तुमचा प्रवासी कंपन्यांबरोबर प्रवासाचा अनुभव..

Submitted by के अंजली on 22 August, 2013 - 12:49

केसरी.. सचिन.. गुरुनाथ.. गिरीकंद.. अनुभव ट्रॅव्हल्स वगैरे कंपन्यांच्या जाहिराती सतत वेगवेगळ्या माध्यमांतून आपल्याला दिसतात...

आम्ही आत्तापर्यंत केलेला प्रवास हा..
आपण माहिती काढून.. प्रीबुकिंग करणे..
जे जाऊन आलेत त्यांना त्याविषयी विचारुन व्यवस्थित आखणी करुन आपल्या सहलीचे आयोजन करणे अशा स्वरुपाचा होता..
यात थोडा त्रास होतो पण आपल्याला हवे तसे एखाद्या आवडलेल्या ठिकाणी जास्त वेळ रमता येते हा फायदा.

पण आता एखाद्या ट्रॅव्हल कंपनीतर्फे प्रवास करावा वाटले. आपल्यांपैकी बर्‍याच जणांनी असा प्रवास केला असेलच.
तुमचा अनुभव कसा होता प्रवासाचा? सोयी कशा होत्या? त्यांचा स्टाफ.. जी ठिकाणं सांगितली ती दाखवली गेली का.. किंवा परदेशप्रवास कसा होता? काही छुपे खर्च नंतर सांगितले गेले का?.. या सगळ्यांची माहिती हवी आहे..

त्याचा मला निश्चितच फायदा होईल.. Happy

.............................

मायबोलीबाहेरच्या वेबसाईटसच्या लिंक्स धोरणात बसत नसल्याने काढून टाकल्या आहेत. मायबोलीकरांना या सगळ्या एकत्र असणे सुलभ वाटत असले तरी मायबोलीवर पैसे देऊन जाहिरात करणार्‍या जाहिरातदारांसाठी अशा लिंक्स असणे योग्य नाही. यातल्या प्रवासी कंपन्यांना हा बाफ प्रायोजीत करायचा असेल तर त्यांचे स्वागत आहे.
-वेबमास्टर

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

केसरी सोबत शिमला मनाली ट्रीप कोणी केली आहे का इथे ?
अनुभव कसा होता ? जेवण क्वालीटी ? हॉटेल्स ? गाड्या ? ही सर्व सोय कशी होती ?
साईट सीइंग साठी खुप दगदग झाली का ?
प्रवासी कंपनी सोबत जायचे आहे (स्वतः ट्रीप प्लॅन करण्यात यावेळी अजिबात इंटरेस्ट् नाही )
केसरी सोडून अजुन कोणत्या कंपनी सोबत हीच ट्रीप केली असेल तरी तो अनुभव सांगा.

केसरी सोबत शिमला मनाली ट्रीपला मी (म्हणजे आम्ही) गेलो होतो. त्याला आता बरीच वर्षे झाली त्यामुळे सगळे तपशील आठवत नाहीत. पण एकंदर अनुभव खूप छान होता हे मात्र विसरलो नाही. जेवण क्वालीटी, हॉटेल्स, गाड्या सर्वच अगदी छान. कुठे गैरसोय किंवा त्रास झाला नाही.
तेंव्हा सुद्धा आम्हाला स्वत:चे स्वत: बुकिंग करून जायचे नव्हते. ड्रायव्हिंग बुकिंग राहणे खाणे गाड्यांच्या व बुकिंगच्या वेळा सांभाळणे या सगळ्या व्यवस्थापनाचे टेन्शन न घेता फक्त ट्रीप अनुभवणे हा हेतू होता तो साध्य झाला. त्यातल्या त्यात एक दोनच नकारात्मक बाबी असतात अशा ट्रीप्स मध्ये. एक म्हणजे स्वत:ला हवे तिथे मध्येच थांबणे किंवा एखाद्या ठिकाणाच्या आसपास हवे तिथे जाऊन येणे (जे आपण स्वत: ड्राईव करताना केले असते) असे काही करता येत नाही. आणि दुसरे म्हणजे सहप्रवासी "उडदामाजी काळे गोरे" असतात. सुदैवाने आमच्या ट्रीप मध्ये सर्व चांगले होते.
अर्थात हे त्यांच्या ग्रुप मधून जात असाल तर. माझ्या माहितीनुसार त्यांच्या चार्टर्ड ट्रीप पण असतात कि ज्या थोड्या महाग असतात पण फायदा हा कि गाडी फक्त आपल्यासाठी असते. ड्रायव्हर हॉटेल बुकिंग खाणे इत्यादी सगळ्याची काळजी ते घेतात. (अर्थात चार्टर्ड ट्रीप चा मला अनुभव नाही)

धन्यवाद अतुल

तेंव्हा सुद्धा आम्हाला स्वत:चे स्वत: बुकिंग करून जायचे नव्हते. ड्रायव्हिंग बुकिंग राहणे खाणे गाड्यांच्या व बुकिंगच्या वेळा सांभाळणे या सगळ्या व्यवस्थापनाचे टेन्शन न घेता फक्त ट्रीप अनुभवणे हा हेतू होता तो साध्य झाला.>> ..अगदी हाच हेतु आहे आमचा. गेल्या १-२ ट्रीप स्वत
केल्या त्यावेळी असे लक्षात आले की त्या ठीकाणी पोचण्यापुर्वी च इतकी माहिती गोळा झाली आहे आपल्याकडे की प्रत्यक्ष तिथे पोचल्यावर " अरे हे तर पहिलय की आपण अधीच" असं वालं फीलींग आलं. सगळे बूकिंग करताना दमछाक झाली ती वेगळीच.त्यामुळे पाटी कोरी ठेवुन प्रवास करयचा आहे.

त्यातल्या त्यात एक दोनच नकारात्मक बाबी असतात अशा ट्रीप्स मध्ये. एक म्हणजे स्वत:ला हवे तिथे मध्येच थांबणे किंवा एखाद्या ठिकाणाच्या आसपास हवे तिथे जाऊन येणे (जे आपण स्वत: ड्राईव करताना केले असते) असे काही करता येत नाही >> बरोबर आहे. पण तेवढं चालेल.

दुसरे म्हणजे सहप्रवासी "उडदामाजी काळे गोरे" असतात. सुदैवाने आमच्या ट्रीप मध्ये सर्व चांगले होते. >> ग्रूप टुर मुद्दाम करयची आहे कारण मुलीला असा अनुभव मिळावा अशी इच्छा आहे. Happy

अजून एक आठवणारी चांगली गोष्ट अशी कि केसरीचे स्वत:चे स्वयंपाकी व अन्य मदतनीस आपल्या बसच्या पुढे (आपल्याआधी तासभर पोहोचतील अशा अंतराने) प्रवास करत होते. जेवण करण्यासाठी जिथे थांबू तिथे ते आपण पोहोचण्याआधी जेवण बनवून ठेवत असत. याचा फायदा असा कि जेवणाचा एक दर्जा राखला जात असे व करण्याची पद्धत एकच असल्याने वेगवेगळ्या हॉटेल्सचे खाणे खाल्ल्याने पोटाचा त्रास (ज्यांना होतो) होण्याची शक्यता कमी होते.

बायदवे, या धाग्याच्या पहिल्या दोन-तीन पानांवर केसरी शिमला कुलु मनाली बाबत नकारात्मक अनुभव आहेत ते सुद्धा वाचून घ्या. दोन्ही बाजू कळतील. उदाहरणार्थ मी जो प्रतिसाद वरती सकारात्मक म्हणून लिहिला आहे त्याची दुसरी बाजू "तेच तेच जेवण" असा नकारात्मक सुद्धा असू शकतो Happy

बायदवे, या धाग्याच्या पहिल्या दोन-तीन पानांवर केसरी शिमला कुलु मनाली बाबत नकारात्मक अनुभव आहेत ते सुद्धा वाचून घ्या. दोन्ही बाजू कळतील. >> हो ते वाचले मी..म्हणुन च केसरी सोडुन अजुन कुठल्या कंपनी सोबत हीच ट्रीप कोणी केली आहे का ? आणि त्यांचे अनुभव काय आहेत हे जाणुन घ्यायचे होते.

ओके.. मी काही पाने स्किप केले तरी सुजाच्या लिंक्स बघेन.
ट्युलिप हॉलिडे बद्दल प्रत्यक्ष अनुभव असलेले फीडबॅक आहे.
सो सर्वात आधी त्यांना संपर्क करेल.
आमच्या घरातील जेष्ठ नागरिक आणि इतरही काही लोकांनी
वीणा बद्दल तक्रार केली आहे की ते ग्राहकांना ग्रुहित धरतात आता कारण स्पर्धाच नाही त्यांना जेना गटात.
सेवा वाईट नसली तरी इतरांच्या तुलनेत ऑलमोस्ट दुप्पट पैसे. फक्त गोड गोड गप्पा मारणारे टुर मॅनेजर, पण कुठलीही तक्रार केली तर चक्क कानाडोळा. वेबसाईट वर प्रॉमिस केलेल्या काही गोष्टी निर्लज्जपणे मागितल्यावर दिल्या.
दुसऱ्या राज्यातही चांगले ग्रुप टुर ऑपरेटर माहिती असतील तर ते पण शेअर करा.

केसरी सोबत नैनिताल ट्रीप कोणी केली आहे का ? अनुभव कसा होता ? हॉटेल्स चांगली होती का ? एकंदर साईंटसिईंग वगैरे घाई गडबड की व्यवस्थित करुन दिलं ?
पहिल्यांदाच ग्रुप टुर चा अनुभव घेणार आहोत त्यामुळे जरा साशंक आहोत तरी कृपया अनुभव शेअर करावेत.
धन्यवाद.

प्रश्ण कुठे विचारावा कळले नाही म्हणुन इथे विचारते.
मे महिन्यात अंदमान करणं ठीक राहिल का ? कोणी मे मधे जाउन आले आहे का ? मला मिक्स रिव्यु मिळाले आहेत.
काहिंच्या मते थंडीत गेलं तरी तिथे भयंकर च गरमी असते. उलट मे म्हणजे मान्सुन च्या अलिकडचा महिना चांगले वातावरण मिळेल असे काही लोक म्हणाले.
काहींच्या मते , मे मधे अज्जिबात जाउ नये...
कृपया कोणाला अनुभव असेल तर शेअर करा.
मे मधे जाण्यासारखी ( उत्तरेकडची सोडुन ) अजुन काही ठीकाणे सुचवता आली तर तसंही सुचवा.
गेले दोन वर्ष काश्मिर, नैनिताल झाले आहे..आता परत नॉर्थ साईड ला जायचे नाहिये.
धन्यवाद.

तमिळनाडूचे हवामान म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरमध्ये पावसाळा असतो. जानेवारीत संक्रांत हा पीकप त्याचा सण म्हणजे त्यांची दिवाळी. तेच हवामान तिकडे. जानेवारी १५ ते फेब्रुवारी १५ उत्तम.

शिमला टॉय ट्रेन ने कोणी प्रवास केला आहे का? जाताना आणि येताना कनेक्टिंग विमानाच्या वेळा मॅच होत नसल्यामुळे आम्ही पार्शिअल ट्रेन जर्नी करायचा विचार करत आहे. शिमला ते शोघी (किंवा त्या पुढीस्टेशन्) असा प्रवास विस्टाडोम ने करायचा बेत आहे. नंतर ड्रायव्हर ला शोघी ला बोलावून परत शिमला असा प्लॅन आहे. साधारण दिड दोन तासाचा प्रवास आहे. तर माझे प्रश्न असे आहेत.
१. विस्टा डोम आणि फर्स्ट क्लास मध्ये छतावरच्या काचा सोडल्या तर काही फरक आहे का?
२. दिड दोन तासाचा प्रवास अनुभव घेण्यापुरता पुरे कि शोघी च्या पुढे काही न मिसण्यासारखे आहे?
३. टॉय ट्रेन बद्दल अजुन काही मौलिक माहिती असल्यास ती देखील पुरवणे

१. विस्टा डोम आणि फर्स्ट क्लास मध्ये छतावरच्या काचा सोडल्या तर काही फरक आहे का?..... काही ही नाही.... मी त्या भागात ८ वर्षे राहिलो आहे
२. दिड दोन तासाचा प्रवास अनुभव घेण्यापुरता पुरे कि शोघी च्या पुढे काही न मिसण्यासारखे आहे?: काही ही नाही ... सर्व काही साध्या ट्रेन मधून पाहता येते
३. टॉय ट्रेन बद्दल अजुन काही मौलिक माहिती असल्यास ती देखील पुरवणे: या रूट वरील सर्व ट्रेन्स आकर्षक आहेत. एकदा अनुबव घ्यावा... विशेष्तः बडोग ला उतरून पहा... जुने स्टेशन छान आहे

धन्यवाद रेव्यु. बरोग पर्यंत जायचा प्लॅन नाहीय. म्हणजे मुलांना टॉय ट्रेन चा अनुभव देण्यासाठी दोन तासाची राईड पुरेशी आहे Happy

शिमला टॉय ट्रेन किंवा इतर ट्रेनचा विस्टाडोम प्रवास केलेला नाही. पण विस्टाडोम प्रवासाचे फायदे तोटे आणि पैशाचा मोबदला यांचे काही विडिओ पाहिल्यावर कळलं की त्यातून जायचं नाही.

चौर्याहत्तर वर्षाच्या ज्येनाबरोबर युरोप ट्रिप करायची आहे. ज्येनाची तशी इच्छा आहे. तिथे जायला चांगला सीजन म्हणजे महिना कोणता. ट्रॅव्हलशिवाय पर्याय नाही असे वाटतेय पण तिथेही दगदग होईल का अशी शंका आहे. मँगो हॉलिडेज प्रसिद्ध आहे युरोप टूरसाठी, इथे कोणाला अनुभव आहे का त्यांच्यासोबत जाण्याचा. कोणती ट्रॅव्हल कंपनी चांगली पडेल युरोप बघण्यासाठी. सिनियर सिटीझन टूर योग्य पर्याय असेल का एकटे जाणाऱ्या ज्येनासाठी.

आई वडीलांनी २०१९ मेमध्ये वीणा वर्ल्ड बरोबर युरोप ट्रीप केली होती. ती सर्व वयोगटासाठी होती आणि तरुण जोडप्यांनी आईबाबांना छान मस्ती करायला लावली. जनरली प्रेक्षणीय ठिकाणांपासून बस लांब उभी करतात, त्यामुळे भरपूर चालावे लागते. आईबाबा ऍक्टीव्ह होते त्यामुळे प्रॉब्लेम आला नाही. चालण्याचे इश्यु असतील तर सिनीअर सिटीझन ट्रीप करावी किंवा ट्रीप बूक करताना चौकशी करावी.

त्यांच्या ट्रीपमधे एकीची पर्स पासपोर्टसहीत चोरीला गेली तेव्हा मॅनेजरने तक्रार वगैरे करायला मदत केली. पण ते सोबत थांबत नाहीत. ते शक्यही नसते. सुदैवाने रात्री पासपोर्ट सापडल्याने ते काही स्थळे मिस करून परत ट्रीपला जॉईन करू शकले.
बाबांचे फोन कार्ड ॲक्टिवेट होण्यात इश्यु आला तेव्हा ट्रीप मॅनेजरच्या फोनवरुन बाबांनी खुशाली कळवली.

मावशीनेही वीणा वर्ल्डतर्फे युरोप ट्रीप बूक केली होती व कोविडमुळे ती कॅन्सल झाली. तिचे क्रेडिट तसेच राहिले व कुठलेही ऍडीशनल पैसे न भरता तिने गेल्या वर्षी तिच ट्रीप केली. प्रसंगी जवळचे नातेवाईक असे क्रेडीट वापरू शकतात.

पहिलीच युरोप ट्रीप असेल, युरोपातील स्टॅंडर्ड स्थळे पहायची असतील, एक्झॉटिक किंवा ऑफबीट युरोप फिरायचा नसेल, एकटं फिरण्याची मानसिक तयारी/ इच्छा नसेल, शहरापासून लांब हॉटेल्स त्यामुळे स्वतःला संध्याकाळी एकटं फिरता येत नाही हे चालणार असेल व भारतिय जेवणच सर्व्ह करण्यामुळे तिथे जाऊन पंजाबी जेवणाची तयारी असेल वीणा वर्ल्ड चालेल.

मे ते जुलै बेस्ट सीझन ठरेल. पुढच्या सीझनसाठी साधारण ऑक्टोबरपासून जाहिराती येऊ लागतात. त्यावेळी बूक केले तर चांगला डिस्काउंट मिळतो. जसजशी सहलीची तारीख जवळ येते तसे रेट वाढतात. अर्ली बर्डसना एखाद ट्रीट मिळू शकते. अर्थात ते पूर्ण वीणा वर्ल्ड व मॅनेजरवर अवलंबून असते.
सामान बसमधे लोड-अनलोड करताना ड्रायव्हर वा ट्रिप मॅनेजर (ऍज पर पॉलिसी) मदत करत नाहीत. ज्येनांना सामान उचलायची सवय/मानसिक तयारी/शारिरीक क्षमता नसेल तर याचा जरूर विचार करावा.
अर्थात सहल बूक केल्यावर डू-डोन्टस ची व्यवस्थित लिस्ट मिळतेच. शिवाय कम्फर्टेबल पोषाख व शुज, पासपोर्ट कसा सांभाळावा, सामान किपत घ्यावे इ. सुचना सतत केल्या जातात. कान टोचणारे सोनार असल्याने त्या इफेक्टीव्ह ठरतात.

सीझनच्या बाबतीत-
- उत्तरेकडचे देश असतील तर जुलै हा पीक टाइम धरून एक दोन महिने पुढे मागे पर्यंत चालेल. इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड वगैरे
- दक्षिणेकडचे - भू मध्य समुद्राजवळचे देश असतील, तर स्प्रिंग मधे चांगले. मार्च-एप्रिल-मे. कदाचित सप्टेंबर. स्पेन, इटली वगैरे.

Pages