष्ठ नागरिक नाहीये अजुन तरी
अंजू हो ना
इंद्रा, वरती लिहिलय बघ मी
ते सगळं आहे पॅकेज मध्ये...
आता मी वीणाजला च फायनल करते.... म्हणजे ते नीट जातील, नीट येतील
मला टेन्शन नको
http://www.makemytrip.com/hol
http://www.makemytrip.com/holidays/india/search?depCity=&isDestHoliday=t...
check these options, if interested.
वीणाचा अनुभव जरुर
वीणाचा अनुभव जरुर लिहा.
उदयपुर मधिल पॅकेज टुर ऑपरेटचा संपर्क खाली देत आहे. बुकिंग करण्याआधी टुर ऑपरेटर कडे चौकशी करा.
Fortune Tours & Travels
email ID : fortunetourstravels@gmail.com
Tel : +91-294-2442246
Mob: +91 98291 20375
ओकेज धन्स!
ओकेज
धन्स!
ते २९३८० + सर्व्हिस टॅक्स असं
ते २९३८० + सर्व्हिस टॅक्स असं असेल ना? नाही रिया! सर्व्हिस टॅक्स include आहेत. पण तू २० डिसेंबर साठी बुकिंग करतेय त्यामुळे असेलही.कारण मी ही ४ दिवस लेट केला तर १२०० चा फटका(P.P.) पडला.
देवकी, मी ऑगस्ट मध्ये
देवकी, मी ऑगस्ट मध्ये विचारलेलं तर मला सहा हजार डिस्काऊंट देत होते ते
आता तीन हजारच देतायेत
आत्ता करुन आलेय बूकिंग
आणि माझी टूर कॉस्ट २९३८०+ सर्व्हिस टॅक्स अशी आहे
कोणी जातय का २० डिसेंबरला विव
कोणी जातय का २० डिसेंबरला विव सोबत?
म्हणजे मी अजुनच टेन्शन फ्री होईन
म्हणजे मी अजुनच टेन्शन फ्री
म्हणजे मी अजुनच टेन्शन फ्री होईन >>>> टेन्शन नको घेऊस.याबाबतीत विवबद्दल बर्याच जणांचे चांगले अनुभव आहेत.
तुमच्या पोस्ट्स वाचतानाच माझी ट्रिप त्यामुळे ठरली.वर दिलेल्या अनेक लिन्कस चांगल्या आहेत.पण माझे अगदी आयत्यावेळी ठरले.त्यामुळे विव पसंत केले. तेव्हा तुम्हाला धन्यवाद!
मँगो हॉलिडेज चे कस्टम पॅकेजचा
मँगो हॉलिडेज चे कस्टम पॅकेजचा चांगला अनुभव आहे का?
मेकमाय ट्रिप वाले दोन दिवस झाले तरी उत्तर देईनात.
देवकी, विव सोबत कुठे आणि कधी
देवकी, विव सोबत कुठे आणि कधी जाताय तुम्ही?
गोल्डनबीच रिझॉर्ट मुरूड येथे
गोल्डनबीच रिझॉर्ट मुरूड येथे कोणी राहिले आहे का? काय अनुभव इत्यादी?
अमा, इथे वाच. मस्त आहे. जा
अमा, इथे वाच. मस्त आहे. जा आणि एंजॉय कर. माझी पोस्ट त्या धाग्यावर ७व्या पानावर सगळ्यात शेवटी आहे.
पिकनिकबद्दलची माहिती त्याच धाग्यावर विचार ना. इथे प्रवासी कंपन्यांचा अनुभव शेअर करायचा आहे.
Pages