तुमचा प्रवासी कंपन्यांबरोबर प्रवासाचा अनुभव..

Submitted by के अंजली on 22 August, 2013 - 12:49

केसरी.. सचिन.. गुरुनाथ.. गिरीकंद.. अनुभव ट्रॅव्हल्स वगैरे कंपन्यांच्या जाहिराती सतत वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्याला दिसतात...

आम्ही आत्तापर्यंत केलेला प्रवास हा..
आपण माहिती काढून.. प्रीबुकिंग करणे..
जे जाऊन आलेत त्यांना त्याविषयी विचारुन व्यवस्थित आखणी करुन आपल्या सहलीचे आयोजन करणे अशा स्वरुपाचा होता..
यात थोडा त्रास होतो पण आपल्याला हवे तसे एखाद्या आवडलेल्या ठिकाणी जास्त वेळ रमता येते हा फायदा.

पण आता एखाद्या ट्रॅव्हल कंपनीतर्फे प्रवास करावा वाटले. आपल्यांपैकी बर्‍याच जणांनी असा प्रवास केला असेलच.
तुमचा अनुभव कसा होता प्रवासाचा? सोयी कशा होत्या? त्यांचा स्टाफ.. जी ठिकाणं सांगितली ती दाखवली गेली का.. किंवा परदेशप्रवास कसा होता? काही छुपे खर्च नंतर सांगितले गेले का?.. या सगळ्यांची माहिती हवी आहे..

त्याचा मला निश्चितच फायदा होईल.. Happy

.............................

मायबोलीबाहेरच्या वेबसाईटसच्या लिंक्स धोरणात बसत नसल्याने काढून टाकल्या आहेत. मायबोलीकरांना या सगळ्या एकत्र असणे सुलभ वाटत असले तरी मायबोलीवर पैसे देऊन जाहिरात करणार्‍या जाहिरातदारांसाठी अशा लिंक्स असणे योग्य नाही. यातल्या प्रवासी कंपन्यांना हा बाफ प्रायोजीत करायचा असेल तर त्यांचे स्वागत आहे.
-वेबमास्टर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ग्लास ब्रेकींग हॅमर जे ऑनलाईन मिळतात ते काही कामाचे नाही असे हा खालचा व्हिडीओ सांगतो आहे.
http://www.youtube.com/watch?v=-r2Yq6Pn1Gk

त्या ऐवजी पॉकेट नाईफ उपयोगी आहे असे त्याचे म्हणणे आहे.

आपल्यापैकी एखाद्याने प्रॅक्टीकल उपयोग कधी केला आहे काय?

नुकतीच माझी चुलत भावंडे, बाबा, काका वगैरे कंपनी पंजाब ट्रीप करुन आली. पुण्यातल्या स्वयंभू ट्र्व्हल्सचे पॅकेज टूर घेतले होते. प्रतिमाणशी:१४६०० रु. बच्चेकंपनी: ९५००रु. आणि ज्येष्ठ नागरिकांना १०००रु. सुट.

एकंदरीत अनुभव छान होता. राहण्याची, खाण्यापिण्याची व्यवस्था उत्तम होती.त्यांच्या बरोबर तीन स्वयंपाकी होते.
त्यामुळे काही त्रास झाला नाही. अगदी गव्हाची खीर वगैरे केली होती म्हणे!

एकूण नऊ दिवसांची ट्रीप होती. ६ नोव्हेंबर ते १४ नोव्हेंबर.

अल्पना.. त्यांनी ट्रेनने प्रवास केला. येताना राजधानीने आले. पंजाब आणि हिमाचल प्रदेश असे फिरले. त्यात अमृतसरचे सुवर्ण मंदिर आणि आजूबाजूची ठिकाणे, डलहौजी,खजियार आणि इतरही काही ठिकाणे होती.

ओके. हिमाचल + पंजाब असेल तर ठिक, कारण नुसतंच पंजाबमध्ये ९ दिवस फिरण्यासारखं खूप काही नाहीये.

आई-बाबांना शिर्डी-शिंगणापूर करायचे आहे, पुण्यात आमच्याकडे मुक्काम करतील. शक्यतो एका दिवसाची ट्रीप होईल अशी अपेक्षा आहे. पण एक मुक्काम करुन पुढे आणखी एखादं तीथक्षेत्र/पर्यटन स्थळाची सफर होत असेल तर ती पण चालेल.

पुण्यातून या क्षेत्रांचे दर्शन घडवून आणण्यासाठी अनेक कंपन्या आहेत. पण चांगल्या काही कंपन्यांचे माहिती आहे काय? कुणी अशी यात्रा केली आहे काय?

शक्यतो प्रायवेट कार नको, ग्रूप सोबतच फिरायचयं. चौधरी यात्रा कंपनीचा अनुभव कसा आहे?

अनुभव ट्रॅव्हल्ससोबत हेरिटेज कर्नाटक ट्रीप कोणी केली आहे का? अनुभवच्या टूर्स चांगल्या असतात असं बर्‍याच जणांकडून ऐकलं आहे.

माझी आई बाबा १५ दिवसापूर्वी जाऊन आले कर्नाटकात, अनुभवबरोबर. कोस्टल नाही , दुसरं होतं नाव. कुर्ग, हसन वगैरे. प्रचंड खुष होते आईबाबा सर्व व्यवस्थेवर. हॉटेल्स तर उत्तमोत्तम होती.

शर्मिला, मंजू-डीनं अनुभवसोबत कर्नाटक सहल केली आहे.

आम्ही नुकतीच त्यांच्यासोबत मस्त केरळ-ट्रीप करून आलो.

शर्मिला, गेल्या दिवाळीत आम्ही अनुभवच्या 'डिस्कव्हर कर्नाटक' सहलीला जाऊन आलो. खूप मस्त अनुभव! राहण्याची व्यवस्था उत्तम, खायची चंगळ. फक्त फिरायच्या बस अगदी उत्तम अश्या नव्हत्या, तेवढीच काय ती आणि म्हटलं तरच गैरसोय.

आताच मेकमायट्रिपच्या मार्फत बुकींग करुन दिल्ली-आग्रा-जयपूर करुन आले.

मेकमायट्रिप मुख्यतः हॉटेल, विमानाची तिकीटं आणि स्थानिक वाहन उपल्ब्ध करुन देते. म्हटलं तरी तुम्ही एका गृप बरोबर असता, म्हटलं तर स्वतंत्र. साधारणतः काय काय बघायचे येईल याचा एक आराखडाही असतो.

मेकमायट्रिप ची ही आमची दुसरी ट्रिप. आधी अंदमानला जाऊन आलो. तिथे फारच चांगला अनुभव आला. त्यामानाने ह्या ट्रिपमध्ये काही धडे शिकलो.
१. परतीच्या प्रवासाचे तिकीट आपल्या शेवटच्या स्थानापासूनच पाहीजे हे सांगा. आम्हाला जयपूरवरुन दिल्लीला फक्त विमानासाठी यावे लागले.
२. स्थानिक गाईड, मेकमायट्रिप देते, काही ठिकाणी चांगला अनुभव आला, काही ठिकाणी नाही. फतेहपूर-सिक्रीला गाईडला काही सांगण्या ऐवजी विक्रेत्यांकडेच घेउन जाण्यात रस होता. अक्षरशः विचारुन विचारुन माहीती काढली. बिरबलाचा महाल वैगरे न दाखवताच साहेब बाहेर निघाले होते.
३. खरेदी करायची असेल (जयपूर) तर आधी नेटवर शोधाशोध करुन खरेदीचे ठिकाण शोधून ठेवा. कुठच्याही लोकल माणसाला किंवा गाईडला विचारल्यास फसवणूक होण्याची शक्यता आहे (आमची झाली. कुठेतरी भलत्याच ठिकाणी बाजार आहे असे सांगितले)
४. दिल्ली आग्रा जाताना, टॅक्सी ड्रायव्हर आम्हाला यमुना महामार्गावरुन किती जलद जाता येते, काही खाचा-खळगे नाहीत. २ तासात पोचू. पण टोल तुम्हाला भरावा लागेल.
असे सांगत होता. पण जून्या मार्गावर एक सिकंदरा म्हणून ठिकाणी अकबराची कबर आहे.ती लिस्ट मध्ये होती. तर काय फक्त एक थडगं आहे म्हणून तो आमचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होता. नशिबाने आम्ही ऐकले नाही. सिकंदरा बघण्यासारखे आहे.
तिच गोष्ट लाल किल्ला आणि आग्रा फोर्ट. म्हणे एकदम सारखे आहेत. दोन्ही बघायची गरज नाही इ. पण अर्थातच दोन्ही वास्तु वेगळ्या आहेत.

आमची ट्रिप चांगली झाली म्हणजे जे बघायला गेलो होतो ते व्यवस्थित बघितले.
पुन्हा मेकमायट्रिप बरोबर जाईनही कारण हॉटेल्स चांगली असतात (मिनिमम ३ तारे असलेले सांगावे) आणि वाहनाची सोय होते. आपल्या फिडबॅकवर त्यांचे पुढचे काम अवलंबून असते म्हणून ते ही फार कशाला विरोध करत नाहीत.

बरोबर आपण ज्या एजंट मार्फत बुकींग केले त्याचा नंबर जरुर ठेवावा.

डिसेंबर-जानेवारी मध्ये मैत्रिणी-मैत्रिणींचा मध्यप्रदेश टूर करण्याचा विचार आहे..कोणत्या टूर कंपनी कडून चांगल package मिळेल..वीणावर्ड सारख्या काही कंपन्यांकडे ग्रुप टूर मध्ये मध्यप्रदेश include च नाहीएय

चांगली माहिती, अदिती. बऱ्याचवेळा दिल्लीचे विमानाचे स्वस्त तिकीट मिळते. सुरुवात तिथे करावी. महा०मंडळाजवळ पहाडगंज, नवी दिल्ली येथे गिजरे ट्रावल आहे. त्यांचे काम पुण्यातूनही होते. दोन दिवसांनी आग्रा जावे. शुक्रवारी ताज बंद असतो. दोन दिवस राहून जयपूरला जावे. तिथे दोन दिवस राहून दुपारी दोनच्या जयपूर सु०फास्ट गाडीने सकाळी मुंबईला येता येते.

@श्रध्दा,
म०प्रदेशचे टु०कार्यालय वल्र्ड ट्रेड सेंटरला मुंबईत आहे. सर्व सहल आखून बुकिँग करतात. एकदा विचारा जबलपूर, अमरकंटक, बांधवगड, कान्हा, खजुराहो हे फार एकाबाजूला पूर्वेला आहेत. बसचा कंटाळवाणा प्रवास करावा लागेल ईंदोर उजैन भोपाळ पासून. दोन भागात आटोपशीर होईल.

माहितीबद्दल धन्यवाद Srd....सततचा प्रवास फार कंटाळवाणा होईल म्हणून माझासुद्धा दोन भागात हि सहल करण्याचाच विचार होता

पुढच्या महिन्यात केदारनाथ ला जायचंय . आपलं आपलं म्हणजे प्रवासी कंपनीची मदत न घेता . तिथे गेल्यावर राहण्यासाठी हॉटेल मिळतात का ? कि इथूनच बूक करावे लागेल ? आपलं आपल्याला लोकल ट्रान्सपोर्ट वापरून फिरता येतं का ? तिथे गेल्यावर वाहन बूक करता येतं का ?खाण्या पिण्याची , कपड्याची काय काळजी घ्यावी लागेल ?

cleartrip.com वरुन हॉटेल बुकींग चा अनुभव आहे का कोणाला ?
ते लोक जे डील देतात त्यानुसार मला हॉटेल पेक्षा सुमारे ६००० रुपये कमी कॉस्ट दिसते आहे..
ईतकं स्वस्त त्याना कसं काय परवडु शकतं...
काही hidden चार्जेस असतात का त्यात ?

कोनाला काही अनुभाव असेल तर प्लीज शेअर करा

केदारनाथला प्रवासी कंपनीकडून जायची अजिबातच गरज नाही. केदारनाथला खूप हॉटेल्स आहेत. महाराष्ट्र मंडळाच्या गेस्ट हाऊसमध्ये चुकूनही उतरू नका, अगदी बकाल अवस्था होती आम्ही गेलो तेव्हा. गढवाल निगमचं रेस्ट हाऊस थोडं महाग असतं, पण अगदी स्वच्छ होतं. तिथे जेवण मिळतं की नाही लक्षात नाही पण बाहेर अगदी सहज होते ती सोय.

तिथे फिरण्यासाठी लोकल ट्रान्सपोर्ट म्हणजे नक्की कुठे? केदारनाथला की उत्तराखंडला?

cleartrip.com वरुन हॉटेल बुकींग चा अनुभव आहे का कोणाला ? >> Booking.com वर सगळ्यात स्वस्त डिल मिळतात हा अनुभव आहे. आणि फक्त credit card no. द्यावा लागतो. हॉटेल वर पोहचल्यावर पैसे भरायचे.

थेट हॉटेलशी संपर्क करुन बुक केले तर ते महाग पडते, त्या पेक्षा वरिल साईट वरुन बुक केल्यास फायदा होतो हे मात्र नक्की.

Pages